रात्रीला पंख फुटले

Submitted by सिद्धेश्वर विला... on 15 October, 2018 - 03:26

रात्रीला पंख फुटले

अन ती गेली उडून

दिवस बिचारा काम करून

गेला थकून भागून

शोधू कुठं अन जाऊ तरी कसं ?

हि अर्धवट नोकरी सोडून

विचार करुनी वेडा झाला

मग्न गेला बुडून

वैनतेया सांगे विनवून

कामिनीस आण शोधून

खगराज चहू भ्रमण करुनि

आला निरोप घेऊन

गरोदर आहे यामिनी

सांगे तात बनलात आपण

गळून पार अर्धा झाला

जमीन गेली सरकून

कोण देईल सुट्टी मजला ?

कोण ठेवेल धरती झाकून ?

उडणारा बोजवारा आठवून

हात पाय गेले गळून

शिस्तीत नोकरी केली असती

तर नसते लागले माझे

नको तिकडे ध्यान दिले

आता उचला दोघांचेहि ओझे

सिद्धेश्वर विलास पाटणकर

Group content visibility: 
Use group defaults

बाप रे ! मोठे मोठे शब्द वापरलेत त्या पेक्षा जरा काव्य कल्पने कडे जास्त लक्ष दिलं असतंत तर ....

@ बोकलत

दोन्ही वाघच आहेत , आणि तेही खरेखूरे.. नक्की कुठला म्हणताय ?

@ टवाळ - एकमेव

अहो जरा शाळेतले समानार्थी शब्द आठवतायत का बघितले , त्याच काय आहे इथे आल्यापासून बघतोय लोक भारी भारी शब्द वापरतायत , म्हंटल आपण पण जरा वापरून बघावं ...