अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीतरी विश्वास बसेल असं लिहा की भुत्याभाउ.
उत्तरप्रदेशात नाकात मराठी नथ घातलेला पुरुष, भयानक आणि विचित्र दिसणार्‍या त्या माणसावर सिगरेटचा धुर सोडायची हिंमत करणारी तिथली लोकल मुलं, भर दुपारी दगड टाकायला सज्ज असणारी आग, ऑफिसमधुन चहा प्यायला निघालं असताना टपरीवाल्याच्या घराचा शोध घेत जाणारे उडाणटप्पु

अरेरे!!! त्यांना समज देऊन सोडायला हवं होतं. वाईट झालं भुत्याभाऊ. कदाचित तो मनुष्य अघोरी वगैरे असेल. असे लोक जरा एक्सट्रीम टाईप असतात. सहसा कोणाच्या भानगडीत पडत नाहीत. तसे निर्धोक असतात शक्य तो त्यांना कोणाशीही काहीही मतलब नसतो. त्यांच्या मनात असेल तर स्व:ताचा जीव ही ओवाळून टाकतील, आणि राग आला तर जीव घेतील.

नथ फक्त महाराष्ट्रीयन दागिना नाही.. इतर प्रदेशातही वेगवेगळ्या प्रकारच्या नथ घातल्या जातात. त्या नथ किंवा नथनी इ. नावाने ओळखल्या जातात.

सहसा नाथपंथीय आणि अघोरी यांच्याकडे आग पैदा करण्यासाठी काही तरी साधन नेहमी असतं . धूनी साठी बाळगावं लागतं.

बघा भुत्याभाऊंचा ऐकीव अनुभव लोकांना खरा वाटला, आणि माझ्या खऱ्या कथा लोकांना खोट्या वाटतात. मला साडेसाती सुरु आहे एकदा का संपू दे मग व्हिडिओचीच लिंक देतो कि नई इथे बघालच तुम्ही.

मला साडेसाती सुरु आहे एकदा का संपू दे मग व्हिडिओचीच लिंक देतो कि नई इथे बघालच तुम्ही.>>
अरारा, एव्ह्ढ्या पावरफुल्ल कोकलत जवळ साडेसाती संपवायची पावर न्हाय, ह्या एका गोष्टीवरुन विश्वास उडाला बगा!!

अरारा, एव्ह्ढ्या पावरफुल्ल कोकलत जवळ साडेसाती संपवायची पावर न्हाय>>>> पयत्न करून बघायला पाहिजे एकदा. यशस्वी झालो तर तो पण थरारक किस्सा इथे लिहीन म्हणजे एखाद्याला साडेसाती सुरु झाली तर माझा किस्सा वाचून लगेच संपवू शकतो.

बोकलत राव

यु आर स्पेशल
साढेसाती असेल सामान्य पब्लिकला.
तुम्हाला किमान साढेआठी तरी हवीच.

आखिर हमारे ब्राण्ड की प्रेस्टिज का सवाल है Happy

व्यत्यय, कपड्यांच्या बाबतीत म्हणाल तर कोणीही काहीही घालू शकतो. विशिष्ट ड्रेस कोड नसतो हो. फक्त काही साधनं असतात कंपल्सरी.

माझ्या नातेवाईकाच्या बाबतीत घडलेली खरी गोष्ट... एकदा त्या बाहेरून घरी आल्यानंतर अचानक त्यांच्या जिभेतुन रक्त यायला लागले. सर्व उपचार (वैद्यकीय ) करून देखील काहीच फरक पडला नाही. डॉक्टर च्या मते जखम इ काहीही नव्हतं. सर्व काही नाॅरमल पण रक्त का येतय कळत नव्हतं.
नंतर एका ओळखीच्या बाहेरचं वगैरे जाणार्‍या व्यक्तीने पाणी अभिमंत्रित करून दिले आणि काही क्रिया केल्या.
त्यानंतर लगेच रक्त येणे बंद झाले पुर्णपणे. काहीही औषध न घेता.

काहीतरी विश्वास बसेल असं लिहा की भुत्याभाउ °>>>>>>> शश्श ! असं बोलायचं नाही. फक्त बोकलत लिहितात ते बंडलबाज असतं, बाकी सगळ्यांचे किस्से खरे. त्याच्यावर अभ्यासपूर्ण ? चर्चा होणार आणि बोकलतना मात्र अपमानास्पद बोलत रहाणार. तरी बर, पोस्ट्स वाचणं स्कीप करता यावं म्हणून ते धाग्याच्यावर स्वतःच नाव लिहितात.
माझ्यासाठी तरी त्यांच्यामुळेच हा धागा इंटरेस्टिंग झाला आहे.

भीतीची लहर
बोकलतचा कहर
मी गावी गेलो ना कोकणात की आजूबाजूंच्या गावातून अंगात आलेल्या लोकांना माझ्याकडे घेऊन येतात. मग मी त्यांच्या डोक्यात झाडू मारून भूत उतरवायला सुरवात करतो. मला बघताच अंगात आलेली माणसं झाडावर काय चढतील, दहा लोकांना हवेत फेकून काय देतील, अंगणात पडलेला तीस चाळीस किलोचा दगड एका हाताने उचलून माझ्याकडे काय भिरकावतील, काय विचारू नका, तऱ्हा सगळी. एव्हडी माझी दहशत आहे. आणि एखाद्याचं घर झपाटलेलं असेल तर मी जवळ जाताच ते घर थरथर कापायला लागतं आणि बरीच कौलं फुटतात त्यामुळे अशा पछाडलेल्या घरी मला शक्यतो मला हिवाळ्यात नायतर उन्हाळ्यातच बोलावतात. एकदा तर कहरच झाला, एका आंब्याच्या झाडावरचं भूत उतरवायला गेलो होतो तर गावातली सगळी लहान लहान पोरं माझ्या मागे आली, कारण काय तर मला पाहुन झाड थरथरायला लागलं की आंबे खाली पडतात. हे असं आहे सगळं काय बोलताय नी काय नाय.

धन्यवाद @कल्पेशकुमार @मीरा तुमच्या असाच आशिर्वाद पाठीशी असला तर मी येणाऱ्या काळात असेच थरारक आणि उत्कंठावर्धक अनुभव घेऊन इथे हजर होत राहीन

भुत्याभाऊंचा किस्सा खरा कि खोटा हा प्रश्न नाही आहे. त्यांनी धाग्याचे अलिखित नियम मोडलेले नाही आहेत हे महत्वाचे.
तो किस्सा त्यांनी दुसर्याकडून एकला व सांगितला त्यात काही चुकी नाही, तसेच माननीय व्यत्यय यांनी काही प्रश्न उपस्थित केले ते
हि योग्य.. त्यावर इतरांनी आपले अनुभव किंव्हा मत द्यावे वगैरे इतर सर्व धाग्याला धरून आहे.
पण या गोष्टी पटत नाहीत म्हणून बोकालतांच्या या धाग्यावरील लिखाणाला समर्थन कसे होऊ शकेल?
असो, मलाही माझ्या एका मित्राने एक गोष्ट सांगितली होती. त्याने एकदा इंटरनेट वरून अश्याच कोणत्यातरी ग्रुप ला जॉईन केले होते.
तेंव्हा एका फॉरेनर शी चॅटिंग झाले व सर्व निसर्ग म्हणजे एक शरीर असते असे काहीतरी संकल्पना तो सांगत होता. म्हणजे समजा तुमच्या
पायाला डास चावला कि ती कळ मेंदू पर्यंत पोहचली व मेंदूने आदेश देताच हाताने प्रतिक्रिया केली व त्याजागी खाजवले. तसेच संपूर्ण ब्रह्मांड हे एक शरीर आहे
असे काहीतरी ती संकल्पना होती. माझ्या मित्राला काही त्या गोष्टी पटल्या नाहीत तेंव्हा त्या समोरील व्यक्तीने त्याला एक प्रयोग दाखवायची तयारी दर्शवली
त्याने सांगितले कि तुमच्या घरातील कुंडीतील व कोणत्याही आजूबाजूच्या छोट्याश्या रोपट्याची चित्र अपलोड करा. त्यानंतर त्या रोपट्याला पुढील १५ दिवसात मी (म्हणजे तो फॉरेनर) नष्ट करणार तुम्ही त्याला पाणी,खत वगैरे देऊन जमेल तेवढी काळजी घेऊन त्याला वाचवून दाखवा.. याने ते चॅलेंन्ज स्वीकारले व फोटो अपलोड केल्यावर १५ दिवस खूप काळजी घेऊनही ते रोपटं कस जिवंत नाही राहील ते अजूनही त्याला नाही कळालं...

अलिखित नियम?? कोणी ठरवले?
बोकलत यांच्या धाग्यावरील लिखाणाला उगाचच विरोध का? माझ्यासाठी आणि इतरही अनेकांसाठी त्यांचे किस्से इतर कोणत्याही अमानवी किश्श्यांइतकेच खरे आहेत.

>> श्रीयुत बोकलत यांना कुणी अपमानास्पद बोलेललं मी तरी पाहिलं नाहीये...
>>पालथ्या घड्यावर पाणी!

आमच्यात कोणालाही पालथ्या घड्याची उपमा देणे याला अपमानास्पद बोलणे म्हणतात.

व्यत्यय - मी आधीच लिहला होता कि हा माझा अनुभव नाही ... तुम्ही नीट वाचलेलं दिसत नाही ... असो ...

बोकलत यांना तुम्ही पूर्ण पाठिंबा द्या आणि त्यांचा जो वेगळा धागा आहे तिथे नक्कीच चर्चा करा त्यावर कोणाचा आक्षेप नसावा ...

@ रमेश रावल, पिंडी ते ब्रम्हांडी ही काॅनसेप्ट ही तीच आहे. मृणालिनी जोशींच्या " शंकर लिला" या सद्गगुरू शंकर महाराज यांच्यावर लिहीलेल्या पुस्तकात आहे.

आमच्यात कोणालाही पालथ्या घड्याची उपमा देणे याला अपमानास्पद बोलणे म्हणतात.>>
त्याला आम्ही काही करू शकत नाही

@Avdhut
उद्या माझ्या सारख्या पाप्याच्या पितराने द ग्रेट खलीला द्वंद्वाचे.आव्हान दिले तर त्याच्या खिजगणतीतही मी नसेन .. नाही का?

ईथे बोकलतांमुळे पडलेल्या आंब्यांवर ताव मारणारे, आणि खाल्ल्या आंब्याना, नि चाटल्या बाठांना जागणारे बरेचजण गोळा झालेले दिसताहेत... Lol Lol

दोन आठवड्यांपूर्वी हरीश्चंद्रगडावर गेलो होतो.
ज्यावरून हा धागा सुरू झाला नेमकं ते व्याघ्रमुख पहायचं राहिलं.
मित्र रेग्युलर ट्रेक्स घेऊन जातो त्याला विचारलं की तुला काही अमानविय अनुभव आला आहे का?

त्याने दुसऱ्या एका गृपचा अनुभव सांगितला तो असा.

तर हा गृप तोरणा गडावर वस्तीला राहीला. ट्रेक मुळे दमलेले सर्वजण जेवण तयार करून जेऊन, उष्ट खरकट उद्या निस्तरू म्हणून झोपले.
सकाळी जाग आली तेव्हा त्यांची सगळी भांडी घासून वाळत टाकली होती.
तिथे बापू म्हणून कोणीतरी एक मदत करणारा आत्मा आहे.

ईथे बोकलतांमुळे पडलेल्या आंब्यांवर ताव मारणारे, आणि खाल्ल्या आंब्याना, नि चाटल्या बाठांना जागणारे बरेचजण गोळा झालेले दिसताहेत... Lol Lol>>>>> तेच मी पण बोलतोय. आंब्यांवर ताव मारणाऱ्यांमुळेच अजून या धाग्यावर तग धरून आहे, नाहीतर चाटल्या बाट्याना जगणाऱ्यानी माझ्या खऱ्या कथा खोट्या आहेत अशी बोंबाबोंब करत कधीचंच हकलवला असता मला. Rofl Rofl

Pages