१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
आशुचा नुख्सा (?) बरोबर आहे.
आशुचा नुख्सा (?) बरोबर आहे. मी एकदा हे केलं होतं. कोलगेट लावल्यावर खूप हलका झाला डाग. मग नंतर धुवून धुवून पुर्ण गेला होता.
बायांनो/मुलिंनो इथे नविन बाफ
बायांनो/मुलिंनो इथे नविन बाफ उघडलाय.
http://www.maayboli.com/node/11317
अश्विनी, हे राहिलं.. ६.
अश्विनी, हे राहिलं..
६. मुळात ही घरगुती बाब चव्हाट्यावर मांडावी की नको ?
७. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देणे योग्य की अयोग्य ?
कुठे उघडाला आहे? मला दिसत
कुठे उघडाला आहे? मला दिसत नाहीये ते पान.
माझ्याकडे चकलीची भाजणी आहे.
माझ्याकडे चकलीची भाजणी आहे. चकल्या करायला किति मोहन घालावं लागेल?
<<बायांनो/मुलिंनो इथे नविन
<<बायांनो/मुलिंनो इथे नविन बाफ उघडलाय.
http://www.maayboli.com/node/11317>>
प्राजक्ता, मला बाफ दिसत नाहिये. मला सभासद व्हायला लागेल या ग्रुपचे. कुठे उघडला आहेस हा बाफ सांगशिल का प्लिज?
अखि,लाजो 'माहीति हवि आहे ' या
अखि,लाजो
'माहीति हवि आहे ' या ग्रुपचे सदस्य व्हा.
धन्स प्राजक्ता अत्ता करते
धन्स प्राजक्ता
अत्ता करते विनंती...
दोन वाटी उडदाऐवजी मूग डाळ
दोन वाटी उडदाऐवजी मूग डाळ भिजत घातलिये. त्याचं आता काय करू???
नंदिनी ढोकळा बनव त्या
नंदिनी ढोकळा बनव त्या मूगडाळीचा. डाळितलं पाणी काढुन टाकून मिठ मिरची थोडसं जिरं (आलं लसूण आवडत असेल तर) घालून वाटून घे. चमचाभर तेल गरम करून घे. ज्या भांड्यात ढोकळा करायला लावणार असशिल त्यात तेल टाकून ईनो फ्रुट सॉल्ट्(लेमन) टाक वाटल्या डाळीचं बॅटर ओत. २० मिनिटे वाफवून मस्त ढोकळा तयार. थंड झाल्यावर बाकी नेमहीप्रमाणे वड्या पाडून फोडणी वगैरे.
नंदिनी, जिरं मिरची घालून डाळ
नंदिनी, जिरं मिरची घालून डाळ वाट आणि मीठ घालून हाताने फेटून घे. आणि अर्ध्या तासाने त्याची भजी तळ. त्याला मुगोरे म्हणतो आम्ही.
मंजु, दिवाळीच्या आधीच तळणीचे
मंजु, दिवाळीच्या आधीच तळणीचे काही नको वाटतय... ढोकळा कालच केला होता. परत आज करायचा?????
अगं राणी मग डोसे कर. छान
अगं राणी मग डोसे कर.
छान होतात.
मग त्याची जिरं मिरची घालून
मग त्याची जिरं मिरची घालून मिक्सरमधून फाईन पेस्ट करून घे. मग मीठ, कोथिंबीर, चमचाभर तेल, थोडं बेसन घालून सरळ डोसे/घावन घाल.
मुगाच्या डाळिचे पराठे हि
मुगाच्या डाळिचे पराठे हि चांगले होतात, कोंथिबिर्,मिरचि,लसुण घालुन भरड्सर वाटुन घ्यायचीं. पोळि लाटुन त्याच्या अर्ध्या भागावर डाळिचे मिश्रण पसरवायचे दुसरा अर्धा भाग दुमडुन तेल सोडुन खमंग भाजायचे.
नंदिनी, त्याचा शिरा/ हलवा करु
नंदिनी, त्याचा शिरा/ हलवा करु शकतेस. मिक्सरवर वाटुन घे आणि तुपावर खमंग भाजुन घे, मग दुध आणि साखर घाल. फक्त हे भाजायला वेळ आणि तुप थोड जास्त लागते.
पसरट्टु कर ग त्या भिजलेल्या
पसरट्टु कर ग त्या भिजलेल्या मुगाच्या डाळिचे
हरा-भरा
हरा-भरा कबाब.
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=728021#P...
नाहीतर सरळ शिजवून आमटी/वरण/सार.
घरी दिवाळी निमित्त आलेल्या
घरी दिवाळी निमित्त आलेल्या मिठाईत जवळपास एक किलो बर्फ्या पडून आहेत. त्यात अर्धा किलो काजूकतलीच आहे. गोड खाऊन वैताग आल्याने कुणीही त्याला हात लावत नाहीये. पण एवढा खवा, मलई वाळून जाताना पाहणं जीवावर येतंय.. त्याचं काय करता येईल?
माझ्याकडे ४ किलो नाचणी सत्व
माझ्याकडे ४ किलो नाचणी सत्व आहे. मी अधुनमधुन लापशी वगैरे करतो पण ते अजून संपता संपत नाहीये. अजून काय बरे करता येईल. कढी देखील करुन पाहतो. शीरा वगैरे होऊ शकतो का? बरे फ्रीजमधे किति दिवस आपण पिठ वगैरे साठवू शकतो. माझ्याकडे होते असे की एकदा काय एखादी गोष्ट फ्रीज मधे गेली की परत बाहेर काढायला मला महिने लागतात. कधीकधी मला फ्रिजचा हा एक तोटा वाटतो की वस्तू कोंबून ठेवायची सवय लागते. वेळ मिळत नाही त्यामुळे आणखीनच त्या पडून राहतात. कधीकधी तर एखादे धान्य वा पिठ घरात असून ते शोधायचा इतका कंटाळा येतो कारण सर्व वस्तू फ्रिजमधून काढाव्या लागतात. इथे सिंगापुरात धान्य नि पिठ खूप लवकर खराब होतात. शिवाय ऊन देता येत नाही.
रोज थोडे सत्व पाणी घालून गॅस
रोज थोडे सत्व पाणी घालून गॅस वर ठेव ४ मिनिटं.. नंतर जिरेपूड आणि मीठ घालून खा.
थोडं नाचणीचं सत्व ताकात
थोडं नाचणीचं सत्व ताकात कालवून हिरवी मिर्ची व मीठ जीरं घालून उकळंव. मस्त लागतं
आशु, अगं फुलपुडी टाकायला येणारा / पेपर टाकायला येणारा छोकरा, इस्त्रीवाला, झाडूवाला यांना ४-४ बर्फ्या कागदात बांधून देवून टाक. एक समोरच खायला लाव. काजूकतली वगैरे त्यांना मिळतच नाही कधी त्यामुळे त्यांचे खुष चेहरे बघायला आपल्याला मस्त वाटतं. मलईवाली बर्फी घालून दुधीहलवा, गाजरहलवा करुन ठेव.
आशू, पंजाबी भाज्यांमध्ये
आशू, पंजाबी भाज्यांमध्ये घालता येतील त्या बर्फ्या
अगदी अगदी अश्विनी. मी आत्ता
अगदी अगदी अश्विनी. मी आत्ता हेच लिहीणार होते, पेपरवाल्याला, बाईंना, दूधवाल्याला देऊनटाक म्हणून (मिठाई अजून चांगली असेल तरच).
दुसरं म्हणजे जबरदस्ती संपवू नको. त्यानी वाढलेल्या कॅलरीज जाता जात नाही.
आशू, दूध आटवून बासुंदी कर
आशू, दूध आटवून बासुंदी कर (किंवा आवडेल तितके दाट कर). काजूकतलीचा वर्ख काढून मायक्रोवेव्हमध्ये १० सेकंद ठेव. ती जराशी मऊ झालेली असेल.. त्याचे अंगूरमलाईचे करतो तसे छोटे गोळे कर आणि गरम बासुंदीमध्ये सोड. खव्याची खीर अशी मूळ रेसिपी आहे, त्याचं हे दुसरं व्हर्जन
अगदी टॉप लागेल असा माझा अंदाज.
रच्याकने, खव्याच्या गोळ्यांची बासुंदी करून बघा.. वेगवेगळे खायचे रंग घातले, तर ही खीर सुंदर दिसते, लागते तर कमालच!
देवा! अगं , परवा दिवाळसणासाठी
देवा! अगं , परवा दिवाळसणासाठी ३ किलो रसमलई आणली होती त्यातली १ किलो अजून उरली आहे!
)
तरी अर्धी काल संपवली. आणि त्यातलीच पनीर बटर मसाला अजून फ्रिज मध्ये आहे. पंजाबीचं नाव नको!
(१२ माणसांचा अंदाज सांगितला त्या बाईंना, त्यात परवापासून २२ माणसे जेवली. पण अजून भाज्या आणि पुलाव आजही पुरेल इतका आहे! अंदाज अपना अपना !!
पण खव्याचं याशिवाय अजून वेगळं होणार तरी काय!
आशु, अगं खव्याच्या साटोर्या
आशु, अगं खव्याच्या साटोर्या कर. बर्या टिकतातही त्या. साटोर्यांच्या प्रॅक्टीससाठी बरी आहे बर्फी
रैना, अश्विनी याना अनुमोदन.
रैना, अश्विनी याना अनुमोदन. आम्ही दरवर्षी पाडव्याच्या दिवशी देवळात जाताना मिठाई घेऊन जातो व तिथे वाटून देतो. लोक पण खुश होतात, वाया देखील जात नाही. तसेच, मोलकरीण, स्वयंपाकवाल्या काकू, वगैरेना फराळाचं बांधून देण्यापेक्षा मिठाईच देतो.
मुगाच्या डाळीवद्दल धन्यवाद. मी रत्नागिरीला गेल्यामुळे ती मी आमच्या पोळीवाल्या मावशीना देऊन टाकली.\
आशु, गाजर हलवा, दुधी हलवा वगैरे करता येइल. खव्याच्या पोळ्या पण करता येतील. (कशा करायच्या ते मला नाय माहित्)न
आशु, चार चार बर्फ्यांच्या
आशु, चार चार बर्फ्यांच्या पुड्या कर आणि देवळाबाहेर किंवा कुठे कुठे बसलेल्या लहान मुलांना दे. अश्विनीने सांगितलेले पण मस्तच.
बी, नाचणीच्या सत्त्वाचे लाडू
बी, नाचणीच्या सत्त्वाचे लाडू छान होतात. पुरेशा तुपावर खमंग भाजून घे आणि त्यात ते थंड झाल्यावर तुझ्या आवडीप्रमाणे पिठीसाखर तसेच बदाम काजूचे काप घालून वळ. पीठ चांगले भाजल्यामुळे टाळ्याला चिकटत नाहीत. वेळी अवेळी भूक लागल्यास तोंडात टाकायला छान लागतात. त्यामुळे बेताच्याच आकाराचे कर.
Pages