रंगीबेरंगी पौष्टिक सलाड - चटपटीत साउथवेस्टर्न सॅलड - मैत्रेयी

Submitted by maitreyee on 18 September, 2018 - 22:46

चटपटीत साउथवेस्टर्न सॅलड

आमच्याकडे सॅलड खायची फ्याशन अज्जिबात नव्हती खरं तर. सॅलड म्हणजे काहीतरी बेचव, गारढोण प्रकार औषध घेतल्यासारखा खाणे ही अ‍ॅटिट्यूड! पण माझ्या आता टीनेजर असलेल्या लेकीने काही वर्षांपासून सॅलड्स आवडीने खायला सुरुवात केल्यावर मी रेसिप्या शोधून प्रयोग करायला सुरुवात केली. मग कुठे लक्षात आले की सॅलड्स पण मस्त चविष्ट करता येतात की! आता जो प्रकार लिहितेय तो मुलीच्या खास आवडीचा. एरवी सॅलडची रेसिपी वगैरे काय लिहायचीय असे वाटले असते पण गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुद्दाम फोटो काढून लिहिली गेली.
या सॅलडला लागणारे ड्रेसिंग पण मी घरीच बनवते.

ड्रेसिंग साठी -
साहित्यः
ऑलिव ऑइल १/४ कप, १ लिंबाचा रस, कोथिंबीर, १ लहान मिर्ची ( किंवा हलापिनो चा लहान तुकडा), लसणाच्या १-२ पाकळ्या, ५-६ मिरी दाणे, १ चमचा मध, एक जरा मोठा चमचा सावर क्रीम किंवा योगर्ट किंवा ग्रीक योगर्ट, चवीपुरते मीठ.
18f82607-54af-4ed2-892a-63bc6a024e14_0.jpg50493c90-5ca2-4b11-a365-c34a1fc0e1ce_0.jpg
कृती :
मिर्ची, कोथिंबीर, लसूण, मिरी हे वाटून घ्या. ही चटणी आणि बाकीचे साहित्य एकत्र करून भरपूर हलवून एकसारखे करा.सुंदर क्रीमी टेक्स्चर चे ड्रेसिंग तयार होईल. लसूण , मिरची आणि कोथिंबीरीमुळे आपल्या देशी जिभेला ही चव एकदम आवडते.
9b8da449-5b5a-4d52-b8cd-453d00d1b682.jpgमुख्य सॅलड:
साहित्य:
रोमेन लेट्युस ची पाने, अवोकाडो, ग्रेप टोमॅटो, रंगीत मिर्च्या, मक्याचे दाणे उकडलेले किंवा भाजलेले, अर्धा कच्चा आंबा (किंवा पाइनॅपल वगैरे कोणतेही ट्रॉपिकल फळ चालेल), बदामाच्या चकत्या.
d7e547a0-2b17-4d3e-857c-3b0fc488721b.jpg
कृती:
भाज्या, फळे आवडीप्रमाणे चिरुन एकत्र करा.
923ba097-ff27-4e82-9a99-b302a6ecf65b_0.jpg
वरून उकडलेले किंवा भाजलेले मक्याचे दाणे, तयार केलेले ड्रेसिंग आणि शेवटी बदामाचे काप घाला. सर्व हलक्या हाताने एकत्र करा. हे सॅलड पौष्टिक आहे हे वेगळे सांगायला नको, अनेक रंगांमुळे आणि टेक्स्चर्स मुळे दिसायलाही सुंदर दिसते. साउथवेस्टर्न असं नाव दिलं कारण अवोकाडो, रंगीत मिरच्या, कॉर्न वगैरे असल्यामुळे. हवं तर मेक्सिकन म्हणा! Happy
या ड्रेसिंग ची चटपटीत चव, अवोकाडोची क्रीमी चव, टोमॅटो आणि फळांच्या तुकड्यांचा आंबटगोडपणा यामुळे हे सॅलड चवीला अतिशय चटपटीत आणि स्वादिष्ट लागते! बघा करून!!
सर्व नीट टॉस केल्यावरचा फोटो:
7d38c278-99f3-409b-8917-3b2678b74fc5.jpg
एरवी मी त्यावर टोर्टिया चिप्स चे तुकडेही घालते कुरकुरीतपणासाठी, पण इथे नियमात बसणार नाही म्हणून घातलेले नाहीत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान पाकृ.
रंगीत सॅलड मस्त दिसतंय.

छान रेसीपी व फोटो . बक्षिस पात्र. पनीरचे तुकडे व पास्ता उकडून पण घालता येइल . मुख्य म्हणजे तयारी करून ठेवली तर रात्री घरी आल्यावर लगेच करून खाता येइल बरोबर दोन गार्लिक ब्रेड तुकडे असले की झाले. ड्रेसिन्ग खूपच वर्सेटाइल आहे. यम्मी.

मस्त रेसीपी.

चांगले योगर्ट घरच्या घरी कसे बनवायचे याच्या टिप्स कोणीतरी लिहा प्लिज. योगर्ट्च्या ऐवजी घट्ट सायीचे दही वापरुन हीच रेसीपी करुन बघायला पाहिजे.

आमच्याकडे सगळ्यांना सलाड मनापासून आवडते.

हे नक्की करून बघणार. ड्रेसिंग खूप इंटरेस्टिंग वाटतेय. आवाकाडो कधी खाल्ला नाहीये. हल्ली भाजीवाल्याकडे 50 ला एक छोटा आवाकाडो मिळतो. आणून बघेन.

मस्त रेसिपी.
सॅलड आमच्या ही कडे आवडत सगळ्यांना.
हे नक्कीच करणार. इथे आवाकडो चांगलं मिळत नाही ते वगळून करीन किंवा त्याच्या ऐवजी काय घालता येईल ?

छान आहे रेसिपी
रोमेन लेट्युस ची पाने, अवोकाडो, ग्रेप टोमॅटो, >>>> याला पर्याय म्हणून कुठल्या भारतीय भाज्या/ फळे वापरता येतील?

धन्यवाद सगळ्यांना! हे ड्रेसिंग खूप वर्सटाइल आहे, त्यामुळे व्हेरिएशन्स अवश्य करून पहा. भाज्या ज्या लोकली मिळतील त्या वापरायला हरकत नसावी, अवोकाडो नसेल तर काकडी वापरून पहा, लेट्युस, मका, टोमॅटो लहान तुकडे करून, रंगीत मिरच्या इ. मिळतीलच तिकडे, एखादे फळही हवेच मात्र. ते शक्यतो करकरीत असलेले छान, सफरचंद चालेल, कदाचित द्राक्षही. लोक स्टृऑबेरी घालतात पण त्यांना स्वतःची वेगळी चव आणि वास असतो ते ओवरपावर करू शकेल कदाचित इतर गोष्टींना.
शाली- क्रंच साठी यात तसा तुटवडा नाही, आंबा इथे मिळतो तो पिवळी कैरी असते जी मस्त करकरीत पण तरी आंबटगोड असते, शिवाय रंगीत मिरच्या, बदाम आहेतच. तरी पण मी वर लिहिल्याप्रमाणे टॉर्टिया चिप्स बेस्ट लागतात या काँबिनेशन मधे अ‍ॅडिशनल कुरकुरीतपणाला. तुम्ही लोकांनी परवानगी दिली नाही ना नियमात Wink नाहीतर होत्या माझ्याकडे काल चिप्स Happy

भाहारीही!! Happy

भारतात टॉर्टिया चिप्सना पर्याय म्हणून भाजलेला पोह्याचा पापड घालता येईल. किंवा आवडीच्या फ्लेवरची शेव किंवा खारी बुंदीसुद्धा.
ड्रेसिंग भारी वाटतंय - कॉकुला करायला सांगेन करून घालेन आता आला की. Proud Happy

स्वाती Lol
मानव- हो, इथे मुद्दाम लिहिले नाही रेसिपीत पण मीही ( विशेषतः जर जेवणाला पर्याय म्हणून सॅलड असेल तर) यात चिपोटले मॅरिनेड केलेले ग्रिल्ड चिकन घालते. पर्फेक्ट सूट होते या फ्लेवर्स बरोबर.
अतरंगी - दही घट्ट नसेल तर स्वच्छ रुमालात किंवा पेपर टॉवेल मधे बांधून पाणी काढता येते चटकन.

सुरेख!
सगळ्या चीजा मिळवून करून पाहायला हवं हे Happy

रेसिपी आफ्टर रेसिपी! लब्बाड!! Proud

इथे आल्यावर सुरूवातीची अनेक वर्षं नाकं मुरडल्यावर आता सर्व प्रकारची सॅलड्स भयंकर आवडतात, २-३ मील्स बिना सॅलड्सची झाली की क्रेविंग होतं इतपत. त्यामुळे ड्रेसिन्ग आणि सॅलड दोन्ही नक्की करून बघेन. देसी ग्रूपसाठी करायला पण मस्त आहे प्रकार.

काही बदल केला नाही तर नाव खराब होइल म्हणून मी केल आणि/किंवा पालक पण घालेन.

केलं सलाड. आवाकाडो आणायला गेलो नाही. घरातल्या सामानाचा वापर केल. ड्रेसिंग सेम केलं. योगर्ट ऐवजी घट्ट दही वापरले.

स्वीट कॉर्न, काकडी, गाजर, रेड बेल पेपर, अननस, लेटयूस, टोमॅटो, भाजलेले बदाम भरडून, हिरवी भोपळी मिरची.... 4-5 चुकार बीट चे तुकडे.

सोबतीला हनी चिली ड्रमस्टिक आणि लेमन गार्लिक ड्रमस्टिक.

अल्पना - भारी फास्ट काम आहे!
पाय - अहो काही खास रेसिपी नाही. चिपोटले मॅरिनेड रेडीमेड मिळते. मी एक लॉरीज (Lawry's ) बाहा चिपोटले मॅरिनेड म्हणून वॉलमार्ट किंवा शॉपराइट कुठून तरी आणले होते ते वापरते. चिकन ब्रेस्ट्स ला ते लावून किमान १-२ तास मॅरिनेट करायचे आणि ग्रिल करायचे. मी तर चिकन आणले की ते धुवून भरपूर मॅरिनेट फासून झिपलॉक मधे घालूनच फ्रीज मधे ठेवते. म्हणजे पुढच्या २-३ दिवसात हवे तेव्हा ग्रिल करून कॅसेडिया, सँडविच किंवा सॅलड कशात तरी घालायला वापरता येते. माझ्याकडे गॅस टॉप ग्रिडल आहे त्यावर झटपट ग्रिल अगदी १० मिनिटात करता येते.

Pages

Back to top