Submitted by ashokkabade67@g... on 24 October, 2018 - 12:03
भारतातील प्रत्येक पक्षातिल नेते मऺडळी पद सत्ता आणि पैसा या तीन गोष्टी वापरून आपल्याच मुला वापर कुटुंबातील सदस्यांना आमदार खासदारांची उमेदवारी मिळवून देऊन सत्ता आपल्याच घरात ठेवून घराणेशाहीचा इतिहास घडवत आहेत याला कोणताही पक्ष अपवाद नाही त्यामुळे प्रश्न पडतो की या देशात लोकशाही आहे काॽ आपली मते सांगा , चर्चा अपेक्षित आहे प्रतिसाद द्यावा, ऺऺऺ
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
या जगात लोकशाही कुठेच नाहीये.
या जगात लोकशाही कुठेच नाहीये.
कहने को तो ये शहर है लेकीन कानून यहा जंगल का चलता है, हर ताकदवर जानवर अपने से कमजोर जानवर को दबोच के जीता है.
हा डायलॉग जेवढ्या लवकर समजाल तेवढे चांगले
अशोक चक्रधर यान्ची देमोक्रसी
अशोक चक्रधर यान्ची देमोक्रसी क्या होती है ही कविता वाचा.
भारतातल्या प्रत्येक १८+
भारतातल्या प्रत्येक १८+ नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात मतदान प्रक्रिया (मतदारान्च्या याद्या, प्रचार यन्त्रणा, प्रत्यक्ष मतदान, मोजणी...) राबवणे आणि मतपेटी द्वारे सरकार निवडण्याची बहुमोल सन्धी जनतेला मिळते. देशाच्या स्वातन्त्रा नन्तर आता पर्यन्त ६८ वर्षात १६ वेळा (लोकसभेच्या) निवडणूका पार पडल्या आहेत. देशाचा फाफटपसारा आणि निवडणूक प्रक्रियेच्या कामाचा विस्तार बघता प्रत्येक निवडणुक माझ्यासाठी एक आश्चर्य आहे. जर प्रक्रियेमधे काही त्रुटी असतील, आणि आहेतही तर त्या दुर करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. उमेदवारान्चा, त्याच्या पक्षाचा अभ्यास करा, विचारपुर्वक मतदानाच्या हक्काचा पूर्ण वापर करा.
भारतात लोकशाही आहे याचा मला मोठा अभिमान आहे.
हे तुम्ही लिहिले लेखात ते
हे तुम्ही लिहिले लेखात ते होते ह्याचे कारण लोकशाहीच आहे. जैसी प्रजा वैसा राजा ही लोकशाहीची साधी व्याख्या. युटोपिया हवा असला तर क्था कादंबर्यात शोधा.
ज्या देशात जनता मतांचे पैसे
ज्या देशात जनता मतांचे पैसे घ्यायला कचरत तर नाहीच वर ते घेऊन मतदान दिवस ही हक्काची सुट्टी मानून त्या दिवशी फिरायला जाते त्या जनतेने हे असले प्रश्न आधी स्वतःला विचारावेत. उत्तरे तुमच्या आत दडलीत, ती आत शोधा.
ज्या देशात जनता मतांचे पैसे
ज्या देशात जनता मतांचे पैसे घ्यायला कचरत तर नाहीच वर ते घेऊन मतदान दिवस ही हक्काची सुट्टी मानून त्या दिवशी फिरायला जाते त्या जनतेने हे असले प्रश्न आधी स्वतःला विचारावेत.
>>>>>>>
सॉरी पण हे फार पॉलिटीकल कम डिप्लोमाटीक कम असंबद्ध उत्तर झाले.
काही टक्के जनता अशी असेलही, पण त्याचा लोकशाही असण्याशी नसण्याशी काय संबंध?
@ घराणेशाही... हे काही अंशी रक्तातही असते आणि त्याच वातावरणात लहानाचे मोठे झाल्याने ते रक्तातले गुण जोपासलेही जातात.
ज्से की कित्येक अभिनेत्यांची मुले अभिनेतेच होतात, धिरुभाईंसारख्या उद्योगपतींच्या घरीच मुकेश अंबानीसारखा उद्योगपती जन्माला येतो, तेव्हा कोणाला काही आश्चर्य वा वावगे वाटत नाही, पण नेत्याच्या पोटी नेता जन्माला आला तर उगाच का घराणेशाहीचा ओरडा करायचा..
लोकशाही वगैरे कुठल्याहि
लोकशाही वगैरे कुठल्याहि देशात नसते. सगळीकडे देशातले श्रीमंत लोक, राजकारणात हुषार असलेले लोक सत्ताधारी असतात. राजकारणात हुषार असलेले लोक जनतेला पटतील अश्या थापा मारतात नि निवडून येतात. श्रीमंत लोकांना त्यांच्या थापा खोट्या आहेत हे माहित असले तरी ते पण हुषार, निवडून येणार्या रा़जकारण्यांना पाठींबा देतात, म्हणजे त्यांची लफडी राजकारणी लोक सांभाळून घेतात.
शतकानुशतके फक्त नवीन लोक नि नवीन लफडी, पण राज्य करण्याची पद्धत तीच.
>>लोकशाही वगैरे कुठल्याहि
>>लोकशाही वगैरे कुठल्याहि देशात नसते.<<
बिंगो! डिमाक्रसी इज ओवररेटेड - असं फ्रँक अंडरवूड म्हणुन गेलेलाच आहे...
हि ग्राउंड रियॅलिटी, सो कॉल्ड लोकशाहित रहाणार्या लोकांना जितक्या लवकर समजेल्/उमजेल तेव्हढं चांगलं. अन्यथा, ते स्वतःला आलिप्त तरी करतात किंवा एखादा व्हायनर्स क्लब जॉइन करतात...
लोकशाही तर आहे. आपल्याला ज्या
लोकशाही तर आहे. आपल्याला ज्या पार्टीचा उमेदवार पाहिजे तो निवडुन देता येतो. जगातल्या अर्ध्या देशात लोकाना आपल्या निवडीचा राज्यकर्ता निवडता येत नाही.
सिने क्षेत्रात मुलगा influence मुळे अभिनयात येतो पण जर मुलगा नीट अभिनय करत नसेल तर त्याचे चित्रपट पाहिले जात नाहीत. अभिषेक बच्चन ला वडलापेक्षा कमी चित्रपट मिळतात. पण तेच अभिनय चांगला असेल तर जास्त चित्रपट मिळतात जसे की राज कपुर.
उद्योग जगात पण तसेच आहे. जर मुलगा चांगला बिझनेस करत असेल तर रिलायन्स सारखी ग्रो होते नाहीतर र्पिमियर, मफतला सारखी डबघाईला येते. घराणेशाहीमुळे बिर्ला समुहाची वाढा टाटा समुहा एवढी झाली नाही.
गाडी , घर किंवा साधा साबण घेताना पण आपण कॉलीटी बघतो . लोकानी रिलायन्सचा फोन हा धिरुभाईच्या मुलानी लॉच केला म्हणुन नाही घेतला तर value for money आहे म्हणन घेतला.
राजकाराणाचे तसे नाही. भारतीय नेत्याचा मुलानाच मत देतात मग तो कुठल्याही पार्टीचा असो. मत देताना मात्र बहुतेक लोक हा अमक्याचा मुलगा किंवा ह्या पार्टीचा प्रमुख हा तमक्याचा मुलगा/मुलगी किंवा नातु आहे म्हणुन वर्षानुवर्ष मत देतात.
नेत्या पोटी नेता जन्माला येउ शकतो पण त्याने तसे प्रुव्ह केले पाहिजे. अमेरिकेत पण जॉर्ज बुश चा एक मुलगा परत राष्ट्रपती बनतो. दुसरा मुलगा राष्ट्रपती बनण्यासाठी पहिल्या १० जणात असतो पण तो जॉर्ज बुश म्हणुन न्हवे तर स्वताच्या जोरावर. भारतात तसे नाही नेत्याचा मुलगा युवा नेता म्हणुन जन्माला येतो.
धाग्यातला प्रश्न ज्या
धाग्यातला प्रश्न ज्या पद्धतीने दरडावून विचारला आहे त्यावरून नक्कीच लोकशाही आहे !
४.५ वर्षांपुर्वीपर्यंत देशात
४.५ वर्षांपुर्वीपर्यंत देशात लोकशाही होती म्हणे...!!
लोकशाहीचे यश राबवणाऱ्या
लोकशाहीचे यश राबवणाऱ्या यंत्रणा म्हणजे पोलीस न्यायालय आणि प्रशासकीय उच्च अधिकारी यांच्या नैतिकतेवर अवलंबून असते, कायदे कागदावर कितीही चांगले असले तरी निर्बल ,अल्पसंख्य ,ज्यांचे उपद्रवमूल्य कमी आहे असेलोक , यांना दुर्लक्षितच केले जाते असा अनुभव आहे.
लोकशाहीचा एक दोष असा आहे की आली बाबा आणि चाळीस चोर यापैकी चाळीस चोर यांचा प्रभाव निवडणुकीत कामात येतो आली बाबा किती खरा असला तरी तो अल्पमतातच असतो.
लोकशाही ही प्रशासनाची
लोकशाही ही प्रशासनाची सर्वोत्तम पद्धत नाही. पण उपलब्ध पर्यायात ती सगळ्यात चंगला पर्याय आहे....
<<<लोकशाहीचा एक दोष असा आहे
<<<लोकशाहीचा एक दोष असा आहे की आली बाबा आणि चाळीस चोर यापैकी चाळीस चोर यांचा प्रभाव निवडणुकीत कामात येतो आली बाबा किती खरा असला तरी तो अल्पमतातच असतो.>>>
अरारा! म्हणजे खरे लोक कमी नि चोर जास्त अशी अवस्था असेल तर लोकशाही काय नि इतर कुठली पद्धत काय, चोर नसाल तर तुमचे वाट्टोळे!
<<<लोकशाही ही प्रशासनाची सर्वोत्तम पद्धत नाही. पण उपलब्ध पर्यायात ती सगळ्यात चंगला पर्याय आहे....>>>
सहमत. आता चोर कमी नि खरे जास्त असे कधी होईल का कुठल्याहि देशात? कसे?
<<आता चोर कमी नि खरे जास्त
<<आता चोर कमी नि खरे जास्त असे कधी होईल का कुठल्याहि देशात? कसे?>>
भारतापुरते बोलायचे तर कदाचित सगळ्या चोरांना, त्यांनी (चोर्या करण्या आधी) परदेशात पाठवून दिले तर जमेल.
आपल्या पक्षाच सरकार असल तर
आपल्या पक्षाच सरकार असल तर लोकशाही असते. नाहितर ती धोक्यात येते.
आपल्या पक्षाच सरकार असल तर
आपल्या पक्षाच सरकार असल तर लोकशाही असते. नाहितर ती धोक्यात येते.>>
सत्य वचन