Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 03:35
आपण गाण्याच्या भेंड्या खेळतो तश्याच कवितेच्या भेंड्या "काव्य अंताक्षरी"
नियमावली:
१)कविता चारोळी असावी.
२)लिहताना आधीच्या कवितेतील शेवटची ओळ/शब्द घेऊन पुढील ओळी लिहाव्या.
३) शेवटचा शब्द/ओळ घेताना ती आहे तशीच घेतली जावी. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घेऊ नयेत.
४)दोन किंवा अधिक कविता एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच शब्द/ओळी पासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेली कविता ग्राह्य धरुन पुढील कविता लिहावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुरुवात कोणत्याही आवडीच्या
सुरुवात कोणत्याही आवडीच्या शब्दावरून केली तर चालेल का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चालत असेल तर माझी चारोळी
शब्दाविना शब्द सारे
मुके होऊनि गेले
निःशब्द भावनांना या
अर्थ देऊनि गेले
द्वा, तुम्ही सुरवात करत आहात
द्वा, तुम्ही सुरवात करत आहात तर तुमची चारोळी टाकून करा. शुभस्य शिघ्रम्!
अर्थाविन जगण्याला अर्थ नसे हो
'अर्था'विन जगण्याला अर्थ नसे हो
असे कोण म्हणे त्या समज नसे हो
हे नाही चालणार ना?
गेले गेले म्हणताना
गेले गेले म्हणताना
आले फिरून सामोरे
माझे माझे ठरलेले
आसू म्हणू की सोयरे
अर्थ देवूनि गेले
दुहिचा अर्थ देवूनि गेले
व्यापारी देश विकुन गेले
सेनानी व्यर्थ खंगून गेले
तुरंग सारे रक्तात भिजुन गेले
मला वाटतंय असं कंटीन्यु
मला वाटतंय असं कंटीन्यु करायचंय ->
अर्थ देऊनि गेले >> ही चारोळीची शेवटची ओळ तर पुढची-
अर्थ देऊनि गेले
जगण्याला, दर्शन तुझे
चरणी लीन होऊन तुझ्या
जीवन सफल झाले माझे
किंवा शेवटचा शब्द 'गेले'
गेले विसरुनि मी
अस्तित्व हे माझे
लाभले जेव्हा मला
चरणकमल तुझे
(दोन्ही चारोळ्या गणरायाच्या चरणी समर्पित!
)
{लिहताना आधीच्या कवितेतील
{लिहताना आधीच्या कवितेतील शेवटची ओळ/शब्द घेऊन पुढील ओळी लिहाव्या.}
शेवटचा शब्द / शेवटची ओळ कुठेही आले तरी चालेल की त्यावरूनच सुरुवात करायला हवी?
नियम क्र ३ व ४ बघा.
नियम क्र ३ व ४ बघा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटच्या शब्दा/ओळी पासून कविता सुरू व्हायला हवी.
द्वादशांगुला नंतर नियमानुसार भरत यांनी केलेली चारोळी बरोबर आहे. आता तिथून सुरवात करा
सोयरे म्हणावे की
सोयरे म्हणावे की
शत्रूच त्यांस मानावे
स्वतःच्याच चुकांना
दूरतरी कसे लाथाडावे
दूर तरी कसे लाथाडावे
दूर तरी कसे लाथाडावे
जे काळजास डसले
काटे जरी असले तरी
ते काळजात वसले
लाथाडावे म्हणुनी ताटकळत
लाथाडावे म्हणुनी ताटकळत राहिले
विपक्ष सारे एकवटुन पाहिले
हाती मात्र काहीच न उरले
बघता बघता चौथे वर्षही सरले
दूरतरी कसे लाथाडावे
दूरतरी कसे लाथाडावे
आपुले म्हटले ज्यांना,
काळजावर वार करती
दया कशी येईना त्यांना.
भरत, भारीच!
भरत, भारीच!
दया कशी येईना त्यांना
.
ते काळजात वसले यावरून पुढचं
ते काळजात वसले यावरून पुढचं लिहा.
ते काळजात वसले
ते काळजात वसले
हसणे तुझ्या गालीचे
बहरले माझ्या या
मनीचे फुलांचे बगीचे
फुलांचे बगीचे
फुलांचे बगीचे
स्वरांनी भिजावे
चांदण्या बनूनी
अंबरी रुजावे
अंबरी रुजावे
अंबरी रुजावे
स्वप्न तुझे नि माझे
चांदण्यात फुलावे
हास्य तव गाली चे
रुजावे फुलांनी
रुजावे फुलांनी
ईशचरणापाशी
अंत गोड होईल
अशा ध्येयाशी
बाबारे! इधर मेरा काम नही.
बाबारे! इधर मेरा काम नही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारीच आहात तुम्ही सगळे. शीघ्रकवी का काय म्हणतात ते
बाबारे! इधर मेरा काम नही.
बाबारे! इधर मेरा काम नही. Happy
भारीच आहात तुम्ही सगळे. शीघ्रकवी का काय म्हणतात ते Happy मेरेभी बस की बात नही
ध्येयाशी नाते आमुचे
ध्येयाशी नाते आमुचे
जसे देवाचे अन भक्ताचे
नशिब नाही हे भाळीचे
अर्पण करु फुल कर्माचे
गालीचे खळे
गालीचे खळे
डोळ्यांचे तळे
कुठे बुडवावे
मन माझे खुळे
किल्ली, द्वादशांगुला या़ंंची
किल्ली, द्वादशांगुला या़ंंची चारोळी बाद आहे.
तुमची आधीची चारोळी घेऊन मी पुढची लिहिलीय.
खुळे जीव वाट पाहतात
खुळे जीव वाट पाहतात
आर्ततेने त्याना साद घालतात
एखादाच असतो हाकेला ओ देणारा
जीवान्ची व्याकुळता जाणुन धावणारा
द्वादशांगुला या़ंंची चारोळी बाद आहे>>>> हो का, मेहनत वाया गेली. आधीच काही येत नाहीये![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
धावणारा धावतो
धावणारा धावतो
पाहणारा पाहतो
काळ कोठे का कधी
थांबलेला राहतो?
आता मी ब्रेक घेतो.
आता मी ब्रेक घेतो.
राहतो मी चराचरात
राहतो मी चराचरात
प्रत्येकाच्या मनामनात
तरीही लोक शोधतात मला
मुर्ती अन देवळात
देवळात शांतपणे जळणारी पणती
देवळात शांतपणे जळणारी पणती
तिन्ही सांजा मिणमिणती
स्वतः जळूनी इतरांना प्रकाश देती
वर्णाया तिला अपुरी माझी शब्द संपत्ती
देवळात माझ्या मनीच्या
देवळात माझ्या मनीच्या
मी फक्त तुलाच वसवावे
तुझीच रे मी होताना
स्वतःतच हरवून जावे
Pages