कुंडीतल्या वेलासाठी आधार
कुंडीमध्ये वेल लावले तर त्यांना आधार कसा द्यायचा?
अ) कुंडीत वेल लावण्या अगोदरच तळाशी असलेल्या भोकातून दोन ती नायलॅान देऱ्या बांधून ठेवायच्या. वरची टोके वर कुठेतरी आडव्या आधाराला बांधली की वेल त्यावर वाढतात. मग वर माती घालून भाज्यांचे वेल लावायचे. पण हा आधार पक्का बांधल्याने वेलाची वाढ झाल्यावर कुंडी हलवता येत नाही.
ब ) स्वतंत्र आधार
लागणाऱ्या वस्तू आणि कृती -
प्लास्टिक कुंडी, पिविसी पाइप चारपाच फुट एक इंच २५एमएम साइज, नायलॅान दोरी, रंगाच्या डब्यांची प्लास्टिक झाकणे, प्लास्टिक ट्रे, साइकल स्पोक किंवा /छत्रीची तार भोके पाडण्यासाठी. जुनी सुरी/चाकू झाकण कापण्यासाठी.
फोटो १ तयार रचना -
फोटो २ पाइपचे वरचे झाकण.
फोटो ३ प्लास्टिक ट्रेमध्ये कुंडी.
कुंडीच्या तळाशी आतमध्ये बसेल असे एखादे रंगाच्या डब्याचे झाकण किंवा जुनी प्लास्टिक प्लेट घेऊन त्याला मध्याभगी पिविसी पाइप जाईल असे भोक पाडले. खाली पाइपच्या टोकाला सळीने आडवी भोके पाडून दोरी घातली की झाकण सटकणार नाही. हे झाकण कुंडीच्या तळाला भोके असतात त्यातून दोरी घालून बांधले की पाइप मध्यभागी उभा राहतो.
आता पाइपच्या वरच्या टोकालाही एक झाकण बसवले. तेही खाली सरकू नये म्हणून खाली आडवी भोके पाडून दोरी घातली आहे.
वरच्या झाकणाला तीन (अथवा चार) भोके पाडून दोऱ्या बांधल्या आणि त्या खाली कुंडीच्या काठाला बांधल्या आहेत.
( सळी गरम करून भोके पाडावीत. दोरीची टोके जाळून चिकटवून घ्यावीत. झाकणाचे मधले भोक सुरी गरम करून पाडावे, फार मोठे करू नये पाइप घट्ट बसेल एवढेच.)
कुंडीत माती भरून आख्खी कुंडीच वेलासह पाइपला धरून उचलता येते,हलवता येते.
पण हे सर्व बाल्कनित असल्याने खालचा ट्रे गरजेचा आहे. त्यात तळाला एक इंच मातीचा थर आहे. पाणी वाहिले की यात जमा होते. खताचा अंश वाहून जात नाही, डास होत नाहीत. ट्रेमधली कुंडी ही ट्रेसह हलवायची कारण तळाच्या भोकातून खालच्या मातीमध्ये पसरलेली मुळे तुटत नाहीत.
यामध्ये चवळीचे (वाली) वेल लावले आहेत. रोग पडताहेत म्हणून खळ (मैद्याची कांजी) फवारतो . खळ वाळली की किटक जखडले जातात. कधी मिरचीचं पाणी फवारतो.
थोडा खटाटोप करून असा आधार तयार करता येईल. मातीच्या कुंडीत खालचे झाकण बांधताना तळ फुटणार नाही याची थोडी काळजी घ्यावी लागेल.
भाज्यांचे वेल लावल्यास ते एक शोभा म्हणून हॅालमध्ये एखादा दिवस ठेवता येतील.
(No subject)
जेव्हा जमीन वाळते तेव्हा
जेव्हा जमीन वाळते तेव्हा प्रत्येक गोगलगाय शंखाच्या आत वीसेक अंडी ठेवून मरते. जेव्हा ओलावा येतो तेव्हा या अंड्यांतून नवीन पिले बाहेर पडतात. Submitted by Srd on 4 January, 2019 - 07:22 >> धन्यवाद माहितीबद्दल !!! तरीच मी विचार करत होतो कि उन्हात तापवून घेतलेली माती कुंडीत वापरली तरीही हे कसे उगवतात.
गच्चीवर माती पसरवून उन्हात
गच्चीवर माती पसरवून उन्हात वाळवायची,संध्याकाळी पाणी शिंपडायचे, तुडवायची. कबुतरेही खातात अंडी. दहा पंधरा दिवस ठेवावी लागते. शंख फुटले की मुंग्याही येतात. एकदम पन्नासेक किलो माती मोकळी करता येते. केमिकल न वापरता.
हल्ली सोसाइटीवाले गच्चीवर जाऊ देत नाहीत किंवा छप्पर घातलेले असते. त्यामुळे हा उपायही बाद झाला.
Pages