सर्वसामन्य माणसाला, अश्या काही गोष्टींचा जाज्वल्य अभिमान असतो, ज्यांची निवड तो स्वतः कधीच करत नाही. त्याउलट, ज्या घटकांची निवड तो स्वतः करतो, त्यांच्याविषयी, त्याला फारसा अभिमान राहिलेला दिसत नाही; किंवा अगदी अभिमान असलाच, तरी तो फार टेम्भा मिरवत नाही ..
खानदान, संस्कृति, जात, धर्म, राष्ट्रियत्व, वर्ण, कूळ, इतिहास यातलं काहीच आपल्या नियंत्रणात अगर निवाडीत नसतं. हा फ़क्त एक योगयोग असतो. लहान मूल जन्माला आलं, की या गोष्टी त्याला आपोआपच चिकटतात !! त्यामधे त्या लाहान मुलाला, कुठलाही पर्याय दिला गेलेला नसतो.
याउलट, शिक्षण, नोकरी, छंद, वाचन, कला, क्रीड़ा ... या सगळ्या गुणांमधे, स्वतःला अनेक पर्याय असतात.. !! इतकंच नव्हे, तर या सगळ्या गुणांना आत्मसात करताना शारीरिक अणि बौद्धिक मेहनतही घ्यावी लागते. यशाची एक-एक पायरी पार करत, पुढे जावं लागतं ..काही वेळा स्पर्धा करुन.. , तर काही वेळा त्याग करुनच, यामधे प्रावीण्य मिळतं..
पण गंमत अशी आहे की स्वतः निवड नं केलेल्या घटकांबाबतच, लोकांना खुप आपलेपणा निर्माण होते. आपल्याला मिळालाय, तो फार महत्वाचा ठेवा आहे अशी दृढ़ भावना जनमानसात दिसून येते. यातूनच, स्व-जातीचा, धर्माचा, इतिहसाचा, स्वतःच्या कुळाचा, भाषेचा लोकांना असलेला पराकोटीचा अभिमान, ते सतत प्रसारित करत असतात. सोशल मिडिया, वृत्तवाहिन्या आणि प्रसार माध्यमांमधे होणाऱ्या अगणिक चर्चांमधे हेच दिसून येतं..
याउलट स्वतःच्या शिक्षणाचा जाज्वल्य अभिमान लोकांमधे फरसा दिसून येत नाही. इस्लाम, ज्यू किंवा हिंदुत्वाबद्दल कट्टरवादाने बोलणारे खूप सुशिक्षित असले तरी “आम्ही डबल ग्रॅज्युएट आहोत” हे धर्माइतक्या कट्टरतेने सांगताना मी तरी ऐकलं नाहीये.
माणूस म्हणून आपण कोणत्या गोष्टींची निवड करतो.........., कोणत्या गोष्टी आपल्याला योगायोगाने मिळाल्यात ..........आणि कोणत्या आपल्यावर लादल्या गेल्या आहेत, हे अजूनही आपल्या (सर्वसामान्य) कॉमन मॅनच्या लक्ष्यात येत नाही ..
ज्याक्षणी आपण योगायोग आणि निवडीमधला फरक, खऱ्या अर्थाने समजून घ्यायला लागू, तेव्हाच आपली खरी वैचारिक प्रगती सुरु होईल !!
शिक्षण, नोकरी, छंद, वाचन, कला
शिक्षण, नोकरी, छंद, वाचन, कला, क्रीड़ा ... या पैकी काहीच जमले नाही, काहीहि सांगण्याजोगी कामगिरी झाली नाही, की मग खानदान, संस्कृति, जात, धर्म, राष्ट्रियत्व, वर्ण, कूळ, इतिहास या सर्वांचा अभिमान उफाळून बाहेर येतो.
मा़झेच पहा ना. मलाहि शिवाजी बाजीराव यांचा प्रचंड अभिमान. आजकालची भारतातली संस्कृती पाहून लाज वाटते म्हणून पाच हजार वर्षांपूर्वीची भारतीय संस्कृती किती थोर होती, भारताने जगाला शून्याची कल्पना दिली, याचा गर्व. शून्यानंतर पुढे (गेली तीस वर्षे सोडता) काहीहि केले नाही, कधी मुसलमानांचे तर कधी इंग्रजांचे नि आता अमेरिकनांचे पाय चाटणे हे जास्त, बाकी तसे बरेच काही केले आहे, अभिमानास्पद आहे, प्रशंसनीय आहे. पण भारतीयांशी बोलायला जावे तर त्यांना फक्त ऑस्ट्रेलियात क्रिकेट टीम काय करेल, कोण रणवीर का कुणि याचे लग्न अश्या गोष्टीतच जास्त रस.