Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44
या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुठे पाहिला? साईट?
.
कुठे बघितला गच्ची ?
कुठे बघितला गच्ची ?
https://www.mtalky.com/o/a
https://www.mtalky.com/o/a.aspx?i=1675 इथे आहे सुजा
कुठे बघितला गच्ची ?>>>मी
कुठे बघितला गच्ची ?>>>मी airtel TV वर बघितला.. छान आहे.. नक्की बघा
काल सिम्बा पाहिला.
काल सिम्बा पाहिला.
जाम मजा आली.
सौरभ गोखले चा विशेष उल्लेख, मस्त काम झालंय त्याचं.
मध्यांतरा पर्यंत फार बोअर झाला. रणवीर कंटाळवाणा वाटला. सारा सॉलीड प्रॉमिसिंग वाटली.
मध्यांतरानंतर बरा वाटला. "सिंघम" च्या एंट्रीला जेमतेम १०० ची क्षमता असलेल्या आणि अर्ध्या खुर्च्या रिकाम्या असलेल्या आमच्या थेटरात शिट्ट्या आणि टाळ्या पडल्या
रणवीर सोडून बाकी सगळे आवडले. "आंख मारे" आवडलं.. खरं ते पाहण्यासाठीच सिनेमा पाहिला म्हटलं तरी चालेल.
निम्म्याहून अधिक मराठी कलाकार पाहून टडोपा आलं !
वर्थ वॉचिंग वन्स !
काल सिम्बा पाहिला.
काल सिम्बा पाहिला.
सिनेमा बरा आहे. पण रणवीर सिंग आहे म्हणुन मजा आली.
आशुतोष राणा आणि बाकी सगळं मराठी मंडळ मस्त आहे.
सारा छान आहे. प्रॉमिसिंग आहे.
काल सिम्बा पाहिला.रणवीर ची
काल सिम्बा पाहिला.रणवीर ची प्रचंड ओव्हरअॅक्टींग आहे.बट सुट्स ऑन हिम.वर्दी मधे कडक दिसला आहे.सगळ्यात जास्त शिट्ट्या अजय च्या एंट्रीलाच.साराला मोजुन सीन्स आनि २ गाणी आहेत फक्त.वन टाईम वॉच.रोहीत शेट्टी ने त्याचा चित्रपटांचा खास टच इथेही जपला आहे.
कारवा नावाचा अमेझॉन प्राईम वर
कारवा नावाचा अमेझॉन प्राईम वर दलकर सलमान,मिथिला,इरफान खान चा पिक्चर थोडा पाहिला.खूप आवडला.उरलेला नंतर पाहणार आहे.
चल भाग नेटफ्लिक्सवर पाहिला.
चल भाग नेटफ्लिक्सवर पाहिला. ब-यापैकी टाईमपास आहे.
ढूंढते रह जाओगे हा सिनेमा कथा प्रत्यक्षात उतरवली आहे हा अनुभव देतो.
वोडका डायरीज पहिला, kk मेनन
वोडका डायरीज पहिला, kk मेनन ने खाल्लाय पूर्ण चित्रपट. ट्विस्ट वर ट्विस्ट आहेत. आवडला.
सिम्बॅ (मला हे नाव मोबाईल वर
सिम्बॅ (मला हे नाव मोबाईल वर लिहिता येत नाही) पाहिला.
दुसऱ्या अर्ध्याची दाहकता कमी करण्यासाठी पहिला अर्धा विनोदी बनवलाय.
रणवीर ने ओव्हर ऍक्ट केलंय पण ते 'सो बॅड इट्स गुड' मध्ये जातं.
अनेक वर्षांपासून, 80ज मध्ये चालत आलेली कथा वापरून जनतेला नवा संदेश देण्याचा प्रयत्न.कथा इतकी प्रेडीकटेबल की त्यातले एक पात्र दिसल्यावर आपल्याला त्या पात्राचा पुढच्या कथेत उद्देश काय असेल हे कळतं. सारा मुलीला छोटा रोल.तिचे कपडे मस्त डिझाइन केले आहेत.गाणी डोळ्यांना सुखद.आशुतोष राणा, आणि सर्व मराठी कलाकारांची भूमिका आवडली.थेटरात प्रचंड टाळ्या शिट्ट्या होत्या.
आणि तरीही असं वाटलं की जो संदेश शेवटच्या 20 मिनिटात द्यायचा उद्देश आहे तो पात्र पहिल्या अर्ध्यात अती आचरट पणाने वागलेली दाखवून तितक्या प्रभावी पोहचत नाहीये.
पण हा संदेश द्यायला एका गाड्या उडवणाऱ्या निर्मात्याने सुरुवात केली, चित्रपट लोकप्रिय झाला त्यामुळे संदेशही लोकप्रिय होईल अशी अपेक्षा करू.
(आणि तरीही मन 'विशफुल थिंकिंग!' ओरडतंय तिथे दुर्लक्ष करू.)
एकंदर एकदा बघा.रणवीर साठी.आणि चटपटीत डायलॉग साठी.
रणवीर ने ओव्हर ऍक्ट केलंय पण
रणवीर ने ओव्हर ऍक्ट केलंय पण ते 'सो बॅड इट्स गुड' मध्ये जातं.>> शेट्टिचे सगळेच हिरो ओव्हर द टोप असतात, थोडा दाक्षिणात्य प्रभाव असतोच त्याच्या सगळ्याच मुव्हित, रणवीर त्याबाबतित अगदिच अमिताभ सारखा आहे डायरेक्टर बरहुकुम सगळ करणार,
फ्रेश , यन्ग, एनर्जेटिक रणवीर ट्रेलर मधे तरी आवडलाच होता पण का कुणास ठाउल त्याच्याबरोबर दिपिकाला बघायची इतकी सवय झाली की त्याची आणी साराची केमेस्त्री तेव्हडी जमुन आलेली वाटत नाही.
तो गाड्या का उडवतो माहीत आहे
तो गाड्या का उडवतो माहीत आहे ना?
तो गाड्या का उडवतो माहीत आहे
तो गाड्या का उडवतो माहीत आहे ना?>>
का? सांगा
गाड्या उडवणे कथेची गरज नसते.
गाड्या उडवणे कथेची गरज नसते. रोहित चे वडील शेट्टी ( व्हिलन) एक स्टंट मॅन होते. स्टंट मॅन चं स्ट्रगल आणि लाईफ त्याने पाहिले आहे. आजच्या ग्राफिक्स च्या जमान्यात देखील स्टंट मॅन लोकांना कामे आणि रोजगार मिळाला पाहिजे म्हणून प्रत्येक सिनेमांत तो असे कार उडवणे टाईप स्टंटस टाकतो जे स्टंट मॅन लोक परफॉर्म करतात.
एका मुलाखतीत ऐकले होते. स्टंट टीम कृतज्ञता व्यक्त करत असताना.
चांगली कल्पना आहे.त्या
चांगली कल्पना आहे.त्या लोकांना चांगले सेफ्टी स्टॅंडर्ड देत असेलच.
एकंदर त्याचे पिक्चर डोक्याला ताप नाही असे असतात.गोलमाल अगेन(भूतवाला) मात्र आवडला नाही.अजय देवगण करीना चा गोलमाल रिटर्न आमच्याकडे एकदम फेमस आहे.
मला काजल आगरवाल आणि अजय
मला काजल आगरवाल आणि अजय देवगण वाला सिंघम खूप आवडलेला. दुसरा करीनावाला काही मिनिटंपण बघू शकले नाही.
च्र्प्स छान माहीती, रो शे ची ही बाजू माहीती नव्हती. एकदा त्याने त्याची बायको मराठी आहे, ते सांगितलेलं.
अरेच्चा गोलमाल ४ आणि सिंघम २
अरेच्चा गोलमाल ४ आणि सिंघम २ आले होते हे मला माहितपण नाही
सिंघम २ एकदा tv वर लागला होता
सिंघम २ एकदा tv वर लागला होता, तेव्हा सर्फिंग करताना समजलं. अजय देवगण आवडतो मला आणि सिंघम पहिला आवडलेला, मला वाटलं हा ही आवडेल पण नाही. करीना अजिबात अपील झाली नाही.
करीनाचा रोल अजय देवगणपक्षा
करीनाचा रोल अजय देवगणपक्षा महत्त्वाचा होता का?
रोहित शेट्टी, त्या शेट्टींचा मुलगा आहे हे माहीत नव्हतं.
एकदा त्याने त्याची बायको
एकदा त्याने त्याची बायको मराठी आहे, ते सांगितलेलं.>> हो म्हणून बरेच मराठी कलाकार घेतो मुव्हिजमधे अस चला हवा... मधे सान्गितल त्याने
@च्रप्स>> धन्यवाद माहिती
@च्रप्स>> धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
रोहित शेट्टी कडे एव्हढे मराठी
रोहित शेट्टी कडे एव्हढे मराठी कलाकार असतात त्याच कारण त्याचा कास्टिंग डायरेक्टर विकास कदम उर्फ शऱ्या आहे
अच्छा.
अच्छा.
विकास कदम आधी अजय देवगणच्या युनिट मध्ये होता का, मी ऐकलं होतं पूर्वी असं.
रोहित शेट्टी, त्या शेट्टींचा
रोहित शेट्टी, त्या शेट्टींचा मुलगा आहे हे माहीत नव्हतं. >>> +१
कारण त्याचा कास्टिंग डायरेक्टर विकास कदम उर्फ शऱ्या आहे >>> मग तो स्वतःला का नाही कास्ट करत? भारी अॅक्टर आहे. प्रभावळकरांच्या समोर तोडीस तोड उभा होता तो.
गोलमाल १ २ ३ आणि सिंघम १
गोलमाल १ २ ३ आणि सिंघम १ मलापण आवडले होते.
अजय देवगण आणि रोहित शेट्टी कॉम्बो छान वर्कआऊट होते असे मत झालेले.
कालच पाहीला
कालच पाहीला
स्पेशल मेंशन, वैदेही...
ही या चित्रपटात इतकी सुंदर दिसते, की साराऐवजी हिला घेतलं असतं तर चाललं असत. ही फ्रेममधून गेली, तर का गेली, असा प्रश्न पडतो, इतकी ती सुंदर दिसते. आणि अभिनयही छान केलाय... >> हेच वाटले अगदी
रणवीर एकदम एनर्जेटीक आहे आणि सिनेमात तसाच वावरलाय. मस्त वाटला.
त्याचे मराठी एवढे काही वाईट नाहीये. त्याच्यावरुन त्याने नजर हलू दिली नाहीये हे खरे!
संवाद आवडले. दोन्ही जुनी गाणी आवदली हे विशेष
बाकी अब्बा, डब्बा, जब्बा चा इतका सुंदर उपयोग आधी कुणीच केलेला नाही. आख्खे थिएटर कित्ती वेळ हसत होते
सारा मस्तच! स्टार किड म्हणून तिच्याबद्दल जरा साशंक होते. पण सुरेख दिसली पण आहे आणि अभिनय पण छान केलाय. तिला पहातांना तरुणपणची अमृता सिंग आठवते. ड्रेस छान आहेत तिचे!
गाड्या उडवणे कथेची गरज नसते.
गाड्या उडवणे कथेची गरज नसते. रोहित चे वडील शेट्टी ( व्हिलन) एक स्टंट मॅन होते. स्टंट मॅन चं स्ट्रगल आणि लाईफ त्याने पाहिले आहे. आजच्या ग्राफिक्स च्या जमान्यात देखील स्टंट मॅन लोकांना कामे आणि रोजगार मिळाला पाहिजे म्हणून प्रत्येक सिनेमांत तो असे कार उडवणे टाईप स्टंटस टाकतो जे स्टंट मॅन लोक परफॉर्म करतात.
एका मुलाखतीत ऐकले होते. स्टंट टीम कृतज्ञता व्यक्त करत असताना.>>> हे माहित नव्हतं. खुप छान.
अब्बा, डब्बा, जब्बा चा इतका
अब्बा, डब्बा, जब्बा चा इतका सुंदर उपयोग>>>
+ १
भाई पाहिला का कोणी? कसा आहे?
भाई पाहिला का कोणी? कसा आहे?
Pages