Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 03:35
आपण गाण्याच्या भेंड्या खेळतो तश्याच कवितेच्या भेंड्या "काव्य अंताक्षरी"
नियमावली:
१)कविता चारोळी असावी.
२)लिहताना आधीच्या कवितेतील शेवटची ओळ/शब्द घेऊन पुढील ओळी लिहाव्या.
३) शेवटचा शब्द/ओळ घेताना ती आहे तशीच घेतली जावी. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घेऊ नयेत.
४)दोन किंवा अधिक कविता एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच शब्द/ओळी पासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेली कविता ग्राह्य धरुन पुढील कविता लिहावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कहर केला इंधनदराने
कहर केला इंधनदराने
थरथर लागली रुपयाला
नोटा मजून दमलो तोवर
कर्जबुडवा भुर्र गेला
कहर फुलत्या ऋतूने मांडलेला
कहर फुलत्या ऋतूने मांडलेला
बहर भरगच्च दाटुन सांडलेला
झुळुक रेंगाळलेली गंधवेडी
पदी रंगीत नाजुक घट्ट बेडी
भरत
भरत![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गेला आधार अनेकांचा
गेला आधार अनेकांचा
गेली ती जगण्याची भावना
दुःख आप्त दुरावण्याचे
कोणासही साहे ना
ना तरी ठरलेच नव्हते जायचे आहे
ना तरी ठरलेच नव्हते जायचे आहे कुठे
चालली, सरली म्हणेतो वाट वाटेला फुटे
अंत नाही चालण्याला, खंत नाही मानली
थांबला तो संपला ही खूण केवळ पाळली
स्वाती सुंदर!
स्वाती सुंदर!
थांबला तो संपला ही खूण केवळ
थांबला तो संपला ही खूण केवळ पाळली
धावलो जागेवरी न फक्त कॅलरी जाळली
ऋतुजाच्या डाएटने काया माझी वाळली
आताआताश्या फक्त ५५ मिनिटे सांभाळली
दीक्षित काही पाठ सोडत नाहीत!
दीक्षित काही पाठ सोडत नाहीत!
फक्त पंचावन्न मिनिटे तेवढी
फक्त पंचावन्न मिनिटे तेवढी सांभाळली
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गोडधोडा पाहता दृष्टी किती का भाळली
आग्रहाला निग्रहाने ठाम दिधली उत्तरे
दीक्षितांची भाषणे गीता नि बाय्बल रे खरे!
खरे खरेसे सारे अता, भास वाटू
खरे खरेसे सारे अता, भास वाटू लागले
भास सारे होउनि खरे, त्रास वाटू लागले
कोवळे हे वय असे, सारे खास वाटू लागले
फसवी ही अंतरे, सारे आसपास वाटू लागले
लागले बोलायला डोळे जरासे, तोच
लागले बोलायला डोळे जरासे, तोच मी
घेतली ओढून सत्वर पापण्यांची ओढणी
जवळ येइल, खोल पाहिल वाकुनी, तेव्हा कुठे
लपवलेल्या सर्व गुपितांची उघडतिल संपुटे
Submitted by स्वाती_आंबोळे on
Submitted by स्वाती_आंबोळे on 14 September, 2018 - 19:39>>>. जमलंय
मागील पानावरील भरत. यांच्याही चांगल्यात .
संपुटे म्हणजे काय ?
शिंपल्यांची बंद जोडी पाहिली
शिंपल्यांची बंद जोडी पाहिली आहे का? त्याला संपुट/संपुष्ट म्हणता येईल. सरधोपट अर्थ बंद डबी.
इथे पहा.
संपुटांवरही अता पुटे चढाया
संपुटांवरही अता पुटे चढाया लागली
स्मरणे सारी तुझी विस्मराया लागली
एक होते झाड ज्यावर दोन पक्षी राह्यचे
मधुकुजने ती अताश्या दूर विराया लागली
दीक्षितांची भाषणे गीता नि
दीक्षितांची भाषणे गीता नि बाय्बल रे खरे! >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
काय विषय आहेत काव्यांचे एकेक, नोटाबंदी, पेट्रोल भाव, दीक्षित डाएट !!
मस्त.
मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आता मी 'लागली'वरून लिहिणार नाही! पर्यायी शब्द द्या.
संपुटे कधी न उघडली
संपुटे कधी न उघडली स्त्रीजन्माची
समतोल राखत माहेर सासरची
जीव गुंतवते चुल मातीची
ज्योत तळपते प्रसंगी झाशीची
लागली कुणाची 'उचकी'
लागली कुणाची 'उचकी'
उचकी घ्या उचकी..... पुढचा शब्द!
उचकी?
उचकी?
) डायेट काय, उचकी काय! ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
स्वरूप, तुम्ही डॉक्टर आहात का? (होपफुली पेशन्ट नसाल
३) शेवटचा शब्द/ओळ घेताना ती
३) शेवटचा शब्द/ओळ घेताना ती आहे तशीच घेतली जावी. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घेऊ नयेत.
<<
या नियमाने स्वरूप यांची कविता बाद आहे. "संपुटे" असेच यायला हवे.
कल्पेशकुमार यांची बरोबर आहे.
उचकी आली कारण नसता, जीव घाबरा
उचकी आली कारण नसता, जीव घाबरा झाला
ओठांपाशी पाण्याचा येऊन थबकला पेला
काय कुणी माझेसुद्धा या निर्मम जगात आहे?
आठव होऊन मनी कुणाच्या मीही रहात आहे?
आ.रा.रा., खरंच की! धन्यवाद.
आ.रा.रा., खरंच की! धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वाती
स्वाती![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
नाही नाही डॉक्टर नाही!
अधिक माहितीसाठी प्रोफाइल बघा
झाशीची ती ज्योत तळपली
झाशीची ती ज्योत तळपली
विश्वाला आदर्श घालावया
स्त्रीजन्म का फक्त बांधील
चूलमूल कूपमंडुक बनावया
डॉक्टर शब्द टायपल्याबरोबर आ
डॉक्टर शब्द टायपल्याबरोबर आ.रा.रा. अवतीर्ण झाले हा योगायोग की काय?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आठव होऊन मनी कुणाच्या मीही
आठव होऊन मनी कुणाच्या मीही रहात आहे?
सलज्जतेने मनीदर्पणी कुणी मजला पहात आहे?
किती सुखद ही जाणीव सजणा; तनमन हासत आहे
खरोखरी की भासच अवघा; स्वप्नच भासत आहे
अरे त्या बाद झाल्या चारोळ्या
अरे त्या बाद झाल्या चारोळ्या - आता 'बनावया'पासून लिहायला हवं.
बनावयाला सज्जच आहे
बनावया मी सज्जच आहे
बनवायाला ये बिन्धास्त
इन्टरनेट जोडणीपलिकडे
काही लागत नाही जास्त!
बनावया'ला' चालतय का? विचारुन
बनावया'ला' चालतय का? विचारुन घ्या..... नाहीतर ही पण बाद व्हायची![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आता?
आता?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages