आधीचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा:
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712
भाग ५ : https://www.maayboli.com/node/68160
भाग ६ : https://www.maayboli.com/node/68226
---------------------------------------------------------------------------------------------------------
ह्या वैरीण भासणाऱ्या रात्रीचा वेळ जाता जात नव्हता. घड्याळाचे काटे आळसावल्यासारखे पुढे सरकत होते. दोन एकमेकांच्या प्रेमात असलेले जीव कुशीवर तळमळत रात्र जागून काढत होते आणि काही केल्या आज लवकर पहाट उजाडत नव्हती.
मध्यरात्रीनंतर कधीतरी श्रुतीचा डोळा लागला. आदित्यच्या तेही नशिबात नव्हते. अचानक त्याला ऑफिसचं काम आलं. कस्टमरला डिलिव्हर केलेल्या कोडमध्ये ऐनवेळी issue आला असल्यामुळे त्याला रात्री जागून काम करावे लागणार होते. थोडा वेळ घरीच काम केल्यानंतर त्याला ऑफिसला जाणे भाग पडले. त्याची टीम आधीच येऊन पोचली होती. अमेरिकेचा क्लायंट असल्यामुळे रात्रभरात issue resolve करून कोड production ला चेक-इन करायचं होतं. अगदीच high- priority module मध्ये issue आल्यामुळे युद्धपातळीवर तो आणि त्याचे सहकारी काम करत होते. त्यांना आवश्यक त्या सूचना देऊन, issue fixing चे काम पूर्ण करून, कोड चेक-इन करायला पहाट झाली.
ह्या सगळ्या गडबडीत आदित्यच्या मनावर खूप ताण आला होता. कालचा दिवसभराचा थकवा, दिवसभरातल्या नाट्यमय घडामोडी, श्रुतीची अचानक झालेली भेट, रात्री जागून केलेल्या कामाचा ताण हे सगळं त्याला आता असह्य झालं होतं. त्याचं डोकं पुरतं भंजाळून गेलं होतं. काम पूर्ण झाल्यानंतर त्याला जरा बरं वाटलं. एव्हढ्या सगळ्या गोष्टींमध्ये एक तरी पार पडली होती. आज त्याला दिवसा विशेष काम नसणार होतं. क्लायंटला मेल पाठवून झाल्यांनतर तो रिलॅक्स झाला. अजून काही बारीक सारीक गोष्टी राहिल्या होत्या. त्या करूनच घरी जावे असं ठरवून तो काम करायला लागला. पण शरीराच्या अव्याहत काम करण्याच्या क्षमतेला मर्यादा असतातच ना! झोपेने तिचे काम अचूक केले आणि काम संपवू पाहणाऱ्या आदित्यचा काम करता करताच डोळा लागला. कधी नव्हे ते आदित्य चक्क ऑफिसमध्येच खुर्चीवर बसल्या बसल्या झोपून गेला होता.
--------------------------------------------------------------------------------------------
श्रुतीला उशीरा झोप लागल्यामुळे उठायला नेहमीपेक्षा थोडासा उशीरच झाला होता. रात्री तिने आदित्यच्या गाडीचा आवाज ऐकला होता. "कुठे जातोयस, का जातोयस, कोडिंगचं काम असेल तर मी काही मदत करू का", असं तिला विचारावंस वाटलं होतं. पण ती पार्किंगमध्ये पोहोचेपर्यंत आदित्य तिथून निघून गेला होता.तो घरी परत कधी येईल ह्याबद्दल घरी कोणाला काहीही कल्पना नव्हती. सुनंदा मावशी केव्हाच उठली होती. श्रुतीचा सकाळचा व्यायाम झाला तेव्हा सुनंदा मावशी छानपैकी जरीची साडी नेसून तयार होऊन बाहेर जाण्यास निघाली होती. ती आज तिच्या एका नातेवाईकाकडे लग्न असल्यामुळे तिकडे जाणार होती. थोडेसेच जरीकाम आणि नाजुक बुट्टे असलेल्या त्या फिकट पिवळ्या साडीमध्ये मुळचीच सुरेख असणारी सुनंदा मावशी सुंदर दिसत होती.आदित्य अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे पसंत करत नसल्यामुळे मावशीने त्याचा लग्नाला येण्यासाठी नकार गृहीत धरून त्याला येण्यासाठी विचारले नव्हते. आदित्यला काहीतरी अर्जंट काम आले असणार व त्याशिवाय तो असा अचानक न सांगता बाहेर जायचा नाही हे तिला माहित होते. त्यामुळे असाही तिचा विशेष आग्रह नव्हताच. उलट बोअर होतय अशी भुणभुण करणारं सोबत कोणी नसल्यामुळे तिचा वेळ मजेत जाणार होता. आज संध्याकाळी ती आणि आदित्य बाहेर जाणार होते. म्हणून माझा मुलगा मला वेळ देत नाही वगैरे तक्रार न करणारी सुनंदा मावशी आणि तिने काहीही न म्हणताही आईसाठी विशेष वेळ राखून ठेवणारा आदित्य, असे दोघे मायलेक आपापली स्पेस जपत एकमेकांना सांभाळून राहत होते.
आज श्रुती घरीच थांबणार होती. तिला काही assignments आणि experiments पूर्ण करायचे होते. सुनंदा मावशीला बाय करून श्रुतीने घराचे दार आतून लावून घेतले. मूड चांगला व्हावा आणि उत्साह यावा म्हणून तिने मंद सुरामध्ये गाणी लावली. सकाळी बागेतली फुले तिने आणून ठेवलेलीच होती. त्यांचा सुंदर गुच्छ तयार करून फुलदाणीमध्ये ठेवून दिला. तिने तिची रूम आवरली. पुस्तके रचून ठेवली. लॅपटॉप, notepad, पेन असे अभ्यासाचे साहित्य टेबलवर सेट करून ठेवले. आज मनसोक्त आणि अजिबात घाई न करता ती आंघोळ करणार होती. गरम पाण्याने आंघोळ केली की कसे ताजेतवाने वाटते आणि मूड चांगला होतो. ठरवल्याप्रमाणे तिने आरामात आंघोळ केली आणि मघाशीच लावलेल्या गाण्याबरोबर गुणगुणत तिने स्वतःचे आवरायला सुरुवात केली.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
आदित्यला जाग आली तेव्हा तो त्याच्या ऑफिसच्या केबिनमध्ये खुर्चीवर बसून टेबलवर डोकं ठेवून झोपलेला होता. त्याला प्रचंड अवघडल्यासारखं झालं होतं. एकतर आपण ऑफिसात झोपलोय, तेही असं काम पूर्ण न करता ह्याचं त्याला वैषम्य वाटलं. त्याने घड्याळात पाहिलं. अजून ऑफिसची एम्प्लॉईज कामावर येण्याची ठराविक वेळ झाली नव्हती. इतर लोक येण्याच्या आत घरी जायला हवं ह्याची त्याला जाणीव झाली. असही थोडंसच काम उरलं आहे, ते घरी बसूनच करूया असं मनाशी ठरवून त्याने लॅपटॉप उचलला. इतर सर्व gadgets बॅगेत कोंबून तो बेसिनकडे गेला. तोंडावर पाण्याचे हबकारे मारले तेव्हा जरा तरतरी आली. हे करणं गरजेचं होतं. कारण त्याला गाडी घेऊन घरापर्यंत ड्राइव करत जायचं होतं. आता जर झोप लागली असती तर मात्र खरंच वाट लागली असती. मात्र घरी गेल्याबरोबर दुसर्या कशाचाही विचार न करता थेट झोपायचं हे त्याचं पक्क ठरलं होतं.
आदित्य घरी पोचला तेव्हा बाहेर मस्त ऊन पडलं होतं. माळीकाकांनी नुकतेच बागेतील झाडांना पाणी दिले होते. झाडांवर टवटवीत रंगीबेरंगी फुलं उमलली होती. एक टपोरा लाल गुलाब दिमाखात डोलत होता. आजवर आदित्यचे बागेकडे एवढ्या बारकाईने काडीचा लक्ष गेले नव्हते. आज मात्र त्याला तो गुलाब श्रुतीला देण्याची तीव्र इच्छा होत होती. कसेबसे स्वतःला सावरून तो दरवाज्यासमोर आला व बेल वाजवली. दार उघडले गेले नाही. मग त्याने लॅचच्या चावीने दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण दाराला आतून कडी लावली होती. २-३ वेळा बेल वाजवूनही दार उघडले गेले नाही तेव्हा आदित्य हैराण झाला. नको नको त्या शंका त्याच्या मनात येऊ लागल्या. त्याची आई बाहेर गेलीये हे त्याला माहीतच नव्हतं. कामाच्या गडबडीत फोन पाहायचा राहून गेला होता. त्याने कॉल करावा म्हणून फोन हातात घेतला, त्यावर आईचा message आला होता. तिने ती बाहेर जाते आहे हे कळवले होते. आदित्य फोन बघतच होता आणि इतक्यात दार उघडले गेले.
आणि आदित्यला मघाशी गुलाबाचे फुल नाही तोडले तेच बरे केले असं वाटलं. दरवाजा उघडण्यासाठी धावत आलेली आदित्यची प्रियतमा नुकत्याच उमलेल्या टवटवीत गुलाबासारखी दिसत होती!
हो ना, दारात श्रुती उभी होती. नुकतीच न्हायली असल्यामुळे ओल्या केसांतून जराजरासे पाणी ठिबकत होते. तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. पांढरीशुभ्र ओढणी खांद्यावरून घसरू पाहत होती. पिटुकले मोत्याचे डूल तिच्या चेहऱ्याबरोबर हेलकावे खात होते. तिच्या येण्याने जणू आसमंतात सुगंध भरून राहिला होता. आधीच तिच्या प्रेमात असणाऱ्या आदित्यची तिच्या ह्या रूपाकडे पाहून पुन्हा एकदा झोप उडाली होती.
श्रुती: "आदित्य तू, आता ? मला वाटलं तू आज येणार नाहीस घरी "
आदित्य: "घरात घेतेस ना मला? रात्रभर कामामुळे झोपलो नाही गं !"
श्रुती: "ओह सॉरी, ये ना. मावशी लग्नाला गेलीये. संध्याकाळपर्यंत येईल घरी."
आदित्य: "आलाय मला तिचा message तसा."
आदित्यला तिला सांगायचं होतं खरं तर, की श्रुती तू खूप सुंदर दिसते आहेस. तुला बघून दिवसाची सुरुवात छान झाली वगैरे. नेमकं काय बोलावं ह्यासाठी तो मनात वाक्य जुळवत होता. पण प्रत्यक्ष काहीतरी वेगळच गुळमुळीत आणि रुक्ष बोलत होता. त्याचंही बरोबर होतं म्हणा. २४ तासात किती आघाडयांवर धक्के सहन करावेत माणसाने!
पण श्रुतीच बोलली.
श्रुती: "आदित्य, एक विचारायचं होतं. तू थकलेला आहेस, रात्रभर जागरण झालंय तुझं. पण तरीही माझ्यासाठी एक गोष्ट करशील?"
आदित्यचं काळीज धडधडू लागलं. खूप दिवसांपासून संपर्कात नसल्यामुळे आणि मागे झालेल्या प्रसंगामुळे दोघांमध्ये आधीच एक वेगळाच awkwardness आला होता. अजून ते एकमेकांशी थेट साधं सुद्धा काही बोलले नव्हते. त्यात आज दोघेच घरी होते. मनात आदित्य म्हणत होता, " नाही, आता नको श्रु, मी खरंच थकलोय गं. तुझ्याकडून ते जादुई ३ शब्द मला ऐकायचे आहेत. पण आता खरंच मनस्थिती फार वेगळी आहे." पण त्याला हे असले विचार फार वेळ करावे लागले नाहीत.
श्रुती म्हणाली, "जास्त वेळ नाही घेणार मी तुझा. एवढंच विचारायचं होतं की, ………………..
...........................................................................
(क्रमशः )
भाग ८ : https://www.maayboli.com/node/68631
----------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
---------------------------------------------------------------------------------------
मी पहिला.
मी पहिला.
नेहमीप्रमाणे छान लिहिलंय!
एवढाच विचारायचं होतं की, …………
एवढाच विचारायचं होतं की, ………………..
चहा घेणार की कॉफी
मस्त झालाय हाही भाग. आता पुढील भागाची उत्सुकता कायम राहिलीय.
एवढुसा भाग ! छान झालाय पण
एवढुसा भाग !
छान झालाय पण
तुझ्या लेखनाची पंखा झाले आहे
तुझ्या लेखनाची पंखा झाले आहे गं मी. रोमातून येऊन प्रतिसाद द्यावासा वाटला. पण किती तो लहान भाग!
नेहमीप्रमाणे मस्त !
नेहमीप्रमाणे मस्त !
मस्त !!!!
मस्त !!!!
मस्त झालाय हाही भाग. आता
मस्त झालाय हाही भाग. आता पुढील भागाची उत्सुकता कायम राहिलीय.
मस्त ..
मस्त ..
धन्यवाद अज्ञातवासी , Namokar
धन्यवाद अज्ञातवासी , Namokar , विकास अ. म्हात्रे, कोमल १२३४५६, प्रि तम , आसा, डूडायडू

छान....
छान....
Wahh khupach challiy Katha.
Wahh khupach challiy Katha. Thoda mitha Hawa bhaag ani lawkar aala tar majjach aamhala .
हा पण भाग सुंदर .. पुढचा भाग
हा पण भाग सुंदर .. पुढचा भाग लवकर येऊ द्या please ...
धन्यवाद prakrut, Vchi Preeti
धन्यवाद prakrut, Vchi Preeti, दत्तात्रय साळुंके
छान आहे पण 6व्या भागाची लिंक
छान आहे पण 6व्या भागाची लिंक ओपन का होत नाहीये??
धन्यवाद जुई के
धन्यवाद जुई के
6व्या भागाची लिंक ओपन का होत नाहीये??>>>>
होईल आता , मराठी आकडे पडले होते चुकुन
Mstch ... Pudhcha part ..lvkr
Mstch ... Pudhcha part ..lvkr plzzzz
next part please....
next part please....
किल्लीतै छान जमलाय हा भाग!
किल्लीतै छान जमलाय हा भाग!
दरभागावेळी कसली ना कसली उत्सुकता ताणून ठेवतेस बघ!
पुभाप्र! 
धन्यवाद जुई, prakrut ,
धन्यवाद जुई, prakrut , Urmila Mhatre
मस्त चाललाय! पुभाप्र!
मस्त चाललाय! पुभाप्र!
धन्यवाद अज्ञातवासी
धन्यवाद अज्ञातवासी
पुढचा भाग कधी?
पुढचा भाग कधी?
जमेल तितक्या लवकर पुढचा भाग
जमेल तितक्या लवकर पुढचा भाग टाकण्याचा प्रयत्न करते.. धन्यवाद abhijat
next part plzzzzzzzzzzz.
next part plzzzzzzzzzzz.
धन्यवाद प्रथमेश४ .
धन्यवाद प्रथमेश४ .
पुढचा भाग टाकला आहे :
भाग ८ : https://www.maayboli.com/node/68631
Thanks Killi.....
Thanks Killi.....
(No subject)