युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीच भाजी का वर चर्चा चालू आहे ती?
chauri.jpg

गवार किंवा वालपापडीसारखे कोरडी काळामसाला वगैरे वापरून केली तर बोर होते ही भाजी. काय चुकले कोणास ठाऊक. काहीतरी टेक्स्चर वेगळे आहे हिचे..

बस्के, शक्य असेल तेव्हा फ्रेश चवळी च्या शेंगा वपरून भाजी करून बघ. इन्डियन स्टोअर मध्ये मिळणार्‍या फ्रोजन भाज्या मला अजिबात आवडत नाहीत. जून, निबर वाटतात त्या मला. कदाचित त्यामुळे भाजी चांगली झाली नसेल.

बस्के, अग ही पटेलकडे छान ताजी मिळते. ती आणुन कर फ्रोजन पेक्षा.
मी शेंगदाण्याचा कुट, मसाल्याच तिखट , गुळ घालून करते. पाणि अज्जिब्बात नाही घालायच. झाकणावर पाणि ठेवून भाजी शिजु द्यायची. आणि तेल थोड जास्त.
मीरा, मी तुरीच्या दाण्याची आमटी करते. ओवा, मिरची, खोबर, आलं,तिखट,गरम मसाला वाटण करून घ्यायच. दाणे थोडे चेचुन किंवा चॉपर मध्ये फिरवायचे. जीर्‍याची आणि थोडा ओवा फोडणी करून वाटण परतायच . आणि तुरीचे दाने टाकून शिजवून मग थोड गरम पाणि घालून रस्सा/आमटी तयार.
इथे लिहायच नाहीये. डिलीट करते वाचल्यावर.

बबौ, आपल्या त्या ह्यांची ही भाजी पण मिळते का काय!
बस्के हो हीच ती. याच्याच शेंगा आणल्या होत्या मी. निबर आणि जून वाटत होत्या भरपूर वेळ शिजवूनही...

तुरीच्या आमटीच्या छान रेसिपीज मिळाल्या योकु आणि सीमा यांच्याकडून.

तुरीच्या शेंगा आता मिळतील लवकर तेव्हा करायला हवेत हे प्रकार.

मी तूर घालून वांग्याची भाजी करते, बरोबर मटार, ओले पावटे पण घालते, गोडा मसाला, गूळ, दाणेकूट घालून.

मी गोडा मसाला, गुळाच्या रस्सा भाज्या करत असले तरी जरा तिखटसर असतात माझ्या भाज्या.

तुरीचे दाणे घालून खिचडी मस्त होते, भोगीला वांग्याच्या भरतात पण मी तूरदाणे, मटार, कांदापात घालते.

तुरीचे दाणे, मटार दाणे, कांदा, टोमॅटो, बटाटा यांचं सारण करून मी तिखट करंज्या, मोदक तळलेले करते.

तुरीच्या शेंगा पाण्यात नुसतं मीठ घालून शिजवून छान लागतात.

तूर, मटार, कांदा, फ्लॉवर, टोमॅटो, बटाटा हे मावेत 5 min शिजवून घ्यायचे त्यात ओवा, जिरं, मिरपूड, मीठ, तिखट , आलं मिरची लसूण तुकडे किंवा ठेचा आणि कोथिंबीर घालायची मग हे सारण ब्रेड मध्ये भरून ब्रेड टोस्ट करायचे.

तुरीचे दाणे always rocks, ह्या सर्वात छान लागतात आणि त्या सुगंधी शेंगा मला कोकणात पोचवतात तुरीच्या शेतात.

उंधियोत पण घालतात, मी करत नाही. बाकी सर्व मी थंडीत एकेकदा तरी करते. आता वर आमटीचे दोन प्रकार मिळालेत तेही करून बघायला हवेत.

>>आपल्या त्या ह्यांची ही भाजी पण मिळते का काय!>> मग? समजलास काय? Wink
खूप पूवी चवळीच्या शेंगा आणून भाजी करायचा प्रयत्न केला आहे पण नाही आवडली विशेष. इथल्या एखाद्या कृतीने पुन्हा करायला हवी.
सगळ्याच फ्रोझन भाज्या वाईट नाही लागत. मी गवार आणि वालपापडी तर हल्ली फ्रोझनच आणते. कोण मोडत बसेल त्या शेंगा?

सायो +११.. फ्रोझन भाज्या भयंकर आवडतात मला. विशेषतः गवार, वालपापडी , फ्रेंच कट ग्रीन बीन्स व काला/हरा चना. पटकन शिजतात. ऑलरेडी निवडून चिरून मिळतात. बेस्ट असतात. फ्रोझन हिरव्या मिरच्या प्रॉपर तिखट असतात व भरपूर टिकतात.
हल्ली तर मेथी पण छान मिळते फ्रोझन. पूर्वी कचरा असायचा त्यात. आता नसतो.
पण ह्या चवरीने पार तोंडावर पाडले. काहीही करून बरी भाजी होईना. परत आणले नाही पाकिट मग.

अरे हो बस्के, मी वाल लिल्वा वगैरेही ठेवते फ्रिजरला. दीपची फ्रोजन कोथिंबीर चटणी घालून झटपट उसळ मस्त होते किंवा पडवळाच्या भाजीत वगैरेही घालता येतात.
मेथी वगैरे नाही आणत. अगदी पचपचीत वाटते ती.

मी पण गवार फ्रोझन आणते. दाकु लावून परतलेली खरपूस भाजी मस्त होते फ्रोझन गवारीची. चवळी मला आवडते पण इथे त्या लांबलचक शेंगा मिळतात त्या सोलत बसायचा कंटाळा म्हणून आणत नाही.

मला २५ ३० माणसांसाठी काकडी चं दही घालून रायतं करून न्यायचं होतं .. कार्यक्रम संध्याकाळी होता आणि आम्ही दुपारीच जाणार होतो .. पाणी सुटायला नको म्हणून काकड्या किसून त्याचं लिटरपेक्षा जास्त पाणी एका भांड्यात झाकण ठेऊन फ्रीझ मध्ये ठेवलं होतं.. उद्या पिऊ शकू असं वाटलं म्हणून टाकून नाही दिलं .. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा फ्रीझ उघडल्या उघडल्या काकडीच्या पाण्याचा भयानक वास आला Sad म्हणून पाणी न पिता ओतून दिलं .. आता या गोष्टीला १ आठवडा झाला ... पण तरी फ्रीज उघडला कि काकडीचा वास येतोच आहे .. Sad फ्रीज एकदा पुसला .. वास जावा म्हणून इथे एक फ्रेशनर मिळतो तो ठेवला आहे .. पण तरी वास येतोच आहे ..
आणि माझं नाक मेलं भयंकर तीक्ष्ण आहे .. आता तो वास डोक्यात जायला लागलाय Sad कोणाकडे काही युक्ती आहे का ?

कांदा ठेवा फ्रीजमध्ये - काकडीचा वास जाईल. Proud
जोक्स अपार्ट, बेकिंग सोड्याने वास जातो म्हणतात - बशीत सोडा घालून ठेवून पहा फ्रीजमध्ये.

yokuchef_0.png
सणसणीत शेफ योकु!!

Lol भारी आहे. कढईखालचा विस्तव फ्रेंच फ्राईजसारखा दिसतोय. Wink

कांदा ठेवा फ्रीजमध्ये - >> अक्षरशः माझ्या डोक्यात हेच आलं होतं .. काट्यानेच काटा काढू म्हणून..
आधी सोडा ठेऊन बघते .. कसा ठेऊ ? एका बशीत /वाटीत उघडाच ना ?

अमित Lol
मग धरा म्हटल्यावर काय करतोस? Proud

Lol

बबौ! मैचित्र नेहेमीप्रमाणे ए१! Happy

अंजली, वेळ असेल तर संपूर्ण फ्रीज रिकामा करून बेकिंग सोड्याच्या पाण्यानी पुसून कोरडा करा. नंतर बेसो उथळ डिश मध्ये ठेवा फ्रीज मध्ये सगळं सामान रीलोड केलं की. कुठलाही नकोसा वास राहात नाही.

Pages