चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हा मंडळीना चित्रपताचे छपरी नाव , दिग्दर्शक,त्यार्तील नट /नट्या यावरून त्या चित्रपटाचे प्याकेज लक्षात येत नाही का? विशेषतः विद्वान आणि साक्षेपी लोकांना ? अर्थात हिन्दुस्तानके ठग सारख्या ठिकाणी फसवणूक होउ शकते Proud

अहो याला चित्रपटाचे केव्हडे कौतुक झाले होते. भारतीय गुप्तहेर, काश्मिर प्रश्न, स्त्रीप्रधान वगैरे. काश्मिर तर कुठे दिसलाच नाही. अभिनय पण भारी आहे वगैरे वगैरे

गॅटमॅट की गॉटमॅट ? या नावाचा मराठी चित्रपट आहे अवधूत गुप्तेचा. रसिका धबडगावकर (आता रसिका सुनील - मानबा फेम) आहे यात. तिच्यासाठी आणि अवधूत गुप्ते साठी बघावा असे वाटते. नाहीतरी टाईमपास मूव्ही बरे वाटतात. नाळ संथ असणार. इथे वाचून ठरवू.
( मी आजच किस किस से प्यार करू हा कपिल शर्माचा सिनेमा नेटवर पाहिला आहे. आणि माझा वेळ चांगला गेला. मी कुठल्या टाईपचा आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल)

टवणे सर , तुम्ही राझी आणि नाम शबाना मध्ये गल्लत करताय
>>>>
अरेच्या खरेच की. नेटफ्लिक्सवर नाम शबाना पाहून मला वाटले तो हाच

नाळ पाहिला काल. आवडला. सगळ्यांची कामे छान झालीयेत. नागराज मंजुळे ने रोल केलाय पण दिग्दर्शन नाही. तेव्हा सैराट सारख्या अपेक्षा ठेवून बघायला जाऊ नये. तर आवडेल. बाकी ते छोटं पोरगं गोड आहे Happy

'नाळ' बघीतला. सगळी वातावरण निर्मिती मनासारखी जमवून आणली आहे आणि आता खरी कथा सुरू होईल म्हणून प्रेक्षक सरसावून बसतोवर संपला! जेवढा आहे तेवढा चांगला आहे. एखाद्या सुगरणीने उंधियोसाठी सगळी सामग्री मेहनतीने जमवून व्यवस्थित नीटवाट करून घेतली आहे आणि त्यातून आपण आता मस्तपैकी उंधियोची अपेक्षा करत असताना ती सामग्री सलाडरूपात ताटात पडावी असे वाटले.

स्पॉयलर (ठरू शकतो)
श्रीनिवास पोकळे (चैतन्याचं काम केलेला बालकलाकार), देविका, आजी यांची कामं छान आहेत. ओम भूतकर (मामा), चैत्याची आई खरी थोड्यावेळासाठी येऊनही लक्षात राहतात. श्रीनिवास आणि आजी यांचे संवाद आणि एक्प्रेशन्स हे (त्यांच्या वयाचा विचार करता) त्यांच्याकडून इतक्या बिनतोड करून घेणे याबद्दल दिग्दर्शक आणि टीमची कमाल कराविशी वाटते. जयेसचे गाणेही आवडले.

टवणे सर चित्रपट पहायला हातात फिलॉसफीचे पुस्तक घेउन बसता काय? पुस्तकात पाहत पाहत पिक्चर पाहतात की क्वॉय?

पूर्वी सिनेमात पात्रं फिलॉसॉफी झोडायची. आता संवादातून दिलेले असले डोस हद्दपार होत चालले आहे. नाटकात अजूनही आहेच. मराठी सिनेमात कधी कधी जाणवते.

पुस्तक नाही सुरी, कुकर, तवा घेऊन बघतो स्वयंपाक करत.

तुम्हाला तरी कुठून वेळ मिळतो हो इथे यायला? राज्यात दुष्काळ आहे, सीमेवर सैनिक लढत आहेत आणि तुम्ही बाबू लोक माबोवर गप्पा हाणायला येता Light 1

नाळ.......मुळातच छोटा जीव असणारी कथा सुरेख गुंफलीय.या सिनेमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे चैत्या!त्याचा सहज सुंदर अभिनय चकित करतो.त्याच्याकडून काम झकास करवून घेतले आहे.तसेच इतर पात्रांचा सहज वावर,अतिशय सुरेख फोटोग्राफी ही या सिनेमाची शक्तीस्थळे आहेत.सुमीची शेजारीण मात्र बर्‍यापैकी शुद्ध मराठी बोलते ते खटकतं.

आपलीमराठीवर कच्चा लिंबू पाहिला. स्पेशल चाईल्ड असलेल्या जोडप्याची कथा. विषय थोडा बोल्ड आहे. त्या स्पेशल असलेल्या मुलाचं लैंगिक शमन, त्याचा सांभाळ, नवरा बायकोचे एकमेकांप्रती प्रेम, बॉसचा आधार अशा बर्याच बाबी आहेत. सगळ्यांनी आपापली कामं उत्तम केली आहेत.
फक्त मला स्पेशल म्हणजे नक्की कसा दाखवायचाय हा मुलगा ते काही कळलं नाही. अंगापिंडाने धिप्पाड असतो, मन लहान मुलाचं म्हणावं पण लैंगिक वासना जागृत झालेल्या असतात. इतर वेळी तो लहान मुलांसारखं बोबडं बोलतो , हावभाव, हातवारे लहान मुलांसारखे करतो.
सगळा पिक्चर ग्रे शेड मधे आहे. फक्त सोकुलच्या जिवनात काहीतरी हॅपनिंग व्हायला जाणार असते तेव्हाची साडी रंगीत दाखवली आहे बॅगेत भरताना.

अतुल परचुरेला बरीच प्रसिद्धी मिळाली होती या नाटकामुळे. रिमा, दिप्र, मोजो आणि अतुलचं नाटक आहे तूनळीवर. प्रसाद ओकला या सिनेमासाठी बरीच बक्षीसं मिळाली, नॅशनल अॅवाॅर्डसुद्धा. चित्रपट खरंच ईतका चांगला आहे का, ब्लॅक न व्हाईट करण्याचा हेतू काय.

मूळ नाटकात स्वाती चिटणीस होती बहुतेक.

मी नाटक, पिक्चर दोन्ही बघितलं नाहीये. जयवंत दळवी यांचं पुस्तकही वाचलं नाहीये. मी कॉलेजात असताना नाटक गाजत होतं आणि काही shots tv वर दाखवले होते तेव्हा स्वाती चिटणीस, दि प्र, मो जो आणि अतुल परचुरे यांना बघितल्यासारखं वाटतं.

चित्रपट खरंच ईतका चांगला आहे का, ब्लॅक न व्हाईट करण्याचा हेतू काय.>>>> चित्रपट चांगला आहे. पण मला नातीगोती चा संदर्भ माहित नव्हता.
ब्लॅक अँड व्हाईट मागे हेतू हा असेल की रटाळ, एकसूरी जीवन किंवा जुना काळ कारण रवी जाधव म्हणतो ४ आण्याला गजरे मिळाले किंवा टाईपरायटरचा वापर.

२.० आताच पाहून आलो. न आवडण्यासारखं काहीच नाही पण बेक्कार जांभया येत होत्या.
लहान मुलांना (ज्यांनी अर्नोल्डचे साय फाय मूवीज पाहीलेले नाहीत ) त्यांना दाखवण्यासाठी उत्तम सिनेमा आहे. या जॉनर मधे हिंदी सिनेमा (तमीळच्या कृपेने) रूळतोय याचं कौतुक म्हणून पहा.

अखेर Kill Bill - Vol I & II दोन्ही पाहिले. (इंग्लिश सिनेमे आवडीने पाहणार्‍यांच्यात हे सिनेमे पाहणारी मी बहुधा शेवटची असेन Proud )

सर्वात पहिलं, इतका हिंसाचार असलेला सिनेमा मी अख्खा बघेन, शिवाय पहिला भाग पाहून झाल्यावर दुसराही बघावासा वाटेल, असं मला स्वप्नातदेखील वाटलं नसतं. त्याला केवळ दोन कारणं - उमा थर्मन आणि पहिल्या भागातलं अगदी शेवटचं वाक्य. (ब्राईडची मुलगी जिवंत असल्याबद्दलचं)
(सबटायटल्सविना सिनेमा असा आणि इतका कळला नसता, हेही खरं.)

काय अचाट, अफाट, बेफाट मूव्ही-मेकिंग आहे !! दोनोळी सूडकथेवर अशा प्रकारे सिनेमा करावा हे कुठून सुचलं असेल!
स्क्रिप्ट, पार्श्वसंगीत आणि कॅमेरावर्क फार भारी वाटलं. तलवारबाजी आणि त्या दृश्यांचं एडिटिंग पण भन्नाट. 'डोळ्याची पापणी लवते न लवते तोच...' हा फॉर्म आणि वेग दोन्ही भागांत कायम ठेवलाय. दुसर्‍या भागातला शेवटचा बिअ‍ॅट्रिक्स आणि बिलमधला खुर्चीवर बसल्या बसल्या तलवारबाजीचा सीन तर 'हैला! आत्ता आपण काय पाहिलं...?!!' असाच आहे. (ते पाहताना डोक्यात सारखं येत होतं, बॉलिवूडवाल्यांनी हे सर्व फाईट-सीन्स स्लो-मोशनमध्ये दाखवून त्याची वाट लावली असती. Lol )

बाकी, सिनेम्याची स्टोरी, त्यातले प्रमुख सीन्स, अमुक पात्र तमुक का वागलं यावर नेटवर ढीगाने फोरम्स आहेत. ते थोडेफार चाळले. माणसं किती चवीचवीनं, पोटतिडिकीनं, उत्साहानं चर्चा करत असतात! (आपणही इथे तेच करतो म्हणा. Wink )
माबोवर या सिनेमाचा धागा वगैरे आला होता का शोधलं. फक्त चि.क.वा.च्या अर्काईव्ह्जमध्ये तुरळक उल्लेख सापडले. (जरा विरसच झाला Proud )

Kill Bill - Vol I & II <<< नोंद करून ठेवतो.
( तुझ्यासारखेच इतरांनीही चिकवावरच समाधान मानले असेल. Happy )

ललिता,
माझ्या मते Tarantino चे सिनेमे ही एक अतिशय वेगळी लीग आहे.
जसे Woody Allen किंवा Alfred Hitchcock चे सिनेमे.

तो प्रेक्षकांचे emotions एका कड्याच्या टोकाला हाकत नेतो आणि टोकावर पोचलेला प्रेक्षक जेव्हा अतिशय vulnerable असतो तेव्हा Tarantino त्यांना जे काही दाखवतो ते प्रेक्षकांसाठी भयंकर satisfying असते.

Inglorious Bastards, Django Unchained (typical bollywood movie) , Hateful Eight हे त्याचे काही अजून चांगले सिनेमे. हे सिनेमे बघितल्यास तूम्हाला माझा वेगळ्या लीगचा मुद्दा ध्यानात येईल.. आणि हो टोकाचा हिंसाचार बघण्याची तयारी ठेवावी लागेल.

किल बिल १/२, स्टोरी टेलिंगचा बादशहा क्वेंटिन टॅरंटिनोचे पिक्चर्स आहेत. किल बिलचे ग्राफिक्स सीन पचवलेत तर रिझर्वाॅयर डाॅग्ज आवर्जुन बघा. त्याचे वेस्टर्न जाॅनरं पिक्चर्स हि क्लासिक्स आहेत...

Pages