काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.
लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.
एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.
"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.
"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले
"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला
"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम
"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"
"मी आणि माझी बायको"
"कुठे आहेत त्या?"
"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"
"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.
मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.
"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.
कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.
"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.
"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.
"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"
"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.
"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.
मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.
"काय झाले?" त्याने विचारले.
"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.
"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.
त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"
"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.
"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.
"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो
"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.
"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.
मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?
संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.
मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.
४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.
बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.
ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.
नेफ्लिवर अनुष्का शेट्टीला
नेफ्लिवर अनुष्का शेट्टीला डोळे भरून पाहत बसलो होतो, माबोच्या खिडकीत धक्क्यावर धक्के बसायला लागले म्हणून आलो तर... हा धागाच धक्कादायक झालाय आता.
हो कधीमधी टीपापा वर येत होतो.
हो कधीमधी टीपापा वर येत होतो... . जनरल चर्चात भागही घेतला ..त्याने काय प्रूव होते ? चर्चा करण्यासाठी अनेक मेंबर्स येतात तिथे जे आधी म्हणालो तसे तुमच्या कारवायात सहभागी नसतात. टीपापावर असूनही तुमच्यासारखे कुणाचे मॉकिंग वगैरे करत नाहीत. टीपापावर नेमके कोण काय करते हे सगळ्यांना ठाऊक आहे. (ऊदा आजचाच टीपापा पहा). ते तुम्ही किंवा मी कोणाला सांगायची गरज नाही. जेव्हा जेव्हा टीपापाने कोणाचे मॉकिंग केले आहे तेव्हा मी आणि अनेक मेंबर्सने स्वतःला डिसासोसिएट केलेले आहे.
मी टीपापवर लिहिले ते ही तुम्हाला आकस नसावा असे वाटल्याने.
पण तुम्ही तुमचा अंतस्थ हेतू ह्या धाग्यावर पुन्हा अंमलात आणल्याने माझ्याही भ्रमाचा भोपळा फुटला म्हणता येईल की.
स्नेहसंमेलन कधी झाले आणि तुमचे पिकिंग आऊट कधी चालू झाले... ह्याची टाईमलाईन मी तुम्हाला आठवण करून द्यायची गरज नसावी.
फिअर मॉगरींगचा, बडबड कशाला म्हणालो ह्याचा कंटेक्स्ट तुम्हाला अजूनही कळालेला नाही... हे तुम्ही चर्चा न वाचता व्यक्ती बघून आरोप करता हे पुन्हा सिद्ध करते.
स्मायली तुमच्या हास्यास्पद आरोपांना टाकली आणि तुमचे सो कॉल्ड 'मिस झालेले' वाचन तुम्हाला दाखवून दिल्याने तुमचा संताप झाला होता हे दाखवणारी तुमची पोस्ट अजूनही तिथेच आहे. पुन्हा तिचा कंटेक्स्ट बदलून लिहिण्याने खोट्याचे खरे होते का?
ज्याला स्वत:वर आरोप झालेले आवडत नाहीत त्याने इतरांशी बोलतानाही हे भान राखायला हवं. >> म्हणजे तुम्ही आरोप करता हे मान्य आहे तर.
तुमच्या कारवायांना वैतागलेल्या शोषितांची बाजू मी का घ्यावी... प्रत्येकाची अस्तित्वाची लढाई स्वतःची आहे. मी कधी ना कोणाची बाजू घेतली ना कोणाची बाजू मिळवण्यासाठी प्रयत्न केला... आताही मी एकटाच तुमच्याशी बोलतो आहे.
त्या टीपापा च्या लिंक वर
त्या टीपापा च्या लिंक वर क्लिक केल्यावर "तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही." असा मेसेज येतोय. कसं बघायचं ते पान?
काही नसते हो तिथे, गप्पांचे
काही नसते हो तिथे, गप्पांचे पान आहे फक्त.
तरी पण इचछा असेल तर अमेरिकेतील आयुष्य जॉईन करा, दिसेल टिपापा.
>>काही नसते हो तिथे, गप्पांचे
>>काही नसते हो तिथे, गप्पांचे पान आहे फक्त.>> +१. जशी बाकीची गप्पांची पानं आहेत तसंच हे ही एक पान. लोकं ज्या तर्हेने टीपापा, टीपापा करतात तसं तिथे काहीही नाही. आणि गृप (काही लोकं कंपूही म्हणतात) वगैरे आवडत नसेल तर मुळीच नका जाऊ तिथे. उगाच टीपापात येणारे असा शिक्का नको बसायला. रोमात राहून हळूच वाचणं शक्य आहेच. तो चॉईस तुमचा.
लॉज बुकिंग वरून गाडी टीपापा
लॉज बुकिंग वरून गाडी टीपापा कडे कशी वळली?
कारवाया काय, बुलींग काय, मॉकिंग काय? या सगळ्याचा लॉज बुकिंग शी काय संबंध?
ज्या कुणा व्यक्तीबद्दल तुम्हाला तक्रार आहे त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता. त्यांना इ-मेल किंवा विचारपूस मधे लिहून तुमची भांडणे तिथे करा ना!
मायबोलीवर विषयाला धरून लिहिण्याबद्दल चे नियम खूप लोक पाळत नाहीत, पण हे म्हणजे भलतेच!!
या गोष्टी वेगळा धागा काढूनहि करता आल्या असत्या.
कालपासुन या धाग्यावर मला "सौ
कालपासुन या धाग्यावर मला "सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली..." याचा प्रत्यय का येतोय....
:D: फुल२ विरंगुळा
फुल२ विरंगुळा
सार्वजनिक भांडणे हेच तर
सार्वजनिक भांडणे हेच तर प्रमुख आकर्षण आहे माबो चे.
मुद्दा चुकीचा असूनपन बाजू धरून ठेवने, समोरच्याला घालून पाडून बोलणे.
Sayonara + 1
Sayonara + 1
बाब्बो! हे गळे काढणे झेपलं
बाब्बो! हे गळे काढणे झेपलं नाही ब्वा!
जरा कभी हा कभी ना चा धागा न्पेक्षा प्रतिसाद वाचा पुन्हा.
मार्मिक +१
मी कसला कुठे जातो आहे राज..
मी कसला कुठे जातो आहे राज.. इथेच आहे. शेवटचे वाक्य वाचलेत ना. आकसग्रस्त लोकांशी डील करण्यास मी एकट्यानेच समर्थ आहे.
तुम्ही म्हणता त्या सौ चुह्यां पैकी काही नेहमीचे बिळातून बाहेर येऊन इथे बागडत आहेत. पुढेही जेव्हा मी लिहीन तेव्हाही ते येत राहतील.
If you want a piece of Heisenberg, get in line.
मी मागील वर्षी
मी मागील वर्षी पुण्यातल्या मॅरिअट मध्ये एक वीकेंड टीपी करायला राहिले होते. माझ्याकडे मॅरिअटचे ग्लोबल कार्ड आहे त्यामुळे नोकरी सकट सर्व डेटा त्यांच्या क डे आहे. प्लस त्यांनी पासपोर्ट मागितला. तो दिला. नेक्स डे मुलगी हॉस्टेल मधून मला भेटायला आली ती रात्री रुमात झोपणार आहे शी इज माय डॉटर सांगितले तर त्यांनी एक चकार शब्द विचारले नाही. नेक्स्ट डे ब्रेकफास्ट मला फ्री होता. मीच त्या होस्टेसला सांगितले की प्लीज गिव्ह बिल् फॉर हर ब्रेफा. ते त्यांनी दिले. आमचा स्टे इतका मस्त झाला कि मी त्यांना मस्त फीड बॅक दिला तर हेड कस्टमर सर्विस अमेरिकन कन्येची मला मेल आली. !!! इट इज हाउ यू हँडल अ पीपल सिचुएशन प्लस रिक्वायर्ड डे टा इट इज बेटर टू शेअर.
हा एक वेगळा अनुभव लिहीला आहे पण मी भारतात सर्वत्र बी टाउन मध्ये पण प्रवास केला आहे. तिथे वर लिहीले आहे तसे रजिस्टर असते.
सिंगल लेडी ला रूम मिळणे अवघड असते हे ही खरे आहे. पण तुम्ही क्लीअर केले पाहिजे. तेव्हा ही कंपनीची माहिती, व ड्राइअविन्ग लायसन्स
पॅन कार्ड मागत. तेव्हा आधार कार्ड नव्हते.
सर्वत्र फॅमिली बरोबर हॉटेल स्टाफ वागतो व सिंगल लोकांबरोबर वागतो ह्या दोन्हीत जमीन अस्मानाचा फरक आहे तुमच्या बाउंड्रीज तुम्हीच निस्चित केल्या पाहिजेत व त्या क्लीअर सांगाव्यात. केरळात माझे बुकींग १९९१ ची गोष्ट. एका लेडिज होस्टेल टाइप जागेत होती. तिथे बॅग फक्त ठेवायची बेड खाली, कपाटाला कुलूप नाही. बेड शीट नाही. सर्वत्र केरळा मुलींचे कुरळे केस व नारळ तेला चा वास. मी बरोबरच्या कलीगला मी इथे राहात नाही दुसरीकडे व्यवस्था करू म्हणून आबाद प्लाझा तिथले महाग एक हॉटेल होते तिथे गेले. स्वतःचे पैसे भरून सोय केली. मग टूर संपल्यावर मॅनेजरच्या शिव्या खाल्ल्या. पण राहायचे मला होते.
हायझेनबर्ग, एक मित्रत्वाचा
हायझेनबर्ग, एक मित्रत्वाचा सल्ला.
काम डाउन, अँड क्विट स्विंगिंग अॅट एनी अँड एव्हरी डॅम थिंग कमिंग योर वे. वि ऑल आर नॉट टू ओल्ड टु नॉट बी पोलायट...
आज हाब यांची पोस्ट नाही आली?
आज हाब यांची पोस्ट नाही आली?
राज आज तुम्ही माझ्यासकट
राज आज तुम्ही माझ्यासकट अनेकांना लॉजिक व इंग्रजी च्या कुरणात रानोमाळ भटकायला लावले आहे
हे मी असे डीकोड केले, स्टेप बाय स्टेप, आधी निगेटिव्ह न वापरता आणि मग एक एक निगेटिव्ह अॅड करत
-> "I am too old to be polite" -young people have to be polite. I am past that age (so be polite? no need)
-> "I am NOT too old to be polite" -
young people have to be polite. I am NOT past that age. (so be polite? yes)
-> "I am too old to NOT be polite"
it is ok for young people to NOT be polite. I am past that age. (so be polite? yes)
-> "I am NOT too old to NOT be polite"
it is ok for young people to NOT be polite. I am NOT past that age. (so be polite? no need)
या चर्चेचा पूर्णविराम बहुधा "हाब माबो सोडून हिमालयात निघून गेला" ने होईल
मात्र वरती दुसर्या व चौथ्या
मात्र वरती दुसर्या व चौथ्या वाक्यात मधे कॉमा आला तर अर्थ उलटा होईल
मी असं वाचलं:
मी असं वाचलं:
We are all not too old to be impolite.
= young blood is impolite; age mellows people down; none of us are that old, so I can be as impolite to you if you’re to me.
करेक्ट, माझे चौथे वाक्य जुळते
करेक्ट, माझे चौथे वाक्य जुळते याच्याशी. नॉट पोलाइट च्या ऐवजी इम्पोलाइट वापरले तर लौकर डीकोड होते.
>>अनेकांना लॉजिक व इंग्रजी
>>अनेकांना लॉजिक व इंग्रजी च्या कुरणात रानोमाळ भटकायला लावले आहे<<
जीऽझ, वाटलं न्हवतं इतकं कंफ्युझिंग होईल. हाय्झेनबर्गना डबल निगेशन समजतो म्हणुन मुद्दाम त्याचा प्रयोग केला...
स्वाती_आंबोळेंनी हि गाडी वेगळ्या ट्रॅकवर नेली आहे (so I can be as impolite to you if you’re to me.).
हियर इज व्हॉट आय सिंपली मेंट - यंग पिपल्स हॅव टु बी पोलायट. इट्स ओके फॉर ओल्ड फार्ट्स टु बी इम्पोलायट; वि आर नॉट देअर यट...
अरे देवा
>>> स्वाती_आंबोळेंनी हि गाडी वेगळ्या ट्रॅकवर नेली आहे
अरे देवा!
We’re not old enough to be impolite असं आहे तर ते!
धन्यवाद स्पष्ट केल्याबद्दल. आम्ही दुपारपासून ही गुंडाळी सोडवत बसलो होतो!
मला तर अजूनही सुटले नाही.
मला तर अजूनही सुटले नाही. ट्रुथ टेबल मांडून झाले . तोही नाद सोडला व त्याच टेबल वर वाईन ठेवून प्यालो. वाईन च्या नशेत नँड गेट वाले काही आय सी, ब्रेड बोर्ड व वायरी मागवल्या इंटरनेट वरून. निदान त्याने तरी सुटेल. बहुदा हे एन पी हार्ड आहे.
(No subject)
(No subject)
(No subject)
नाव आय नीड ए ड्रिंक टू...
विकु
विकु
Appreciate your advice Raj
Appreciate your advice Raj and I know you meant well (despite all our differences of opinion).
You see, sometimes even the most polite of all people (you know who) forget the very basic etiquette - It is not just impolite but also rude to meddle when two people speak directly by addressing each other - let alone abuse the ambiguity of one's writing to further their own malicious intent.
What we all just witnessed here is how Swati twists and turns written lines to her own advantage and create a false picture of someone's intent.
It is that time Raj when principles and loyalty are at cross. Like it or not, we all need to choose one over another and unfortunately like in every life struggle choosing principles is more painful, stressful yet most rewarding. I think it is really going to define who we are, as a person and as a true patron of Maayboli.
My words may sound hogwash to most people and why shouldn't they? They surely are silly and over-dramatic if read without passion. And my passion does not allow me to let someone rob me off my reputation (by means of false accusations) that I have built over a long course of 10+ years.. at least not without putting up a fight.
Apologies for writing in English, out in the woods with limited connectivity.
हाब - बाहेर एन्जॉय करा, हे
हाब - बाहेर एन्जॉय करा, हे असले प्रकार इथे होतच असतात.
Background ला डोक्यात हे माबो चालत राहणे फार बेकार,
मजा करा !
<<>अरे अरे! मग जरा थांबून
<<>अरे अरे! मग जरा थांबून भरपूर विचार करून मग मराठीत लिहायचे.
विचार केल्यावर कळले असते उगाच भर रस्त्यावर येऊन खाजगी बोलायचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या व्यक्तीशी खाजगीच संपर्क साधावा.
<<>>
लोक एकेका मुद्द्यासंबंधी लिहीत असतात, स्वतःला काय समजले, वाटले त्याप्रमाणे लिहीत असतात. एकदा सार्वजनिक ठिकाणी बोलायला लागल्यावर काही न आवडणारे शब्द ऐकायला येणारच - खरे वा खोटे. जसे तुम्हाला passion, principle आहे तसे इतरांना हि असते. त्यांनाहि दिसेल त्यावर मत लिहायची हौस असते. त्यांच्या सभ्यतेच्या नि उद्धटतेच्या कल्पना खाजगी नि सार्वजनिक ठिकाणी वेगळ्या असू शकतात.
वास्तविक भारतात राहिलेल्यांना हे कळायला पाहिजे. स्वतःच्या घरी स्वच्छता पाळणारे लोक रस्त्यावर येऊन कुठेहि नाक शिंकरतात, चड्डीची बटणे खोलून धार सोडतात, काही जण तर चक्क चड्डी सोडून रस्त्यावर उकिडवे बसतात. ते तुम्हाला चालते, मग मायबोलीवर कुणि काही लिहीले तर कशाला उगीच नादी लागायचे?
म्हणून असे खाजगी बोलायचे असेल तर इ-मेल करा, टेक्स्ट करा!!!
सभ्य नि उद्धट (ज्याला तुमच्या भाषेत polite, rude wagaire म्हंटले आहे) काय यांची चर्चा करायची असल्यास वेगळा धागा काढा!
<<<यंग पिपल्स हॅव टु बी
<<<यंग पिपल्स हॅव टु बी पोलायट. इट्स ओके फॉर ओल्ड फार्ट्स टु बी इम्पोलायट; वि आर नॉट देअर यट... >>>
एव्हढे सगळे कसे कमीत कमी शब्दात मांडले आहे -
<<<वि ऑल आर नॉट टू ओल्ड टु नॉट बी पोलायट... >>>
अरे व्वा! क्या बात है!
तुम्ही संस्कृतमधे लिहीत जा. एकदम वेदाच्या जोडीला जाउन बसेल तुमचे लिखाण. बर्याच लोकांना पी एच डी करायला विषय मिळेल.
आता हे तरुणपणी नम्र असावे म्हातारपणी नसले तरी चालेल, हे तर्कशास्त्र कुठले माहित नाही. नेहेमी नम्रच असावे, शंभर वर्षाचे झाल्यावर सुद्धा!! म्हातारपणी बरेच काही काही होते, पण उद्धट व्हायचे काय कारण?
Pages