गझल - एक हत्ती

Submitted by बेफ़िकीर on 29 November, 2018 - 11:11

गझल - एक हत्ती
=====

एक हत्ती अणुस्करामध्ये
माणसे आपल्या घरामध्ये

कृष्णविवरे अनेक टपलेली
आपल्यातील अंतरामध्ये

एक डुबकी तुझ्यातली म्हणजे
एक घुसमट सरोवरामध्ये

हे तुझे आत ये मला म्हणणे
काय आदर, अनादरामध्ये

प्रेमगाथा अपूर्ण नसत्या तर
मीठ नसतेच सागरामध्ये

झाड, कर्जे नि दोर एखादा
काय होणार वावरामध्ये

व्यावसायिकपणे म्हणू, ते, जे?
बोललो भावनाभरामध्ये

मालकी 'बेफिकीर' नाकारे
पण अटीट्यूड चाकरामध्ये

=====

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कृष्णविवरे अनेक टपलेली
आपल्यातील अंतरामध्ये
एक डुबकी तुझ्यातली म्हणजे
एक घुसमट सरोवरामध्ये >>>
अप्रतिमच