Submitted by बाबा कामदेव on 5 January, 2019 - 09:09
मित्रहो, कदाचित हिरव्या मिरच्यांच्या खरड्या बाबत आणखी एखादा धागा असू शकतो. पण यू ट्यूब वर आढळलेला हा व्हिडीओ अफलातून आहे. रस्टिक आहे. वर्णन करणाऱ्या ताईही कोल्हापूर कडच्या दिसतात. त्यांच्या भाषेच्या लहेजाने व्हिडिओची आणि खर्ड्याचीही खुमारी वाढली आहे . अवश्य पहा आणि करून बघा....
ते सगळे फूड चॅनेल च भारी दिसते आहे....
(ही जाहिरात नव्हे )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे रेसिपी आणि चॅनल
छान आहे रेसिपी आणि चॅनल सुद्धा.. Try करेन..
खर्डा लय भारी.
खर्डा लय भारी.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
त्याच्या फुडच्या (नो पन) व्हिड्यू मधले दादा किती बोलत्यात. कांदा कापताना तो कसा भारी, कोतमीर चिरताना ती कशी भारी, बेसन कसं बलवर्धक आणि मधुमेहावर काय करायचं.... पण लय मजा आली राव ती फुटकळ पिटर पिटर ऐकाया.
त्या म्याडम शेवटी गप मुकाट बसा म्हणत्यात वाटून राहिलं ना!
हा च्यानेल बर्यापैकी फेमस आहे
हा च्यानेल बर्यापैकी फेमस आहे. आणि रेसिपीज चांगल्याच होतात.
अमित, गावाकडची वाट ना? हो तो
अमित, गावाकडची वाट ना? हो तो माणूस बोलतोय खूपच. ह्याचे फायदे, त्याचे फायदे वगैरे. पण मला तरीही ते चॅनल बघायला आवडलं.
हे आवडले असेल तर हेही आवडेल
हे आवडले असेल तर हेही आवडेल १०० टक्के..... सगळे चॅनेलच मजेशीर आहे.
https://www.youtube.com/watch?v=b4NfirsDaJY&t=336s
छान आहे.
छान आहे.
मी बघते ह्या मावशी का ताईंचे व्हिडीओज, मधे भरली वांगी बघितलेली. बोलण्याची स्टाईल आवडते मला त्यांची.
माझ्या साबाई अगदी असाच खरडा
माझ्या साबाई अगदी असाच खरडा करतात...टिपांसहित!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी जीव जळवू खर्डा आहे.
अगदी जीव जळवू खर्डा आहे. नुसता पाहून जीभ झणझणली. आधी खाल्ला होता पण कधीच केला नव्हता. आणि ज्या ठिकाणी खाल्ला त्या सगळ्यांनी खरड्याची कसली डोंबल रेसिपी अशा तुच्छतेने वरवर कृती सांगितली होती, आज सिक्रेट हाथ में पडा, उद्या 101% करणार.
त्या चॅनेलला सबस्क्राईब करायला ऑप्शन दिसत नाही, बेल आयकॉन पण नाही दिसत.
अरे देवा. खरडा, दोडक्याची
अरे देवा. खरडा, दोडक्याची भाजी बघताना अस वाटल कि आमच्याच घरचं कुणीतरी करत आहे भाजी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद बाबा कामदेव.
ब्राम्हणी (जातीचा उल्लेख फक्त स्वयंपाकाची स्टाईल सांगण्यासाठी केला आहे.) स्वयंपाक हा टिपिकल महाराष्ट्रीअन स्वयंपाक म्हणुन इथल्या साउथ इंडीअन मैत्रिणींना माहित आहे. हे चॅनल दाखविता येईल त्यांना आमच्या स्टाईलच्या स्वयंपाकासाठी.
उदा. आम्ही काळा मसाला क्वचीत घालतो भाजीत. क्वर्षभराची चटणी असते जनरली. शेंगदाण्याचा कुट जवळ जवळ प्रत्येक भाजीत असतो आणि साखर नसतेच.
सीमा, शेंगदाण्याचा कूट हा
सीमा, शेंगदाण्याचा कूट हा जनरली देशावर सढळ हाताने वापरतात. आणि कोकणात खोबरं.
जिकडे जे पिकतं त्याचा वापर खाण्यात होतो.
भारी आहे खर्डा! तोंपासू! ते
भारी आहे खर्डा! तोंपासू! ते वाटायला वापरलेलं लोटकं कसलं आहे? मातीचंच का?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
'भेंडी' विशेष आवडती दिसते त्या ताईंची!
माझी माय पण अशीच पोळ्या भाकरी
माझी माय पण अशीच पोळ्या भाकरी झाल्या की ठेचा करायची हो, आम्ही (मराठवाडी)ह्याला ठेचाचमराठवाडी)पण लोट्याने न ठेचता वरवंट्याने ठेचायची.
सेम माझ्या माहेरी करतात.फक्त
सेम माझ्या माहेरी करतात.फक्त चुल एवजी गॅस अनि मातीच्या भाड्यांएवजी रुचन्याने/वरंवट्याने कुटतात्/बारीक करतात.
थोडा बाजुला काढुन, कमी तिखट खाणार्या लोकांसाठी अर्धा टोमॅटो टाकुन परत सेम प्रोसेस.
आज घरी जाऊन करायला हवा.
भारी आहे रेसीपी!
भारी आहे रेसीपी!
एकदा करून बघणार.
तो मिर्च्यांचा खर्डा आणी त्या
तो मिर्च्यांचा खर्डा आणी त्या काकुंची सांगण्याची पद्धत जाम आवडली. कुठेही हातच राखुन न ठेवता त्या कृती सांगत होत्या. मी एवढ्या तिखट मिर्च्या खर्ड्याकरता घेत नाही. फिक्या मिर्च्या तव्यावर तळुन / भाजुन झाल्या की छोट्या खलात मिर्च्या+ लसुण + मीठ इतकेच घालुन भरड कुटते. मग त्यात कच्चे तेल घालुन भाकरीशी मस्त लागतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते वाटायला वापरलेलं लोटकं
ते वाटायला वापरलेलं लोटकं कसलं आहे? मातीचंच का? <<< होय,
अस्सल गावरान पद्धतीचा आहे का
अस्सल गावरान पद्धतीचा आहे का हा खर्डा?
कारण कोथिंबीर वैगेरे खर्ड्यात नसते बरेचदा.
मी पण नाही घालत. तिखट हिरव्या मिरच्या, लसुण आणि मीठ इतकंच जिन्नस.
>>> मातीचंच का? <<< होय
>>> मातीचंच का? <<< होय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद.
आमच्याकडेही ठेचा असाच करतात.
आमच्याकडेही ठेचा असाच करतात. पण कमी तिखट करायचा असेल तर त्यात परत्लेला कांदा किंवा शेंगदाणे किंवा दोन्ही घालतात.
खर्डा लय भारी.
खर्डा लय भारी.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
त्याच्या फुडच्या (नो पन) व्हिड्यू मधले दादा किती बोलत्यात. कांदा कापताना तो कसा भारी, कोतमीर चिरताना ती कशी भारी, बेसन कसं बलवर्धक आणि मधुमेहावर काय करायचं.... पण लय मजा आली राव ती फुटकळ पिटर पिटर ऐकाया.
त्या म्याडम शेवटी गप मुकाट बसा म्हणत्यात वाटून राहिलं ना! + १
भारी मजा आली त्या माणसाची बडबड एकून..
तुम्हाला सांगतो..नव्वीन सूनेला किन्हाई सासू बोलती..आनि तिच्या डोळ्यातून कन्हाई टचकन पानी येतं बगा..
मस्त आहे स्टाईल,
मस्त आहे स्टाईल,
सस्मित कोथिंबीर बघून मलाही दचकायला झालं.अस्सल खरड्यात फक्त मिरची लसूण.नॉ कोथिंबीर नॉ दाणे कूट.(हे सर्व असेल तरी खाईन, फक्त त्याला खर्डा न म्हणता मिरची चटणी म्हणून खाईन.)
व्हिडिओ घरी जाऊन पाहिला.
व्हिडिओ घरी जाऊन पाहिला. अप्रतिम खरडा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
)
करणार्या बाईंची भाषा काय गोड
(गर्व से कहो हम कोल्हापूरी है
मिरचीचा ठेचा म्हणा रे.. खर्डा
मिरचीचा ठेचा म्हणा रे.. खर्डा काय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे पाट्यावर किंवा दगडी मध्ये
अरे पाट्यावर किंवा दगडी मध्ये जे खरडलं जातं त्यालाच खर्डा म्हणतात. आपण मिर्च्या खलबत्त्यात ठेचतो म्हणून तो ठेचा.
पण खर्डा हा शब्द पण जास्तच ऐकलाय.