Submitted by _आनंदी_ on 4 February, 2019 - 05:23
घरामधे बाल्कनी/ गॅलरी मधे कपाट बन्वायच आहे.. प्लास्टिक / फायबर वाले तकलादु असत्तात आणी खुप सामनही ठेउ शकत नाही / बसत नाही.. पाऊस लागण्याची पुर्ण शक्यता आहे.. त्यामुळे लाकडी कपाट नाही करु शकत.. काही आयडिया असतिल तर शेअर करा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मरिन प्लायवुड वापरुन कपाट करा
मरिन प्लायवुड वापरुन कपाट करा. पाण्यामुळे आजिबात फुगत नाही.
मार्बल किंवा ग्रेनाईटचे करा,
मार्बल किंवा ग्रेनाईटचे (कडप्पा) करा, मस्त टिकावु असतात
१. ग्यालरीत कपाट.
१. ग्यालरीत कपाट.
२. कशाला?
आय मीन त्यात ठेवणार काय???
३. मजला कोणता? ग्यालरी कोणत्या दिशेला? (आपल्याकडे नैऋत्य मोसमी वार्यांमुळ पाउस येतो. अर्थात साऊथ-वेस्टरली विंड्स. पूर्व्/उत्तर वगैरे दिशेला ग्यालरीत पाणी येणार नाही.
हे सांगा मग पुढे उत्तर लिहितो.
वॉटरप्रूफ्/मरीन प्लाय चे शिक्के मारलेली बोगस प्रॉडक्ट्स भरपूर उपलब्ध आहेत. खरं वॉप्रू नसेल तर पंचाइत होते, त्यापेक्षा मग सिंथेटीक प्लास्टीक शीट्स परवडतील.
आरारा! योक नंबर.
आरारा! योक नंबर.
पूर्व आग्नेय आणि दक्षिण
पूर्व आग्नेय आणि दक्षिण तीन्ही दिशा ना ओपन आहे गॅलरी .. थोडी मोठी आहे.. नॉर्मल गॅलरी पेक्षा..
पाऊस तर येतोच आत पर्यंत.. कपडे अंथरूण ई. ठेवण्यासाठी करायचा आहे कपाट.. घर छोटं आहे.. पुरत नाही घरातील कपाट
8 वा मजला
8 वा मजला
Gallery enclose करून नाही
Gallery enclose करून नाही घेता येत का?
मग ऊनपावसाचा प्रश्न नाही.
हे बेकायदेशीर नाही का?
हे बेकायदेशीर नाही का?
गॅलरी enclose नाही करता येणार
गॅलरी enclose नाही करता येणार थोडी मोठी आहे सो खूप दारांनी भरून जाइल.. ज्यांनी केलं त्यांच्या इथे बघितलं .. अंधार पण होतो ..
बेकायदेशीर का? गॅलरी मध्ये कपाट?
आनंदी,
आनंदी,
अंथरुण, कपडे वगैरे ठेवण्यासाठी कपाट करायचे तर उघड्या, पाऊस येणार्या गॅलरीत योग्य होणार नाही. मोठी गॅलरी आहे तर सरकत्या काचा लावून बंद करुनच असे करणे योग्य होईल. पाऊस नसेल तेव्हा काचा सरकवल्या की उजेडही येइल. भिंतीवर अॅलुमिनमचे शेल्विंग आणि त्यावर प्लॅस्टिकचे टोट्स अशी उभी रचना बाल्कनीच्या भिंतीला करता येइल पण पावसाळ्यात ते देखील गैरसोईचेच कारण तुम्हाला कपडे वगैरे साठी स्टोरेज हवे आहे. ट्रंकेत पांघरुणे ठेवून तेच कॉफी टेबल म्हणून वापरणे असे काही करणे शक्य आहे का? किंवा दारामागे उभे कप्पेवाले कापडी ऑर्गनायझर ज्यात लहान कपडे ठेवता येतील आणि इतर कपड्यांसाठी आहे त्या कपाटात जागा उपलब्ध होईल.
तुम्हाला घराचा लेआउट देता आला तर इथली मंडळी योग्य उपाय सुचवतील .
हम्मम बरोबर आहे.. लेआऊट
हम्मम बरोबर आहे.. लेआऊट देण्याचा प्रयत्न करते
हॅालच्या खिडक्या बॅल्कनीत
हॅालच्या खिडक्या बॅल्कनीत उघडत असणार, बंद केल्यावर हॅालमध्ये अंधार येतो.
खिडकीच्या खाली बसता येईल एवढे उंच (२८ इंच) ४८ इंच लांब,१८ इंच खोल कपाट बनवले तर ?
गॅलरीत कपाट कापडी वस्तू साठी
गॅलरीत कपाट कापडी वस्तू साठी करणे चांगली कल्पना नाही. रोज लागणारी अंथरूण, पांघरूण आहेत का? तसं नसेल तर extra सामान loft वर ठेवायचे . पाहुणे आले की काढायचं आणि ते आहेत तोवर गुंडाळी करून ठेवायचे. पसारा होतो पण पर्याय नाही.लहान मुलांची खेळणी, extra गॅस सिलेंडर ह्या गोष्टी त्या गॅलरीत/कपाटात ठेऊ शकता. घरातील clutter कमी केले तर जागा पुरेल का?
>>गॅलरी enclose नाही करता
>>गॅलरी enclose नाही करता येणार थोडी मोठी आहे सो खूप दारांनी भरून जाइल.. ज्यांनी केलं त्यांच्या इथे बघितलं .. अंधार पण होतो ..
एक कल्पना आहे - बाथरूम मधे शॉवर सेपरेटर असतो तसं बाल्कनीच्या एका बाजूला अॅक्रिलिक शीट लावायचं आणि तिथेच साईडला कपाट करायचं. म्हणजे उजेडही येईल, कपाट पावसापासून वाचेल, आणि सगळी बाल्कनी एन्क्लोझ करावी लागणार नाही.
तीन पर्याय.
तीन पर्याय.
जिथे कपाट किंवा अन्य काही करायचंय तेवढा भाग स्लायडिंग विंडोज किंवा बंद करता येणार्या काचेच्या खिडक्यांनी एन्क्लोज करता येईल.
खूप अवजड कपाट नाही बनवलं तर पावसाळ्याचे तीन-साडेतीन महिनेच ते घरात कुठेतरी ठेवता येईल.
कपाट वॉटरप्रूफ करण्यासाठी सनमायका लावता येईल.
त्या बाल्कनीत सिट आउट सारखे
त्या बाल्कनीत सिट आउट सारखे डे बेड करायचे. बालकनी साइजचेच बेड/ दिवाण बनवून घ्यायचे. खाली स्टोअरेज स्पेस करायची. वर एक फोम्
गादी कुशन्स ठेवुन दिवसा पडायला पुस्त के वाचायला गाणी ऐकायला बाहेर बघायला आरामाची जागा होईल. पण सरकत्या काचा लावून बाल्कनी एन्क्लोज करावी हे बरे नाहेतर मुले ज्येना पेट्स खाली पडू शकतात . ग्रिल तरी हवे.
जास्तीचे सामान नको असल्यास काढून टाका कोनमारी मेथडने. माझ्याकडे निव्वळ दोन जास्तीच्या जाड चादरी/ रग आहेत जे मी आता थंडी गेली की बॉक्स बेड मध्ये भरऊन टाकेन.
>>कोनमारी मेथडने म्हणजे?
>>कोनमारी मेथडने
म्हणजे?
काचा लाउन घेणे हा पर्याय
काचा लाउन घेणे हा पर्याय उत्तम. आम्ही पण कपाट गॅलरीतच केले आहे. पण आमची गॅलरी दोन दिशेने ओपन आणि दोन बाजुने भिंत असल्याने कपाट दोन्ही भिंतीच्या बाजुने केले आहे.
>>कोनमारी मेथडने
म्हणजे?... अधिक माहितीसाठी गुगल किंवा विकिपिडियावर कोनमारी सर्च करा. किंवा मेरी कोंडो चे स्पार्क ऑफ जॉय नावाचे पुस्तक आहे किंवा नेटप्लिक्स वर सिरिझ आहे.
सोप्या भाषेत सांगायचे तर घर कसे लावायचे आणि जे नको आहे ते टाकुन देणे म्हणजे घर प्रसन्न राहाते म्हणजे कोनमारी
सध्या मुलीला कोनमारी शिकवत आहे. अत्तापर्यन्त कपाटातिल ३०% जागा कमी झाली आहे.
धन्यवाद सगळ्यांना.. मस्त
धन्यवाद सगळ्यांना.. मस्त ऑपशन्स .. विचार करते
<सध्या मुलीला कोनमारी शिकवत
<सध्या मुलीला कोनमारी शिकवत आहे. अत्तापर्यन्त कपाटातिल ३०% जागा कमी झाली आहे.>
गोडबोड. जागा ३०% वाढायला हवी.
Conmari works well. I am
Conmari works well. I am working on our house using her videos as motivation.
Also its a good feeling that our house is not as untidy as those in the serials.
कोन मारी वर धागा काढला आहे.
कोन मारी वर धागा काढला आहे. तिथे लिहा लोक्स.