स्वयंभू

Submitted by रमेश रावल on 17 December, 2018 - 22:55

माझ्या भावाला वाचनाची खूप आवड..इतिहासात विषेशत जास्त रूची.. शिवाजी महाराज/संभाजी महाराजांच्या विषयी तर तारखेस सर्व पाठ.. रामायण महाभारत व त्यातील घटनेविषयी कोणी चूकूनही बोलायला सर्वात केली तर हा काही त्याला तासभर तरी सोडत नाही...पण आत्ता वाईट वाटते की धकाधकीच्या आयुष्यात इतरांसाठी जगताना स्वतचा छंद जोपासता आला नाही.. दोन महिन्याने महिनाभर रजा घेवून भारतात येतोय. तेंव्हा त्याची वाचनाची आवड पुन्हा सूरू व्हावी म्हणून एखादे चांगले पुस्तक भेट द्यावे असे ठरवले पण श्रीमानयोगी, म्रुत्युंजय, पावनखिंड, युगंधर, छावा, रावण खलनायक नव्हे नायक, महाभारत एक सूडाचा भडका, असे भरपूर त्याने वाचलय त्यामुळे आता नेमक कोणत पुस्तक त्याला भेट द्यावे हे कळेना.. तशात भिमावरील स्वयंभू मला आठवल, बूकगंगावर पहिले काही पान वाचण्याची सोय आहे पण अंदाज येईना.. इतक्यात मायबोली कुटूंब आठवले.. स्वयंभू घ्यावी का.. तसेच इतर नावे सूचवा.. आणि जमलच तर छान पैकी वाक्य सांगा जे पुस्तकावर लिहून भेटदेता येईल

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कादंबरीमय शिवकाल गोनिदा

4 कादंबऱ्या एकत्र आहेत, शिवजन्माच्या आधी पासून राज्याभिषेकापर्यंत काळ कव्हर केला आहे.
शिवकाळा बद्दल कादंबरी असून सुद्धा, सामान्य माणसे नायक आहेत, महाराज, इतिहास पार्श्वभूमी म्हणून येतो.

सर्वांचे धन्यवाद ,
@च्रप्स :- शिकस्त कशावर आहे..
आणि स्वयंभू कुणी वाचलं आहे का..

शिकस्त- पार्वतीबाई पेशवे च्या जीवनावर आहे.

तुम्ही एक कालखंड घेऊन त्याच्याशी संबंधित २-३ पुस्तके एकत्र असे हि करू शकता

उदा पेशवाई- राऊ - पानिपत- स्वामी- शिकस्त-झेप - झुंज - मंत्रावेगळा

धन्यवाद सिम्बा
मला माझ्या कलीग ने शोध (लेखक मुरलीधर खैरनार) हे नाव सुचवलं, बुकगंगा वर REVIEWS पण चांगले आहेत

(१६७० साली शिवाजीराजांनी दुसऱयांदा सुरत लुटली , तेवहा सुरतेहून परत येताना हया लुटीतला अर्धा अधिक असा प्रचंड ऐवज मधेच कुठे तरी हरपला.
गोंदाजीकडे असलेला पंचवीस लाख कोटी रुपये किंमतीचया ईतका खजिना नेमका गेला कुठे..? साडे तीनशे वर्षा आधी तया खजिनयाचं काय झालं...? हयाचा शोध सुरू होतो ....)
स्वयंभू विषयी माहिती मिळाली ती अशी कि ते पुस्तक माहितीपर आहे.. शोध मध्ये कथेत शिवकालीन संधर्भ जोडलेले आहेत त्यामुळेहे घ्यायचं नक्की केलं आहे.... तरी तुमच्या मुळे अजून नावे कळाली त्याबद्दल सर्वांचे आभार..

ओह तुम्हाला fantasy च्या अंगाने जाणार्या ऐतिहासिक कादंबर्या चालणार असतील तर बर्याच आहेत कि
१) शर्थीने राज्य राखले - १२ भाई कारस्थान आणि मराठ्यांचा इंग्रजांवर विजय
२) XXXX- नाव आठवत नाहीये , पण या कथेवर सर्जा चित्रपट बेतला होता
३) XXXX- परत नाव विसरलो , विजयनगर साम्राज्य बुडवले त्याबद्दल होती
४) घटकेत रोविले झेंडे - पहिला बाजीराव

Back to top