मॉलबाहेर बसतो भिकारी सदा

Submitted by बेफ़िकीर on 22 January, 2019 - 11:27

गझल - मॉलबाहेर बसतो भिकारी सदा (२२.०१.२०१९)
=====

मॉलबाहेर बसतो भिकारी सदा
मी तसा या जगाच्या किनारी सदा

ते सुधारायचा मार्ग देते खरा
बोलणे लागते जे जिव्हारी सदा

श्वास झोपेत बहुतेकदा थांबतो
जाग येते नि जाते उभारी सदा

जीव माझा न देतो न घेतो कधी
देत घेतो स्वतःची सुपारी सदा

मोकळ्या पाखरांना भुरळ पाडते
पिंजऱ्यातील माझी भरारी सदा

मोल मिळतेच साधेपणाचे इथे
येत कामास नाही हुशारी सदा

सांज सांजावल्यांची कराया सुखद
मावळत राहतो भरदुपारी सदा

दुःख देऊन जग दुःख घेते इथे
आमची या ठिकाणी उधारी सदा

गाजती शेर शोधून माझे जुने
आशयाची करत वाटमारी सदा

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< मॉलबाहेर बसतो भिकारी सदा
मी तसा या जगाच्या किनारी सदा
...
श्वास झोपेत बहुतेकदा थांबतो
जाग येते नि जाते उभारी सदा
...
मोकळ्या पाखरांना भुरळ पाडते
पिंजऱ्यातील माझी भरारी सदा
...
दुःख देऊन जग दुःख घेते इथे
आमची या ठिकाणी उधारी सदा
>>>

वाह, क्या बात है. सुंदर.

सगळेच शेर मस्त!

मोकळ्या पाखरांना भुरळ पाडते
पिंजऱ्यातील माझी भरारी सदा

छानच!!

श्वास झोपेत बहुतेकदा थांबतो
जाग येते नि जाते उभारी सदा

जीव माझा न देतो न घेतो कधी
देत घेतो स्वतःची सुपारी सदा

दुःख देऊन जग दुःख घेते इथे
आमची या ठिकाणी उधारी सदा

>>>> वा, खुप छान

वाह, खूप सुंदर बेफिजी...
मॉलबाहेर बसतो भिकारी सदा
मी तसा या जगाच्या किनारी सदा> मतला सुंदर..ही उपमा अतिशय आवडली...विचार करूनही सुचली नसती...

श्वास झोपेत बहुतेकदा थांबतो
जाग येते नि जाते उभारी सदा> हे नीट समजले नाही...उभारी स्वप्नांची आहे ?

सांज सांजावल्यांची कराया सुखद
मावळत राहतो भरदुपारी सदा> सुंदर..." सांजावल्यांची" काय शब्द बसवलायत..!

दुःख देऊन जग दुःख घेते इथे
आमची या ठिकाणी उधारी सदा> वाह वाह!

गझल आवडली.