एव्हाना आम्ही रॉकी माउंटन नॅशनल पार्क पर्यंत पोहोचलो होतो. रात्र असल्यामुळे काहीच दिसत न्हवते. डेनवर प्रसिद्ध आहे त्याच्या तापमानातील फरकासाठी. हा आम्ही या आधीही डिसेंबर मध्ये अनुभवलं होतं. हि आमची एका वर्षातली दुसरी भेट होती डेनवरला.त्या ट्रिप मध्ये आम्ही डेनवर ला जरी असलो तरी आम्ही डेनवर मध्ये न राहता मोआब, उटाह येथे आर्चेस नॅशनल पार्क आणि कॅयॉन्सलँड नॅशनल पार्क ला भेट दिली होती. त्याचा सविस्तर वृत्तांत परत कधी तरी. तर, त्या ट्रिप नंतर बरेच दिवस प्रवास झाला न्हवता. कुठे जायचे ठरवत असतानाच कॅलिफोर्निया च्या मित्राचा फोन आला आणि परत डेनवर कोलोरॅडो निश्चित झाल. पण या वेळी फोकस हा RMNP आणो कोलोरॅडो स्प्रिंग्स होते. हवामान खराब असल्यामुळे मुळातच न्यू यॉर्क वरून उशीर झाल होता. त्यातून पायलट ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे उड्डाण पुढे ढकलण्यात आले. असे सर्व सोपस्कार पार पाडून तब्बल ४ तास उशिरा डेनवर येथे आगमन झाले.
दुसऱ्या दिवशी फक्त रॉकी माउंटन नॅशनल पार्क (RNMP) करायचे ठरवले होते. ट्रिप्स चे कुठलेही प्लॅनिंग केले न्हवते. मुळात हि ट्रिप "गो ओन द फ्लो " होती. याची मज्जा काय असते आणि हे कित्ती स्ट्रेसफ्री असतं हे आम्ही गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये येल्लोस्टोन येथे अनुभवलं होतो.
सकाळी एकत्र ब्रेकफास्ट ला भेटायचे आणि ठरवायचे कि काय करायचे ते.
कोलोरॅडो प्लॅटू हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्यासाठी. जे मी सह्याद्रीत हरवलं ते कदाचित मी इथे शोधण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटतं. अजून बराच काही राहून गेलाय बघण्या सारखं. बरीच मोठी लिस्ट आहे.
तर, या अशा अचानक ठरलेल्या आणि बऱ्यापैकी यशस्वी झालेल्या ट्रिप्स ची प्रकाशचित्रे इथे देत आहे.
या ट्रिप वर नाही नाही म्हणता बरेच फिरलो.
हा माझा पहिला प्रयत्न आहे काही मराठीत लिहण्याचा, काही चुका झाल्या असतील तर कृपया निदर्शनास आणून द्यावे.
पाऊस असो कि ऊन RMNP तुम्हाला खिळवून ठेवतं
शेवटच्या आईस एज नंतर जेव्हा glacier मागे सरकले तेव्हा ह्या Valley तयार झाल्या. एका फोटो मध्ये हे सगळं सामावणं फार कठीण आहे. हा वरील फोटो पाहून इमॅजिन करता येईल glacier कसे होते ते.
दुसरा दिवसही वातावरण ढगाळ होते. पण जसे आम्ही नॅशनल पार्क च्या जवळ पोहचत गेलो तसं वातावरण क्लिअर होत गेलं. आम्ही आज पहिली भेट हि Beaver Lake ला देण्याचे ठरवले होते, पण पार्किंग लॉट भरल्यामुळे आम्हाला अलीकडे गाडी पार्क करून बस घेण्याचे ठरवले. Hike करणाऱ्यासाठी हा उत्तम पर्याय असून हि बस सेवा पार्क तर्फ़े चालवली जाते. बस चे ३ मार्ग असून एक तर जवळच्या Estes Park मधून उपलब्ध आहे.
Beaver Lake
आम्ही Beaver Lake करून जमल्यास Nymph Lake पर्यन्त hike करायचे ठरवले.
पार्क च्या वेबसाइट वर हि माध्यम प्रकारातील hike असून २५० फूट उंची फार कमी अंतरात चढून जाता.
Nymp Lake
आम्ही या वेळी फेमस trail ridge road घेण्याचे ठरवले. पुन्हा Alpine सेंटर ला भेट देत पार दुसऱ्या बाजूला असणाऱ्या ग्रँड लेक एंट्रन्स पर्यन्त ड्राईव्ह केले. Trail Ridge Road हा तब्बल १२००० फूट उंचीवरून पास होतो.
आज चांगलेच ऊन पडले होते. पार्क मध्ये आल्यापासून आम्हाला Mule Deer सोडून काही दिसले न्हवते.
बराच वेळ आम्हाला आवाज येत होते पण काही दिसत न्हवते. बऱ्याच वेळा नंतर हे महाराज दिसले, मस्त ऊन खात पडले होते.
हा नॉर्थ अमेरिकन पिका असून साधारण अशा माऊंटन वर ट्री लाईन च्याही वर राहतो.
आज आमचा शेवटचा दिवस होता आणि उद्या आम्ही आमचे बस्तान कोलोरॅडो स्प्रिंग्स येथे मुव करणार होतो.
निघता निघता असा सुंदर GoodBye मिळाला.
मस्तच प्रचि..
मस्तच प्रचि..
पहिला लेक मुव्हिज मधे असतो का?
फारच मस्त फोटोज! मी स्वतः
फारच मस्त फोटोज! मी स्वतः तिकडे दोनदा जाऊन आल्यामुळे माझ्याही अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे रॉकी माउंटन नॅशनल पार्क! हे फोटो कधीचे आहेत? उन्हाळा चालू आहे असं वाटतंय
खुप छान... फोटो आवडले.
खुप छान... फोटो आवडले.
फोटो खूप आवडले.
फोटो खूप आवडले.
आम्हाला रॉकी माऊंटन इतका
आम्हाला रॉकी माऊंटन इतका सुंदर का दिसत नसावा बरं? घरकी मुर्गी डाल बराबर म्हणतात ते असं..
डेंव्हर वरून नीट नाही दिसत हो
डेंव्हर वरून नीट नाही दिसत हो ☺️
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना प्रतिसादाबद्दल.
@दैत्य - आम्ही ऑगस्ट मध्ये ही ट्रिप केली होती. उन्हाळा असला तरी बऱ्यापैकी थंडी होती.
@रीया - आम्हाला पण न्यू यॉर्क बद्दल असेच काहीतरी वाटत.
Khup chhaan pics and Marathi
Khup chhaan pics and Marathi likhan pa .
Denvar phirun aalya sarkhe watle. Khup mast.
Khup chhaan pics and Marathi
Khup chhaan pics and Marathi likhan pan.
Denvar phirun aalya sarkhe watle. Khup mast
Chhan photo aahet
Chhan photo aahet
मस्त पिक्स....
मस्त पिक्स....