Submitted by जोतिराम on 20 June, 2011 - 00:15
संध्याकाळच्या त्याच वेळी
आठवण तुझीच आली
क्षणभर माझी पापणी
आसवांमध्ये न्हाली
मला साद देताना
डोळे तुझे खुलायचे
ओठ हसर्या झोक्यावरती
खुप खुप झुलायचे
आठवुन आता काळजामधे
होतय पाणी - पाणी
क्षणभर ......
तीच आठवण येते पुन्हा
गुलाबावाचुन घडलेली
माझा प्रश्न नि उत्तर तुझं
दोन्ही वाचुन नडलेली
डोळ्यामधल्या भावनांना
अधिरता मग आली
क्षणभर ......
कुठे आहेस तु आता
आठवण माझी काढतेस का ?
माझी आठवण आल्यावरती
माझ्यासारखी रडतेस का ?
डोळ्यावरची ओली रेघ
आता पुसुन झाली
तरी पुन्हा माझी पापणी
आसवांमध्ये न्हाली....
-- जोतिराम
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
पहिलाच प्रयत्न....
पहिलाच प्रयत्न....
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/26715
दुसरा प्रयत्न
सुंदर....
सुंदर....
पहिलेच प्रयत्न पण चांगल्या
पहिलेच प्रयत्न पण चांगल्या दिशेने. छान. लिहीत रहा, मनस्वी दिसतेय कविता
खरंच मनस्वी
खरंच मनस्वी
आपल्या सर्वांचे आभार . पल्ली
आपल्या सर्वांचे आभार .
पल्ली चुका टाळण्यासाठी असेच मार्गदर्शन कराल हिच अपेक्षा...
आपल्या आभार .
पल्ली, तिसरा प्रयत्न पण
पल्ली,
तिसरा प्रयत्न पण चांगल्या दिशेने. बर कां !
http://www.maayboli.com/node/26894
खुप छान ज्योतीराम
खुप छान ज्योतीराम