Submitted by सुप्रिया जाधव. on 5 December, 2018 - 15:00
जरी उडतात स्वच्छंदी थवे हे पाखरांचे
प्रवासाची दिशा वाहन ठरवते अनुभवांचे
तुझ्या माझ्यात पडलेली दरी समृद्ध झाली
किती होते सुपिक अवशेष खचल्या डोंगरांचे
नव्याने चढवले मजले जुन्या-पडक्या घरांवर
परंतू राहिले धोंडे बदलणे पायथ्यांचे
तुझ्या मजबूत खांद्यावर विसावे मान माझी
अशी पडतात स्वप्ने पण करू मी काय त्यांचे ?
शिखर गाठून गायबले कुठे....माहीत नाही
कधीचे शोधते आहे ठसे त्या पावलांचे
तुझ्या गावात आला ना अकाली पूर यंदा ?
हजारो शेर होते ते निखळल्या आसवांचे
जरा उतरव 'प्रिया' साशंकतेचा गूढ चष्मा
मळे दिसतील फुललेले तुला सदभावनांचे
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<< उभे केले नव्याने बंगले
<<< उभे केले नव्याने बंगले पडक्या घरांवर
परंतू राहिले धोंडे बदलणे पायथ्यांचे >>>
सुंदर
तुझ्या माझ्यात पडलेली दरी
तुझ्या माझ्यात पडलेली दरी समृद्ध झाली
किती होते सुपिक अवशेष खचल्या डोंगरांचे>>> व्वा
जरा उतरव 'प्रिया' साशंकतेचा
जरा उतरव 'प्रिया' साशंकतेचा गूढ चष्मा
मळे दिसतील फुललेले तुला सदभावनांचे
खुपच सुरेख.
सर्वच शेर आवडले.
सर्वच शेर आवडले.
मनःपूर्वक आभार मंडळी
मनःपूर्वक आभार मंडळी