Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44
या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हेलेना बॉनहॅम कार्टर>> मला
हेलेना बॉनहॅम कार्टर>> मला आवडते ही खुप.. लिस्टित टाकून ठेवते.
तो स्मॉलफूट हा लहान मुलांचा
तो स्मॉलफूट हा लहान मुलांचा सिनेमा कसा आहे?जरा कॉमेडी वगैरे आहे का?
बघितला स्मॉल फूट .. मजेदार
बघितला स्मॉल फूट .. मजेदार आहे..
लहान मुलाना मजा येते
शादी में जरूर आना, खूप छान
शादी में जरूर आना, खूप छान आहे.वेगळी स्टोरी आहे.
अंधाधुन सॉलिड आहे. गोळीबंद
अंधाधुन सॉलिड आहे. गोळीबंद पटकथा. जबरी ट्विस्ट्स आणि तबूची ॲक्टींग. मजा आली.
अंधाधून टॉपक्लास आहे, फार
अंधाधून टॉपक्लास आहे, फार भारी. आयुष्यमान, तब्बू , छाया कदम बेस्ट.. मस्त कथानक .. नक्की बघा.
हे चित्रपट कुठे पाहिलेत ते पण
हे चित्रपट कुठे पाहिलेत ते पण लिहिलं तर बरं होईल . शोधायला सोप्पे पडेल.
लव्ह यात्री पाहिला कि नाही
लव्ह यात्री पाहिला कि नाही कुणी ?
काय करता वेळेचं ?
ट्रेलर बघा, तेवढे पुरेसे आहे.
ट्रेलर बघा, तेवढे पुरेसे आहे. पूर्ण पिक्चर बघितला नाही तरी चालेल
ट्युलिप हे सगळे सध्या थेटरात
ट्युलिप हे सगळे सध्या थेटरात आहेत.
मायबोलीवर 'अंधाधुन' चा सग्गळी
मायबोलीवर 'अंधाधुन' चा सग्गळी सग्गळी गोष्ट सांगणारा क्यूट रिव्ह्यू येण्याच्या आत बघून घ्या.
अंधादुन पहिला काल.... फारच
अंधाधुन पहिला काल.... फारच आवडला ...
कमाल आहे सिनेमा... आयुषमान,तब्बू ने काय रंगवलीत त्यांची कॅरॅक्टर... काही सीन सुरेख आहेत.... (सिन डिटेल्स खोडले....)
भन्नाट मूवी आहे.. परत पहायला आवडेल.... राधिका आपटे चा काय रोल च नाहीये फारसा...
मायबोलीवर 'अंधाधुन' चा सग्गळी
मायबोलीवर 'अंधाधुन' चा सग्गळी सग्गळी गोष्ट सांगणारा क्यूट रिव्ह्यू येण्याच्या आत बघून घ्या
>>>
विकीपीडियावर आली पण अक्खी गोष्ट...
@ नटुकाकी
>> धन्यवाद...
अँकी.... सिन डिटेल्स खोडले...
अँकी.... सिन डिटेल्स खोडले...
सगिना महातो कुणाला आठवतोय का
सगिना महातो कुणाला आठवतोय का ? कसा आहे ?
रच्यकने,
रच्यकने,
अंधाधुन एंडिंग अन बारीक डीटेल्स डिस्कस करायला एक वेगळा बीबी पाहिजे.
सगिना महातो म्हणाल तर तो
सगिना महातो म्हणाल तर तो बंगाली आहे. त्याच्या हिन्दी व्हर्शन चे नाव आहे ' सगिना' . ती साधी सरळ रोमॅन्टिक स्टोरी नाही. सगिना नावाच्या कामगाराने दिलेला लढा आहे प्रेमाच्या मसाल्यासह. दिलीप कुमारच्या फॅन्स साठी. सचिन देव बर्मन चे उत्तम संगीत. चांगला आहे.
मंटो पाहिला. आवडला.
मंटो पाहिला. आवडला.
सिनेमा म्हणजे त्याची जीवनगाथा नाहीये; फाळणीच्या आगचीमागची मिळून ४-६ वर्षांची स्टोरी आहे. कथेत त्याच्या ५ कथा गोवल्या आहेत. तो प्रकार/प्रयोग मला फार आवडला.
मंटोवरच्या सिनेमाच्या माध्यमातून तेव्हाच्या खळबळजनक/टिअर-जर्किंग घटना दाखवण्याचा अजिबात उद्देश नाहीये. जे, जसं घडलं तसं दाखवलंय. ठामठोक बॉलीवूडी ट्रीटमेंटही टाळली आहे. सिनेमा संथ आहे; पण कंटाळवाणा अजिबात झाला नाही.
नवाजुद्दीन सिद्दिकी एक नंबर! वरवरच्या धार्मिक प्रतिकांबद्दलची त्याची चीड, भवतालच्या परिस्थितीमुळे अंतर्बाह्य हलून जाणे, मनातली चरफड फार सुंदर दाखवली आहे. ओव्हरअॅक्टिंगला भरपूर वाव असताना त्याचा मोह पूर्णपणे टाळला आहे.
तेव्हाचे फिल्म-इंडस्ट्रीचे संदर्भ मस्त. मंटो तेव्हाच्या फिल्म इंडस्ट्रीतला आतला माणूस होता, हे मला माहिती नव्हतं. त्याची आणि श्यामची मैत्री, श्यामच्या त्या एका उद्गारानं त्याचं हादरून जाणं, मुंबईवरचं त्याचं प्रेम... सगळंच फार सुंदर घेतलंय.
मंटो त्याच्या लेखनामुळे तेव्हा एक सेलेब्रिटी असेल असा माझा (गैर)समज होता; तो दूर झाला.
सिनेमा पाहिल्यावर `ठंडा गोश्त' कथा इंटरनेटवर शोधून वाचली. श्लील-अश्लीलतेच्या तेव्हाच्या कल्पनांमध्ये आजही फारसा फरक पडलेला नाही, हे लक्षात आलं. (`अश्लील'साठीचा उर्दू शब्द कोणता ते सिनेमात परत-परत कानावर पडूनही मला नीटसं समजलं नाही.)
बाबा कामदेव धन्यवाद. बघतो आता
बाबा कामदेव धन्यवाद. बघतो आता.
१. अंधाधुन या वर्षातला
१. अंधाधुन या वर्षातला सगळ्यात भारी सिनेमा आहे, आज तुम्हाला वेळ नसला तरी या सिनेमासाठी वेळ काढा, लवकरात लवकर हा सिनेमा बघा.
२. या सिनेमा बद्दल काही वाचू किंवा बघू नका, रिव्ह्यूज तर अजिबात वाचू नका, थेट सिनेमा बघायला जा
३. लवकरात लवकर बघा, कारण मग कुठूनतरी स्पॉयलर्स कानावर येतील, मग सिनेमा बघताना मजा कमी होईल
यस चैतन्य. चांगल्या
यस चैतन्य. चांगल्या प्रतिक्रिया ऐकल्या आहेत.
स्पॉयलर्स फक्त प्रभात रोड हून डेक्कन ला जाण्याबद्दल ऐकले आहेत
बिगूल ( मुकेश माचकर) वर
बिगूल ( मुकेश माचकर) वर पुणेरी रिव्ह्यू आलेला आहे अंधाधून चा.
आम्हाला कधी पहायला मिळणार काय
आम्हाला कधी पहायला मिळणार काय माहिती
अंधाधुन पाहिला. आणि एक तासभर
अंधाधुन पाहिला. आणि एक तासभर ’आईशप्पथ’ इतकंच म्हणत होते!!
फारच भारी सिनेमा. मध्यंतरानंतर जरा भरकटला आहे, पण गोष्ट आणखी कुठल्याच मार्गाने पुढे जाऊ शकली नसती. नंतर परत येतो लायनीवर. चित्रपट सुरू झाल्यानंतर एकही हालचाल, एकही शब्द चुकवू नका. एकूणात लय भारी. खूप दिवसांनी इतका भारी थ्रिलर पाहिला. इट्स अ मस्ट वॉच. तब्बू आयुषमानपेक्षाही जास्त आवडली. हा रोल तिच्याकरताच लिहिला आहे जणू. श्रीराम राघवनच्या निमित्ताने का होईना, पण तिचं पोटेन्शिअल आता कळलं मूव्हीमेकर्सना! देर आए एकदम दुरुस्त आए!
दोन तीन आठवड्यांनंतर डिटेलमध्ये बोलू. काही लूपहोल्स आहेतच, कोणीतरी नक्की बाफ काढा रे.
पण चालतंय. खूप दिवसांनी पुणंही आवडलं बघायला सिनेमात.
प्रभात रोडवरून डेक्कन नाही, चक्क शनिपारला पोचलाय बाय द वे!
हां, पुण्यावरून आठवलं, टीव्हीवर ’गुलाबजाम’ पाहिला. आवडला. कथेची हाताळणी आवडली. पण थेटरवर का नाही पाहिला बरं असं काही वाटलं नाही. शेवट खूप ताणलाय. पण मिस झाला असेल तर एकदा पहायला हरकत नाही.
सिनेमातले रिक्षावाले नम्र
सिनेमातले रिक्षावाले नम्र दाखवल्याने पुण्याची बदनामी झाली अशा तक्रारी वाचनात आल्या आहेत.
तुंबाड पाह्यला काल.
तुंबाड पाह्यला काल.
हॉरर या प्रकारातला आणि तरीही अतिशय टाइट पटकथा असलेला भारतीय सिनेमा.
राही स्वतः अॅनिमेटर आहे मुळातला त्यामुळे व्हिज्युअलवरची त्याची पकड एकदम मस्त आहे. ते लक्षात येत राहते.
८-९ वर्षांपूर्वी तुंबाडचा स्टोरीबोर्ड वाचला होता त्यामुळे सस्पेन्स माहिती होताच तरीही हॉरर एंजॉय करायला काही प्रॉब्लेम आला नाही.
वेगळा अनुभव म्हणून बघा.
टिव्ही, लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाइलवर बघायचा सिनेमा नाही हा.
खूप भीती वाटते का ग? मला ती
खूप भीती वाटते का ग? मला ती हॉरर मधली भीती अजिबात सहन होत नाही. सस्पेन्स मधला सस्पेंस किंवा भीती मी सहन करू शकते.
खूप भिती हे ज्याच्या
खूप भिती हे ज्याच्या त्याच्यावर आहे ना.
पण सहन न होणारी भिती, किंवा किळस असं काही नाहीये.
अंधाधुन पाहिला काल.
अंधाधुन पाहिला काल.
आणि तोंडभर हसु 
)
ज ब र द स्त!!
काही जागा तर टाळ्या घेणार्या आहेत.
आयुषमानच्या एकदम शेवटच्या सीनला तर अगदी आयशप्पथ, आयच्या गावात वैगेरे येते आपसुकच तोंडातुन
संवाद, अभिनय, पर्फेक्ट मिळुन आलेली कथा. एकुणात परफेक्ट जमलेला पिच्चर.
कहानी नंतर बर्याच काळाने असा पिच्चर बघितला.
तब्बु ने कमाल केलीये.
आणि आयुषमान तर जस्ट परफेक्ट. मी तर त्याच्या प्रेमात आधीपासुनच होते. आता जास्तच बुडाले :डोळ्यात बदाम:
आता काही जमलेले सीन, संवाद, क्ल्यु आणि खटकलेले सीन, लूफोल्स बद्दल धागा काढा कोणी तरी.
(थेटरातुन उतरल्यावर वैगेरे काढा. योग्य/ जरुरीच्या जागी स्पॉइलर घाला. नैतर लोक शिव्या घालतील. धागा काढणार्याला आणि मलाही
मी पूर्वी सिनेमा न पाहता
मी पूर्वी सिनेमा न पाहता रिव्ह्यू लिहीलेले आहेत. त्यामुळे आता धागा काढला तर स्पॉयलर अॅलर्टची गरज नाही पडणार.
Pages