Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पिकलेल्या केळाची कोशिंबिर पण
पिकलेल्या केळाची कोशिंबिर पण मस्त होते, केळाचे बारिक तुकडे करून त्यात साखर मीठ, घट्ट दही
आणि मोहरी फेसून... अप्रतिम...
मोहरी फेसणे म्हणजे काय?
मोहरी फेसणे म्हणजे काय?
दक्षि आई करायची पि. केळ्याची
दक्षि आई करायची पि. केळ्याची कोशिंबीर पण मोहरी फेसून नव्हती करत.
मोहरी फेसून रायते करायची आई, काकडी आणि कच्च्या पपईचं.
इथे वाचून कोशिंबिरी कळल्या मोहरी फेसूनच्या, करून बघेन की नाही माहिती नाही पण नवीन पदार्थ समजले.
मोहोरी फेसणे.
मोहोरी फेसणे.
मोहोरीची डाळ / मोहोरी भरड वाटून मग पाण्यात किंवा लिंबाच्या रसात भिजवून चांगली घुसळणे. तिला फेस येतो अन मोहोरी चढायला लागते. नीट फेसलं तर हे प्रकरण झणझणीत तिखट डोळ्यातून पाणी अन ठसका लावणारं बनतं.
यात लाल मोहोरी चांगली की काळी ते काकवांना विचारणे. मला जी सापडेल ती वापरतो. मला तरी काळी थोडी जास्त कडवट लागते.
त्या तिकडल्या रेस्पींत
त्या तिकडल्या रेस्पींत सांगितलेलं आहे नव्ह का? काळी मोहोरी फेसायला वापरू नका म्हणून...
मिक्सरच्या लहान पॉट मध्ये सुरेख फेसल्या जाते मोहोरी. आधी कोरडीच फिरवून कूट करायचं आणि मग रेस्पीनुसार आणि वर डॉ म्हणलेत त्यानुसार पाणी किंवा लिंबाच्या रसात ते कूट भिजवून पुन्हा फिरवायची. चांगली फेसल्या गेलेली मोहोरी हलक्या पिवळ्या रंगाची दिसते आणि नुसत्या सुवासावरूनही झणका जाणवतो. पदार्थांत घातली ही मोहोरी की एखाद दिवसानंतर मुरते आणि चांगलीच चढते. बोटभर चाटला पदार्थ अन समोरचा हडबडला की समजायचं काय ते...
>>> मोहोरीची डाळ / मोहोरी भरड
>>> मोहोरीची डाळ / मोहोरी भरड वाटून मग पाण्यात किंवा लिंबाच्या रसात भिजवून चांगली घुसळणे
करेक्ट.
लाल मोहरी प्रेफरेबल. काळी कडवट लागते हेही बरोबर.
एकूणात आरारांना पैकीच्या पैकी मार्क्स!
मोहरी (फेसवेल्या) वरुन
मोहरी (फेसवेल्या) वरुन कांजीवडा आठवला. नवरात्रात अष्टमीला करण्याची पध्दत वर्हाडात आहे. आईला आवडायचा. मी कधी खाल्ला नाही कारण स्ट्राॅंग असतो पण तोच झणका लोकांना आवडतो. टमाट्याच्या लोणच्यातही मोहरी डाळ टाकतात अर्थात तेही लोणच मी करतही नाही खातही नाही.
कांजीवडा आठवला.>>>>>> रेसिपी
कांजीवडा आठवला.>>>>>> रेसिपी टाका ना.
मोहरीची कुटलेली पूड मिळते
मोहरीची कुटलेली पूड मिळते विकत आता, निदान बंगाली-बहुल ठिकाणी तरी. चांगला झणका असतो. भरडायची कटकट नाही. थेट पाण्यात मिसळून वापरायची
मोहोरी फेसण्यात काही वेगळे
मोहोरी फेसण्यात काही वेगळे करायचे असते का? मागे एकदा मी मिक्सरच्या लहान भांड्यात पाणी घालून लाल मोहोरी फिरवली होती तेव्हा झाकण उघडल्यावर नाक आणि कपाळ पॅरलाईज झाल्यासारखं झालं होतं. पण काल परवा तसंच केलं तर फार चढली नाही मोहोरी.
मोहरीची कुटलेली पूड मिळते
मोहरीची कुटलेली पूड मिळते विकत आता, निदान बंगाली-बहुल ठिकाणी तरी. >> अमेरिकेत इंडियन ग्रोसरी मधे पण मिळते. राई ना कुरिया असे गुजरातीत म्हणतात. तेच लिहिलेले असते पाकीटावर. लाल मोहरीची असते की काळ्या ते मात्र मला माहित नाही. लोणच्याकरता आणते मी.
बाईंच्या मिरचीच्या रेसिपीकरता लाल मोहरी मात्र आमच्या इथे कधी मिळाली नाही.
मोहरी (फेसवेल्या) वरुन
मोहरी (फेसवेल्या) वरुन कांजीवडा आठवला.
<<
यूट्यूबवरची रेस्पी. बराच खटाटोप आहे, पण भारी लागेलसं वाटतंय. सध्या इलेक्शनच्या गडबडीत फिरतोय, मोकळा झालो की बनवेन.
(हा यूट्यूबचा बाल-शेफ मराठी आहेसं दिसतंय. परात, भिजने देंगे वगैरे डायलॉग आहेत त्या व्हिडूमधे. )
मारवाडी आहे तो, फार छान
मारवाडी आहे तो, फार छान रेसिपी असतात त्याच्या.
>> मिक्सरच्या लहान भांड्यात
>> मिक्सरच्या लहान भांड्यात पाणी घालून लाल मोहोरी फिरवली होती तेव्हा झाकण उघडल्यावर नाक आणि कपाळ पॅरलाईज झाल्यासारखं झालं होतं
येस - हीच पद्धत आणि हीच कसोटी.
माझ्या माहेरी नाकारड नावाचा ्
धन्यवाद आ.रा.रा., योकु ....
माझ्या माहेरी नाकारडं नावाचा ् पदार्थ होत असे.. त्याची पाककृती माहित नाही...मोहरी फेसलेली काकडीची कोशिंबीर हा तसाच पदार्थ असावा असं वाटतंय..
येस - हीच पद्धत आणि हीच कसोटी
येस - हीच पद्धत आणि हीच कसोटी. >>आता का नाही होत मग? माकाचु?
अरे कुठे नेऊन ठेवलीत माझी का
अरे कुठे नेऊन ठेवलीत माझी का ची को .. एवढ्या कमेंट्स पडल्या
किसलेल्या काकडीबद्दल आरारांशी सहमत.
घरातल्या लोकांपुरती खमंग काकडी करताना मी काकडी सूरी वर किंवा वावे म्हणाली तसं अंजली च्या त्या कटर वरच कोचवते.
पण कोचवलेल्या काकडीची दही घालून करत नाही मी कोशिंबीर .. ओन्ली दाकू घालून . कोचवलेल्या काकडीचे फार पाणी निघत हि नाही खरे तर .
पण उगाच ५० माणसांसाठी मी कशाला काकडी कोचवत बसू ? २ तास लागले असते नुसते ती कोचवायला म्हणून किसली त्यात घट्ट दही,साखरेने पाणी सुटायला नको पण तरी थोडा गोडवा हवा म्हणून मध, डाळिंबाचे दाणे आणि सफरचंद किसून टाकले ..
इथे तुर्किश दुकानातलं दही खूप घट्ट असतं अगदी मस्त कवडी पडते सो त्याच्याने पात्तळ व्हायचा प्रश्ण नव्हता . आणि मला कोशिंबीर करून न्यायची नव्हती रायता न्यायचा होता . मी माझ्यापुरता हा समज(गैर ?! ) करून घेतला आहे कि रायता म्हंटलं कि दही आणि कोशिंबीर म्हणजे नो दही
मी काकडी किसली ती किसली इथे त्याच्या डबल किस पडला बास आता आणखी काकड्या नका किसू
किसलेल्या काकडीचा दही / सावर क्रीम घालून रायता खूप छान होतो. या प्रकारच्या रायत्यासाठी किसलेलीच काकडी हवी. खूप छान मिळून येतो रायता. अंजली, हा रायता आदल्या दिवशीही करुन ठेवता येतो.>> हो का ? कधी पाहिलं नाही करून .. आणि मोठ्या प्रमाणावर करायची असल्याने मला रिस्क नको होती
मिक्सरच्या लहान भांड्यात पाणी
मिक्सरच्या लहान भांड्यात पाणी घालून लाल मोहोरी फिरवली होती तेव्हा झाकण उघडल्यावर नाक आणि कपाळ पॅरलाईज झाल्यासारखं झालं होतं >>>
फेसलेल्या मोहरीचा झणझणाट कमी पडल्यास तीच मोहरी घालून मुळ्याची कोशिंबीर करून खावी
कपाळ, नाक, कान, स्क्रोल
कपाळ, नाक, कान, स्क्रोल करणाऱ्या हात सगळ्याला झिणझिण्या आल्या.पण फेसलेल्या मोहरीवरच्या पोस्टीं काय संपायला तयार नाहीत. ☺️☺️☺️
गूळपोळी वाल्या काकूंची आहे ना
गूळपोळी वाल्या काकूंची आहे ना ती रेस्पी?
मुळ्याची कोशिंबीर ही घ्या... सापडली
ओके. लेटेस्ट टीप.
ओके. लेटेस्ट टीप.
सकाळी आंघोळीआधी डोक्याला तेल लावायची सवय आहे. पण पाहतो तो काय! तेलाच्या बाटलीत तेल दगडासारखे गोठलेले होते. नॉर्मली गरम पाण्यात बुडवून वाट पहात बसावी लागते. आज डोक्यात किडा वळवळला.
१५-१७ सेकंद मावे केल्यावर बाटलीतील तेल झकास पातळ होते.
बाटलीचे झाकण उघडे ठेवावे, जेणेकरून बाटली फुटण्याची शक्यता शून्य होईल.
तेल खाण्याचे नसल्याने कंटेनर मावे सेफ आहे/नाही, प्लॅस्टीक मावेत? वगैरे प्रश्ण विचारू नयेत.
कंटेनर मावे सेफ आहे/नाही,
कंटेनर मावे सेफ आहे/नाही, प्लॅस्टीक मावेत?>>> वाचता वाचता हा प्रश्न डोक्यत आलाच एकदा चुकून मावे सेफ भांड्यात चमचा राहीला. मावे सुरु केल्यावर अश्या ठिणग्या उडाल्या ना कि तेव्हापासून कानाला खडा.
शेंदेलोण, पादेलोण, सैंधव आणि
शेंदेलोण, पादेलोण, सैंधव आणि rock salt या सगळ्या गोष्टी एकच की वेगळ्या?
मला चिरलेल्या आवळ्यात rock salt आणि लिंबू घालून थोडंस मुरवून खायला आवडतं. पण पूर्वी आणलेलं पॅकेट बाटलीत मोकळं करून फेकून दिलं तर आता नाव माहीत नाही
सैंधव = शेंदेलवण = हिमालयन
सैंधव = शेंदेलवण = हिमालयन रॉक सॉल्ट हे माहीत होतं.
पादेलवण म्हणजे वोल्कॅनिक ब्लॅक सॉल्ट असं गूगल केल्यावर कळलं.
स्वाती, आभारी आहे.
स्वाती, आभारी आहे.
आणि मग काला नमक काय आहे?
आणि मग काला नमक काय आहे?
शेंदेलोण, पादेलोण, सैंधव आणि
शेंदेलोण, पादेलोण, सैंधव आणि rock salt या सगळ्या गोष्टी एकच की वेगळ्या?
<<
द्येवा!
रॉक साल्ट = खाणीत सापडणारं मीठ. यात शेंदे/पादे व सैंधव लवण सगळेच येतात.
सी साल्ट = समुद्राचं पाणी बाष्पीभवन करून मिळवलेलं मीठ. उर्फ खडे मीठ.
शेंदे लोण = शिंदी/सिंधी लोकांचे लवण उर्फ मीठ. = सैंधव.
हे रंगाने मळकट पांढरे असते व प्रामुख्याने सिंध प्रांतातील खाणींत सापडते, हे भारतभर आयात केले जात असे व सिंधकडून आलेले लवण असे त्याचे नांव पडले. यात सोडियम क्लोराईड शिवाय इतरही (उदा पोटॅशियम क्लोराईड) क्षार असतात त्यांमुळे नेहेमीच्या "टेबलसॉल्ट" च्या तुलनेत सोडियम क्लोराईड कंटेन्ट कमी, व त्यामुळेच चवीला खारटपणाही कमी असतो.
काहीवेळा हे थोडे गुलाबीसरही असते.
पादेलोणात गुलाबीपणा डायरेक्ट काळा होतो. हेच ते काला नमक.
यात नेहेमीच्या (नॉर्मल सैंधवात असते त्या) सोडियम क्लोराईड, सल्फाईड, सल्फेट पोटॅशियमचे क्षार इ, यांच्या व्यतिरिक्त आयर्न सल्फाईड व हायड्रोजन सल्फाईड असतात. आयर्नमुळे रंग गुलाबी/लाल्/काळपट लाल होतो, (लोह जितका जास्त तितका रंग डार्क) तर हायड्रोजनसल्फाईडचा तो टिपिकल उकडलेल्या अंड्याचा वास /चव मिठाला येते.
अन हो, हे पादेलोण, सैंधव मीठ हिरडा, बेहडा, आवळा, बाभळीची साल अन थोड्या बेकिंग सोड्यासोबत चिनीमातीच्या भांड्यात भाजून बनवत. आजकाल सिंथेटिकली बनवतात म्हणे.
आपण टेबलसाल्ट म्हणून वापरतो ते 'शुद्ध' व 'देश का नमक' वालं मीठ आर्टिफिशियली आयोडाईज्ड असते, यात ऑल्मोस्ट ९९% सोडियम क्लोराईड असते, व हे सी साल्ट असते. अर्थातच समुद्राच्या पाण्यापासून बनवले जाते. पूर्वापार चालत आलेल्या मिठागरांची टेक्नॉलॉजी यात वापरली जात नाही, तर व्हॅक्युम इव्हॉपरेशन टेक्निक वापरले जाते.
छान माहिती. आभारी आहे
छान माहिती. आभारी आहे
छान माहिती. आभारी आहे
छान माहिती. आभारी आहे
धन्यवाद, आरारा.
धन्यवाद, आरारा.
Pages