इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
i10 बद्द्ल कोणीच काही बोलत
i10 बद्द्ल कोणीच काही बोलत नाहीये..:अओ:
नॅनो च्या तीन गाड्यांना आग
नॅनो च्या तीन गाड्यांना आग लागली असे टीवीवर दाखविले होते. दील्ली लखनौ व चंदिगड बहुतेक. कंपनी शॉर्ट
सर्किट म्हण्ते व सप्लाय केलेल्या गाड्यान्चे ऑडिट् करणार म्हणे. निकाल मिळे परेन्त नॅनो बाजुला ठेवावी.
स्विफ्ट डीजायर अनुमोदन.
आय-टेन आणि रिट्झ बद्दल याआधी
आय-टेन आणि रिट्झ बद्दल याआधी झालेली चर्चा--
alpana | 1 July, 2009 - 21:22
हुंडाय आय टेन (पेट्रोल टॉप मॉडेल- अॅस्टा) आणि मारुती रिटझ झेड एक्स आय पैकी कोणती गाडी घ्यावी. माझा स्वतःचा कल मारुतीकडे आहे. नवर्याला पण रिटझ गाडी तांत्रिकदृष्ट्या आवडली आहे आय टेन पेक्षा पण त्याला गाडी मागुन दिसायला नाही आवडली. त्यामानाने आतुन आणि बाहेरुन दिसायला आय टेन जास्त चांगली वाटतेय. आय टेनचा ही परफॉर्मंन्स चांगला आहे असे ऐकण्यात आहे. कुणाला काही अनुभव आहे का?
ह्या दोन्हीपैकी कोणती गाडी घ्यावी. किंमत दोन्ही गाड्यांची जवळपास सारखीच आहे. रिटझ ५-१० हजार महाग पडतेय.. (पण मग गादी थोडी मोठी आहे न..)
adm | 1 July, 2009 - 21:25
मी दोन्ही गाड्या बघितल्या होत्या.. मला आय टेन खूप आवडलेली.. performance आणि reviewes पण चांगले आहेत आय टेन चे.. फक्त ह्या दोन्ही गाड्या माझ्या बजेट पेक्षा महाग होत्या सो मी शेवटी झेन एस्टीलो घेतली..
SAJIRA | 4 October, 2009 - 12:30
![ritz.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5883/ritz.jpg)
![i10.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5883/i10.jpg)
मारुतीने (खरे तर सुझूकीच) स्मॉल कार्सची पिलावळच काढली आहे. छोट्या गाड्यांत पेट्रोल, डिझेल मिळून दोन-अडीच डझन पर्याय दिले आहेत. त्यांचं आणि डिझेल कार्सचं फारसं जमत नव्हतं आजवर. पण 'स्विफ्ट' कशी काय जमली देव जाणे. (फियाटचं इंजिन लावल्यावर जमला बहूधा खेळ एकदाचा). रिट्झ आय-टेनपेक्षा निश्चितच चांगली आहे. लुक्स तर अगदी किलिंग आहेत. बघा खाली- पहिली रिट्झ, दुसरी आय-टेन.
ह्युंडाई कार्स आर सेड टु बी 'पेपर कार्स'. सँट्रो आणि वरना या दोन गाड्या मी वापरल्या आहेत, त्यामुळे मलाही असाच अनुभव आला आहे. (या टीकेला वैतागूनच त्यांनी नवीन 'आय ट्वेन्टी' काढली असावी. स्टेबिलीटी, स्ट्रेंग्थ, सेफ्टी याबाबतीत ती बरी आहे.)
अडमा, एस्टिलो पण आता पुन्हा कपडे बदलून आणलीये त्यांनी. तु कधी घेतलीस? (पण खरं तर त्यापेक्षा ए-स्टार का नाही घेतलीस?)
amitdesai | 4 October, 2009 - 12:33
आय १० चा रिपोर्त उत्तम आहे. कंपनीतल्या तिघांकडे आहे. रिटझ् चा फर्स्ट हॅन्ड रिपोर्ट माहित नाही, पण सर्विस नेटवर्क आणि स्पेअर पार्ट प्राईझच्या बाबतीत मारुतीला तोड नाही.
alpana | 5 October, 2009 - 10:01
रिटझ् पेट्रोल वर्जन मस्त आहे. मार्केटमध्ये पेट्रोल व्हर्जन स्विफ्ट्ला मागे टाकतेय विक्रीच्या संदर्भात (इति: भाऊ, मारुतीमध्ये सेल्स अन मार्केटिंग मध्ये आहे). आता स्विफ्टमध्ये पण के सिरिज इंजिन येणार आहे पेट्रोल व्हर्जन मध्ये. आम्ही अडीच महिने झाले रिटझ् घेवून. गाडी खरच मस्त आहे.
नॅनोचे सध्या बुकिंग बंद आहे.
नॅनोचे सध्या बुकिंग बंद आहे. ज्या दिड लाख लोकांनी नॅनो बुक केल्या आहेत, त्यांनाच वाटप कार्यक्रम २०११ पर्यंत चालणार आहे. लॉटरी दिल्याच्या थाटात त्यांनी मलाही पत्र पाठवले आहे- "अभिनंदन! तुम्हाला टाटा नॅनोची अॅलॉटमेंट झाली असून तुमची गाडी तुम्हाला ऑक्टोबर २०१० मध्ये पंडित ऑटो, बारामती (!!) इथून मिळेल!!"
दुसरे म्हणजे नॅनो एक लाखात नाही. एक लाख ही बेसिक मॉडेलची 'एक्स फॅक्टरी' किंमत ठेऊन टाटांनी आपले वचन पुर्ण केले आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ऑन-रोड-पुणे किंमती खालीलप्रमाणे-
नॉनएसी - १.४८
एसी - १.७८
एसी विथ पॉवर विंडोज, कलर बंपर - २.०३
बाकी, आग-बिग लागल्याचे वाचण्यात-ऐकण्यात नाही.
२०१० मध्ये पंडीत ऑटो बारामतीत
२०१० मध्ये पंडीत ऑटो बारामतीत शाखा काढणार असततील रे!
(का आहेच आत्ताही? :अओ:)
ए-स्टार अगदी रीसेन्ट आहे ना, खूप कमी दिसतात. अजूनही मारुतीला रीसेल व्हॅल्यू खूपच चांगली असल्यामुळे जुनी विकून तीच घ्यायकडे कल आहे.. माझ्या ओळखीत केवळ रीसेल हा निकष लावून २ कुटुंबांनी अल्टो घेतली आहे.
शेव्हर्लेची हिरवी गाडी कोणती?
मध्यम गाडीत सुझुकीची एसएक्स४ जबरी आहे. किंमत ८ लाख.
पंडित ऑटोची शाखा आहेच तिथे.
पंडित ऑटोची शाखा आहेच तिथे. भाऊ म्हटला, 'डिलीव्हरी' घेताना त्यांना विचार- बारामती ते पुणे दरम्यान एखादा घाट लागला तर गाडी पुण्यापर्यंत येईल का धडपणे?!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण मला माहितीये, एवढी वाईट नसणार ती गाडी. घेतल्यानंतर १०-१५ हजार ऑन घेऊन विकता येईल, हा माझा सरळ हिशेब. (डिलीव्हरीज वाढल्यावर, रस्त्यावर दिसायला लागल्यावर तिची मागणी वाढते की नाही, ते बघाच. बुकिंग अजून २ वर्षे तरी ओपन नाही होणार तिचे). पण तोपर्यंत दुसर्या कंपनीने तशीच गाडी काढून भसाभसा वाटायला सुरूवात केली तर काय, याचे उत्तर अजून ढगातच आहे.
फियेस्टा, एसेक्स४, लोगान, अल्टो या गाड्या आता घेऊ नयेत. २०१० मध्ये त्यांची मॉडिफाईड व्हर्जन्स बाजारात येणार आहेत.
अल्टोला उत्तम पर्याय म्हणजे ए-स्टार किंवा शेवर्ले-स्पार्क. पण थोऽऽडेसे बजेट वाढवून रिट्झ घ्या. (असे माझे म्हणणे).
हिरवी गाडी काय भानगड आहे? शेवर्ले-स्पार्क का?
हिरवी गाडी काय भानगड आहे?
हिरवी गाडी काय भानगड आहे? शेवर्ले-स्पार्क का?>>>>>>>>
वैनीला बहुद्धा ग्रीन कार म्हणायचय.
त्यान्ची एक वोल्टा होती पण किम्मत जास्त होती ना?
कुठलीहि गाडी घ्या, पण हॉर्न
कुठलीहि गाडी घ्या, पण हॉर्न चांगला मजबूत पाहिजे. शिवाय रहदारीतून पटापटा वाट काढायची म्हणजे
स्टिअरिंग रिस्पॉन्स चांगला पाहिजे, गाडी कशी नागीणी सारखी वळवळत गेली पाहिजे.
म्हणजे सगळे सभ्य, सुशिक्षित, श्रीमंत लोक घुसाघुसी करत, इतरांची, अगदी पादचार्यांची सुद्धा पर्वा न करता, डावी उजवी बाजू न बघता, जमले तर लाल दिवा तोडून, गाडी दामटतील. आणि स्वस्तातले घाणेरडे पेट्रोल घेऊन सगळीकडे नुसता काळा धूर ओकत नि आवाज करत इकडून तिकडे जातील. आणि हो, श्रीमंत नि सभ्य लोकांचे दुसरे लक्षण म्हणजे गाडीतील सिगारेट (अगदी जळत्या सुद्धा) नि इतर कचरा बेफिकीरपणे खिडकीतून रस्त्यावर फेकून द्यायचा!
म्हणजे कसे, अमेरिकेतहि असे होतेच, पण ते लोक ना सभ्य, ना श्रीमंत, ना सु च काय नुसते शिक्षित सुद्धा नसतात. समाजातला अत्यंत खालचा थर! पण अमेरिकेत असे होते, मग भारतच मागे का?? म्हणून तेव्हढेच उचलायचे.
लुक्सचा मुद्दा प्रचंड रिलेटीव
लुक्सचा मुद्दा प्रचंड रिलेटीव आहे, रिट्झ आणि आयटेन मधे आयटेन मला तरी जबरी वाटते.पुन्हा बुट्स्पेसचा प्रॉब्लेम आहेच. बादवे, टाटांच्या गाड्यांना विशेषतः इंडीगोला रिसेल वॅल्यु काय आहे?
अमृता, ती पडून राहीलेली विस्टा केवढ्याला देणार?
आगाऊ, लोगान लूक्स म्हटले तर
आगाऊ,
लोगान
लूक्स म्हटले तर तस्सा काही प्रोब्लेम नाही.पुढचा भाग बाकी सर्व मोठ्या(भारतातील) गाड्या सारखाच आहे.मूळ डीझाईन रेनो फ्रांस चे आहे.
जर फारच निषिद्ध असेल तर झायलो अथवा स्कोर्पिओ का नाही पाहत?
'होंडा जाझ' किवा मारुती
'होंडा जाझ' किवा मारुती स्विफ्ट यात कोनती prefer करावी ?
'होंडा जाझ' आणि 'मारुती
'होंडा जाझ' आणि 'मारुती स्विफ्ट' यांच्यात माझ्या मते तुलना होणार नाही. जाझ ही फक्त पेट्रोलमध्ये उपलब्ध असलेली 'प्रिमियम स्मॉल कार' (किंमत - ८ लाख) आहे; तर स्विफ्ट ही पेट्रोल (४ ते ५ लाख) व डिझेल (५ ते ६ लाख) मध्येही उपलब्ध असलेली लोकप्रिय स्मॉल कार. जाझ ही मल्टियुटिलिटी म्हणता येईल अशी, आतमध्ये अन बुटमध्ये (फ्लेक्झिबल सीटस अॅरेंजमेंटमुळे) जास्त जागा असलेली गाडी आहे.
जाझची स्पर्धा पुंटो(डिझेल), आय-२०, स्विफ्ट डिझायर, नवीन इंडिगो मांझा यांच्याशी आहे. तर स्विफ्टची रिट्झ, आय-१०, पुंटो(पेट्रोल), इंडिका विस्टा यांच्याशी आहे.
आगाऊ, डिझेल इंडिगोला बरी रिसेल व्हॅल्यु आहे. टाटाचे न पेट्रोल इंजिन्सचे आतापर्यंत जमत नव्हते. फियाटची इंजिने लावल्यावर जमते की नाही, ते बघायला पाहिजे.
>>>> म्हणजे गाडीतील सिगारेट
>>>> म्हणजे गाडीतील सिगारेट (अगदी जळत्या सुद्धा) नि इतर कचरा बेफिकीरपणे खिडकीतून रस्त्यावर फेकून द्यायचा!
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
झक्की, सिग्नल किन्वा कुठे थाम्बून वा गाडी न थाम्बविता वेग कमी करुन, दरवाजा थोडाच उघडून खाली रस्त्यावर पानाची पिन्क टाकायची अस्ते, ते विसरलात की तुमच्या अमेरिकेत नस्ते?
बर लोगानलाच वायपर "लेफ्टह्याण्ड ड्राइव्ह" च्या बेताने लावलेले आहेत ना?
\\D ऐवजी //D हे असे? डी म्हणजे ड्रायव्हरची जागा उजवीकडे
मी आपली (चर्चा न करता) सुमो घेतली १३ वर्षे जूनी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सत्तरकिलो उप्स, सत्तर हजारात मिळाली, नॉट ब्याड ना?
दरवाजा थोडाच उघडून खाली
दरवाजा थोडाच उघडून खाली रस्त्यावर पानाची पिन्क टाकायची अस्ते >>
ही कलाकारी मला कधी जमेल त्याचा विचार करतो आहे.
बर लोगानलाच वायपर "लेफ्टह्याण्ड ड्राइव्ह" च्या बेताने लावलेले आहेत ना? >> बरोब्बर! वायपर्स सुलटे करण्याचेही कष्ट घेतलेले नाहीत. (त्यामुळे होते काय, की ऑफ साईडची काच मस्त पुसली जाते, अन ड्रायव्हरसाईडचा अप्पर-राईट कोपरा तसाच!
) नशीब, लेफ्ट हँड ड्राईव्ह तसेच उचलून भारतात नाही आणले. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नुसतेच 'अॅव्हरेज बरे' या मुद्द्यावर एखादी गाडी वर्षानुवर्षे चालण्याचे दिवस संपले आता.
लिंभौ, अगदी 'लेफ्ट अँड राईट' स्टाईलीत वापरून टाक ती गाडी. (म्हणजे 'वापर' असे म्हणतोय. 'टाक' असे नाही.
). बाजूच्यांना घाबरवून सोडत, हायवेला, रपारप हाणायला लई भारीये ती गाडी!
>>>> लिंभौ, अगदी 'लेफ्ट अँड
>>>> लिंभौ, अगदी 'लेफ्ट अँड राईट' स्टाईलीत वापरून टाक ती गाडी.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तस करायच तर दोन मान्ड्यान्च्या मधी पकडलेल्या वॉटरब्यागित "१८० मिलि" पाण्यासोबत टाकुन सिप सिप करत, मधेच समोरच्या स्पीडोमीटरच्या कप्प्यात ठेवलेला चकणा अधेमधे तोन्डात टाकावा लागेल!
मग लेफ्ट अन राईट काय की अप अन डाऊन काय..... सगळ सारखच!
एनिवे, एककाळ असाही होता की सोबत भरलेली वॉटरब्याग असल्याशिवाय मला गाडी चालविताच यायची नाही
पण या सुमोला पॉवर स्टिअरिन्ग नाहीये, तसच टायर ते रुन्द कोणते अस्तात ना? काय बर नाव त्यान्च? तस्ले आहेत, त्यामुळे स्टिअरिन्ग फिरवायला बर्यापैकी ताकद लागते अन कर्व्हिन्ग स्प्यानही मोठा आहे, अगदी जुन्या काळातले यष्टी ड्रायव्हर जसे दोन्ही खान्दे इकडून तिकडे हलवत कमरेपासून पाठीतुन वळत ते भल थोरल चाक फिरवायचे तसच काहीस होतय!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अन काय असेल ते असो, कदाचित
अन काय असेल ते असो, कदाचित मला भासही होत अस्तील, पण या तेरा वर्षे जुन्या सुमोत खच्चून माणसे कोम्बुन वजन जरी वाढवले तरी वेगात अस्ताना वळणावर वा अन्य कारणाने थोडाजरी हेलकावा बसला तर गाडी आत्ता पलटी होते कुशीवर की नन्तर अशी भिती वाटत रहाते!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
, अन ट्युबचि कन्डीशन माहीतच नाहीये किती पन्क्चरवाल्या आहेत ते!
टायरची अगदी वाट लागते.
पळवायला मात्र मस्तच आहे गाडी, नव्वद शम्भर सहज गाठते अन या गाडीत बसल्यावर वेग जराही जाणवत नाही जो इतर छोट्या गाड्यात (जसे की झेन्/अल्टो वगैरे) जाणवतो.
पण सत्तर-ऐन्शीहून जास्त वेग घेत नाही सध्या कारण टायरची कन्डीशन - एक नवा, बाकी झिजून XXबाबा झालेले
माझ्यामते तर भारतातील कुठलाच रस्ता त्याच्या पृष्ठभागाच्या खडबडीत्/उन्चसखल पणामुळे सत्तरच्या वर वेग घेण्याच्या लायकीचा नाही!
अशाही शन्केला जागा आहे की टायरकम्पन्यान्चा धन्दा व्हावा म्हणूनच की काय रस्ते असे खराब बनवतात!
इथं एवढ्या सगळ्या हाय्-फाय
इथं एवढ्या सगळ्या हाय्-फाय गाड्यांबद्द्ल चर्चा चालल्यात. माझी आल्टो सकाळपासून हट्ट धरून बसलीय, माजंबी काय तरी येऊ द्या म्हनून. मी किती समजवतोय तिला, की 'बाई तू मध्यमवर्गीय घरातली पोरगी आहेस. आपण कशाला मिसळावं त्या श्रीमंताच्या तवेरा, लोगान, होंडा सिटी असल्या पोरींमध्ये? तू मला आवडतेस ना! २०-२२ अॅव्हरेज, चालवण्याचा आनंद, सुरक्षित प्रवास देतेस. मग झालं तर' पण तिची समजूत काही पटत नाही. आता काय करावं बरं?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
LOL प्रभुणे अहो,
LOL प्रभुणे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहो, डेबोनेरसारख्या, गेला बाजार बॉलिवुड सिनेपाक्षीकान्च्या गुळगुळीत रन्गित मुखपृष्ठावरील टन्च नट्यान्चे फोटो जसे दूरुनच बघुन मग विसरुन जायच अस्त तश्याच प्रकारे या गाड्यान्ची चर्चा देखिल आपल्याकरता नाहीच्च अशी मनाची खातरजमा केव्हाच करुन टाकायची अस्ते!
मध्यमवर्गीय घरातली पोरगी...
मध्यमवर्गीय घरातली पोरगी... LOL.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अल्टो हे अनेक वर्षांपासून गाड्यांच्या विक्री तक्त्यात नंबर एकची जागा टिकवून ठेवलेलं प्रॉडक्ट. त्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. व्हॅल्यु फॉर मनीचे मस्त उदाहरण. २०१० मध्ये बरेच बदल करून नवीन अल्टो येतेय, असे ऐकले.
माझी पहिली गाडी अल्टोच होती. अडीच वर्षे वापरली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिंबू भौ, पटतंय हो मला, पण
लिंबू भौ,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पटतंय हो मला, पण आमच्या छोटुशा आल्टोची समजूत कशी काढायची?
ए साजिर्या! लिही की लेका दोन चांगल्या ओळी आमच्या गरीबाच्या पोरीबद्द्ल. बघावं तेव्हा पाच लाखांच्या पुढ्चं बोलत असतो ते.
अरेच्चा! माझी पोस्ट
अरेच्चा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझी पोस्ट पडण्यापूर्वीच साजिर्याने लिवलं बी.
मनकवडा हा याचाच ड्यु आयडी असेल काय?
योगेश. खरं आहे. या गाडीने
योगेश.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरं आहे. या गाडीने इतिहास घडविला, अन आपल्यासारख्या अनेक मध्यमवर्गीयांचं गाडीचं स्वप्न पुरं केलं. तिचं नाव घातलं आता वरती.
'स्पार्क' ने मात्र अल्टो विरुद्ध कंबर कसली आहे. शेवर्ले च्या शोरुममध्ये गेलात, तर त्याच किंमतीत अल्टोपेक्षा स्पार्कमध्ये प्रत्येक फीचर कसे वरचढ आहे, ते तुम्हाला सिद्ध करुन दाखवतील.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साजिर्या, माझ्या अल्टोने
साजिर्या,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या अल्टोने तुला छानशी पप्पी दिलीय. दोन कारणांसाठी
१) दखल घेतल्याबद्द्ल २) तिच्या बहिणीला अडीच वर्षे नांदवल्याबद्द्ल
नै त काय प्रभुणे, गप्पा बघा
नै त काय प्रभुणे, गप्पा बघा ना या सगळ्यान्च्या, पाच दहा लाखाच्या खाली कोणी काही बोलतच नाही!
कस जमायच हे गणित?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
त्यातुन ते तिकडचे युएसवाले घुसले की मग ते बोलणार डॉलरच्या भाषेत, आपण आपला कवटाळून धरणार आणे/रुपयाचा हिशेब!
झालच तर बाजारात शेव्हरलेट्/होन्डा अन कुणाकुणाच्या पन्चवीस लाखापासून पुढल्या गाड्या आहेतच!
आयला, आख्ख्या आयुष्याची काय? पितरान्सहीत खानदानाची कमाई एकत्रीत करुन मोजली तरी या रक्कमान्च्या जवळपासही पोचता येत नाहीये मला!
अन या अस्ल्या गाड्या रस्त्यावर दौडत अस्ताना मधे मधे मला माझि सुमो किन्वा झेन घुसवणे म्हणजे इत्क ऑकवर्ड वाट्ट म्हणून सान्गु ना!
त्यात अजुन एक भिती, साला अस्ल्या गाड्यान्ना चूकून धक्का बिक्का लागला तर दुरूस्तीचा खर्च किती बसेल माथी????? एक माणुस मेला गाडीखाली तर कायद्याने जेवढी नुकसानभरपाई द्यावी लागणार त्याहुन कितीतरी जास्त या गाड्यान्ची मिजास पुरवावी लागेल!
मी तर म्हणतो की या गाड्यान्ना स्वतन्त्र मार्ग ठरवुन द्यावेत!
एनिवे, माझी लहानपणापासूनची इच्छा आहे!
बाकी काही नाही तरी किमान एक घोडागाडी पक्षी टान्गा असावा स्वतःचा!
किमान बैलगाडी तरी???
रिटायरमेण्टनन्तर लिम्बीच्या गावी जाऊन रहायच तर बैलगाडी हवीच हवी!
पण प्रभुणे भाऊ, त्याच बजेट देखिल लाखाच्या घरात सहज जात बर का!
हल्ली बैलजोडी पन्नास हजारापर्यन्त मिळू शकते, बाकी पन्नासमधे वर्षाचे दाणापाणी अन बैलगाडी! गाडी पार्किन्गला अन बैल पार्किन्गला स्वतन्त्र जागा हवी ते वेगळच!
झक्कीन्ना सान्गाव का फायनान्स करायला?
इकडे कधी आले की फुक्कट हव्वीतेवढी राईड मारुन आणू बैलगाडीतून!
आयला, या लिंभोला प्रत्येक
आयला, या लिंभोला प्रत्येक बीबीमध्ये एक वेगळी लेन काढून द्यायची का आपण? सातारा रोडला पीयम्ट्यांसाठी आहेत तशा? जेएम, एफसी आणि इतर काही रस्त्यांवर पण करणार आहेत म्हणे. लिंभाऊनेच काय घोडं मारलं मग?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
घोडागाडीची आयडिया बाकी भारी हां. मी पण कधीतरी घेणारच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इकडे कधी आले की फुक्कट
इकडे कधी आले की फुक्कट हव्वीतेवढी राईड मारुन आणू बैलगाडीतून!
>> लिंबू! झक्की गाडीत बसले तर बैल उधळणार नाहीत याची काळजी घ्या. तुमच्या नकळत झक्की हळूच बैलांना पराण्या टोचतील. माबोवर 'व्हेटरन बुलफायटर' म्हणून प्रसिद्ध आहेत ते.
रिटायरमेण्टनन्तर लिम्बीच्या गावी जाऊन रहायच तर बैलगाडी हवीच हवी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> एवढं काही टोचून बोलायला नको हो वैनींच्या गावाकडच्या रस्त्यांना. तुम्ही रिटायर होईपर्यंत ते रस्ते आमचे नेते कशे झ्याक करून टाकतील बगतच र्हावा.
<<सत्तर हजारात मिळाली, नॉट
<<सत्तर हजारात मिळाली, नॉट ब्याड ना?>>
नॉट ब्याड? अहो माझी पहिली गाडी, मी फक्त दीडशे डॉ. ला घेतली नि तेंव्हा डॉ. चा भाव फक्त ७ रु. होता, म्हणजे करा हिशेब केव्हढ्याला पडली. इतकेच काय एक वर्षानी नव्वी कोरी, पावर स्टीअरिंग, ऑटोमॅटिक, पावर ब्रेक्स, रेडियो, कॅसेट प्लेयर इ. सर्व असलेली फोर्ड मॅव्हरिक फक्त ३००० डॉ. ला घेतली.
आता मात्र 'मध्यमवर्गीय घरातली पोरगी' सुद्धा ३०,००० डॉ. ला पडते! नि भाव आहे ४५रु. डॉ. चा! करा हिशेब!! मग कळेल मी एकच गाडी चार चार वर्षे का वापरतो.
<<आमचे नेते कशे झ्याक करून टाकतील >>
कोण हो तुमचे नेते? ते ठाणे, नागपूरचे कमिशनर का? ते तर निवृत्त झाले म्हणे! 'खर्याची दुनिया नाही' ना.
बैलगाडीत बसल्याचे आठवत नाही, पण टांग्यात मात्र १९५५ पूर्वी कल्याणमधे अनेकदा बसलो आहे. शिवाय कल्याणचे त्यावेळचे रस्ते, म्हणजे आजकाल खेड्यात देखील बरे रस्ते असतील. पुण्याच्या टांग्यात बसायला जास्त गंमत, पण गेले बिचारे.
अहो लोकहो,माझ्या वायपर च्या
अहो लोकहो,माझ्या वायपर च्या भळ्भळत्या जखमे वर मीठ नका चोळू हो!!!
खर सान्गू -ते माझे पहायचे राहून गेले गाडी घेताना,पण -really does not make a difference-
मला सेकंड हँड गाडी घ्यायची
मला सेकंड हँड गाडी घ्यायची आहे. सध्या कन्फ्युजन आहे. सध्या प्रेफरन्स छोट्या मॉडेल मधे कोणतीही मारुती किंवा होंडाई चालेल (टाटा नको). कोणती घ्यावी, कोणाकडुन घ्यावी, किंमत कशी डिल करावी.. कृपया मला मदत करा.
तसेच कोणी माबोकरांच्या ओळखीत कोणाची गाडी जर विकण्यास असेल तर नक्की कळवा...
~ योगिता
झक्की, अहो तेवढ्यात किंमतीत
झक्की, अहो तेवढ्यात किंमतीत आता रिमोटची खेळण्यातली गाडी पण येत नाही बरं का. लिंभाऊ म्हणतो त्याप्रमाणे बैलगाडी सुद्धा लाखात जाते आता. तुमच्या ताकदीचे (म्हणजे तोलामोलाचे) बैल पाहिजे असतील, तर लाखाच्या वर पण जाईल. आणि पुण्यात नुसतेच टांग्यात बसायलाच काय, पण रिक्षात, पीएम्टीत, सारसबागेत, ट्रेनीत बसायला, सायकलवर, महापालिकेत, रस्त्यावर, फुटपाथवर, यस्टीस्टँडवर, अमृततुल्य टपरीवर इत्यादी अनेक ठिकाणी बसायला फार्फार मजा येते. एकंदर पुण्यात कोणत्याही गोष्टीत फार मजा येते, हे आम्ही तुमच्या कानीकपाळी आम्ही ओरडत असतो, पण ते तुम्हाला पटतच नाही.
असो.
योगिता, तुमचे बजेट किती आहे, यावर सारे काही अवलंबून आहे. दहा वर्षांपुर्वीची मारुती-८०० पन्नास हजारांतही मिळेल आणि १-२ वर्षे जुनी मारुती स्विफ्ट किंवा सँट्रो अडीच-तीन लाखांच्या आसपास मिळेल. (या रेंजमध्ये अल्टो, वॅगनआर, झेन याही गाड्य आल्याच). आता तीन लाख जुन्या गाडीसाठी घालवायचे, तर जवळपास तेवढ्याच किंमतीत येणार्या अल्टो, एस्टिलो, स्पार्क या नवीन गाड्या का घेऊ नयेत, हाही एक प्रश्न आहेच. शिवाय जुनी गाडी पुर्ण कॅश देऊन घेणार की लोन करणार, हाही. (जुन्या गाडीसाठी लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतो).
'महिंद्रा-फर्स्ट चॉईस' कीम्वा 'मारुती- True व्हॅल्यु' मध्ये बघा. सगळ्या कंपन्यांच्या सेकंडहॅंड कार्स विशिष्ट टर्म्सवर गॅरंटी-वॉरंटीवर विकत मिळतात, त्या किंचित किंमतीने महाग असतात, पण खात्रीशीर. एजंटकडून घेणे शक्यतोवर टाळा. तशी वेळ आलीच, तर माहितगार लोकांना सोबत घेऊन, विचारून, खात्रीच्या गॅरेजवाल्याकडून टेस्टिंग करून, मगच घ्या. ओळखीतली गाडी मिळाली, तर उत्तमच.
१) आधी बजेट ठरवा.
२) कॅश की लोन ते ठरवा.
३) त्यानंतर जास्तीत जास्त किती वर्षे जुनी गाडी चालू शकेल, ते ठरवा.
(यावरून क्र.१ आणि क्र.२ वर पुन्हा विचार करा.)
४) पेट्रोल की डिझेल ते ठरवा. (किती वापरणार, रनिंग किती होणार यावरून ठरवा.)
५) मग ब्रँड आणि प्रॉडक्ट (कंपनी आणि गाडी) ठरवा.
महिन्याला ५ ते ८ हजार हप्ता भरायची तयारी असेल, तर फक्त ५०००० ते १००००० भरून ३ ते ५ लाखांची गाडी दाराला लागू शकते, हाही हिशेब मनात ठेवा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages