Submitted by supriya19 on 8 August, 2008 - 12:43
जुन्या हितगुजवर हा धागा होता. ईथे दिसला नाही आणि एक प्रश्न होता म्हणुन मी हा धागा सुरु केला.
admin, काही चुक झाली असेल तर तुम्ही हा विभाग हलवु शकता.
माझ्याकडच्या नाँनस्टीक भांड्यांवर बाहेरील बाजुने पिवळसर्-लालसर आणि तळाला(बाहेरील) काळे डाग पडले आहेत. हे डाग कसे काढायचे याविषयी कोणि काही माहीती देउ शकेल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते डाग
ते डाग भांड्याबाहेर सांडलेलं तेल जळून झाले असावेत. ओव्हन स्वच्छ करायला मिळणार्या स्प्रेने निघू शकतील.
आईशप्पथ! दिवसभरातलं पहिलं नॉर्मल(?) पोस्ट टाकलं! है शाब्बाश!
धन्यावाद
धन्यावाद म्रुण्मयी.
सुप्रिया,
सुप्रिया, ते भांड मिठ टाकलेल्या कोमट पा ण्यात थोड वेळ भिजवुन ठेवलस तरी सुद्धा डाग निघतिल.
मैत्रिणीं
मैत्रिणींनो, मदत करा. डाळीला किडे येऊ नयेत म्हणून इथे काय करावे? (अमरीकेत) काही मिळते का?
सुनिधी,
सुनिधी, थोडसं भाजून थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून वापर.
जमल्यास आधी धुवून मग कोरडे करून, भाजून थंड कर
सुनीधी अग
सुनीधी
अग फ्रीज मध्ये ठेव्.....फ्रोझन केले तरी चालेल..(शक्यतोवर किड लागायच्या आधि ठेवलेस तर फारच छान)
मी तर असेच करते.
धन्यवाद
धन्यवाद चिनु-राणी, मी फ्रीझर मधे पण टाकले आहे थोडे व भारतातुन बोरीक पावडर मागवली आहे.. तसेच भाजण्याचा आळस करुन सध्या तरी कडक उन्हात ठेवले १ दिवस..
अग इथे पण
अग इथे पण बोरिक पावडर मिळते ना? बोरीक ऍसिड या नावाने? आमचा तबलेवाला वापरतो तबल्यासाठी.
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
हो की काय..
हो की काय.. बघायला हवी.
अग इथे पण
अग इथे पण बोरिक पावडर मिळते ना? बोरीक ऍसिड या नावाने? आमचा तबलेवाला वापरतो तबल्यासाठी---
...आणि आम्ही वापरतो कॅरम खेळण्यासाठी...........
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
बोरीक पावडर कुठे मिळेल इकडे
बोरीक पावडर कुठे मिळेल इकडे अमेरिकेत? डाळीला किड लागु नये म्हणुन अजुन काय वापरता येइल बोरीक पावडर ऐवजी?
बोरिक पावडर सहसा वापरु नये.
बोरिक पावडर सहसा वापरु नये. ती निघून जाण्यासाठी डाळ जेवढी धुवावी लागते, तेवढी घुतली जात नाही.
तूरडाळीला थोडे एरंडेल वा गोडे तेल चोळून ठेवले, वा त्यात हिंगाचा खडा ठेवला तर किड लागत नाही. चण्याची डाळ शक्य असेल तर दिवसभर उन्हात ठेवावी.
हिंगाचा हा उपयोग माहिती
हिंगाचा हा उपयोग माहिती नव्हता. आता नक्किच प्रयोग करुन बघणार, धन्यवाद दिनेशजी.
मंडळी एक शंका होती. बेकिन्ग
मंडळी एक शंका होती. बेकिन्ग पावडर, बेकिन्ग सोडा आणि खायचा सोडा या मध्ये कै फरक आहे... यापैकी एखाद्याला दुसर्याचे सब्स्टिट्युट म्हणून वापरु शकतो का? कुठ्ल्या पदर्थन्मध्ये आणि कसे?
गोडगोजिरी हे
गोडगोजिरी हे वाचा
http://chemistry.about.com/cs/foodchemistry/f/blbaking.htm
मी पाकिस्तानचा बासमती तांदूळ
मी पाकिस्तानचा बासमती तांदूळ आणला आहे. त्यावर लिहिलेली पद्धतः
१. भात आणि सहापट पाणी झाकण न लावता शिजायला ठेवा
२. पाच ते दहा मिनिटाने जास्तीचे सगळे पाणी टाकून द्या. ( ड्रेन करा, असे लिहिले आहे.)
३. नंतर थोडा वेळ झाकण लावून शिजवा.
अजून असे केले नाही. उद्या करून बघेन. अशा पद्धतीने भात चांगला होतो का?
पण असे पाणी ओतून दिल्यावर
पण असे पाणी ओतून दिल्यावर त्यातील सर्व जीवनस्त्त्वे निघून जातात ना???
होय, मलाही तसेच वाटते. म्हणून
होय, मलाही तसेच वाटते. म्हणून इथे विचारले. आपल्यापैकी असे कुणी करत नसणार. पण आता पाकिटावरच छापले आहे, तर एकदा बघुया करुन.
पण असे पाणी ओतून दिल्यावर
पण असे पाणी ओतून दिल्यावर त्यातील सर्व जीवनस्त्त्वे निघून जातात ना??? >>
बरोबरच आहे हे... मी ते पाणी भाजी शिजवायला वापरते.. कारण पाणी काढले की भात सुट्टा होतो
पुलाव / बिर्याणी साठी मोकळा
पुलाव / बिर्याणी साठी मोकळा भात करायचा असेल तर तो अश्या पद्धतीने करतात. बासमती तांदूळ शक्यतो खास प्रसंगी वापरला जातो. रोजच्या खाण्यासाठी तो पोटाला चांगलाही नाही. मग कधीतरी तांदूळातील सत्व फेकली गेली तर काय फरक पडतो असा विचार असेल त्यांचा कदाचित
रोजच्या खाण्यासाठी तो पोटाला
रोजच्या खाण्यासाठी तो पोटाला चांगलाही नाही.
पोटाला चांगला नाही म्हणजे ?
इथे (मालदीवला) साधा भात मिळतो तो लवकर शिजत नाही. बासमतीशिवाय पर्याय नाही ( आणि तोही पाकिस्तानचा बासमती ! ) मी नेहमीच्याच पद्धतीने करतो. काल सहज म्हणून पाकिट वाचले, तर त्याच्यावर ही पद्धत मिळाली...
सुगरणींनो मला मदत कराल का
सुगरणींनो मला मदत कराल का प्लीज?
सध्या मी मुलांच्या अॅक्टिविटीज नि क्लासेस मुळे वीकेंडला खूपच बिझी बी झालेय. मग सारखं बाहेर खाणं होतं नि मला ते फारसं आवडत नाही. तर वीक डे ला काही पदार्थ करून ते फ्रीझ करता येतील का? मी नेहमी ताज्याचाच आग्रह धरते पण आता अगदीच नाईलाज आहे. तर कोणत्या भाज्या अशा गोठवता येतील नि किती दिवस साधारण राहतील फ्रीजरमधे? खोबर्याच्या वाटणाच्या भाज्या राहतात का चांगल्या? इतर कोणत्या गोष्टी फ्रीझ करता येतील? जरा आयडियाज द्याल का?
कोणीच फिरकत नाही वाटतं इथे...
कोणीच फिरकत नाही वाटतं इथे... या संबंधात एक बी बी होता जुन्या माबोवर तो पण सापडत नाहीय
सुमॉ, विपू बघ.
सुमॉ, विपू बघ.
सुमॉ इथे आहे बघ बरीच चर्चा
सुमॉ
इथे आहे बघ बरीच चर्चा जुन्या मायबोलीवर. मी स्वतः पदार्थ फ्रीझ क्वचितच करते. रविवारी बरेच प्रकार करून ठेवते.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/60019.html?1206369040
सिंडे, इथे लिहायला काय होत ग,
सिंडे, इथे लिहायला काय होत ग, आता किती कष्ट पडतील सगळ्यांना... सुमॉची विपू बघा मग परत तुझी मग त्यात काही मजेदार दिसल तर परत तिथे.. छे छे मला वेळ नाहिये आत्ता :p
सुपर मॉम मी वान्गी, भेन्डी,
सुपर मॉम मी वान्गी, भेन्डी, गवार तसेच कडधान्याच्या उसळी फ्रीझ करते. वरण, साम्बार आणि भात पण चान्गला फ्रीझ होतो. फ्रीझ करताना air tight भान्डी वापरा. चपात्या ठेवायच्या असतील तर Glad च्या press n seal मध्ये ठेवून नीट सील करा. डोश्याचे पीठ पण छान फ्रीझ होते. डोसे करायच्या २ दिवस बाहेर काढून रेफ्रीजरेटर मध्ये ठेवा. मी फ्रीझ केलेले पदार्थ २ ते ३ आठवड्यात सम्पवते. तुमच्याच रेसिपिने केलेले वान्ग्याचे भरीत मी १ महिन्याने बाहेर काढले, ते उत्तम होते.
बासमति तांदुळ हा इतर
बासमति तांदुळ हा इतर तांदळांच्या तुलनेत लो ग्लायसेमिक इंडेक्क्स असलेला तांदुळ आहे म्हणजे ह्यातिल साखर रक्तात उशिरा मिसळते (इतर तांदळांच्या तुलनेत). पाकिस्तानातिल एका प्रांतातला (नाव आठवत नाहि, बहुदा सिंधु नदिचे खोरे जिथे आहे तिथे) बासमति हा जगातला सर्वोत्तम बासमति समजला जातो. पाकिटावर लिहल आहे त्या पध्धतिने (म्हणजे तांदुळ जास्त पाण्यात शिजायला ठेवुन उकळि आल्यानंतर पाणि काढुन टाकणे) शिजवल्यास तांदळातिल जास्तिचा स्टार्च निघुन जातो आणि भात मोकळा होतो. वजन कमि/नियंत्रणात ठेवण्यासाठि ह्या पध्धतिने भात केल्यास त्याचे दुष्परिणाम काहि प्रमाणात कमि होतात (मात्र तरिहि भात हा कधितरि च खावा रोज खाण्यात नुकसान जास्त). हे अस करतांना जीवनस्त्व अर्थातच नष्ट होतिल पण मुळातच तांदुळ पॉलिश करतांना (साल काढुन टाकण्याचि प्रक्रिया) त्यातिल जीवनसत्व बर्याच प्रमाणात आधिच नष्ट झाले असतात, बाहेरुन घातले असल्यास (फोर्टिफिकेशन) गोष्ट वेगळि.
मंजु, बासमति तांदुळ रोज खाणुआस का योग्य नाहि ते सांगशिल का? मी हे याआधिहि ऐकल्य पण कारण कुणिच सांगत नाहि, फक्त पोटाला चांगला नाहि एवडच म्हणतात.
बासमतीने वात वाढतो अस कधीतरी
बासमतीने वात वाढतो अस कधीतरी ऐकलेल. नक्कि माहित नाही.
पण तो सोना मसुरी खायला जम वैताग येतो त्यामुळे आम्ही बासमतीच खातो. अजुन कुठला दुसरा प्रकार आहे का? इथे कायम हेच दोन प्रकार दिसतात.
गोडगोजिरि, बेकिंग सोडा
गोडगोजिरि,
बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा = सोडिअम बायकार्बोनेट. हा आणि टारटरिक अॅसिड (क्रिम ऑफ टारटर) मिळुन बेकिंग पावडर बनते. बेकिंग सोडा हा बेकिंग पावडरला पर्याय असु शकत नाहि मात्र बेकिंग पावडर उपलब्ध नसल्यास/ खुप जुनि असल्यास (बेकिंग पावडर हि पहिल्यांदा वापरायला घेतल्या दिवसापासुन सहा महिन्यात शक्यतो वापरावि नाहितर तिचा परिणाम कमि होत जातो) १/४ टी स्पुन बेकिंग सोडा + १/२ टी स्पुन क्रिम ऑफ टारटर हे मिश्रण १ टी स्पुन बेकिंग पावडरला पर्याय म्हणुन वापरता येइल मात्र मिसळल्यानंतर लगेचच वापरावे.
Pages