युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. खरवसाला दुधासारखा वास येत नाही. तो वेगळाच वास असतो. शरीराच्या प्रत्येक स्त्रावाला (यात दूधही आले) स्वतःचा असा वास असतो. हा दुर्गंध नसतो.>>>>>> +१.

माझ्या माहितीप्रमाणे चीक विकत घेतला / विकला जात नाही, >>>.. मुंबईत चिक विकत मिळतो.

१. खरवसाला दुधासारखा वास येत नाही. तो वेगळाच वास असतो. शरीराच्या प्रत्येक स्त्रावाला (यात दूधही आले) स्वतःचा असा वास असतो. हा दुर्गंध नसतो.>>+१११
विअर्डसा वास आणि चव>>वाचून नेहमीच्या वासापेक्शा वेगळा असेल असे वाटून तो सल्ला दिला आहे.

डॉक्टर, काल घरी यायला उशीर झाल्यामुळे दूध ओतून दिल नव्हतं, तेवढ्यात रस्त्यात असताना तुमची पोस्ट वाचली. आज अजून एक अटेंप्ट करून बघते. पहिल्यावेळेस कदाचित गुळ घातल्यामुळे आवडला नसेल. आज साखर घालून करते.

राजसी, आम्ही शहरात राहतो. गाय आणि गवळी पहायला सुद्धा मिळत नाही. दूध कोण असं फुकट देणार? मी 100₹/लिटर ने चीक विकत आणला. अर्धा लिटर सुद्धा विकत नव्हते.

Punyamade amhi rahto tithe gotha ahe २००rs ltr chik ahe ethe. Me anla hota, gul barik karun ani Sam pramanat dudh uklun room temperature la alyavr mix kela ani cookerla teen char shityya made hou dila, changla zala hota

गाईच्या बछड्याचा प्रथम हक्क असलेलं कोलोस्त्रम आपण आवडतं म्हणून घेणं योग्य आहे का? (मीही लहानपणी आवडीने खरवस खाल्ला आहे.पण आता मनात हे विचार येऊन खाणं आणि करणं होणार नाही.बहुधा कोलोस्त्रम अनलिमिटेड प्रमाणात स्त्रवत असेल आणि वासराला फरक पडणार नाही असं आपण समजू.)

गाईच्या बछड्याचा प्रथम हक्क असलेलं कोलोस्त्रम आपण आवडतं म्हणून घेणं योग्य आहे का?>>>>> नैतिकदृष्ट्या पाहिले तर नक्कीच नाही.तरी आवडतो.पण ज्यांच्या गाईम्हशी आहेत त्यांच्याकडून ऐकलंय की वासराला आईपासून बाजूला करावे लागते.नाहीतर अपचन होऊन वासरू मरते.ख खो तेच जाणोत.

आता कालच माझ्याकडे चिक विकायला १ नेहमीचा माणूस आला,मी चिक विकत घेतला घरी आवडतो म्हणून.आता हा चिक मिळतो तो मुळी ब्राऊन पिवळट रंगाचा.लहानपणी पांढरा बघितला आहे.हा चिक उकडताना ७-८ शिट्ट्या घ्याव्या लागतात आणि साखर घालूनही पांढरा होत नाही.बदामी रंगाचा होतो.विकणारा माणूस म्हशीचा चिक म्हणून विकतो.

नैतिकदृष्ट्या पाहिले तर नक्कीच नाही.तरी आवडतो.पण ज्यांच्या गाईम्हशी आहेत त्यांच्याकडून ऐकलंय की वासराला आईपासून बाजूला करावे लागते.नाहीतर अपचन होऊन वासरू मरते.ख खो तेच जाणोत.
<<

हे पहा,

आपण दूध नावाचं अ‍ॅनिमल प्रोटीन खाण्याबद्दल इथे बोलतो आहोत. गाय/म्हैस्/बकरी/इतर कोणतेही दुभते जनावर, इ. मारून खाणे या विरुद्ध त्या जनावराच्या मादीला बंदी बनवून तिच्या शरिराने तिच्या बाळा करता बनवलेला दूध नावाचा स्त्राव "गाय दूध देते" असं तुमच्या बाळांना शिकवून हिसकवून घेणे, ही अल्टिमेट इंडिअयन व्हेजिटेरियन क्रूरता आहे. (तूप हे प्युअर बीफ फॅट असते रच्याकने.)

तर.

जीवो जीवस्य जीवनम् हा मंत्र जपून, पुढे चला.

अन नाही. वासरू बाजूला केले नाही तर अपचन होऊन ते मरत नाही. तुमच्या बाळाला दूर केले नाही तर ते अपचन होऊन मरेल, असे म्हणण्यासारखे आहे हे.

नॉर्मली सस्तन प्राण्यांत बालवय सरल्यानंतर दुधाची अ‍ॅलर्जी (सॉर्ट ऑफ. ईन्टॉलरन्स वा नावड म्हणा) निर्माण होते. अ‍ॅडल्ट पुरुष जे बाळाच्या कॉम्पिटिशनमधे स्तनपान करू शकतात, ते ९९.९९९९% वेळा करीत नाहीत, असा स्वानुभवाचा विदा वापरून पहा हवं तर.

मुद्दा हा, की दूध व दुधाचे पदार्थ अन मनुष्य वा कोणताही प्राणी, यांच्या मधे, (इन बिटवीन देम) नैतिकता वगैरे बाष्कळ प्रकार आणू नयेत.

खखो अमुक जाणे हा टीपीकल फॉक्सन्यूज स्टाईल प्रकार करू नये. बातमी देताना सेल्फ व्हेरिफाईड फॅक्ट्स सांगाव्या. अ‍ॅझम्शन्स्/अंधश्रद्धा इ. क्वोट करून नंतर खखोदेजा म्हणून लोकाना उल्लू बनवू नये. हे एकंदरितच वाईट असते.

संपादन.
एकदा थोडंसं स्वारी. 'चीक विकत नाहीत' ही तुमचीच पोस्ट आहे असेही वाटले होते.

कामधेनू बद्दल माहिती नाही पण इथे फार्मसी मध्ये बघितली आहे. म्हणुन विचारात होते. पुण्याला गेले कि कामधेनू नक्की शोधणारे. धन्यवाद

नैतिकदृष्ट्या पाहिले तर नक्कीच नाही.तरी आवडतो या माझ्या म्हणण्यावर मी ठाम आहेच.आवडतो म्हणून खाल्ला जातो.
रच्याकने,माझ्या एका नातलगाने हौस म्हनणून कोंबड्या पाळल्या होत्या,त्यांची अंडी मात्र खात नसे.मार्केटमधून दुसरी अंडी विकत आणे.तिचे म्हणणे होते,माझ्या मुलीसारख्या आहेत कोंबड्या.
तर आहे ते असं आहे.

बातमी देताना सेल्फ व्हेरिफाईड फॅक्ट्स सांगाव्या. >>>> मी काही गाई म्हशी पाळल्या नाहीत आणि फॅक्ट्स व्हेरिफाय करण्यासाठी पाळणार नाही.ज्याच्याकडे म्हशी होत्या त्याने सांगितले होते की वासराला बाजूला करावं लागते.त्याचा अनुभव होता तो.मीही त्याच्याशी वाद घातला होता की वासरा साठी दूध निर्माण होत असेल तर ते प्यायल्याने ते कसं मरेल?म्ह्नूनच लिहिलं खखो तेच जाणे.

ऑरगॅनिक डार्क ब्राऊन गूळ वापरा. >>>. दररोजच्या वापरतही ऑरगॅनिक गूळ असतो, त्यामुळे तोच वापरला होता. दूध नासलं नव्हतं, पण एक वेगळाच वास होता, जो आवडला नाही.

साखरेचा खरवस कसा झाला ते लिहा. >>>> डॉक्टर निदान 100% अचूक होतं. चीक आणि गूळ या कॉम्बिनेशचा विचित्रसा वास होता. आज परत छोटा पोर्शन साखर घालून केला तो अतिशय मस्त झाला होता. थँक्स !

भाजीची इमेज टाकता येत नाही, कारण काढलेल्या फोटोची फाईल 2MB पेक्षा जास्त आहे असा एरर मेसेज येतो आहे.
शेतकऱ्याने भाजीच नाव चवळी सांगितलं. या गवारीसारख्या पण कोवळ्या खूप लांब आणि लवचिक शेंगा आहेत. मला उसळीची चवळी आणि एक त्याच नावाची पालेभाजी माहीत आहे. आता त्याच नावाची तिसरी भाजी माझ्या आयुष्यात आली आहे. जसं काही जगातली सगळी नावं संपल्यासारखी तीन वेगळ्या भाज्यांना एकच नाव Sad

ही भाजी माहीत असेल तर ती बनवायची कशी, ते कोणी प्लिज सांगेल का? थँक्स .

वाली आहेत का त्या?
आम्ही कांंदा, हि. मिरच्या आणि वरून ओलं खोबरं वापरून करतो. हवं तर बटाटा.

उसळीची चवळी असते ( कडध्यान्य ) त्याच्याच शेंगा असतील त्या बहुतेक. फूट लाँग बीन्स किंवा यार्ड लाँग बीन्स असे शोधलेत तर फोटो दिसतील. त्याची फरसबी प्रमाणे भाजी करता येते.
हिंग, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, उडीद डाळ घालून फोडणी. त्यावर बारीक चिरलेल्या शेंगा घालून पाणी न घालता शिजवायच्या. भाजी स्जिजत आली की थोडं ओलं खोबरं घालायचं वरून. डब्यात न्यायला एकदम सोयीची भाजी.
पाहिजे तर गोडा मसाला, मालवणी मसाला, कोल्हापुरी मसाला वगैरे घालू शकता.

नाही हो भरत, त्याने देताना चवळी म्हटलं होतं. आणि वाल पाहिले आहेत, या शेंगेचा आकार पहाता वालची शेंग नक्कीच नाही.

मेधा, थँक्स. गुगल केलं. त्याच शेंगा आहेत. तुझी रेसिपी फॉलो करते.

चवळीच्या शेंगांची भाजी करताना, शेंगा हातानेच निवडाव्या. सुरी/विळीने कापू नयेत.

जर शेंग कोवळी व हाताने सहज तुकडा होत असेल, तर सालासकट घ्यावी, नाहीतर सोलून दाणे वापरावेत. आणलेल्या भाजीत काही शेंगा अगदी कोवळ्या अन इतर निबर दाणे काढून वापराव्या लागतील अशा असतात. पिकत आलेल्या शेंगेचा रंग पिवळसरपणाकडे झुकता असतो. असे साल शिजले तरी खाता येत नाही. दाणे हिरव्या रंगाचे, चवळीचेच असतात.

तिखट, मीठ, जिरं, लसूण अन दाण्याचा कूट लावून सुंदर पातळसर भाजी होते. गरम भाकरीबरोबर हाणायला बेष्ट. सोबत एकादी मिरची भाजून घ्या तोंडी लावायला. हवं तर पापड.

चवळीची शेंग असेल. बरबटी पण म्हणतात काही ठिकाणी या भाजीला.
बारीक चिरून खमंग फोडणीत परतायची. हि. मि./ लाल तिखट, हळद आणि मीठ. अगदी आवडत असेल तर गोडा मसाला. वरुन ओले खोबरे. एकदम मस्त होते भाजी.

भाजीची इमेज टाकता येत नाही, कारण काढलेल्या फोटोची फाईल 2MB पेक्षा जास्त आहे असा एरर मेसेज येतो आहे.
<<
फोटो काढताना कॅमेरा रिझोल्युशन कमी केलं तर साईज लहान होते.

मी इरफानव्ह्यू नावाचं एक अत्यंत सुंदर फ्री अ‍ॅप्लिकेशन फोटो रिसाईज करायला वापरतो. (काँप्युटरवर)

दुसरी आयडिया म्हणजे फोटो व्हॉट्सॅपवर आपल्यालाच पाठवायचा. आपोआप काँप्रेस करून मिळतो.

(व्हॉट्सॅप व डेस्कटॉप चे कनेक्शन आहे/करता येते. त्यामुळे २ लोकांचा एक ग्रूप करा, मग नंतर त्यातून दुसरी व्यक्ती डिलीट करा. फक्त १ माणूस - स्वतः-चा ग्रूप बनतो. इथे स्वतःच स्वतःला इमेजेस्/डॉक्युमेंट्स इ. पाठवता येतात. काँप्युटरवरून मोबाईल अन मोबाईलमधून काँपुटरवर हे करणे सोपे जाते. व्हॉट्सॅपपेक्षा या बाबतीत टेलेग्राम जास्त व्हर्सेटाइल आहे.)

Pages