अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाटलेल्या बाठेचा नेम अचुक लागला, फार आनंद वगैरे काही झाला नाही कारण नेम धरलेला तोच मुळात अचुक लागण्यासाठी...असो, पण का कुणास ठावुक अचानक ब्लफमास्टर चित्रपटातला नाना पाटेकर आठवला...नेहमी म्हणायचा.. "डायलॉग अच्छा है, लिख लो"...

>> चाटलेल्या बाठेचा नेम अचुक लागला, फार आनंद वगैरे काही झाला नाही
हे म्हणजे बूमराँग फ़ेकल व स्वत: चेच फ़ोडुन घेतले. व नेम अचुक होता म्हणत मिरवणे झाले

त्या साठीच तर हा धागा आहे. आनंदी व्हा व राहा>>>> अगदी बरोबर, तुम्ही सगळे आनंदी रहा, जग दुष्ट शक्तींनी भरलेलं आहे, पण त्याची काळजी तुम्ही नका करू, जोपर्यंत हा बोकलत जिवंत आहे तोपर्यंत वाईट शक्तींची टाप नाय मायबोलीकरांवर वाईट प्रभाव टाकण्याची, तुम्ही सगळे धागा वाचा मजेत रहा आणि हसताय ना हसायलाच पाहिजे

एवढीच लोकांना हसवायची हौस आहे तर स्वतः चा धागा काढायचा ना किंवा जो काढुन मिळालाय त्यावर हसवत सुटायचं तुमच्या भक्तगणांना.

एवढीच लोकांना हसवायची हौस आहे तर स्वतः चा धागा काढायचा ना किंवा जो काढुन मिळालाय त्यावर हसवत सुटायचं तुमच्या भक्तगणांना.>>>सुरवातीला लोकं माझ्या कथांना घाबरायचे रात्री कथा टाकली की कित्येक जण ती सकाळीच दिवसा उजेडी वाचायचे आणि रात्र होण्याच्या आतमध्ये भिंतीवर डोकं आपटून विसरायचे पण. पण म्हणतात ना ज्या गोष्टींची भीती वाटते ती गोष्ट सारखी केल्याने भीती पार निघून जाते, माझ्या कथा सारख्या वाचून लोकं हळूहळू धीट बनत चाललेत. तुम्ही आताच माझ्या कथा वाचायला सुरवात केली असेल तर साहजिक आहे तुम्ही घाबरून जात असाल आणि मला विनंती करत असाल या अशा थरकाप उडवणाऱ्या कथा दुसरीकडे टाक पण मी सांगतो माझ्या कथा तुम्ही नित्यनेमाने वाचत राहिलात तर तुम्ही एव्हड्या धीट बनाल की झपाटलेल्या जागी जसे की कुलधारा, भानगढ किल्ला अशा ठिकाणी सहज व्हॅटस्सप चॅटिंग करत तुम्ही रात्र काढू शकाल. यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे. धन्यवाद.

टेलिपॅथी नक्की काय कन्सेप्ट आहे माहित नाही, लहानपणी शक्तिमान बघताना शक्तिमान गीता विश्वास ला टेलिपॅथी करतो व ते दोघे जसे मोबाईल फोन
वर बोलावे तसे बोलतात असे दाखवलेले तुम्ही पहिले असेल. पण टेलिपॅथी म्हणजे तसे नुसते बोलणे नसून दुसऱ्याच्या मनातील विचार कळून घेणे
होय किंव्हा दोन माणसांमधील अदृश्य connection आपण म्हणू... पण नक्की असे असते का ?
माझ्या लहानपणी आमच्या गल्लीत फक्त एकाकडेच लँडलाईन होता..सुख-दुःखा ची देवाणघेवाण पत्रानेच व्हायची.. "आई आजारी आहे भेटायला ये "
अश्या आशयाचे पत्र मामाने आईला पाठवले होते. पण तेंव्हा शेतात मजुरीला गेल्याशिवाय दुसऱ्या दिवशी भाजीला आणायचे वांदे व्हायचे.. तरी दोन-तीन दिवस कामावर जाऊन नंतर मामाकडे जायचे असे आईने ठरवले असणार किंव्हा इतर काहीतरी अडचणीमुळे आई पत्र आल्याआल्या निघू शकली नाही हे खरे.. पण
तिसऱ्या दिवशी आई शेतावर काम झालयावर जेवत बसली होती, मला पण शाळेला सुट्टी असल्याने मीहि मागे मागे शेतात गेलो होतो, दुपारी जेवताना अचानक आईचा हात घास खाताना थांबला व ती बाजूच्या काकूंना म्हणाली आईच शेवटचं तोंड पाहायला मिळतं का नाही कुणास ठाऊक.
त्या काकू म्हणाल्या काय झालं,असें का म्हणतेस तर आई म्हणाली सकाळ पासूनच तिला कसेतरी होतंय व घास खूपच कडू लागला अचानक, आज काहीतरी अशुभ कळेल बघ... नेमके त्याच रात्री मामाचा फोन आला कि आज्जी गेली म्हणून...
आपली ज्या माणसाबद्दल खूप जवळीक असते तिच्या बाबतीत असे अनुभवास येते.. बाहेर मुसळधार पाऊस पडत असतो,मोठं मोठ्याने वीजा कडाडत असतात.. तशात दमलेली एक बाई झोपलेली असते पण तिचे पाळण्यातील बाळाने जराशी हालचाल करून बारीकसे जरी कुई केली तरी ती आई पटकन जागी होते..बाळामधील व आई मधील हि अदृश्य नाळ नेमकी कोणत्या विज्ञानाने सिद्ध कराल ?

.बाळामधील व आई मधील हि अदृश्य नाळ नेमकी कोणत्या विज्ञानाने सिद्ध कराल ? >> ह्याला आईच्या मनातले प्रेम म्हणू शकतो.
९ महिने, जिच्या शरीराचा एक भाग ते बाळ असते, त्याची किंचितशी हालचाल पण तिला जाणवतेच.

आताच गणपती, नवरात्री होऊन गेल्या कुणीही "बोकलत या धाग्यावर लिहू नयेत" या साठी प्रार्थना, नवस केला नाही का? एवढे जाणकार आहेत, कुणीही "बोकलत या झाडावर नको, त्याच झाडावर लिहू देत" अशी करणी की काळी जादू की जे काय असतं ते केले नाही?

असो. मी माझ्यातर्फे बोकतांना अजून एकदा विनंती करतो की त्यांनी त्यांचे लिखाण त्यांच्या धाग्यावर करावे.
हा धागा आधी चालत होता तसा चालत राहू द्यावा.

मुंबईत सटोडियांची चाळ या नावाने प्रसिद्ध चाळीचे मूळचे चार मालक, पूर्वी सट्टाबाजारात सामान्य दलाल होते . त्यांनी उलूक साधनेचा प्रयोग करून त्याच्या मदतीने बरीच संपत्ती मिळवली होती . यात घुबडाचा वापर करून भविष्य जाणतात आणि शेवटी त्याचा बळी दिला जातो ..हि बरीच जुनी घटना आहे पण मध्यंतरी मुंबईतील काहि व्यापारी लोकांनी मध्यप्रदेशातील तंत्रिकांच्या मदतीने दिवाळीला हि साधना केल्याचं ऐकलं होत त्याचा काय इफेक्ट आला माहित नाही पण तांत्रिकांनी बक्कळ पैसे कमवले आणि आधीच दुर्मिळ झालेल्या बिचाऱ्या घुबडांचापण बळी गेला ... दिवाळी जवळ आली म्हणून वरील किस्सा आठवला ..
(चाळीचं सध्या नाव काय किंवा रिडेव्हलोपमेंट झाली का ते माहित नाही)

येथे कुणाला 'डाक घालणे' या विधि बाबत माहिती आहे का?
दक्षिण कोकणात प्रचलित असलेली आणि सध्या जवळ जवळ लुप्त झालेली ही एक विधी होती ज्या मधे मृत व्यक्ती च्या आत्म्यास निधनाच्या ११ व्या दिवशी बोलवुन त्याच्याशी संवाद साधत असत. हा विधी फक्त कुंभार समाजातील जाणते लोक संपन्न करु शकतात, त्यांनाच बोलवावे लागते.

१९७६ साली माझ्या सर्वात मोठ्या काकांच्या मोठ्या मुलाच्या अकस्मात निधनानंतर मुंबईत आमच्या घरी डाक घातलेली, तेव्हा माझ्या मधल्या काकांच्या मुलीच्या अंगात येऊन तो त्याच्याच आवाजात बोललेला...हे सर्व माझ्या जन्माच्या आधीचे...सध्या कुठे हा विधी केलेला ऐकण्यात येत नाही..अगदी अलीकडे ५ वर्षांपुर्वी आमच्या गावी एका इसमाची डाक घातलेली...पण ती गुपचुप...अशी वदंता होती की त्या मृत इसमाने कुठून तरी कोणते तरी दैवत आणलेले आणि त्याची गुप्त आराधना करायचा परंतु त्याच्या मुलांना त्याबद्दल काहीही सांगीतले नव्हते. गावातल्यांचा असा अंदाज की त्या दैवतेने आराधना न केल्याने काही दगा-फटका करु नये म्हणून उपाय विचारायला त्याच्या मुलांनी डाक घातलेली. खरे - खोट आजुनही बाहेर नाही आलं.

उत्सुकांसाठी सदर विधी बद्दल ची गुढ आणि काहीशी अगम्य अशी सविस्तर माहिती खालील धाग्यावर मिळू शकेल.
https://www.google.co.in/amp/prahaar.in/वाजवितो-डांक-सत्वर/amp/

खेकडा आणि साधू ची गोष्ट आठवली...
खेकडा समुद्रातून लाटेबरोबर बाहेर येतो व परत समुद्रात जायचा प्रयन्त करत असतो.. साधू त्या खेकड्याला मदत करावी म्हणून
हाताने उचलून परत समुद्रात टाकण्याचा प्रयन्त करत असतात. तर खेकडा साधूच्या हाताला चावत असतो,
तरी साधू परत त्याला उचलून समुद्रात टाकण्याचा प्रयन्त करत असतात. हे पाहून बाजूची व्यक्ती साधूला म्हणते.
तो तुम्हाला चावतो तर मरू दे कि त्याला,तुम्ही का सारखं सारखं त्याला समुद्रात टाकण्याचा प्रयन्त करत आहेत.
साधू म्हणतात "अरे बाबा चावणे हा त्याचा गुणधर्म तर मदत करणे हा माझा , तो त्याचा गुणधर्म सोडत नसेल तर मी तरी माझा का सोडू?"

टीप:- या कथेत साधू म्हणजे अमानवी धाग्यावरील लोक , बोकालतांशी संदर्भ आढळ्यास निव्वळ योगायोग समजावा.

त्या बोध कथेत खेकड़ा नसून विंचु होता.
धागा अमानवीय आहे म्हणून फार तर आपण त्याला तात्या विंचु म्हणू Wink ॐ फट् स्वाहा S

सध्या गावी आलोय मित्रांनो,माझी आठवण काढताय हे पाहून डोळे भरून आले माझे. जरा धीर धरा दिवाळी संपली की पुन्हा माझ्या थरारक आणि भयकथा या धाग्यावर येतील, तोपर्यंत चकल्या,लाडू, चिवडा, करंजा खा आणि आनंदी रहा. सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

<खेकडा पाण्याबाहेर सुद्धा राहातो. उगाच त्याला पाण्यात फ़ेकण्याचा प्रयत्न का?>
राहायला काय हो तो घरी पण राहील, पण घरातील लोक्काना त्रास देत असेल तर फेका..

Pages