मायबोली गणेशोत्सव २०१८ - काव्य अंताक्षरी

Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 03:35

आपण गाण्याच्या भेंड्या खेळतो तश्याच कवितेच्या भेंड्या "काव्य अंताक्षरी"
नियमावली:
१)कविता चारोळी असावी.
२)लिहताना आधीच्या कवितेतील शेवटची ओळ/शब्द घेऊन पुढील ओळी लिहाव्या.
३) शेवटचा शब्द/ओळ घेताना ती आहे तशीच घेतली जावी. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घेऊ नयेत.
४)दोन किंवा अधिक कविता एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच शब्द/ओळी पासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेली कविता ग्राह्य धरुन पुढील कविता लिहावी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काही लागत नाही जास्त
काही पडत नाही कमी
मी मागत नाही काही
परी तो भरभरुनि देतो!

धन्यवाद, मॅगी. Happy

तो भरभरुनी देतो, माझी झोळी फाटुन जाते
नेतो तेव्हा डोळींचे पाणीही आटुन जाते
क्रूर प्रतिस्पर्धी आहे तो, त्याला दया न माया
हसत टाकतो दाने घटकाभरी जीव रमवाया

रमवाया गेलो त्याला परि तो रमला नाही
मी धापा टाकीत बसलो परि तो दमला नाही
मी लाख जमविले त्याला, तो बिलकुल जमला नाही
तो सदैव सोबत माझ्या परि अजुनि गमला नाही

मॅगी धन्यवाद!
आम्हालाही मज्जा येतीय!

नाही कळले कधी उसवली वीण
डोळ्यांदेखत विरले वस्त्र नवीन
लाज कशी वंशाची झाकुन घेऊ
माहेराला कशी परतुनी जाऊ

('लागा चुनरी में दाग'सारखीच कल्पना आहे, यात माझं श्रेय फक्त शब्द जुळवण्यापुरतं. Happy )

जाऊ जाऊ म्हणता राहिली महिनाभर
रोजच्या कामात आता हिची भर
जाऊ बाईचा पाहुणचार केला शेरभर
कधी बाई कटकट जाईल ही रोजची मरमर

मरमर करुनही कष्टच यांच्या नशीबी आले
भूमिपुत्र कृषकांचे कंठ मृत्युफास ल्याले
कोपतो जिथे निसर्ग, जनवार्ता कशाला
विश्व करतो सोहळे, चिमटे यांच्याच पोटाला

पोटाला खळगी चार
अन्नदाता येथे लाचार
चक्रिने झाला बेजार
नियतिपुढे घेतो माघार

माघार घेऊन घेऊन
थकून कसे जात नाहीत
झेपणार नाही माहीत असताना
गप का बसत नाहीत?

गप का बसत नाहीत?
दोन्हीकडचे भाट!
उरलीसुरली कसर भरती
रिकामटेकडे माठ!

माठ म्हणे दगडाला
पुन्हा तो कावळा आणा
व्याकूळ असता तहानलेला
जो दाखवतो साइंटिस्टचा बाणा

बाणा मराठी
बाळगा उरात
हिंदी दिवस जरी
गाजतोय जोरात

जोरात वाहतो वादळवारा
सोबत येती पाऊस धारा
क्षणात करतो नतमस्तक
मी मी करणार्या मानवाला

मानवाला लागतं काय
रोटी कपडा नी मकान
उगा भावनांचा कल्लोळ माजवलाय
बंद करा ते दुकान

दुकान नवे, पडदे नवे, पडद्यामागे ती उभी
चंद्रावर साठलेल्या धुळीची, एक सुंदर नक्षी
भेटावयास जावे, हृदयास लागती कळा
हा असा पाऊस जो, देई जीवाला झळा

झळा या जाळती जीवाला
वैशाख वणव्याच्या
आस लागली मनाला
कधी बरसती धारा वळवाच्या...

वळवाच्या शीडकाव्याला चातक भुलला
तुषार्त जीव का रे ऐसा ओशाळला
ऋत नियमाने कधी न चालला
निसर्गद्रोही मानव उलथवे पावसाळा

पावसाळा आठवणींचा
भरभरून बहरत यावा
मनविहंग माझा त्यात
मनसोक्त धुंद भिजावा

मनसोक्त धुंद भिजावा
असा झराच कोठे नाही
देवा कशाला अशी तू
मानवा तहान दिलीस?

दिलीस आसक्ती जीवनाची तू
त्यापायी चालले मी
तुझ्यापासुनी दूरदूरही
प्रश्न हा पोहोचेन कशी निजधामी?

निजधामी जाताना, तुझी वाट बघतोय
मागे पडणाऱ्या फुलांच्या सड्यात, तुलाच शोधतोय
पेटला हा अग्नी, घेईन कवेत मला
हृदयातला अग्नी विझला, मिळाला थंडावा जीवाला

जीवाला जीव लावता
एक उरला एक निमाला
कसला डाव नियतीने मांडला
खेळता संसार अर्ध्यावर सांडला

माझी काहिच्या काही चारोळी...

सांडला मारता मारता
सांडने बोकड्याच मारला
म्हणे आता खुशाल पांढरा तांबडा वरपा
हंगामा है क्यू बरपा

Iron man हाहाहा भारीय
तरी ही बघा कशी वाटते
~~
सांडला दाणा टीपत गेली
तिही मग अजून सांडत गेली
पाखरे जशी मोठी झाली
घरट्यात नव्या पांगत गेली

Pages