मूर्तीपूजा त्यागावी

मूर्तीपूजा त्यागावी

Submitted by बेफ़िकीर on 8 February, 2019 - 13:31

गझल - मूर्तीपूजा त्यागावी
=====

मूर्तीपूजा त्यागावी हा विचार करतो आहे
घरातल्या साऱ्या मूर्तींना अभय मागतो आहे

प्रचंड प्रस्तावना, पुढे आकांत देहबोलीचा
कविता ह्या शब्दाचा हल्ली अर्थ बदलतो आहे

जे न स्वतःला कळते ते कळते हे जग भासवते
भले कळो ना कळो मला मी, जगास कळतो आहे

उबग येत आहे त्याचा, जो हयात आहे सध्या
मेलेल्यांच्या जगण्याचा तिटकारा करतो आहे

एकेकाळी वाट जायची तिकडे चालत होतो
आता जेथे पाय टाकतो, वाट काढतो आहे

'बेफिकीर' होण्यासाठी बस गझल पुरेशी नसते
हो सच्चा माणूस, एक माणूस विनवतो आहे

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - मूर्तीपूजा त्यागावी