मायबोली गणेशोत्सव २०१८ - श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 14:50

aaras_1.gif
अथर्वशीर्ष हा उपनिषदाचा एक भाग असून ते दहा ऋचांमध्ये विभागलेले आहे. सर्व स्तुती स्तोत्रांची असते तशीच अथर्वशीर्षातील ऋचा विशिष्ट हेतूने रचलेली आहे. सुरवातीच्या ऋचांमध्ये गणेशाच्या अधिदैविक रुपाचे वर्णन आढळते. वक्त्याचे, श्रोत्याचे तसेच दाता, धाता, आचार्य, शिष्य इत्यादींचे रक्षण करण्यासाठी काही ऋचा आहेत. तसेच शेवटी गणपतींच्या ‘व्रातपति, गणपति, प्रमथपति, लम्बोदर, एकदन्त, विघ्ननाशक, शिवतनय तथा वरदमूर्ति’ या आठ नावांना नमस्कार करुन अथर्वशीर्षाची फलश्रुती सांगीतली आहे.

अथर्वशीर्षाचा अर्थ समजला तर उत्तम पण नाही समजला तरी त्यातील दहा ऋचा ऐकताना मनाला अतीव आनंद होतो हे नक्की. या अथर्वशीर्षाचे गोड आवाजात गायन केलय स्वाती आंबोळे यांनी.
गणपती बाप्पा मोरया!

Group content visibility: 
Use group defaults

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अज्ञान माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव खेतवाडी गिर्गाव भागाचे फोटो असलेला धागा सापडत नाहीये. लिंक देईल का कुणी प्लीज.

आदिपूज्यं गणाध्यक्षं उमापुत्रं विनायकम् | मंगलं परमं रुपं श्री गणेशं नमाम्यहम् ||

श्री गणेशाय नमः |
नारद उवाच |

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् |
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ||

प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम् |
तृतीयं कृष्णपिंङगाक्षं गजवक्रं चतुर्थकम् ||

लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च |
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ||

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् |
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ||

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः |
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ||

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् |
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ||

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् |
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ||

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् |
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ||

इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं महागणपतिस्तोत्रं संपूर्णम् ||

गणपती बाप्पा मोरया | पुढच्या वर्षी लवकर या ||

अनेकदा धागा पहिला गेला पण प्रतिसाद देता आला नाही.

गणपती आरास खूप सुरेख.

अथर्वशीर्ष खूप सुंदर गायलंय. डालो करायची सुविधा दिल्याबद्दल धन्यवाद.

गणपती बाप्पा मोरया!!!

Pages