आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)
खेळ शब्दांचा -४- मराठी चित्रपट व नाटक.
Submitted by संयोजक on 18 September, 2018 - 22:29
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हर्पेन, बरोबर!
हर्पेन, बरोबर!
हो खूप मराठी नट्या त्यांच्या
हो खूप मराठी नट्या त्यांच्या लहानपणी या नाटकांमधून काम करतात आणि मोठेपणी मुलाखतीमधून ते सांगतात त्यामुळे मग ती बालनाट्यं प्रसिद्ध पावतात.
खूप मराठी नट्या >> नट नाही
खूप मराठी नट्या >> नट नाही वाटतं. (की तुझं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं? )
दुर्गा झाली गौरी खूप प्रसिद्ध
दुर्गा झाली गौरी खूप प्रसिद्ध होते पूर्वी.
एका वैदर्भिय नाटककाराने
एका वैदर्भिय नाटककाराने लिहिलेलं नाटक जे एका प्रसिद्धीपराङ्मुख विदेशी अभिनेत्रीचे नावही आहे.
-- (दोन अक्षरी)
त्यातल्या काही नट्या त्याला
त्यातल्या काही नट्या त्याला नट्स वाटल्या असाव्यात.
नाही, नाव मीही ऐकलं आहे, पण
नाही, नाव मीही ऐकलं आहे, पण ते प्रसिद्ध वगैरे होतं हे माहिती नव्हतं, आणि ते नाव असं आठवणंही शक्य नव्हतं.
भा, मा (स्वल्पविराम लक्षात
भा, मा (स्वल्पविराम लक्षात घ्यावा) अवांतर पुरे
कृपया धन्यवाद
गार्बो.
गार्बो.
भा, बरोबर
भा, बरोबर
_ _ _ ची / _ _
_ _ _ ची / _ _
संगीतकार-गायिका नवराबायकोचे गाजलेले नाटक.
आंधळ्यांची शाळा
आंधळ्यांची शाळा
केशवराव आणि ज्योत्स्ना भोळे
बरोबर.
बरोबर.
ज्योस्त्ना भोळ्यांचे
ज्योस्त्ना भोळ्यांचे आंधळ्यांची शाळा का?
ओके जरा उशीर झाला पण आठवलं त्याचं समाधान आहे
ऍगथा क्रिस्टीच्या नाटकावर
ऍगथा क्रिस्टीच्या नाटकावर आधारित एक नाटक.
--/----/--
खरं सांगायचं तर ?
खरं सांगायचं तर ?
खरं सांगायचं तर
खरं सांगायचं तर
खरं सांगायचं तर हे काही मला
खरं सांगायचं तर हे काही मला ओळखता आले नसते
भा, बरोबर.
भा, बरोबर.
र _ _ _ _
र _ _ _ _
ह्याचे लेखक क्रांतिकारक होते.
नाट्क का चित्रपट?
नाट्क का चित्रपट?
नाटक.
नाटक.
रणदुंदुभी
रणदुंदुभी
राष्ट्रसंसार - भालजी पेंढारकर
राष्ट्रसंसार - भालजी पेंढारकर
नाटक
बाब्बो. मी चालले पाकृ वाचायला
बाब्बो. मी चालले पाकृ वाचायला.
रणदुंदुभी बरोबर.
रणदुंदुभी बरोबर. वीर वामनराव जोशी.
ओके!
ओके!
खूप गाजलेल्या ह्या पथनाट्याचे
खूप गाजलेल्या ह्या पथनाट्याचे त्याच नावानी चित्रपट रुपांतरही झाले होते
--- झा- - (३, २, १)
मला एकदम 'लागिरं झालं जी' आलं
मला एकदम 'लागिरं झालं जी' आलं डोक्यात! विचार करतो.
मुलगी झाली हो
मुलगी झाली हो
Pages