टाटा स्काय की इतर काही? काय घ्यावे?

Submitted by दक्षिणा on 22 January, 2019 - 08:36

मी सध्या टाटा स्काय वापरते आहे. (वर्षभराचे एकदम एच डी सहित) बरेच महाग पडते असे इतरांचे मत.
यातही माझ्याकडे इंग्रजी सिरियल आणि चित्रपटाचे सबस्क्रिपशन नाही. सध्या नेट्फ्लिक्स, अमॅझोन प्राईम च्या जमान्यात टाटा स्काय ठेवावे की बन्द करावे? मनोरंजनासाठी काय योग्य आहे?
इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची काहीही कल्पना मला नाही. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
कोण काय वापरते, किती खर्च येतो, सर्व्हिस कशी आहे त्याची ही माहिती द्यावी.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यामुळे सगळी चॅनेल्स महिनाभर घ्यायची गरज नाही. वीकएंडला फक्त मूव्ही चॅनेल घेतली तरी चालतील किंवा जेव्हा मॅच असेल तेवढ्या पुरतं स्पोर्ट्स चॅनेल घेता येईल. उत्तम आहे हा प्रकार. >>>>>
हे माहीत नव्हते. धन्यवाद.

मला एअरटेल आणि व्होडाफोन प्ले चे एकवर्षाचे ३५० चॅनलचे स्बस्क्रिप्क्शन फ्रि मिळाले आहे. आता मी मोबाईलवरच टिव्ही बघणार. तसेही युट्युबलाही लाईव्ह चॅनल्स बघता येतात.

mytatasky वेबसाईटला गेले की आधी तिकडेच घेऊन जातात. >>>> हो. एक दो तीन मार्चिंग सुरू करून देतात Lol

आता मी मोबाईलवरच टिव्ही बघणार. >>>> फुकट आहे तर मस्तच! पण टिव्ही स्क्रीनची मजा मोबाईल स्क्रीनमध्ये नाही. जशी काही सिनेमांच्या बाबतीत थियेटरची मजा टिव्ही स्क्रीनमध्ये नाही. प्रवासात असताना किंवा रात्री पेंगुळले असताना मोबाईल हातातून गळून पडायच्या अवस्थेत असताना ह्या कुशीवरून त्या कुशीवर लोळत मोबाईलवर टिव्ही चॅनेल बघायचं असेल तर ठिक आहे. कारण अख्खा टिव्ही आपण कुस बदलली की फिरवू शकत नाही Lol . असं मी कधीतरी ते भंकस तुपारे बघते zee5 वर. आता डोळा लागणार हे लक्षात आलं की तिथल्या तिथे बंद करून गाईगाई.

काल पासून सिलेक्शन केल्याप्रमाणे चॅनल्स दिसू लागली, एक्स्पायरी डेट सुद्धा वाढली !
ते १०० चॅनल्स वाल्या माहिती प्रमाणे, परत काही चॅनल्स कमी- जास्त करावी म्हणून बघावं तर काल दिवसभर डिशची साइट गंडली होती, अतिप्रचंड स्लो झाली होती !
ट्राय ने हस्तक्षेप करुन जे काही केलंय, ते नक्कीच चांगलं आहे, ग्राहकोपयोगी आहे. यामुळे मालिकांच्या दर्जात सुधारणा व्हावी अशी अपेक्षा ठेवावी का ! कारण फालतुपणा दाखवला तर लोकं मालिका तर बघणार नाहीतच, उलट धागाकर्तीप्रमाणे चिडलेच तर चॅनलच सब्स्क्राइब करणार नाहीत Happy

मालिकांचे निर्माते झोपणार नाहीत. किती हिट्स आहेत ते रोजरोज पाहणार आणि लेखकांना योग्य मसाला टाकायला सांगणार.
हळूहळू आइपीएलप्रमाणे बोली लावून कलाकार विकत घेतले जातील. तरंगत चालणार काही वटनट.

माझ्याकडे टाटास्काय आहे. मध्यंतरी चार महिने बाहेरगावी असल्याने बंद होते. टीव्हीची सवय नाहीये म्हणजे सिरीयल्स पहात नाही. फक्त फ्री चॅनेल्स पहाता येतील का ?

माझ्याकडे टाटास्काय आहे. मध्यंतरी चार महिने बाहेरगावी असल्याने बंद होते. टीव्हीची सवय नाहीये म्हणजे सिरीयल्स पहात नाही. फक्त फ्री चॅनेल्स पहाता येतील का ?

तरी १५३ रु घेणार.
पुर्वी ९९ + कोणतेतरी एक प्याक घेऊन काम होत होते.
--------
डीडीचे फ्री चानेल्स चालत असतील तर फक्त फ्रीडिशचा डब्बा (७००रु) घेउन या डिशला ( आकाशाकडे वर तोंड वासलेली पत्र्याची थाळी. ती कोणाचीही वापरता येते.) जोडायचा. डिशची दिशा थोडी बदलली की कनेक्ट होते.
रग्गड करमणूक कायम फुकट.

आमच्याकडे Videocon D2H आहे. (टाटा स्काय सर्व्हीसला वैतागून हे घेतले होते.)

Videocon D2H: हे TRAI चे वारंवार कानावर पडून आज निवांतपणे काय तो सोक्षमोक्ष लावावा म्हणून बसलो पण ते किचकट आहे बरेच असं दिसतेय. बेसिक १०० चॅनेल्स मध्ये त्यांनीच अनिवार्य DD चॅनेल्स भरून ठेवलेत (These are mandatory DD channels which will be part of every pack as per TRAI mandate असं म्हटलेय.)

आधी SUPER GOLD Basic Package आणि इतर काही निवडक असे दिवसाला साधारण ६ रुपये पडायचे (१८० मासिक).

मला ते सगळे काढून टाकून जे हवेत ते चॅनेल्स ठेवायचे होते. तर काही सिलेक्शननंतर लगेचच ते महिना ३५०/- च्या वर गेले. ते एका HD चॅनेल साठी दोन काऊंट करतात असे कळले. त्यांचे १०० डीडी चॅनेल्सचे एक कंपल्सरी पॅक आहे. त्यातले नको असलेले चॅनेल्स काढू शकत नाही. कस्टमरकेअर वाल्यांशी अजून संपर्क होऊ शकलेला नाही. (सगळे ग्राहक मदतीसाठी एकदम तुटून पडले असावेत असे वाटते.) सध्या आजचा अकाऊंट बॅलंस नोट करून यापुढे आहे तोच पॅक दिवसा कितीला पडतोय ते बघून नंतर बघू, या निष्कर्शापर्यंत आलोय.

इथे कुणी Videocon D2H वाले असतील आणि हे केले असेल तर लिहावे. आभारी राहीन.

थोडंस अवांतर आहे पण तरी एक विचारते. Zee5 वपरणाऱ्यानी प्रकाश टाकवा. हे महा हेवी app आहे माझा 1.5 gb डेटा असतो दिवसाला. एकदा मी फक्त दीड एपिसोड पहिला एक सिरीयल चा आणि माझा 1 gb डेटा संपला! कुणी वापरता का zee5 ? तुमचा काय अनुभव?

शंभर चॅनेल्स एकंदरीत घ्यायला आमचा केबलवाला देत नाहीये, भावाचा देतोय. आम्ही त्याला पेड प्लस फ्री मिळून १०० दे सांगतोय. तसं नाही करत. भावाकडे दुसरी केबल आहे, तिथे जास्त नीट आहे. त्यामुळे आम्हाला ३० रु मेंटेनन्स प्लस १०० च्या वर channel जाणार म्हणून २० असे पन्नास जास्त लागणार.

भावाला proper त्याच्या केबलवाल्याचा form दाखवणार आणि पुढच्या महिन्यात आमच्या केबलवाल्याला १०० मधेच adjust करून दे सांगणार.

मानव ह्यांनी वर लिहिल्याप्रमाणे नव्वद channel स दे सांगणार. हा महिना जाऊदे. ट्रायल घेतो.

आधी पेड चॅनल्स घेऊन मग मोफत ऍड करावीत आणि एकूण ९० च्या आसपास ठेवावीत. म्हणजे पुढे पेड चॅनल ऍड केले तर लगेच नेटवर्क फी वाढणार नाही. >>> हे असं करायला हवं.

@सान्वी, डेटा वापरून चानेल्स मालिका पाहणे हे महागच आहे.
--
Videocon D2H -
यांचे माहीत नाही. डिशटीवी आणि ही कंपनी कार्पोरेट लेवलसाठी एकच नवीन कंपनी असली तरी ग्राहकांची सेवावगैरे पुर्वीचेच ठेवले आहे. थोडे थांबले तर तिकडेही सुरळीत करून देतील.
----
सरकारी कायद्याप्रमाणे डीडीचे फक्त तीनचार चानेल्स दाखवणे अनिवार्य आहे, सर्व १८० नाही. नॅशनल,न्युज,डीडी इंडिया,भारती .
-------

सरकारी कायद्याप्रमाणे डीडीचे फक्त तीनचार चानेल्स दाखवणे अनिवार्य आहे, सर्व १८० नाही. नॅशनल,न्युज,डीडी इंडिया,भारती . >>> अच्छा, चांगली माहिती.

माझ्याकडे आहे व्हिडीओकॉन. पण मी नाही रिचार्ज करणार.

https://chrome.google.com/webstore/detail/jiotv-web-universal/nlkljmlnla...
जिओटीव्हीचे हे वेब अ‍ॅप्लीकेशन सुरू होणार आहे.

ऑनलाईन चॅनेल्स पाहण्यासाठी..
https://www.jio.com/en-in/apps/jio-tv

हे मी वायफाय वरून टीव्हीवर पाहू शकेन,

मोबाईलसाठी
http://m.jiotvweb.live/

मोबाईलसाठी जिओ टीव्ही अ‍ॅप आहे. त्यावर कुठलाही कार्यक्रम कधीही पाहता येतो. फक्त डीडी चे कार्यक्रम लाईव्हच पाहता येतात. नंतर दिसत नाहीत.

तोच पॅक दिवसा कितीला पडतोय ते बघून नंतर बघू, >>+11
माझ्या कडे सुद्धा videoconD2h आहे
सध्या तरी जूनेच पॅक सूरू आहे.
Customer care ला call लागलेला नाही.

वार्षिक पॅक घेतला असेल तर वर्ष पूर्ण होई पर्यंत आहे तो पॅक दाखवतील, मग नंतर सांगतील निवडायला.

मासिक असेल तर कदाचित त्या पैशात जुळणारा पॅक सुरू करतील, कॉल न करता.

माझ्या कडे विडिओकॉन आहे मी चॅनेल निवडून पोस्ट केले... त्याने केवळ माझा न्युज लोकमत बंद केला जो माझ्या सिलेक्शन मध्ये होता. बाकी चॅनेल तसेच आहेत.. मी एकही एचडी निवडला नव्हता तरी ३ एच डी चॅनेल सुरु आहेत.. विडिओकॉन कस्टमर केअरवाले नीट उत्तरे देत नाहीत.. आता एक महिण्याचे आहे बॅलन्स तेवढे वापरणार रिचार्ज करण्याबद्द्ल पुन्हा विचार करणार..

कुणी वापरता का zee5 ? तुमचा काय अनुभव?>> मी वापरते झी फाइव्ह पण घरी वायफाय आहे तेव्हाच बघते. मोबाइल डाटा वापरला जात नाही.
अ‍ॅप युजफुल आहे. फक्त तुपारे व राधिका बघते सकाळी रादर ऐकते.

रेकॅार्डिंग करतो कार्यक्रम तेव्हा तासाभराची फाइल साताठशे एमबी असते. काही चानेल्सचे ब्रॅडकास्ट अधिक रेझलुशनचे असते त्यांचे बाराशे एमबी होतात. जर हेच चानेल्स डिटीएचवर न पाहता नेटवर पाहिले तर एवढा डेटा नक्कीच जाईल.

मी मला हवी असलेली सगळी (१०-१२) चॅनेल्स फेव्हरिट करून ठेवलेली असल्याने सर्फिंगही तेवढ्याच कुंपणात होत होते. काल सहज इतरांसारखा आपल्याकडेही काही घोळ आहे का हे पहावे म्हणून सुरुवातीपासून एकेक चॅनेल पाहत गेलो, तर मला सगळी एचडी चॅनेल्स दिसत होती.
त्याबद्दल काही सूचना मिळालेली नसल्याने त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन पाहिलं, तसं नवीन पॅक्स सिलेक्ट कराची घोषणा पुन्हा एकदा दिसली.
मला सुचवलं गेलेलं पॅक फक्त फ्री टु एअर चॅनल्सचं होतं. ते +इंग्लिश एच डी पॅकेज+ मला हवी ती अन्य चॅनेल्स निवडली. यात मला एबीपी माझा दिसलं नाही. स्टार वर्ल्ड प्रिमियरही नाही. आता ते पॅकेजमध्येच आहे का हे कळलं नाही. बहुतेक निवडलेलं पॅकेज उद्यापासून लागू होईल.
ज्यांनी पॅकेज निवडलेलं नाही, त्यांच्या सध्याच्या पॅकेजशी मिळतंजुळतं पॅकेज उद्यापासून लागू होईल, अशी एक सूचना मध्येच दिसलेली.

वेब इंटरफेसमध्येही बरेच बदल झालेत. काही वेळा ओटीपी मागितला. कधी पासवर्ड चालला. चॅट ऑप्शन एकदा फेसबुक चॅटमध्ये घेऊन गेलं . तिथे बॉट होता. पण आज आधीसारखं चॅट करता आलं. पण त्याचा उपयोग झाला नाही.

TATA sky वरून धागा smart tv, firestick कडे गेलाच आहे, म्हणून हा प्रश्न विचारत आहे, विषयांतर करण्याचा कोणताही हेतू नाही.

Jio Media Cable कोणी वापरली आहे का? Jio Gallery मध्ये विक्रीसाठी केव्हा उपलब्ध होईल?

Jio Media Cable ही अशी cable आहे, ज्यामुळे JioPhone (१५०० रु. वाला) TV ला जोडता येतो. (HDMI किंवा RCA) आणि JioPhone वरून कार्यक्रम लावून त्याचा आनंद मोठ्या TV वर घेता येतो.

चॅनल निवडले
सर्व लोकप्रिय चॅनल महाग आहेत.ते स्कीप मारले.लहान मुलांचे पोगो (छोटा भीम) आणि निक(मोटू पतलु) महाग असले तरी घेतले.251 काहीतरी झाले महिना.

Pages

Back to top