काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.
लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.
एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.
"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.
"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले
"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला
"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम
"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"
"मी आणि माझी बायको"
"कुठे आहेत त्या?"
"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"
"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.
मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.
"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.
कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.
"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.
"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.
"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"
"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.
"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.
मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.
"काय झाले?" त्याने विचारले.
"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.
"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.
त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"
"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.
"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.
"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो
"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.
"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.
मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?
संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.
मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.
४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.
बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.
ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.
(No subject)
बंदूक घेतलेला माणूस
बंदूक घेतलेला माणूस ट्रंपतात्यांसारखा का दिसतोय ?
ओ पण धागाकर्त्याला अपेक्षित
ओ पण धागाकर्त्याला अपेक्षित असलेली गुदगल्या करणारी, तुमचे विबासं असेल अशी चर्चा इथे झालीच नाही. शेम शेम !
खत्रा आहे मैचित्र. भ्रमाचा
खत्रा आहे मैचित्र. भ्रमाचा भोपळा सर्वात आवड्ला. तसेच निगडी-कतारही.
गोड आहे चित्र मैत्रेयी.
गोड आहे चित्र मैत्रेयी.
चित्र भारी _/\_
चित्र भारी _/\_
अरे अजून चालूच आहे का इकडे?
अरे अजून चालूच आहे का इकडे?
- लोकांना इतका वेळ कसा मिळतो इतक्या निरर्थक गोष्टीवर भांडायला?
- आणि आपला मुद्दा जगाच्या अंतापर्यंत लावून धरायचा पेशन्स आणि त्यासाठी गरज पडली तर दुसऱ्यांच्या पाणउतारा करायची निगेटिव्हीटी येते कुठून लोकांत?
- रोजच्या टेन्शन मधून जर चेंज म्हणून मायबोलीवर यावे, तर इकडेपण तेच, पर्सनल हेवेदावे, एकमेकांना टोचून बोलणे,मी कसा/कशी तुम्हा सगळ्यांच्या वर श्या, जीव उबून जातो हे सगळे पाहिले की
-म्हणूनच हल्ली मायबोलीवर यावेसे वाटत नाही.
- आणि भांडणे पण कशी पेज3 सारखी गोड गोड आवरणात केलेली,जुने जुने इश्यूज परत उकरून काढून पर्सनल हल्ले करणारी , अरे, निदान राजकीय बाफा सारखी मनमोकळी भांडणे तरी करा, बाकी लोकांना निदान वाचायला मजा येईल,
चित्र भारी >>+१
चित्र भारी >>+१
हायला ह्या लॉजवर काय हल्ला
हायला ह्या लॉजवर काय हल्ला गुल्ला झालाय.
मी उगीच ऋ चं नाव घेतलेलं. सॉरी ऋ.
मैत्रेयी, चित्र छान आहे.
उमम्म हाब कोणत्याही कंपूत
उमम्म हाब कोणत्याही कंपूत नाही हे बघून आनंद जाहला
नवा कंपू सुरू करा.ओळखपत्र
नवा कंपू सुरू करा.ओळखपत्र देऊन रजिस्ट्रेशन !
कुठल्याही कंपूत नसणाऱ्यांचा
कुठल्याही कंपूत नसणाऱ्यांचा कंपू सुरू करताय?
माबो लॉजच्या पाटीवर
माबो लॉजच्या पाटीवर स्वस्तिकचं चित्रं?
आमच्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार माबो सेक्युलर असावी असा अंदाज होता. चुकला की काय?
उलट्या स्वस्तिकाचे बरेच चाहते
उलट्या स्वस्तिकाचे बरेच चाहते आहेत इकडे
Code of Conduct guidelines
Code of Conduct guidelines issued by Ministry of Tourism for hotel managements and owners:
3. Regulated use of premises and official equipment:
• Management/owners are encouraged to prohibit usage of the organization’s premises for use or abuse of illicit substances, sexual violations and of company equipment for viewing, storage, distribution, promotion or use of material which could increase vulnerability to exploitation of the nature mentioned in this code.
• Individuals under the permitted age shall not be allowed permission in to restricted areas like bars and pubs.
• Tourism service providers shall verify and maintain a record of details pertaining to tourists, personnel and service providers like address, contact details etc and also commit themselves to maintaining confidentiality.
• Internet usage that promotes, seeks any contacts for sex tourism and other sexual services, for search of pornographic material and/or to solicit the sale and purchase of illicit substances shall be prohibited.
Ministry of Tourism ची वेबसाईट आहे. तिथे ह्या चर्चेचे उत्तर मिळेल.
विषयाला धरून प्रतिसाद ...
विषयाला धरून प्रतिसाद ... मस्तच !!!
डिसिजन काय झाला? लवकर सांगा
डिसिजन काय झाला? लवकर सांगा यार. मी फॅमिलिबरोबर एका होटेल मधे आलो आहे. गेले कित्येक तास दारापाशी उभा आहे. एक पाय होटेलात एक पाय बाहेर असा उभा आहे. बायको आणि कन्यारत्न कधीच आत गेले. बायकोने तिचे आयडी व क्रेडिट कार्ड वापरुन चेक इन केले. कन्यारत्नाला आयडी विचारला का माहित नाही. मी म्हणलो कि ईथे महत्वाची चर्चा सुरु आहे. जोपर्यंत डिसिजन होत नाही तोपर्यंत आयडी दाखवायचा कि नाही ठरत नाहिये. मगाशि बायको आणि मुलगी माझ्या समोरुन बाहेर गेले जाता जाता मुलीने 'बाबा, तु नॉन लोकल असल्यामुळे अनिश्चित आहेस पण तुला तुझा नरसिम्हा कधितरि भेटेलच' असा शेरा मारला. तिचे मला काहीच कळत नाही. ते तरि बरे. बायकोने माझ्याकडे ढुंकुनही पाहिले नाही त्यामुळे आता मला फार घाईची दिलगिरी लागलि आहे क्रुपया लवकरात लवकर डिसिजन सांगा
पण तू मुद्देसूद बोलतोस असा
पण तू मुद्देसूद बोलतोस असा उगाचच माझा भ्रम होता तो निदान भंगला.
हेही एक शिक्षणच.
>>
वही तो.. !! मी मागे तेच म्हटले होते. त्यांनी ज्यांचे नाव धारण केले आहे त्यांच्याप्रमाने लॉजिकल विचार करत असतील असे वाटलेहोते पण आमचे अगदी अनसर्टॅनिटीचे प्रिन्सिपल निघाले. आता कुठे स्वाती बाईण्नी हिट द नेल....
मी म्हंटले नव्हते ह्या
मी म्हंटले नव्हते ह्या सर्कशीत नवीन करामती बघायला मिळू शकतात, आलेच चित्र
Psychology 101 - If you can't face the truth laugh it away.
चित्राखाली Hail स्वाती_आंबोळे, long live टीपापा लिहा असे सुचवणार होतो पण पुन्हा 4 तासांच्या एडिटींग लिमिटचं कारण येईलच
मस्त चित्र मै
मस्त चित्र मै
मै चित्र मस्त जमलं आहे.
मै चित्र मस्त जमलं आहे.
दिलगिरी कक्षात एकच व्यक्ती कधीची तिष्ठत वाट बघतेय हे ही दाखवायला हवं होतंस. पण आता एडीट करता येणार नाही तेव्हा असू देत.
चित्र
चित्र
दिलगिरी कक्षात एकच व्यक्ती
दिलगिरी कक्षात एकच व्यक्ती कधीची तिष्ठत वाट बघतेय हे ही दाखवायला हवं होतंस >> हो हो.. आणि कक्षाच्या भिंतीवर आधी ठरवून शिकार केलेल्या आयडींचे फोटोही हंटिंग ट्रॉफी सारखे
<<<विषय/मुद्दा कुठलाहि असो,
<<<विषय/मुद्दा कुठलाहि असो, त्याचा चिखल (विपर्यास) करुन त्यात लोळायला हे मोकळे...>>>
मग दुसरे काय मायबोलीवर होणार?
कधी कुणि इथली चर्चा संपादित करून त्याचा मुद्देसूद सारांश करून लिहून ठेवतात का? जी काय मते मांडली असतील, कायद्यासंबंधी, ती कुणि तुमच्या निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडे पाठवता का? मायबोलीवरील लोकांच्या मताला इतरत्र कुठे किंमत आहे का?
मैत्रेयि, चित्र छान आहे. आता
मैत्रेयि, चित्र छान आहे. आता आणखी गंमत करण्यासाठी त्यातल्या लोकांना नावे द्या. म्हणजे हा धागा आणखी काही वर्षे चालेल. वर्षानुवर्ष टिकलेल्या मैत्र्या तुटतील, भांडणे होतील, नवे कंपू तयार होतील. इमोशनल, कमकुवत मनाचे लोक इथून निघून जातील. मग उरलेल्या लोकांना कमरेचे सोडून धिंगाणा घालायला हरकत नाही!
बाबा,
बाबा,
(आणि ईतर कोणीही ज्यांना माझा त्रागा आणि नाराजी समजून घेण्याची ईच्छा आहे.... )
ह्या धाग्यावर सहाव्या पानावर जवळजवळ २०० व्या पोस्टीच्या आसपास माझी पहिली पोस्ट आहे (टेक्निकली दुसरी त्याआधी मी एक जनरल माहितीपर प्रश्न विचारला होता ज्याला आरारांनी ऊत्तर दिले) तर सहाव्या पानांपर्यंत मी ही चर्चा फॉलो करून माझी स्वतःची काही माहिती जमवून सहाव्या पानावर जनरल मतप्रदर्शन केले. त्यावर मी_अनू ह्यांनी ऊत्तर दिले आणि मी त्यांच्याशी बोलत असतांना स्वाती_आंबोळे (ज्यांना तोवर धाग्यावर एकदाही लिहावेसे वाटले नाही) ह्यांनी लागलीच माझी पोस्ट पिक करून मी 'मी_अनू ह्यांच्यावर आरोप करत आहे, लोकांना वेड्यात काढत आहे' असे काहीबाही लिहिले. आता हे असे पहिल्यांदा झाले का? आजिबात नाही.
अनेक धाग्यावर/चर्चात हे सातत्याने होत आहे... अॅक्चुअली प्रत्येक धाग्यावर जिथे मी माझे मुद्दे मांडले आहेत. मी धाग्यावर कधीही (मी शक्यतो काही मतमतांतरे वाचून झाल्याशिवाय मतप्रदर्शन करत नाही. त्यामुळे बहुकेत वेळा अनेक पाने पोस्टी पडल्यानंतरच लिहितो) लिहिले तरी त्या आधी त्या चर्चेत मतप्रदर्शनाची तसदी न घेणार्या स्वाती आंबोळे अगदी न चुकता फक्त माझी पोस्ट कोट करून मुद्दे सोडून काहीबाही लिहित आहेत. त्यांनी मुद्द्याला धरून चर्चा केल्यास काहीच ईश्यू नाही ... मागच्या दहा एक वर्षात अशा अनेक चर्चा त्यांच्याशी आणि अनेकांशी केल्या आहेत.. (त्या तश्या केल्या नसत्या तर ऊगीच तुम्हाला आणि त्यांना आजवर मी मुद्देसूद वगैरे लिहित होतो असे वाटले असेल का?)
पण मागच्या अनेक चर्चातून मी वर म्हणालो तसे स्वाती_आंबोळेंचा पिक आऊट पॅटर्न लक्षात आला. ह्या धाग्यावरही माझ्या पोस्टीनंतर लगेच त्या काहीतरी बिनमुद्द्याचे आणि बिनबुडाचे लिहिणार हे अपेक्षित होतेच आणि त्यांनी ती अपेक्षा आजिबात फोल ठरवली नाही.
त्यांची ही सततची कृती न आवडल्याने एकदा त्यांना थेट टीपापा वर जाऊनही विचारले होते 'तुम्ही मलाच कंटिन्युअसली पिक करता आहात आणि बिनबुडाचे आरोप करता आहात तर तुम्हाला माझ्याकडून काही प्रॉब्लेम आहे का' त्यावर त्यांनी काहीतरी गोल गोल ऊत्तर दिले... तेव्हा त्यांना ' तुम्ही माझ्याशी मुद्दायाला धरून चर्चा करा पण असे आरोप वगैरे करू नका' म्हणून विनंती देखील केली होती ज्याला त्यांनी 'ओके .. नोटेड' असे लिहिले.
पण तेवढेच पुन्हा त्यांचे कंप्ल्सिवली ये रे माझ्या मागल्या होऊन.. पिक करणे आणि आरोप करून मी लिहिलेले डिसक्रेडिट करायला बघणे (मुद्दे मांडणे/खोडणे नव्हे... जे खरे तर चर्चेच्या दृष्टीने चांगले असते) चालू झाले... ह्याला मी तरी आकस म्हणतो.
त्यांना माझ्याबद्दल तो का आहे हे मला माहित नाही.. त्यांना आकस आहे म्हणजे टीपापाच्या ईतर 'काही' मेंबर्सनी सुद्धा तो ग्राह्य धरलाच पाहिजे ह्या नियमानुसार जिथे तिथे डिसक्रेडिट करण्याचा स्वाती_आंबोळेंचा लाईन ऑफ अॅटॅक आणि बाकी मेंबर्सचा लाईन ऑफ डिफेन्स एक्झेक्युट करण्याचा पॅटर्न सुद्धा लक्षात आला.
ह्यावेळी माझ्यासाठी 'ईनफ ईज ईनफ' झाले म्हणून हा त्रागा.
तुम्हाला सतत कोणी असे टार्गेट करून डिसक्रेडिट करायला बघत असेल तर मायबोलीवरच्या अनेक चर्चांच्या जंजाळात ते एक त्रयस्थ वाचक म्हणून मला लक्षात येईलच असे नाही.
मला काही विक्टिम बिक्टिम असल्यासारखे वाटत नाही (आकस वगैरे जे काही आहे त्याच्याशी डील करण्यास मी समर्थ आहे) पण माझा आक्षेप नेमका कशाला आहे ते ईतरांना कळावे असे नक्कीच वाटते.
हाब, टीपापा काय आहे?
हाब, टीपापा काय आहे?
टीपापा
टीपापा
अर्थात ग्रूपचे बरेचसे ईतर अनेक मेंबर्स सुद्धा आहेत.. जे स्वाती_आंबोळेंच्या कारवायांत सहभागी होत नाहीत.
फेरफटका, टीपापा इथे आहे. या
फेरफटका, टीपापा इथे आहे. या गप्पा मारायला (अॅट युवर ओन रिस्क )
हायझेनबर्गसुद्धा परवापर्यंत त्यांना ग्रूप सेटिंगचा तिटकारा असूनही तिथे गप्पा मारायला येत होते. त्यांनी वरती 'गोल गोल उत्तरे' वगैरे उल्लेख केलेत त्या चर्चेनंतरही येत होते आणि 'नाना-तनुश्री'सारखे धागे मायबोलीवर असताना त्या विषयांवर टीपापात चर्चाही करत होते. आज अचानक त्यांना ते होलिअर दॅन टीपापा असल्याचा साक्षात्कार झाला आहे.
अनेक नॉन-टीपापा मेम्बर्सनीही वरती त्यांना उद्देशून 'तुम्ही ताणून धरत आहात', 'तुमच्या पोस्ट्स ऋन्मेषसारख्या होत चालल्या आहेत' इ. निरीक्षणं नोंदवली आहेत. 'मेरिच गिनो' यांनीतर हायझेबर्ग यांनी चर्चा कशी भरकटवली ते साद्यंत लिहिलं आहे. पण त्या कोणालाही उत्तर देण्यात, ईव्हन अॅक्नॉलेज करण्यात हायझेनबर्गना रुची दिसत नाही हे एक नवलच. तसंच टीपापाकरांपैकी मी एकटीनेच त्यांना टोकणार्या पोस्ट्स लिहिल्या आहेत, तरीही सगळ्या ग्रूपवर खापर फोडावंसं त्यांना का वाटलं असेल बरं? सायकॉलॉजी१०१ मध्ये याबद्दल काही माहिती आहे का?
दोन्ही/सर्व बाजूंनी मुद्दे येत असतात तोवर प्रश्नच नसतो. पण एखाद्याला 'तुम्ही करताय ते फिअर मॉन्गरिंग आहे' म्हणणं, किंवा सीरियस चर्चेत 'काय वाट्टेल ते बोलतात लोक' म्हणून हसणारी इमोजी टाकणं ही काही मुद्देसूद वैचारिक देवाणघेवाण नव्हे. ज्याला स्वत:वर आरोप झालेले आवडत नाहीत त्याने इतरांशी बोलतानाही हे भान राखायला हवं. पण व्हिक्टिम कार्ड प्ले करण्याच्या नादात नसेल लक्षात येत कदाचित. मी समजू शकते.
वर त्यांनी काही लोक बुलिंगमुळे इमोशनल होऊन मायबोली सोडून गेल्याबद्दल उल्लेख केला आहे. ते वादासाठी खरं जरी मानलं, तरी त्यापैकी कुठल्याच वेळी हायझेनबर्ग शोषिताची बाजू घेऊन बुलिंगच्या विरोधात उभे ठाकल्याचं आठवत नाही मला. किंवा टीपापाकरांबरोबर स्नेहसंमेलनांना हजेरी लावताना कुठलं प्रिन्सिपल आड आलं नाही आजवर. त्यांच्या आउट ऑफ लाइन पोस्ट्स दाखवून दिल्यावर एकदम प्रिन्सिपल्स आठवली!
असो. आता मजजवळ याहून अधिक काही लिहिण्यासारखं नाही.
हाब, हे असं सातत्याने होत
हाब, हे असं सातत्याने होत असेल तर त्याचा त्रास होणे साहजिक आहे. आता विचार करून पाहा की तुम्ही ज्या आयडींच्या मागे विनाकारण हात धुवून लागता त्यांना किती त्रास होत असेल. उदाहरणार्थ कु. ऋ, शालींच्या मार्मिक कथा. त्या आयडींनाच काय इतर वाचकांनाही ते बघवत नाही. पण तुमच्या नादी कोण लागणार म्हणून कुणी बोलत नाही. परंतु स्वातींचे तसे नाही. त्यांना योग्य शब्दात, कुठेही हिंसक न होता, दुसर्याला त्याची जागा दाखवून देता येते. ह्या बाफवर सुद्धा स्वाती आंबोंळेंचे लिहीणे अतिशय संयमित आणि समंजस वाटते आहे.
तुम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे असे म्हणण्याचीही सोय नाही कारण ते तुम्हाला करताच येत नाही. पण काही बोध घेता आला तर घ्या बुवा.
Pages