Submitted by थॅनोस आपटे on 17 January, 2019 - 06:19
सध्या मायबोलीवर निरुद्देश आणि बिनकामाचे असे असंख्य धागे भारंभार निघत आहेत. पहिले पान तर अशाच धाग्यांनी भरून गेलेले दिसते. एका आयडीने तर कहर केला आहे. त्या आयडीचा एक विशिष्ट राग त्यातून लपून राहीलेला नाही.
अशा विकृत उद्दिष्टांसाठी मायबोलीला वेठीस धरण्याचा प्रकार प्रशासनाने खपवून घेऊ नये ही नम्र अपेक्षा आहे. या आधी जुने धागे जर एकाच आयडीमुळे वर आले ( मग ते चांगले का असेनात) तर त्या आयडीस यमसदनास पाठवण्याची कारवाई झालेली आहे. थोडक्यातच स्पॅम या प्रकाराबाबत पूर्वीप्रमाणे कारवाई व्हायला हवी अशी माझी तरी इच्छा आहे. या भावनेशी कोण कोण सहमत आहे ?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुने धागे वर येण्यात काही गैर
जुने धागे वर येण्यात काही गैर नसावे. एखादा नवीन सभासद कदाचित जुने धागे वर काढू शकतो त्यावर प्रतिसाद देऊन.
हो, पण एकाच सभासदाकडून अनेक बिनकामाचे धागे निघत असतील तर त्यांना समज देण्यात यावी.
माझ्याकडून तीनच धागे वर
माझ्याकडून तीनच धागे वर निघतील :|
अशा विकृत उद्दिष्टांसाठी
अशा विकृत उद्दिष्टांसाठी मायबोलीला वेठीस धरण्याचा प्रकार प्रशासनाने खपवून घेऊ नये ही नम्र अपेक्षा आहे
++100
त्यांनीच काढलेल्या एका
त्यांनीच काढलेल्या एका धाग्याच्या समर्थनार्थ असे धागे येत असावेत.. जेणेकरुन मायबोलीवर लोक आलेच नाहीत तर बरे..
> या आधी जुने धागे जर एकाच
> या आधी जुने धागे जर एकाच आयडीमुळे वर आले ( मग ते चांगले का असेनात) तर त्या आयडीस यमसदनास पाठवण्याची कारवाई झालेली आहे. > खरंच? कधी झालं हे?
===
जर ऍडमीनना वेळ असेल तर दरदिवशी एक ठरावीक वेळ ठरवून त्याआधी २४ तासात आलेले 'ऍडमीनच्यामते बिनकामाचे असलेले धागे' विरंगुळा/तत्सम ग्रुपमधे टाकता येतील. फक्त ग्रुपसाठी दिसतील असे.
माबोसाठी Artificial
माबोसाठी Artificial intelligence based automatic spam detection/classification डेवलप करावे का?
:programmer बाहुली:
मेरीच गिनो, तुमच्याशी सहमत
मेरीच गिनो, तुमच्याशी सहमत आहे. असे भारंभार धागे काढण्यासाठी ऍडमीनने समज द्यायला हवी. तरीही न ऐकल्यास, आयडी सस्पेंड करायला हवा.
जुन्या मायबोलीशी कितीही तुलना करायची नाही ठरवलं तरी हल्ली बऱ्याच नवीन आयडीनी भारंभार निकृष्ट लेखन करून वैताग आणला आहे. अर्थात उत्कृष्ट / निकृष्ट हे फारच सापेक्ष असल्याने आणि माबोवर QC वा सेन्सॉर नसल्याने अशी निवड करणे खूप अवघड आहे, त्यामुळे चाललं आहे ते पहायचं आणि हवं ते वाचायचं.
नवीन आयडीमध्ये (माझ्यासाठी नवीन, कारण मी बऱ्यापैकी गॅप नंतर परत आले आहे किंवा माझ्यासारखच आयडीनी नावं बदलली असतील तर कल्पना नाही) सुद्धा खूप माहितीपूर्ण आणि छान लिहिणारे लेखक/लेखिका, प्रतिसादकर्ते आहेत. (उदा. डॉ कुमार, हायझेनबर्ग, शाली, चैतन्य रासकर, किल्ली. अनु जुनी आहे, पण तिचं लिखाण हल्लीच वाचते, पूर्वी तिला फक्त प्रतिसादात ओळखत होते. प्रतिसादकर्त्यांमध्ये हरपेन, मानव, मेरीच तुम्ही स्वतः, किरणउद्दीन, सिमबा, all time favorite - अरारा, अनु, भरत, सस्मित, अमा, रश्मी).
बाकी बरेच नवीन जण मात्र उगीच एकेक पानाच्या आणि एक पठडीच्या कथा लिहायच्या म्हणून लिहायच्या याने नुसती माबो पानं भरताहेत पण वाचनाचा आनंद नाही मिळत. यावर उपाय नाही, माझं मत विचारलंही नाहीए, पण आज एका ताईंच्या प्रत्येक पानावर कमीत कमी एक कथा पडलेली पाहिली आणि तुमच्या लेखानिमित्ताने भडास निघाली एवढंच.
वर अँमीची पोस्ट वाचून आठवलं
वर अँमीची पोस्ट वाचून आठवलं की तिचा उल्लेख माझ्या पोस्टमध्ये नाही, पण तिचे प्रतिसादही मी आवर्जून वाचते. असे अजूनही बरेच जण असतील, पण ते सुद्धा जुनेच आहेत. नवीन मध्ये बोकलत चा उल्लेख करेन. माझी करमणूक होते.
माझा उल्लेख केल्याबद्दल आभारी
माझा उल्लेख केल्याबद्दल आभारी आहे मीरा, अजुन लिखाण करण्यासाठी हुरूप येइल
अर्थात उत्कृष्ट / निकृष्ट हे फारच सापेक्ष असल्याने आणि माबोवर QC वा सेन्सॉर नसल्याने अशी निवड करणे खूप अवघड आहे, त्यामुळे चाललं आहे ते पहायचं आणि हवं ते वाचायचं. ++ हे अगदी पटलय
कोणता आयडी उडाला आहे?
कोणता आयडी उडाला आहे?
मायबोलीवर नवीन आणि
मायबोलीवर नवीन आणि माझ्यासाठी नवीन असे दोन बुकमार्क ब्राउजरात केले आहेत. (मागच्या अपग्रेडमध्ये ही सोय केलेली आहेच. चाळण हातात आहे.)
लेखाच्या शीर्षकावरून तो धागा उघडायचा का नाही हे ठरतंच बहुतेक.
पुस्तक प्रदर्शनांत विभाग असतातच. आपण योग्य विभागातच घुसायचं अन्यथा भाराभरच असतात पुस्तके.
च्रप्स, नाव लक्षात
च्रप्स, नाव लक्षात राहण्यासारखा नव्हता. तसेही अनेक आयडी लक्षात राहत नाहीत
SRD - बरोबर. आजपर्यंत नाहीत का अनेक टाईमपास म्हणून काढलेल्या धाग्यांकडे दुर्लक्ष केले ? पण या वेळी टुकारपणा सोबतच मायबोलीकरांना खिजवण्यासाठी म्हणूनच खास एक आयडी धागे काढत सुटला आहे असे दिसते. त्याला कुठलेच सभ्यतेचे संकेत लागू नाहीत. ही बंडखोरी पण नाही, इरीटेटिंग आहे खूप.
किल्ली - त्यामुळे चाललं आहे
किल्ली - त्यामुळे चाललं आहे ते पहायचं आणि हवं ते वाचायचं >>> अलिकडे चांगले धागे खूप विरळा झालेत. त्यात एखादा आलाच आणि बघण्यात आला नाही तर अशा धाग्यांनी तिस-या चौथ्या पानावर फेकला जातो.
तुमच्या लेखानिमित्ताने भडास
तुमच्या लेखानिमित्ताने भडास निघाली एवढंच. >> खरं म्हणजे हा उद्देश आहेच. धुडगूस घालणा-यांना इतरांच्या भावनांची कल्पना यावी. अर्थात त्याने उपयोग होईल का याबाबत शंका आहेच.
पहिल्या पानावर ते ग्यारी शनया
पहिल्या पानावर ते ग्यारी शनया धारकका, नाहीतर तुपारे , अंताक्षरी वगैरे धागे असतात. अमानवीय, टिपापा आणि बेकरी कधीच दुसऱ्या पानावर दिसत नाहीत. थँक्स टू दिज फोकस, त्यामुळं हे भारंभार धागे वाले कमीत कमी दुसऱ्या पानावर जातात तरी ☺️
च्रप्स - योग्य निरीक्षण आहे.
च्रप्स - योग्य निरीक्षण आहे. पण त्यांचा त्रास नसतो. ज्यांना मालिकांत रस नाही त्यांना रोज फक्त हेच धागे बघणे जिकीरीचे असू शकते. चांगले धागे येत राहणे हे सोल्युशन आहे.
एखाद्या धाग्याला follow कसे
एखाद्या धाग्याला follow कसे करावे? किंबहुना तशी सोय आहे का मायबोली वर?
पुस्तक प्रदर्शनात भाराभर आणि
पुस्तक प्रदर्शनात भाराभर आणि भुईला भार पुस्तकेच समोर येत राहिली तर संपुर्ण प्रदर्शन अशाच प्रकारच्या पुस्तकांचे आहे असे समजून नव्याने भेटी देणारे येणार नाहीत, चांगली पुस्तके भुईला भार पुस्तकांखाली सतत दबली जाणार असतील तर जुनी माणसे काही काळानंतर ती पुस्तके वर काढायचा कंटाळा करतील.
चांगली पुस्तके भुईला भार
चांगली पुस्तके भुईला भार पुस्तकांखाली सतत दबली जाणार असतील तर जुनी माणसे काही काळानंतर ती पुस्तके वर काढायचा कंटाळा करतील >> खरे आहे
एखाद्या धाग्याला follow कसे
एखाद्या धाग्याला follow कसे करावे? किंबहुना तशी सोय आहे का मायबोली वर --- आहे, धाग्याच्या खाली निवडक 10 त नोंदवा अशी लिंक आहे, त्याच्यावर क्लिक केल्यावर तो धागा तुमच्या साठी बुकमार्क केला जातो, आणि नंतर तुम्ही तो धागा तुमच्या प्रोफाइल मधून डायरेक्ट बघू शकता
शोर्ट टर्म सोल्युशन (थोड्या
शोर्ट टर्म सोल्युशन (थोड्या तांत्रिक बदलांची गरज):
नवीन धाग्यांचे प्रकाशन थेट न करता मॉडरेटेड ठेवून, धागा प्रशानाने संमत केला तरच प्रकाशित होईल.
लॉंग टर्म सोल्युशन (मोठ्या तांत्रिक बदलांची गरज):
माझ्या मते इतर अनेक कारणांसोबत तांत्रिक मर्यादा हे सुद्धा एक महत्वाचे कारण आहे. पहिल्या पानावर विविध ग्रुप्सचे ब्लॉक्स व त्यातील धागे (उदाहरणार्थ बातम्या डॉट कॉम वर जसे विविध वृत्तपत्रांचे ब्लॉक्स व त्याखाली त्यातील बातम्या दिसून येतात काहीसे तसे), त्यातील धाग्यांचे विविध प्रकारे सॉर्टिंग करता येण्याची सोय, धाग्यांची रेटिंग पद्धती, लाईक्सची सोय, ब्लॉकिंगची (धागे तसेच आयडी) सोय या व अशा सुविधा दिल्यास या समस्यांचे बर्याच अंशी निराकरण होईल. पण हे सगळे करणे हा संपूर्णपणे मायबोली प्रशासनाचा धोरणात्मक निर्णय असेल. कारण यात खर्च आहे, वेळ आहे, श्रम आहेत.
> पहिल्या पानावर ते ग्यारी
> पहिल्या पानावर ते ग्यारी शनया धारकका, नाहीतर तुपारे , अंताक्षरी वगैरे धागे असतात. अमानवीय, टिपापा आणि बेकरी कधीच दुसऱ्या पानावर दिसत नाहीत. थँक्स टू दिज फोकस, त्यामुळं हे भारंभार धागे वाले कमीत कमी दुसऱ्या पानावर जातात तरी > अंताक्षरी, टिपापा, बेकरी वगैरे वाहते धागे ग्रुपपुरतेच मर्यादित आहेत.
तुपारे आणि इतर मराठी मालिकांचे धागे सार्वजनिक असल्याने सदस्य नसलेल्यानादेखील दिसतात आणि ते बघून लोकं सदस्य बनायला नको म्हणतात. मला दोन तीनजण भेटलेत असे
===
मीरा, धन्यवाद आवर्जून उल्लेख केल्याबद्दल
थोडक्यात गुलमोहरचे पेज वेगळे
थोडक्यात गुलमोहरचे पेज वेगळे उघडले पाहीजे. चालू घडामोडींचे वेगळे.. असेच ना ?
@हिम्सकूल धन्यवाद
@हिम्सकूल धन्यवाद
हे भारंभार धागा केवळ दिसू
हे भारंभार धागा केवळ दिसू नयेत म्हणून मी त्यांच्यावर क्लिक करते, पण परत बदलून किंवा काहीतरी प्रतिसाद म्हणून वर येतंच राहतात. धागा ब्लॉक करता आला असता तर किती बरं झालं असतं!!
कोणता आयडी उडाला?
कोणता आयडी उडाला?
अरे मला पण कंटाळा आलाय
अरे मला पण कंटाळा आलाय बिनकामाच्या धाग्यांचा. बरं एका गृपातून बाहेर पडले तिथेच असे भारंभार धागे बघून तर आता कुठल्याही गृपात धागे उघडले जातायत असं लक्षात आलंय. अगदी "आपली मायबोली" मध्येही.
हे धागे चुकवायचे तर मायबोलीचं सोडून द्यावी लागेल.
बरं एका गृपातून बाहेर पडले
बरं एका गृपातून बाहेर पडले तिथेच असे भारंभार धागे बघून तर आता कुठल्याही गृपात धागे उघडले जातायत असं लक्षात आलंय. >> हेही खरय
इथे कुणीतरी धागे करण्याची
इथे कुणीतरी धागे ब्लॉक करण्याची सूचना केली आहे, पण संपूर्ण आय डी ब्लॉक करण्याचीही सोय असायला हवी!!
रुमाल.
रुमाल.
Pages