लॉज बुकिंगचा एक अत्यंत धक्कादायक अनुभव

Submitted by Parichit on 22 October, 2018 - 05:21

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.

लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.

एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.

"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.

"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले

"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला

"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम

"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"

"मी आणि माझी बायको"

"कुठे आहेत त्या?"

"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"

"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.

मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.

"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.

कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.

"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.

"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.

"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"

"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.

"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.

मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.

"काय झाले?" त्याने विचारले.

"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.

"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.

त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"

"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.

"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.

"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो

"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.

"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.

मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?

संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.

मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.

४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.

बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.

ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनु, तो पर्तिसाद तुमच्यासाठी नव्हता. ऑल्मोस्ट एकत्र पोस्ट होऊन तुमच्या प्रतिसादाखाली आला इतकंच. Lol
स्वारी.

अन त्यात "भारतात" हा मोठ्ठा अध्यहृत आहे. >> Lol
आता यात 'पेनस्टेकिंग' प्रोसेस कुठे येतेय ते लक्षात येतंय का? >>अहो धागाकर्त्याने स्पेसिफिकली अमेरिकेबाबतीत विचारलेल्या प्रश्नाचे मी ऊत्तर लिहिले आहे ना. Uhoh

हा पहा तुमच्यासाठी पुन्हा देत आहेत प्रश्न.. तरी बरं चांगला बोल्ड मध्ये लिहिला होता
अमेरिकेत हॉटेलमध्ये चेकइन करताना प्रत्येकाचे आयडी प्रूफ स्कॅन करून स्टोअर करून ठेवतात का? असा लोकांचा डेटा खाजगी व्यवसायिकांनी साठवून ठेवायला तिकडे परवानगी आहे का?

म्हणून म्हणालो सगळे समजून घेणे ही पेनस्टेकिंग प्रोसेस आहे. पण आकसाचा चष्मा चढवून वाचले की नेमके महत्वाचे ते दिसत नाही. आता ह्याच धाग्यावर चार पान मागे कोणीतरी असेच हे नेमके कशाबद्दल लिहिले आहे ते न समजून घेता काहीबाही लिहिले आणि मग 'हो का मी मिस केले असेल' असे नंतर लिहिले. पण पुन्हा मागे जाऊन पोस्ट बदलायची तसदी घेतली नाही... चालायचेच.. देअर आर मेनी लाईक यू, डोन्ट वरी.

तुम्हाला अमेरिका शब्दाने त्रास होतो आहे का?

>>> मग 'हो का मी मिस केले असेल' असे नंतर लिहिले. पण पुन्हा मागे जाऊन पोस्ट बदलायची तसदी घेतली नाही
अय्या, मी का? मी 'मिस केलं असेल' नव्हे, 'मिस केलं' असं डेफिनिटिव्ह शब्दांत म्हटलं होतं. त्यानंतर मला कळलेला गोषवारा बरोबर आहे का असंही नम्रतेने विचारलं होतं.
चूक/ओव्हरसाइट कबूल केल्यावर मागे जाऊन त्या गुन्ह्याचा पुरावा नाहीसा करायचा असतो होय! हे नव्हतं माहीत.

ओह! तुम्ही लिहिलं होतं का? Sad जसे नेमके शब्द आठवत नव्हते तसे कोणी लिहिलं तेही आठवत नव्हतं... आरारांच्या संदर्भाने आठवलं ईतकंच.

असू दे,
आता कोणी आणि नेमकं काय लिहिलं होतं हे आठवत नसताना लिहिलेली पोस्ट तू कधी बदलतोस त्याची मी वाट पाहात बसते. Proud

वाय ए डब्ल्यू एन

चार पाच पाने मागे तुम्ही केलेल्या मौक्तिक उधळणीनंतर आलेल्या रच्याकने प्रश्नालाच "धाग्याचा विषय" म्हणतात का? असेल बुवा. अमेरिकेत तेच बरोबर व कायदेशीरही असेल.

एल ओ एल.

त्यात काय एवढे... वाट नका पाहू...तुम्ही तुमची पोस्ट बदलली की लागलीच मी माझी बदललीच म्हणून समजा... गोष्टी क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये झालेल्या बर्‍या. Proud

पोस्ट बदलायचा नियम माझा नाही, तुझा आहे - तू पाळ. Proud
बिसाइड्स, आता ती पोस्ट बदलता येत नाही, मायबोलीवर चार तासांची विंडो असते. तुझ्या पोस्टची विन्डो अजून उघडी आहे. Lol
असो - नो इश्यूज. होतं असं. Happy

चार पाच पाने मागे तुम्ही केलेल्या मौक्तिक उधळणीनंतर आलेल्या रच्याकने प्रश्नालाच "धाग्याचा विषय" म्हणतात का? असेल बुवा. >> एवढा बाष्कळ युक्तीवाद नव्हता एक्स्पेक्ट केला तुमच्याकडून.. छ्या! ह्यत काही मजा नाही.. काहीतरी एकदम धोबीपछाड टाईप्स काऊंटर अर्ग्यूमेंट येऊ द्या हो.

बिसाइड्स, आता ती पोस्ट बदलता येत नाही, मायबोलीवर चार तासांची विंडो असते. तुझ्या पोस्टची विन्डो अजून उघडी आहे. Lol > राहू दे राहू दे...
विषय समजून न घेता आकसापोटी लिहिणे ..ह्याचं ऊदाहरण म्हणून तुमची पोस्ट, तुम्हाला त्याची आठवण करून देणारी माझी पोस्ट आणि पुन्हा त्यावर फुटकळ कारणं देणारी तुमची पोस्ट सगळं ... ऊदाहरणादाखल म्हणून आहे तसं बघायला राहू देत सगळ्यांना.
स्मायली देण्याच्या काँपिटिशनमध्ये मात्र आपली तुमच्यासमोर सपशेल माघार. Proud

हाब, लब्बाड हां एकदम. मगाशी आकसापोटी लिहिलेली पोस्ट कोणाची होती हे आठवत होतं ना? मग नाव घेऊन बिंधास लिहायचं की. ताकाला जाऊन भांडं लपवायचा खेळ कशाला?

फुटकळ का बरं? मायबोलीवर चार तासांची विन्डो नाहीये का पोस्ट बदलण्यासाठी? मागे जाऊन पोस्ट बदलायला हवी हा तुझा मुद्दा होता की माझा? यापैकी कुठलं कारण फुटकळ आहे ते संदर्भासहित स्पष्ट कर बघू.

ताकाला जाऊन भांडं लपवायचा खेळ कशाला? >>नेम ऑफ द गेम ईज ... कॉलिंग समवन्स ब्लफ.

मायबोलीवर चार तासांची विन्डो नाहीये का पोस्ट बदलण्यासाठी? >> पोस्ट बदलण्याची ईच्छा आहे का?
मागे जाऊन पोस्ट बदलायला हवी हा तुझा मुद्दा होता की माझा? >> पोस्ट बदलण्याची ईच्छा नाहीये का?

सौजन्य दाखवत तुम्हाला तुम्ही केलेल्या ( आणि करत आलेल्या) बिनबुडाच्या आरोपांबद्दल दिलगिरी असेल आणि ती व्यक्त करण्याची ईच्छा असेल तर त्यासाठी 'चार तासांची विंडो' वगैरे फुटकळ कारणं द्यायची गरज नाही.
दिलगिरी वाटत नसल्यास.....मी समजू शकतो.

अरे अरे, ती निळी बाहुली वगैरे सगळा गेम होता का? तोही ऑलरेडी मान्य केलेल्या चुकीला ब्लफ म्हणून मग कॉल आउट करण्यासाठी खेळलेला?!
मग इतर कोणाची आवश्यकताच नाही की या खेळात - तूच दोन्ही/सगळ्या बाजूंनी खेळत आणि खेळवत बसला आहेस.
चालू दे, चांगली करमणूक होते आहे.

मी तर चूक ( कितव्यांदा घडली म्हणे ही "चूक" ) ऑलरेडी मान्य केली वगैरे तुमचेच म्हणणे आणि तुमचाच गोड समज.
असो...आधी म्हणालो तसे...तुम्हाला दिलगिरी व्यक्त न करता येणे मी समजू शकतो.

च्रप्स, आधी असं भांडून दाखवा, मग रेझ्युमे पाठवा.
नाहीतर तुम्हाला माझ्याबद्दल आकस आहे हे मान्य करून दिलगिरी व्यक्त करा.
नाही केलीत तरी मी समजू शकतेच म्हणा! Proud

आधी असं भांडून दाखवा, >> भांडण वगैरे काही नाही हो... ह्यावेळी तुमच्या बुलिईंगला वैतागून ईमोशनल होत कोणी मायबोली सोडून जात नाहीये म्हणून तुम्हाला तसे वाटत असेल. Proud

>>> कितव्यांदा घडली म्हणे ही "चूक"
>>> ह्यावेळी तुमच्या बुलिईंगला वैतागून ईमोशनल होत कोणी

याचा संदर्भ आणि या चर्चेशी संबंधही कळला नाही, पण तू मुद्देसूद बोलतोस असा उगाचच माझा भ्रम होता तो निदान भंगला.
हेही एक शिक्षणच.
You seem to carry a lot of baggage. दमत असशील.

याचा संदर्भ आणि या चर्चेशी संबंधही कळला नाही, >> Happy
नाही बुवा.. मी टीपापा किंवा तत्त्सम कुठल्याही ग्रूप सेटींग ठिकाणी ईतर कोणाशीही मायबोली संदर्भातले गॉसिप, नेम कॉलिंग करत नसल्याने भरपूर एनर्जी शिल्लक राहते जे म्हणावयाचे आहे ते ईथेच म्हंटल्या जाते, ईथे तिथे बॅगेज नेण्याची गरज पडत नाही.

तर, परिचित, या अनुभवावरून जरा शिका की

- तुम्हाला कायद्यातील बारीक सारीक गोष्टी माहित नसतील, तर त्याचा फटका बसू शकतो.
- नाहीतर कोर्टात जाऊन फिर्याद करण्याची तयारी असायला पाहिजे.
- जगात सर्वच लोक सज्जन नसतात.
- लोक आपल्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही.
पुढच्या वेळी हॉटेलात जागा बूक करण्यासाठी सही करण्या आधी नीट चौकशी करा.

स्वाती_आंबोळे बुलिईंग करतात?!
मायबोलीवर?!!

ऐतेनच!!

सर्व लोक:
धागे काढण्यापूर्वी किंवा इथे लिहिण्यापूर्वी

सावधान - मायबोलीवर बुलिईंग होते, भांडणे होतात, फसवणूक होऊ शकते, मैत्री तुटते, इमोशनल लोकांना
नैराश्य येते - वाईट्ट वाईट्ट गोष्टी घडतात.

तेंव्हा माझ्या सारख्या, नेहेमी खरे बोलणार्‍या, सर्व लिखाण विनोद मानणार्‍या, निर्लज्ज, निगरगट्ट लोकांनीच इथे यावे.

काय गंमत आहे पहा. आधारच्या धाग्यावर, आधार नंबर सक्तिचा करण्यावरुन ज्यांनी यंत्रणेच्या नांवाने शंख केला तेच महाभाग आता लॉजमधे आय्डेंटिटि मागणे/सक्तीचं करणं कसं जरुरी आहे, या मताचा पुरस्कार करत आहेत.

विषय/मुद्दा कुठलाहि असो, त्याचा चिखल (विपर्यास) करुन त्यात लोळायला हे मोकळे... Lol

काहीही म्हणा, लॉज (बाफ) वर गैरकृत्ये चालतात हे इथे या ठिकाणी सिद्ध झाले आहे .
ज्या साठी लॉज (बाफ) उघडला त्यासाठी त्याचा वापर न करता लोक इथे येऊन भलतेच उद्योग करतायत . कुणी (नको ते) गेम खेळतायत, कुणी विंडोतून डोकावून बघतायत , कुणी स्थानिक बुलीज दमदाटी करतायत, कुणी बॅगेज घेऊन येतायत अन इथे सोडून जातायत. असं अनक्लेम्ड बॅगेज कोनाची जबाबदारी? बरं बर्‍याच येणार्‍यांचे खरे आयडी पण नाहीत !! आता बोला काय करावं लॉजवाल्यांनी ? टाळं लावावं का लॉज ला? Proud

टाळं ? एवढ्यात ?
मी अजूनही दिलगिरी व्यक्त केली जाईल ह्या आशेवर आहे.

शिवाय अजून बर्‍याच लोकांना वादात हात धुऊन घ्यायचे आहेत... तत्व वगैरे काही नाही पण कधीतरी हा/ही आपल्याला असे बोलला होता ते आठवून (आठवायला जरा वेळ लागतो) कंपल्सिवली वादातल्या कोण्या एकाची साईड घेऊन दुसर्‍यावर शरसंधान करायचे आहे. नेम कॉलींग करायचे आहे.... कंपूत घेतलेल्या प्रतिज्ञेला जागत मदतीसाठी धावून जायचे आहे..... 'दुष्मनका दुष्मन दोस्त होता है' न्यायाने अचानक संबंध नसलेल्या आयडीला सपोर्ट करत कंपूत/मर्जीत जागा मिळवायची आहे...नावडत्या आयडीची दुसर्‍या आयडींशी तुलना करून नावडत्या आयडीवर बट्टा लावल्याचा आनंद मिळवायचा आहे.... दुसर्‍याच्या भ्रमाचे भोपळे फोडायचे आहेत/ आपले फोडून घ्यायचे आहेत....डू-आयडीने लॉगीन करून दुसर्‍यावर डु आयडी असल्याचा आरोप करायचा आहे... अगदीच काही नाही तर 'समंजस' भुमिका घेऊन थोड्या वाहवा मिळवून फेम वगैरे मिळवायचा आहे.... किंवा एक दोन अतिविनोदी वाक्ये लिहून टाळ्या मिळावयच्या आहेत.. जुने अपमान..आदर.. सत्कार...अफलातून ईमोजी. असे आणि बरेच काही
आधी न बघितलेल्या एक दोन करामती नव्याने दिसण्याची शक्यता सुद्धा असतेच.

.... विषयाला धरून एखादा प्रतिसादही येऊच शकतो... तो आला की आपण पुन्हा लॉज आणि आयडी विषयाला धरून वाद चालू करू... मुद्दा जुनाच असला तरी नव्यानं वाद घालणं महत्वाचं.. नाही का?

आणि ह्यातलं काहीही नाही झालं तर मुद्दाम टाळं लावण्याची गरजच पडणार नाही.

ही सगळी सर्कस आपण पहिल्यानेच थोडी पाहतो आहोत .. सर्कस जुनीच आहे.. कलाकार बदलले असतील..त्यात गैर वगैरे काही नसते...

हायजेनबर्ग
तुम्ही आम्ही अपरिचित आहोत. माझा तुमच्यावर कुठलाही आकस नाही. तुमचा आयडी हाब असला काय, गमन असला काय चमन असला काय मला फरक पडत नाही. इथे विषय चालू होता तो धागामालकाने मांडलेल्या एकतर्फी बाजूबद्दल. अनेकांनी दुसरी बाजू मांडली. पोलिसांनी लॉजमालकाला जे काही सांगितलेय त्याचे ते पालन करत आहेत. हे सोसायट्यात भाडेकरू ठेवतात त्यालाही लागू आहे.

आता एक गट (ज्यात तुम्ही हिरीरीने पुढे आहात) म्हणतो कि मानवी हक्कांची पायमल्ली होते, नियम चुकीचे आहेत वगैरे. त्यामुळे तुम्हाला अमेरिकेचे असे कडक कायदे लोक सांगत आहेत. त्याबद्दल तुम्ही कधी अमेरिकेतल्या ऑतोरिटीशी भांडण केलेले आहे का ? किमानपक्षी कोर्टात केस तरी ? नसेल तर तुम्ही अमेरिकेत असा किंवा घाना मधे. जिथे राहताय तिथले कायदे पाळणे क्रमप्राप्त आहे हे तुम्हाला ठाऊक असताना भारतातल्या कायद्यांना नावे ठेवून धागाकर्त्याचे प्रश्न कसे सुटतील ? फक्त धागाकर्त्याचे नाही, हा धागा अनेक जण वाचत असतील. तिथे हुज्जत घालून काही मिळणार नाही. तुम्हाला आयडी द्यावेच लागतील. नाहीतर तुम्ही वेळ असल्यास या नियमाला आव्हान देऊन ते बदलून घ्या.

तुम्हाला दहाव्या पानावर कुणीतरी अमेरिकेत असा डेटा घेतात का असा प्रश्न विचारला आहे. त्या आधीपासून तुम्ही हे कायदेच कसे निरर्थक आहेत हे सांगत आहात. मूळ घटना सोडून तुम्ही भरकटल आहात आणि भरकटवत आहात. मूळ घटनेत धागाकर्त्याचे म्हणणे असे की कॅन्सलेशन चार्जेस मागायला नको होते. हे त्यांनी रजिस्टर मधे नोंद करण्याच्या आधी सांगायला हवे होते. एकदा रजिस्टर मधे नोंद झाली कि खाडाखोड चालत नाही. मालक, पोलीस त्याबद्दल विचारणा करू शकतात. सुशिक्षित म्हणून किमान एव्हढे माहीत असायला हवे. पैसे आधी कि वस्तू आधी असा नियम नाही. परस्पर विश्वासावर या गोष्टी चालतात. आधी पैसे मागितले तरी कुणी आक्षेप घेऊ शकतात.

इथून तुम्ही एक बायपास काढलेला आहे. आणि स्वतः चुकीचे असताना इतरांना उच्च लेखून प्रतिसाद देत आहात. चालू द्यात.

Pages