आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)
खेळ शब्दांचा -४- मराठी चित्रपट व नाटक.
Submitted by संयोजक on 18 September, 2018 - 22:29
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बनवाबनवी
बनवाबनवी
पुढचं कोड -- बा ---त
पुढचं कोड
-- बा ---त (नाटक आहे )
जाऊ बाई जोरात ??
जाऊ बाई जोरात ??
जाऊबाई जोरात.
जाऊबाई जोरात.
कृपया क्लूही द्यावा मग जास्त मज्जा येइल.
१९६० च्या सुमारास आलेल्या या नाटकाने संगीत रंगभूमीला पुन्हा चांगले दिवस आणले
क्लू : जितेंद्र अभिषेकी
सं _ _ म _ _ धा
संगीत मत्स्य गंधा
संगीत मत्स्यगंधा
या नावाचा चित्रपट व नाटक दोन्ही आहे
_ _ _ _ ट (५ अक्षरी)
थरथराट का? (तुक्का लावला आहे)
थरथराट का?
(तुक्का लावला आहे)
थरथराट नाही
थरथराट नाही
क्लू :- नाना पाटेकर
नटसम्राट
नटसम्राट
बरोबर
बरोबर
_क ह_ _ची _ट (तीन शब्द)
_क ह_ _ची _ट (तीन शब्द)
नवीन आहे पिक्चर पण अतिशय सुंदर रित्या सादर केलेला. क्लू: उषा नाईक.
दहा हजाराची नोट
दहा हजाराची नोट
ए_ _ता __ष_ (तीन शब्द)
पुलं आणि लक्ष्या एकत्र.
एक हजाराची नोट आहे ते फारएन्ड
एक हजाराची नोट आहे ते फारएन्ड
एक होता विदूषक
पुढचा क्लू
पुढचा क्लू
बालनाट्य
अ - - - - ल - - (चार अक्षरी दोन शब्द)
अलबत्या गलबत्या
अलबत्या गलबत्या
-त रे -त
क्लू - गोनीदांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट.
जैत रे जैत
जैत रे जैत
चकाचक सस्पेन्स चित्रपट
90 च्या दशकाच्या शेवटी शेवटी आलेला चकाचक सस्पेन्स चित्रपट
- न - -
बिनधास्त
बिनधास्त
एक धमाल विनोदी चित्रपट. इथे
एक धमाल विनोदी चित्रपट. इथे बरेचदा आठवण निघते.
_ _ _ व _ _ प _ ड
एक डाव धोबीपछाड
एक डाव धोबीपछाड
बरोबर
बरोबर
_ _ _ त
_ _ _ त
डॉ मुलगी आणि तुरुंगातून सुटका झालेले वडील यांच्या भावनिक संघर्षाची कहाणी दाखवणारा चित्रपट
क्लू हवाय का?
क्लू हवाय का?
सदाशिव अमरापूरकर
कदाचित
कदाचित
कदचित
कदचित
ह्या नावाचा चित्रपट आणि नाटक
ह्या नावाचा चित्रपट आणि नाटक दोन्ही. विनोदी.
_ _ त _ _ द _ _ त
श्रीमंत दामोदर पंत
श्रीमंत दामोदर पंत
विनोदी नाटक
क्लू :- एकाच अभिनेत्याने चार रोल साकारले आहेत
_ ही _ _ ही (५ अक्षरी)
सही रे सही
सही रे सही
पीळोत्तम. आया भगिनींना
पीळोत्तम. आया भगिनींना रडवणारा जबरी हिट चित्रपट. (पीळ वैगेरे व्यक्तीसापेक्ष आहे म्हणा.
)
_ _ र _ सा _
माहेरची साडी
माहेरची साडी
बरोबर
बरोबर
Pages