काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.
लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.
एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.
"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.
"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले
"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला
"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम
"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"
"मी आणि माझी बायको"
"कुठे आहेत त्या?"
"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"
"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.
मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.
"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.
कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.
"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.
"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.
"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"
"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.
"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.
मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.
"काय झाले?" त्याने विचारले.
"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.
"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.
त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"
"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.
"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.
"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो
"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.
"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.
मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?
संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.
मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.
४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.
बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.
ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.
थँक्स अनु.
थँक्स अनु.
च्रप्स, प्रतिसाद नीट वाचला नाहीत हो तुम्ही. वाढत्या गुन्ह्यांमुळेच असे नियम येतात त्यामुळे ते पाळणे भागच आहे असेच लिहिले आहे. आम्ही ४ वर्षांपुर्वी एका ट्रीपला गेलो तेव्हा ३-४ वेगवेगळ्या हॉटेलात राहिलो तेव्हा केवळ भावाचे आयडी घेतले. आता नियम बदलले असतील तर काय करणार, पाळावेच लागणार.
वाढत्या गुन्ह्यांमुळेच असे
वाढत्या गुन्ह्यांमुळेच असे नियम येतात त्यामुळे ते पाळणे भागच आहे असेच लिहिले आहे.
>>> सहमत
मुलांना शाळेतून pickup करताना
मुलांना शाळेतून pickup करताना अथवा शाळेत कोणत्याही कारणाने प्रवेश मिळवण्यासाठी (मूल शाळेत शिकत असेल तर) शाळेने ह्या कारणांसाठी issue केलेलं id दाखवावे लागते. सहसा रोजच्या maid/ टीचर्स ना रोजचे pickup parent/person माहीत होतात, मग रोज बघत नाहीत पण बाळगावे लागते.
अमेरिकेत डे केयर मध्ये ,
अमेरिकेत डे केयर मध्ये , शाळेत प्रत्येकवेळेस आयडी कार्ड मागत नाहीत. सुरुवातीला फॉर्म वगैरे भरुन सर्व माहिती घेतात व तेव्हाच कोण मुलाला घेऊ शकते ती नावे व अन्य जरूरी माहिती ठेऊन घेतात.
>>>
अहो दर वेळी मुलाला सोडताना व परत घेऊन येताना बायोमेट्रिक (अंगुठा दबाके) मॅच झाल्यावरच मग दार उघडतात.
अमेरिकेत हॉटेलमध्ये चेकइन
अमेरिकेत हॉटेलमध्ये चेकइन करताना प्रत्येकाचे आयडी प्रूफ स्कॅन करून स्टोअर करून ठेवतात का? असा लोकांचा डेटा खाजगी व्यवसायिकांनी साठवून ठेवायला तिकडे परवानगी आहे का?
आपल्याकडे (याच शहराच्या आसपास) एक हॉटेलमधल्या वेटरने एका स्त्रीने चेकइन करताना दिलेल्या केवळ फोन नंबरचा गैरवापर करून तिला Blackmail केले होते. त्यावर मी एका प्रतिसादात मी डिटेलमध्ये लिहिले आहे. पण त्याकडे कुणाचे फारसे लक्ष गेलेलं दिसत नाही. आपल्याकडे एअरलाईन कंपन्या सुद्धा या डेटाचा गैरवापर करताना आढळल्या आहेत. उदाहरणार्थ: मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांना हा डेटा विकणे.
ते सोडा , उबर इट्स वरुन फूड
ते सोडा , उबर इट्स वरुन फूड मागवलं तर लगेच स्विगीचे ऑफरवाले मेल्स यायला लागले...
बायोमेट्रीक नाही ना ...भारत
बायोमेट्रीक नाही ना ...भारत देश नव्याने ठाऊक झाला असेल तर ठीक
अमेरिकेत हॉटेलमध्ये चेकइन
अमेरिकेत हॉटेलमध्ये चेकइन करताना प्रत्येकाचे आयडी प्रूफ स्कॅन करून स्टोअर करून ठेवतात का? असा लोकांचा डेटा खाजगी व्यवसायिकांनी साठवून ठेवायला तिकडे परवानगी आहे का?>> नाही. आयडी legit आहे एवढे पडताळून परत देतात. शंका वाटल्यास दुसरा आयडी मागतात. फार तर आयडी वरचा unique number टिपून घेऊ का विचारतात. तुमच्या बरोबरच्या दुसर्याच्या आयडी मागत नाहीत. You are responsible for them. तुम्ही एक दुसर्याचा खून करणार, आत्महत्या करणार अशा आणि अनेक hostile prejudice वरून तुम्हाला गृहीत धरत नाहीत.
ग्राहकाच्या सरकारी आयडी ची प्रत खाजगी संस्थानी काढून ठेवण्यासाठी अनेक देशात कडक कायदे आहेत. तुमच्याकडे त्या देशाचे ओळखपत्र नसेल तर काही देशांमध्ये पासपोर्ट ची अशी प्रत काढता येते. फक्त banks, insurance companies, schools सारख्या काही संस्था ज्यांना ह्या प्रती कशा सांभाळून ठेवाव्यात ह्याबाबत कडक कायदे पाळावे लागतात अपवाद आहेत आणि त्याबाबत त्यांचे ऑडिट सुद्धा होते. They are bound by fiduciary duty related clauses.
तुमच्या केस मध्ये तुम्ही केले ते योग्य केले.. आपली, आपल्या माणसांची, लहान मुलांची identity सांभाळणे आपला lookout आहे आणि अधिकार सुद्धा. हॉटेल सारख्या खाजगी संस्थानी त्यासाठी आपल्याला वेठीला धरणे बेकायदेशीर आहे. कायद्याच्या अभावात पोलिसांनी सांगितले ही सबब होऊ शकत नाही...पोलिस म्हणजे कोर्ट नाही.
कॉपी काढून ठेवण्यास आग्रह झाल्यास हॉटेल मॅनेजरला पोलिसांची legal notice ज्यावर कमिशनर, magistrate सारख्या लोकांची सही.,stamp असते ती बघायला मागू शकता. कायदा नसेल तर अशी नोटीस तात्कालिक, interim काढता येते पण कायमसाठी नाही. Authorities बरोबर तुमच्या आयडीच्या प्रतीच्या safe keeping बाबत काय जबाबदारी आणि व्यवस्था आहे त्याचीही चौकशी करू शकता. भारतात department बरेच responsible आणि responsive झाले आहेत.
रूम देण्याआधी आयडी प्रूफ बघून खातरजमा करणे वेगळी गोष्ट आहे आणि आयडीची प्रत, ते ही हॉटेल सारख्या संस्थेने काढणे हे identity theft ला खुले आमंत्रण आहे ज्याचे परिमार्जन अनेकदा गुन्हेगारी कारवायात होते. आपण सावध राहावे हे चांगले .. प्रसंगी थोडा मनस्ताप, अव्यवस्था झाली तरी बेहेत्तर.
विक्रमादित्याने आप्ला हट्ट
विक्रमादित्याने आप्ला हट्ट सोडला नाही...
बहुतेक सगळ्या हॉटेल्स मध्ये
बहुतेक सगळ्या हॉटेल्स मध्ये अमानवीय शक्ती असतात, आयडी प्रूफ जवळ नसला आणि त्यांनी कोणाला पछाडलं आणि माणूस स्वतःची भलतीच ओळख सांगत बसला तर हा अंगात आलेला माणूस कोण आहे याची खात्री पटण्यासाठी आयडी प्रूफ सक्तीचा केलाय असं मला वाटतं
हाब ,
हाब ,
जास्तीच्या माहितीसाठी,
होटेल्स नुसतेच प्रूफ कॉपी करून ठेवत नाहीत तर ते रित्राईव्ह पण करतात
आमच्या नेहमीच्या हॉटेल मध्ये, मी इकडे आधी राहिलोय असे सांगितले की तो कॉम्प्युटर वर खाट खुट करून ok म्हणतो आणि परत प्रूफ घेत नाही.
पुढच्या भारतवारीत प्रूफ न देण्याच्या तुमच्या हट्टावरून तुम्हाला काही अनुभव आला तर इकडे जरूर शेअर करा,
प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात
प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात आयडेंटिफिकेशन आणि ट्रॅकिंग चिप बसवावी. हॉटेल रिसेप्शन समोर उभे राहिले की नाव, गाव, पत्ता, वय, हा कोणाचा नवरा/मुलगा/भाचा / काका/मामा सगळं कळेल. कोण केव्हा कुठे गेला सगळे पोलीस ट्रॅक करत राहतील. ना कोणी किडनॅप होईल, ना कोणी खोटी अॅलिबी देऊ शकेल.
हे आपल्या सुरक्षेसाठीच आहे, प्लिज कोऑपरेट.
बाबा,
बाबा,
विक्रमादित्याच्या
पोष्टीवरपाठीवर पोसणार्या बांडगूळ वेताळांच्या शापाला त्याने भीक ती काय घालायचीसिम्बा,
अचानक तुम्हाला माझी पोस्ट विषयाला धरून प्रतिसाद देण्याच्या लायकीची वाटली हे बघून कृतकृत्य की काय वाटलं.
आपले म्हणणे मांडावे आणि शांत
आपले म्हणणे मांडावे आणि शांत बसावे.
तुम्हाला माझी पोस्ट विषयाला
तुम्हाला माझी पोस्ट विषयाला धरून प्रतिसाद देण्याच्या लायकीची वाटली हे बघून कृतकृत्य की काय वाटलं.>>>
तुमची on 1 November, 2018 - 17:23 ची समारोप सदृश्य पोस्ट वाचून, तुम्हाला अग्री टू disagree अंमलात आणणे बहुतेक मान्य आहे ह्या आशेने मी ही कृतकृत्य झालो
खरच रूनमेश होत चालला आहे.
खरच रूनमेश होत चालला आहे.
कळतंय की आपला मुद्दा चुकीचा आहे पण माघार नाही घेणार.
हॉटेल सारख्या खाजगी संस्थानी
हॉटेल सारख्या खाजगी संस्थानी त्यासाठी आपल्याला वेठीला धरणे बेकायदेशीर आहे. कायद्याच्या अभावात पोलिसांनी सांगितले ही सबब होऊ शकत नाही...पोलिस म्हणजे कोर्ट नाही.
<<
यार,
जरा ते अमेरिकन ग्रीण कार्ड्/सिटिझनशिप विथ डिफरन्ट लॉ इन्फोर्समेंट अन डिफरन्ट कायदे सोडून इकडे भारतात या. मग कायदा शिकू आपण दोघे मिळून.
"बेकायदेशीर" कुणाच्या कायद्याने? अन माझ्या घरात भाड्याने रहायचं तर तू कोण? हे विचारायचा मला अधिकार नाही का? माझ्या देशात, नवा नोकर ठेवला, किंवा नवा भाडेकरी ठेवला, तरी त्याच्या ओळखीचे प्रूफ निगडीत पोलिस स्टेशनात जमा करावे असा कायदा आहे.
बाकी तुमच्या देशातले कायदे, अन आयडेंटिटी थेफ्ट अन आयडेंटिटी क्रायसिसबद्दल खोपच्यात बोलू नंतर निवांत. पैले तिकडली सिटीझनशिप सोडताय का? ते सांगा. मग एका लेवलवर बोलणे होईल.
>>>तरी त्याच्या ओळखीचे प्रूफ
>>>तरी त्याच्या ओळखीचे प्रूफ निगडीत पोलिस स्टेशनात जमा करावे असा कायदा आहे. >> प्राधिकरणाच्या पोलिस स्टेशनात म्हणून गर्दी असते होय!
पोलिस म्हणजे कोर्ट नाही.
पोलिस म्हणजे कोर्ट नाही.
<<
पोलिस म्हणजे कोर्ट नसलं, तरी पोलिसाचं ऐकलं नाही, तर पोलीस अनेक प्रकारे तुमचे जिणे हराम करू शकतात. तेव्हा त्यांनी सांगितलेले ऐकणे फायदेशीर अस्ते.
तुमच्या आम्रविकेत काळसर रंगाच्या लोकांना "चुकून" गोळी घालून मारून टाकण्याचे प्रकार आजकाल फार ऐकतो आहे. हे अगदी आमच्या योगीराज्यात अॅपल एक्झिक्युटिवला पोलिसांनी गोळ्या घालून मारून टाकले तस्सेच आहे.
तर पुन्हा एकदा हात जोडून विनंती.
इकडे या. अन या योगीराजांना आपण कायदे शिकवाच! अन पोलीस काय करू शकतात अन काय करू शकत नाहीत तेही शिकवा. तुमच्या ओजस्वी भाषेला अन तेजस्वी टायपिंगला घाबरून हे तमाम भारतीय पोलीस त्यांची शेपूट योग्य जागी घालून तुम्हाला सलाम ठोकतील याची मला खात्री नव्हे तर ग्यारंटी आहे! _/\_
कधी येताय तारणहार? कब आओगे?
प्राधिकरणाच्या पोलिस स्टेशनात
प्राधिकरणाच्या पोलिस स्टेशनात म्हणून गर्दी असते होय>>>>>>>
चांगला होता,
पण लक्षात यायला थोडा वेळ लागला
चांगला होता,
चांगला होता,
पण लक्षात यायला थोडा वेळ लागला
<<
"हिंजवडी परिसरात बर्म्युडावाल्यांची गर्दी वाढणार तर! "
या कामदेवांच्या प्रतिसादापेक्षा जऽरा खालचा होता.
माझ्या डोक्यात पण निगडित
माझ्या डोक्यात पण निगडित बद्दल हाच जोक आला होता.'निगडीत का, प्रत्येकाने आपापल्या देशाच्या पोलीस स्टेशन मध्ये का नाही जायचं' वगैरे ☺️☺️☺️☺️☺️
निगडीत या मराठी शब्दाचा अर्थ
निगडीत या मराठी शब्दाचा अर्थ जर आपण विसरलो असू, तर लवकरात लवकर मायबोलीवरून संन्यास घेतलेला बरा, असे आदरपूर्वक सुचवितो.
आरारा,
आरारा,
जोपर्यंत तुम्ही विषयाचा आवाका आणि मर्यादा समजून घेऊन केवळ त्याबरहुकूम विचार करण्याच्या पेनस्टेकिंग प्रोसेसमध्ये ... डोक्यातल्या अगणित वेगवेगळ्या विषयांची भेळ बाजुला ठेऊन लिहायला शिकत नाहीत तोपर्यंत तुमच्याशी वन-टू-वन चर्चा होऊ शकेल असे वाटत नाही.
आता येऊद्या एक जोरदार, तडकता, भडकता रँट.
>>>निगडीत या मराठी शब्दाचा
>>>निगडीत या मराठी शब्दाचा अर्थ जर आपण विसरलो असू, तर लवकरात लवकर मायबोलीवरून संन्यास घेतलेला बरा, असे आदरपूर्वक सुचवितो. >>>
अमित
अमित
विषयाचा आवाका आणि मर्यादा
विषयाचा आवाका आणि मर्यादा समजून घेऊन केवळ त्याबरहुकूम विचार करण्याच्या पेनस्टेकिंग प्रोसेसमध्ये
<<
आय क्नो इट्स क्वाईट पेनस्टेकिंग फॉर यू टु कीप अप विथ फॅक्ट्स. कीपींग अप विथ माय काइंड ऑफ थिंकिंग इज बियोंड यू, बट दॅट्स ओके. देअर आर मेनी लाईक यू, डोन्ट वरी.
तर,
जेव्हा आपण "कायद्या" बद्दल बोलतो, तेव्हा किमान दोन देशांत कायदे वेगळे असतात, सोशल्/लीगल्/पर्सनल काँटेक्स्ट्स वेगळे असतात, इतके आकलन असले तरी पुरेसे होईल. नैका? तुम्हाला मराठी येते, अन इथे येऊन मराठीत बोलायची दुर्दम्य इच्छा आहे, याचा अर्थ तुम्ही वर्जिनल भारतीय आहात. तेव्हा, इतक्यात 'देशी' विसर्लात की काय?
अन याला रँट म्हणाय्चे असेल, तर आपण जी मौक्तिके या धाग्यावर उधळत आहात ते काय आहे नक्की?
तेव्हा पुनः एकदा,
अपनी तेजस्वी और ओजस्वी लेकर कब आओगे, तारणहार?
अमित
अमित
निगडीत चा जेन्यूईन अर्थ माहीत
निगडीत चा जेन्यूईन अर्थ माहीत आहे.पण असे शाब्दिक पीजे करायची उबळ ही येणाऱ्या शिंकेसारखी आहे. ☺️☺️
या असाध्य रोगात 'आप कतार मे है' सारखी वाक्यां पण मोडतात.
'केवळ त्याबरहुकूम'??
'केवळ त्याबरहुकूम'??
<<
का ब्वा? हा काय काँप्युटर प्रोग्रामिंगचा क्लास आहे का? धाग्याचा विषय 'हॉटेल मालकाने/ त्याच्या एजंटने, प्रोस्पेक्टिव्ह गिर्हाइकाचं आयडी प्रूफ मागणे योग्य की अयोग्य' हा आहे. अन त्यात "भारतात" हा मोठ्ठा अध्यहृत आहे.
आता त्या संदर्भात तुमच्या पोस्टींत अमेरिकेतील उदाहरणे देवून भारतात जे काय कर्तात ते अमेरिकन कायद्यानुसार चूक कसे आहे, हेच पुनःपुन्हा येते आहे.
आता यात 'पेनस्टेकिंग' प्रोसेस कुठे येतेय ते लक्षात येतंय का?
Pages