Submitted by सिद्धेश्वर विला... on 2 October, 2018 - 08:41
निष्ठुर कली मन अन कीर्तन मायेचे
संसार निर्धार आधार बीजाचे II
बीज बोयी मानव , वात्सल्य केवळ त्या चौकटीत
घृणा वाढे ती सदैव, करी मंथन विद्येचे II
कल्लोळ माजे दुःख होता जीवाला
हर्षात जवळी तो मद्याचा प्याला II
कसा आलो जन्मी , ते अज्ञात सारे
प्रबळ झालो , त्याचे श्रेय लुटे रे II
जननि भासे पापी , जिने जन्म दिधला
तू बीज बोताक्षणी तिला विसरला II
कुठे फेडीशी हे पांग, सांग तू रे वैष्णवा
अनाथ होशी निर्गमनि नरकातसुद्धा II
{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ओह तेरी इधर भी कली आया
ओह तेरी इधर भी कली आया
कलियुगवर आज एक कविता केलेली पण इकडे धागा काढायचा मुहूर्त नाही मिळाला,
आभारि आहे...
आभारि आहे...