१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
नाचणीच्या पीठाचे केले असेच
नाचणीच्या पीठाचे केले असेच लाडु तर चालतील का ?
होय नाचणीच्या पीठाचे मस्त
होय नाचणीच्या पीठाचे मस्त होतात लाडु. मी करते नहेमी..
त्यात अजुन डाळीच पीठ, कणिक आणि तादुळाच पीठ टाक. हि बाकिची पीठ नाचणीच्या पिठाच्या निम्मे टाकायची.
आशू, आईसक्रीम बनव नी ३
आशू, आईसक्रीम बनव नी ३ आठवड्याने मगच खायला बाहेर काढ. मगच सगळ्यांना गोड वाटेल.:)
आलेली बर्फी वाटली की संपते.
देवळात घेवून जा. मला फक्त गोड पदार्थ नुसते बनवायची (खायची नसल्याने) आवड असल्याने मी एखाद दिवशी देवळात जाताना पाहिजे तो आवडीने पदार्थ करून प्रसाद म्हणून तिथे वाटते. आवड ही पुर्ण होते.
नाचणीच्या पिठात जरासे उडीद व
नाचणीच्या पिठात जरासे उडीद व किंचित तांदूळ पिठी,डिंक्,गूळ तूपात भाजून झकास लाडू होतात.
परवाला केले मी.
धन्यवाद सोनचाफा! छान आहे हा
धन्यवाद सोनचाफा! छान आहे हा उपाय!
मनु, तपशीलवार कृती देशील ?
मनु, तपशीलवार कृती देशील ?
डिंकाचे लाडु करायचे आहेत.
डिंकाचे लाडु करायचे आहेत. त्यामधे खारकेएवजी खजुर घालुन लाडु करता येतील का?
सिंडे, मी दिली ना तपशिलवार
सिंडे, मी दिली ना तपशिलवार कृती??? आSS??* डोळे वटारलेली बाहुली**
मनु, स्वयपाकघरात किती वेळ
मनु, स्वयपाकघरात किती वेळ घालवतेस ग?
तिची वेगळी आहे गं. दोन्ही
तिची वेगळी आहे गं. दोन्ही पद्धतींनी करुन बघेन.
>>मनु, स्वयपाकघरात किती वेळ
>>मनु, स्वयपाकघरात किती वेळ घालवतेस ग?<<
सुरुवातीला आम्ही इथे शिकताना दोघीच एकत्र रहाताना ती वैतागयाची कारण मी काही करायला लागले की तिलाही मला मदत करायला म्हणून आत यावे लागायचे. मी नको येवुस सांगितले तरी पण तिला गिल्टी वाटायचे मी एकटी करतेय बघून. मग ती वैतागायची...यार तू आत आलीस की मलाही करायला लागते ना. एक काम करुया बाहेरच जेवुया. दर एक दोन दिवसा आड सांगायची. व स्वताचे पॉकेट मनी खर्च करून मला बाहेर जेवण. 
बहिण तेच म्हणायची,किती ते सारखे किचनमध्ये,जा बाहेर.... ..
सिंड्रेला,लिहिते मी नाचणीच्या लाडवाची कृती.
अमयाच, खजूर येतील ना घालता... त्यात काय. पण ते वाटा वगैरे प्रकार आहेत.
आशु_डी तुझ्या बर्फ्या वाटुन
आशु_डी तुझ्या बर्फ्या वाटुन संपल्या नसतिल अजुन तर हे करुन पहा...
सगळ्या बर्फ्यांचा चुरा कर (वर्ख काढुन) त्यात दुध घाल आणि मिक्सर मधुन फिरव. हे मिश्रण कुल्फी मोल्ड्स मधे घाल आणि फ्रिझ कर... २-४ आठवड्यांनी खायला काढ... ताव मारुन खातिल सगळे
तुला हव त्यात थोडे भरडलेले पिस्ते/काजु घाल. मस्त मलई कुल्फी तयर होईल.
मिक्सर मधे जास्त घुसळु नकोस नाहीतर बर्फीमधली फॅट वेगळी होईल आणि ते जरा विचित्र लागेल...
नाही मिक्सर मधे फिरवलेस तरी हरकत नाही. पण मग चुरा हाताने नीट बारिक करुन घे.
लाजो, तेच सांगितले तिला.
लाजो, तेच सांगितले तिला. संजीव कपूरची रेसीपी आहे खाना खजाना बची हुइ मिठाईंसो आईसक्रीम.
सगळ्यांना खूप धन्यवाद.
सगळ्यांना खूप धन्यवाद. वाटपाची कल्पनाही चांगली आहे. कुल्फीची , साटोर्यांची कृती करुन पाहीन.
आमच्याकडे इथे थायलंडहून
आमच्याकडे इथे थायलंडहून चिक्कू येतात आणि ते खूपच कच्चे असतात. मी त्यांना तांदळात ठेवतो पण तरीही ते कच्चे राहतात आणि शेवटी सडून जातात. असे वाटतं की ते पिकलेत पण खावून पाहिलेत की आंबट लागतात. आणखी काही करता येईल का कच्ची फळ घरी पिकवण्यासाठी?
धन्यवाद
चिक्कू घेवूच नकोस किंवा
चिक्कू घेवूच नकोस
किंवा बाकिच्यांना विचारुन बघ ते काय करतात ते. फळाची जातच तशी असेल कदाचित.
बी, चिक्कु वर्तमान पत्र किंवा
बी, चिक्कु वर्तमान पत्र किंवा ब्राऊन पेपर बॅग मधे घालुन मग तांदळाच्या ड्ब्यात ठेव. पिकतील... किंवा आंबे ठेवतात तसे वाळक्या गवतात, पेपरात गुंडाळुन ठेव...
घरी खुप सफरचन्दे आहेत..पराठे,
घरी खुप सफरचन्दे आहेत..पराठे, खीर झाली करुन, गोड फारसे खपत नाही . अजुन काय करता येइल?
सफरचंदाचे
सफरचंदाचे कोशिंबीर्/रायते
सफरचंदाचे लोणाचे लिहिन इथे.
मेथ्यापल
पन्हे करता येईल पण अॅपल्स शिजवुन घ्यावे लागतील.
लालुने पण एक प्रकार टाकला
लालुने पण एक प्रकार टाकला होता ना गेल्या वर्षी ?
मेथ्यापल छान वाटतेय..पन्हे
मेथ्यापल छान वाटतेय..पन्हे किती दिवस टिकेल?
पन्ह्याच्या आइस क्युब्स
पन्ह्याच्या आइस क्युब्स करायच्या. ते करताना त्यात स्ट्रॉबेरीचे तुकडे टाकायचे. मग अगदी लाइट लिंबु सरबत करुन त्यात ह्या २ क्युब्स घालुन प्यायचे. हवं तर पन्हं करताना पुदिन्याची पानं नाहीतर वेलदोड्याची पूड घालायची. इतके सुंदर लागते. वा वा. किती पण दिवस टिकते असे.
वाह झकासच! आता करतेच हे पन्हे
वाह झकासच! आता करतेच हे पन्हे
ते अॅपल रेलिश इथे
ते अॅपल रेलिश इथे आहे-
http://www.maayboli.com/node/6029
माझ्याकडे उडदाचे पीठ खूप उरले
माझ्याकडे उडदाचे पीठ खूप उरले आहे (इतके मी आणलेच का मुळात
).. त्याचे लाडु करुन झालेत..
काल रात्री इडलीरवा मधे घातले आणि आज इडल्या करायला घेतल्या ..पण म्हणावे तसे आंबले नाही .. असे का बरे.. का काही बदल केले तर आंबेल.. मी २ वाटी इडली रवा आणि १ वाटी उडीद पीठ रात्री एकत्र भीजवले पाणी साधारण १/२ ग्लास घातले असावे.. साधारण मिश्रण भिजेल इतके.. हे मी बरोबर केले का..का काही वेगळी कृती हवी.
मी करते उडीद पीठ वापरुन
मी करते उडीद पीठ वापरुन इडल्या. १ कप इडली रवा, १/२ कप उडिद डाळ पीठ...पाणी घालून भिजवून ठेवायचं एक तास. हे भिजवताना गुठळ्या होतात पण चालेल. मग एक तासाने ते नीट भिजलेलं असतं. मग पुन्हा पाणी घालून सरबरीत करायचं. आता गुठळ्यापण नीट मोडता येतात. मग ठेवायच overnight. म्हणजे एकंदरीत पाणी जास्त लागतं. छान हलक्या सॉफ्ट होतात, कळतही नाही डायरेक्ट पीठ वापरलय.
पापड कर.. instant डोसे कर,
पापड कर..
instant डोसे कर, मा.बो. वर असेल कुठे तरि क्रुति.
धन्स मिती प्राजक्ता .. घरी
धन्स मिती
प्राजक्ता .. घरी सगळ्यांनी पापडच सांगितले.. म्हणुनतर इथे आले ..

ज्वारीच्या पिठात मिसळून
ज्वारीच्या पिठात मिसळून भाकर्या करता येतील ( पावपट मिसळायचे ) तांदळाच्या पिठात मिसळून आंबोळ्या करता येतील. पाणीपुरीच्या पुर्या (रवा व कणकेत मिसळून ) करता येतील. पीठ कोरडेच भाजून डांगर करता येईल.
माझ्या कडील बासमती तान्दुळ
माझ्या कडील बासमती तान्दुळ बहुतेक नवीन असावेत्,कारण भातात नेहमी प्रमाणेच पाणी घालून कुकर मधे शिजवून भात चिकट होतोय.मी १ पेर भर पाणी रहील इतके पाणी घालते त्यात शिजवतान्ना.
आता कालच बी.जे तून १५ पाउन्ड चा पैक आणलाय्.....चिकट भात खाववत नाही. का काही चुकतय माझ?
भात मो़कळा होण्यासाठी आता अ़ऊन काय करता येइल बर???
जुना आणि नवीन तान्दूळ कसा ओळखावा?
इथे बन्द पैक मुळे कळणार नाहीना पण
Pages