'रोमिओ ज्युलिएट' पासून 'ब्युटी अँड द बीस्ट' पर्यंत
'गॉडफादर' पासून 'सेक्रेड गेम्स' पर्यंत,
'सिंहासन' पासून 'गेम ऑफ थ्रोन्स' पर्यंत
'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' पासून 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' पर्यंत आणि
'शायनिंग थ्रू' पासून 'राझी' पर्यंत
ह्या सगळ्या चित्रपटांना जोडणारा समान धागा कुठला असे विचारले तर पटकन लक्षात येते की हे सगळे चित्रपट लिखित स्वरूपातील साहित्यकृतीवर आधारलेले आहेत.
आपण दरवर्षी शेकडो चित्रपट/नाटके/वेबसिरिज/डॉक्युंमेंट्री बघतो पण दरवेळी त्या कलाकृतीचा मूळ ऊगम तिचा जन्मदाता आपल्याला अनभिज्ञ असतो.थोडा प्रयत्न केल्यास आपण साहित्यकृतीवर आधारित चित्रपट/नाटके/वेबसिरिज/डॉक्युंमेंट्री ची जंत्री ईथे बनवू शकतो. सगळ्यांना ह्या माहितीचा निश्चितच ऊपयोगी होईल.
साहित्य आणि सिनेमाचे भाषेचे बंधन नाही. साहित्य आणि चित्रपटाची जुजबी माहिती (उदा. साल, लेखक वगैरे) आणि दोहोंची लिंक जोडणारा एकतरी दुवा (ऊदा. विकी लिंक) प्रतिसादात दिल्यास अधिक माहिती मिळवू ईच्छिणार्याला सुरूवात करण्यास सोपे जाईल.
डॉक्युमेंट्री आणि नाटकांसाठी यू-ट्यूब वा तत्सम विडिओज चालतील, पण घटना/भाषणे/गाणी/फॅनमेड विडिओज टाळल्यास बरे होईल.
पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुस्तक आणि चित्रपटाबद्दल तुमची मते, अभ्यास, संशोधन, माहिती प्रतिसादात नक्की लिहा.
लिखित कलाकृती आधी आणि त्यावर बेतलेले चित्रपट/नाटक/ वेबसिरिज हे महत्व अधोरेखीत करण्यासाठी धागा चित्रपट सदरात न ऊघडता 'वाचू आनंदे' ह्या सदरात ऊघडला आहे.
जुना (सध्या बंद पडलेला) धागा असल्यास त्या धाग्याची लिंक ईथे टाकून हा धागा पुढे चालवू शकतो.
टीप - प्रतिसाद देतांना पुस्तकाचे/सिनेमाचे नाव बोल्ड टाईपमध्ये लिहाल्यास चाळतांना सोपे जाईल एखादे नाव सापडायला.
'द गॉडफादर'
धाग्यात गॉडफादरचे नाव आले आहे तर सुरूवात गॉडफादरनेच करतो.
१९६९ साली आलेल्या मारिओ पुझोच्या 'द गॉडफादर' ह्या कादंबरीवरच बेतलेला पहिला सिनेमा 'द गॉडफादर' १९७२ साली आला आणि त्यानंतर ऊरलेले दोन भाग १९७४ आणि १९९० साली आले. 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' आणि नंतर 'हॅरी पॉटर पुस्तकांना' लोकाश्रय मिळण्याआधी बायबल खालोखाल सर्वात जास्तं वाचली/विकली गेलेली कादंबरी होती गॉडफादर (ऐकीव माहिती).
ईटलीतल्या सिसिली (जिथले योद्धे प्राचीन काळी शूरवीर म्हणून प्रसिद्धं होते) मधून सावकारापासून जीव वाचवून पळालेला एक लाजरा मुलगा अमेरिकेत येऊन सात घराण्यांनी व्यापलेल्या गुन्हेगारी जगताचा सगळ्यांना पुरून ऊरणारा अनभिशिक्त सम्राट कसा होतो त्याची आणि त्याच्या पुढच्या दोन पिढ्यांची कहानी म्हणजे 'गॉडफादर'
पुस्तक आणि चित्रपट दोन्हीही आपापल्या क्षेत्रात यश आणि गुणवत्तेचे मापदंड आहेत. चित्रपटाने, पुझो बरोबरच कपोला (डिरेक्टर), ब्रँडो, डी नीरो आणि अल पचिनोला अनंत काळासाठी यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.
मराठीतल्या सिंहासन आणि सामनासारखेच कधीही बघितले तरी आजिबात आऊटडेटेड न वाटणारे सिनेमे आहेत गॉडफादर. ह्या नंतर गुन्हेगारांना ग्लोरिफाय करणार्या सिनेमांची लाटच आली. रामूची 'सरकार' मालिकाही ह्यावरच बेतलेली आहे.
रत्नाकर मतकरी ह्यांच्या 'जौळ'
रत्नाकर मतकरी ह्यांच्या 'जौळ' कादंबरीवर सिनेमा 'माझे घर माझा संसार हा सिनेमा व माझे काय चुकले हे नाटक आले होते. ही कादंबरी डोंबिवली मधील सत्यघटनेवर आधारीत आहे.
'जादू तेरी नजर' अपना फेव्हरिट
'जादू तेरी नजर' अपना फेव्हरिट हय !!
शक नावाचा एक मस्त सिनेमा वपु
कथेबद्दल कुठे वाचलं होतं ते आठवत नसल्यामुळे आणि आत्ता संदर्भ सापडत नसल्यामुळे सध्या पोस्ट उडवत आहे.
अकिराविषयी कोणी लिहिलं नाही
अकिराविषयी कोणी लिहिलं नाही ना?
अकिरा (१९८८) हा याच नावाच्या जपानी कॉमिक (मांगा) वर आधारित अॅनिमेशनपट आहे. सिनेमाचा लेखक/दिग्दर्शक आणि पुस्तकाचा लेखक एकच आहे - कात्सुहिरो ओतोमो. अकिराची थोडक्यात कथा अशी - तिसर्या विश्वयुद्धानंतर जगाचा चेहरामोहरा पालटला आहे. तोक्योचा (टोकियो) समूळ नाश होऊन त्याची जागा निओ-तोक्योने घेतली आहे. २०१९ मध्ये निओ-तोक्योला बेसुमार वाढलेली गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराने पछाडले आहे. या सर्वांचा उबग आलेल्या तरुणाईने हिंसेचा आसरा घेतला आहे. या हिंसक कारवायांना आळा घालण्याकरता माशल लॉ पुकारला जातो. कथेचा नायक शोतारो कानेदा (कानेडा) याच तरुणाईचा एक हिस्सा आहे. तो कॅप्सूल्स नामक बाईकर गँगचा लीडर आहे तर त्याचे विरोधक क्लाऊन्स आहेत. या गँगवॉरमध्ये कानेदाचा मित्र तेत्सुओ शिमा प्रशासनाच्या हाती लागतो आणि सुरु होतो कानेदाचा संघर्ष! तेत्सुओमध्ये प्रशासनाला एवढा रस का असतो? तिसरे विश्वयुद्ध का झाले? आणि अकिरा म्हणजे कोण किंवा काय? या सर्व प्रश्नांचे उत्तरे सिनेमातूनच मिळवलेली श्रेयस्कर!
मूळ पुस्तक कॅरेक्टर ड्रिव्हन आहे. २००० पेक्षा जास्त पानांच्या कॉमिक्समध्ये कानेदा आणि इतर मुख्य पात्रे अनेक लोकांना भेटतात. या प्रत्येकाला सखोल अशी बॅकस्टोरी आहे आणि सबप्लॉट आहे. सर्व्हाव्हलला प्राधान्य देणार्या जगात जगताना प्रत्येकजण आपापला दृष्टीकोन घेऊन येतो. या सर्व दृष्टीकोनांचा कानेदा आणि तेत्सुओच्या विचारसरणीवर प्रभाव पडतो आणि दोघांचे रस्ते वेगवेगळे होत जातात. या सगळ्यात सर्वात महत्त्वाचे पात्र म्हणजे निओ-तोक्यो! निओ-तोक्योला स्वतःचे विचार आहेत, स्वतःची ओळख आहे. हा संपूर्ण प्रवास मूळ कॉमिक अतिशय विस्ताराने मांडते. तसेच ओतोमोची ड्रॉईंग्ज आणि ड्राफ्टिंग स्किल्स जबरदस्त आहेत. त्यामुळे हे पुस्तक एक वेगळाच व्हिज्युअल अनुभव देते.
सिनेमा बनवताना ओतोमोने पूर्ण क्रिएटिव्ह कंट्रोल आपल्याकडे राहिल याची काळजी घेतली होती. अर्थातच सिनेमा पूर्ण पुस्तक कव्हर करत नाही. त्यामुळे सिनेमा समजून घ्यायला अधिक अवघड आहे. पण त्याची कमतरता ओतोमो रंगसंगतीतून भरून काढतो. मूळ कॉमिक कृष्णधवल आहे. सिनेमामध्ये मात्र ओतोमो निऑन रंगांचा तूफान वापर करतो. भगभगीत रंगात रंगलेल्या निओ-तोक्योच्या वरवर दिसणार्या सुबत्तेखाली लपलेले वास्तव उठून दिसते. त्याहूनही जबरदस्त गोष्ट म्हणजे यातली फ्रेम न् फ्रेम हाताने काढलेली आहे. यामध्ये संगणकाचा वापर शून्य आहे. आणि तरीही आज आधुनिक तंत्राने बनवल्या गेलेल्या अॅनिमेशनपटांसमोर अकिराचे कलर डिझाईन आणि लाईट डिझाईन उठून दिसते.
हा व्हिडिओ यावर अधिक चांगले भाष्य करतो - https://www.youtube.com/watch?v=xf0WjeE6eyM
मस्त ओळख पायस. मँगा/कॉमिक्स
मस्त ओळख पायस. मँगा/कॉमिक्स या प्रकारांशी कधी ओळख करून घेतलेली नाही. ते कधीतरी करायचे आहे.
मस्त ओळ्ख पायस
मस्त ओळ्ख पायस
एका स्टोरीत १९८४, v for vendetta, मार्वलचा कॅप्टन अमेरिका आणि बकी वाला सिनेमा असे सगळे सिनेमे आठवले.
जॉर्ज ऑरवेलचे १९८४ अजून वाचायचे राहिले आहे हे सुद्धा परत कितव्यांदा तरी आठवले.
मायकल कनिंगहमच्या The Hours
मायकल कनिंगहमच्या The Hours या पुलित्झर मिळालेल्या पुस्तकावरून बनवलेला त्याच नावाचा चित्रपट.
१९२३मधली व्हर्जिनिया वूल्फ मिसेस डॉलॉवे हे पुस्तक लिहायला सुरवात करतेय, १९५१मधली लॉरा ब्राऊन ते पुस्तक वाचतेय आणि २००१मधली क्लॅरिसा (जी पुस्तकातल्या मिसेस डॉलॉवेसारखी आहे) एका पार्टीची तयारी करतेय. या तीन स्त्रियांच्या आयुष्यातला एक दिवस हे कथानक आहे.
मला पुस्तकापेक्षा चित्रपट अधिक चांगला वाटला कारण:
• दिगदर्शकाने दृकश्राव्य मध्यमाचा पुरेपूर फायदा करून घेतला आहे. उदा: नवरा हापिसला जाताना लॉरा त्याला खिड्कीतून पाहतेय. तो गेल्यावर ती वळते आणि आपल्या मुलाकडे पाहते. दिग्दर्शकाने नक्की काय केलं आहे माहित नाही पण आई आणि मुलामधला तो टेन्स क्षण फारच घाबरवणारा होता माझ्यासाठी
• निकोल, ज्युलियन, मेरील तिघींनी (त्याच क्रमाने) इतका जबरदस्त अभिनय केला आहे कि त्या स्त्रियांशी, त्यांच्या भावनांशी आपण फारच कनेक्ट होतो पुस्तकातल्यांपेक्षा.
• पुस्तकातली भाषा फारच लिरिकल, प्रोज (मराठी शब्द?) वगैरे असलेली आहे.
• पण तरीही लॉराला आपल्या नवर्याबद्दल वाटणारी घृणा, त्यामागची कारणं आणि रिचर्ड-क्लॅरिसा-लुईस यांचे कॉम्पलीकेटेड नाते पुस्तकात जास्त नीट समजते. त्यासाठीतरी पुस्तक वाचायलाच हवे.
इब्सेनच्या अनेक नाटकांवरून
इब्सेनच्या अनेक नाटकांवरून सिनेमे झालेत. डॉल्स हाऊस वर तर सगळ्यात जास्त.
टेनेसी विल्यम्सच्या स्ट्रीट कार नेम्ड डिझायर वर त्याचा नावाचा अप्रतिम सिनेमा आहे. तरूण मार्लन ब्रॅण्डो आहे त्यात.
चांगला गोषवारा अॅमी.
चांगला गोषवारा अॅमी.
सिनेमाला बर्याच कॅटेगरी मध्ये ऑस्कर नॉमिनेशन मिळाले होते असे आठवते आहे. Virginia Woolf च्या मोठ्या नाकाच्या मेकअप मध्ये Nicole Kidman नेहमी पेक्षा जास्त सुंदर दिसते आणि तिने ते नाक तसेच कायम ठेवावे असे मला आपले उगीचच वाटते.
The Blue Umbrella
The Blue Umbrella
पहिल्या पोस्टच्या संपादनाची वेळ निघून गेल्याने नवीन पोस्ट लिहित आहे.
रस्किन बाँडच्या अगणित लघूकथांसारखीच ही कथाही त्याच्या home ground (हिमाचल, ऊत्तरांचल) मध्ये घडते. रस्किनच्या नजरेतून देहरा, श्यामली, गढवाल, नैनिताल अशी त्याकाळी (८० चे दशक) लहान असलेली गावे आणि तिथले लोक (तिथे सेटल झालेल्या ब्रिटिश लोकांसहित) बघणे म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो... तोईतका अस्सल आणि तिथल्या निसर्गासारखा मनभावन की रस्किन आयुष्यभर आपल्या सोबतच रहावा असे वाटते.
तर हिमाचल मधल्या एका छोट्याश्या गावात एका शाळकरी मुलीला बिनियाला जापनीज टुरिस्टकडून एक नक्षीदार छत्री मिळते. ती छत्री एवढी सुबक आणि निळ्याशार रंगाची असते की पाहणार्या प्रत्येकाच्या नजरेत ती भरून जाते. छत्री मिळाल्याबद्दल काहींना बिनियाचे कौतुक वाटते तर काहींना हेवा. पैकी हेवा वाटण्याच्याही पुढे जाऊन गावातला छोट्या किराणा दुकानाच्या मालकाला राम भरोसेला बिनियाचा मत्सर वाटू लागतो. आणि काहीही करून ही छत्री मिळवायचीच ह्यासाठी तो कारस्थानं करत राहतो. ह्या कारस्थानात छुप्या पद्धतीने कोण कोण कसे सामील होतात,
मग अचानक छत्री गायब कशी होते, तिचा रंग कसा बदलतो.. मग छोटी बिनिया कसा छडा लावते.. वगैरे कहानी पुढे सुरस होत जाते आणि गोड शेवट होऊन संपते.
विशाल भारद्वाजने ह्या कथेवर ह्याच नावाचा अप्रतिम सिनेमा बनवला आहे. ज्यात लहान मुलीचे काम कोणी केले आठवत नाही पण राम भरोसे चे बेरकी पात्र 'पंकज कपूर' ने मस्त रंगवले आहे.
सुंदर धागा!
सुंदर धागा!
हायझेनबर्ग, अॅमी, वरदा, टवणे सर आणि एकूणच सगळेच प्रतिसाद छानच. बरीच पुस्तकं वाचायची राहिली आहेत आणि बरेच सिनेमे बघायचे राहिले आहेत याची जाणीव झाली.
नॉट विदाऊट माय डॉटर
लेखिका बेट्टी महमूदी. लेखिकेच्या आयुष्यात घडलेली खरी कहाणी. बर्याच जणांना माहिती असेल. घटस्फोटित अमेरिकन स्त्री एका इराणी डॉक्टरच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करते. एक मुलगी होते त्यांना. दरम्यान इराणमध्ये क्रांती होते आणि महमूदी ( मूडी) चा सगळा नूर बदलतो. अमेरिकेविषयी द्वेषाने बोलू लागतो. काही दिवसांसाठी इराणला जाऊन येऊ म्हणून बायको आणि मुलीला तिकडे घेऊन जातो आणि नंतर खरा रंग दाखवतो. आता इथेच राहायचं. बेट्टी खूप प्रयत्न करते. पण व्यर्थ. एंबसी म्हणते आम्ही तुला अमेरिकेत परत पाठवू शकतो पण इराणी कायद्यानुसार मुलीला बापाकडेच ठेवावं लागतं. शेवटी ' नॉट विदाऊट माय डॉटर' हा आपला हट्ट ती पुरा करते आणि इराणमधून तुर्कस्तानला पळून जाते आणि तिथून अमेरिकेला.
पुस्तक लहानपणी वाचलं होतं ( भाषांतर) . सिनेमा नंतर कधीतरी पाहिला. पुस्तक जास्त सरस आहे.
द गुड अर्थ
लेखिका पर्ल बक
एका चिनी शेतकऱ्याच्या लांबलचक आयुष्याची सुरस कथा. वर्णनं चित्रदर्शी! माझं अतिशय आवडतं पुस्तक.
चित्रपटही चांगला वाटला. विशेषतः टोळधाडीचा सीन आणि एकूणच शेतावरची दृश्यं.
नॉट विदाऊट माय डॉटर
नॉट विदाऊट माय डॉटर
लेखिका बेट्टी महमूदी. >> शक्ति - द पावर हा करिष्मा, शाहरूख आणि नाना चा हिंदी सिनेमा ही ह्याच कादंबरीवर आधारित आहे.
द गुड अर्थ > अजून विस्ताराने वाचायला आवडेल.
सगळे बाँड्पट - मोस्ट् ली
सगळे बाँड्पट - मोस्ट् ली पुस्तकांपेक्षा चित्रपट आवडलेत.
अजून विस्ताराने वाचायला आवडेल
अजून विस्ताराने वाचायला आवडेल.>> पुस्तकाबद्दल लिहू शकते. चित्रपटाबद्दल नाही. लिहू का?
शक्ति - द पावर हा करिष्मा, शाहरूख आणि नाना चा हिंदी सिनेमा ही ह्याच कादंबरीवर आधारित आहे.>> हो का? हे माहिती नव्हतं. असा काही पिक्चर आला होता हेही माहीत नाही.
अरे जॉन ग्रिशम ला विसरले लोक.
अरे जॉन ग्रिशम ला विसरले लोक. मला A time to kill, The Firm, Client, Rainmaker, Pelican brief खूप आवडतात.
गुलशन नंदा यांच्या अनेक
गुलशन नंदा यांच्या अनेक कादंबरयांवर चित्रपट आले आहेत. उदा. . काजल (1 9 65), कटी पतंग (1 9 70), खिलोना (1 9 70), शर्मिली (1 9 71), दाग (1 9 73), नया जमाना (1 9 71) आणि मेहबूबा यातील सहा चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन करण्यात आले होते.
अरे जॉन ग्रिशम ला विसरले लोक.
अरे जॉन ग्रिशम ला विसरले लोक. मला A time to kill, The Firm, Client, Rainmaker, Pelican brief खूप आवडतात. >>> मंदार, तुमची प्रत्येक आवड दोन चार ओळीत खरडा पाहू. नुसती यादी वाचण्यापेक्षा आम्हाला पुस्तकांची वा सिनेमांची 'समरी' वाचायला नक्कीच आवडेल.
एकदम सगळ्यांबद्दल लिहिण्यापेक्षा रोज किंवा जमेल तसे एका पुस्तका वा सिनेमा विषयी चार ओळी लिहिल्या तरी चालतील.. नक्की लिहाच.
पुस्तकाबद्दल लिहू शकते.
पुस्तकाबद्दल लिहू शकते. चित्रपटाबद्दल नाही. लिहू का? >> वावे , हो हो... पुस्तक किंवा सिनेमा काहीही एक वाचले किंवा पाहिले असल्यास त्याबद्दल नक्की लिहा. पुस्तक वाचले असल्यास ऊत्तम पण नुसता सिनेमाच पाहिला असल्यासही चालेल.
arjun1988 >> मंदारला केली तीच
arjun1988 >> मंदारला केली तीच विनंती तुम्हालाही करतो... यादी नको... एका प्रतिसादात गुलशन नंदांच्या एकेका कलाकृतीबद्दल लिहा.
मी त्यांची पुस्तकं वा सिनेमे काहीच वाचलं/पाहिलं नसल्याने त्यांच्या कामाबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
> Virginia Woolf च्या मोठ्या
> Virginia Woolf च्या मोठ्या नाकाच्या मेकअप मध्ये Nicole Kidman नेहमी पेक्षा जास्त सुंदर दिसते आणि तिने ते नाक तसेच कायम ठेवावे असे मला आपले उगीचच वाटते. Lol > हो त्या वूल्फिश नाक आणि केशरचनेमधली निकोल मलापण जास्त आवडली
===
वावे, आभार
===
अकबर-बिरबलाच्या गोष्टींपैकी 'चार मूर्ख शोधून आण' आठवतेय का? त्यातला पहिला मूर्ख, "माझी बायको तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. आज त्यांचे लग्न आहे. त्यासाठी रुखवत घेऊन चाललोय." सांगणारा. तो खरंच मूर्ख असतो का? ही गोष्ट आठवायचे कारण म्हणजे
काऊई हार्ट हेमिंग्जचे The Descendants हे पुस्तक आणि त्याच नावाचा चित्रपट.
बोटिंग अपघातामुळे बायको कोमामधे गेल्यावर मॅट किंगला कळते की तिचे अफेअर होते. आणि आतापर्यंत अलिप्त नवरा-बाप असलेला मॅट, बायको-मुलींशी असलेले आपले नाते परत एकदा जोखायला लागतो. त्या प्रवासाची ही कथा.
इथेदेखील मला पुस्तकापेक्षा चित्रपट जास्त आवडला कारण:
• गोष्ट हवाई बेटांवरची आहे. त्यामुळे वाचण्यापेक्षा पहायला छान वाटते.
• हवाईन शर्ट-बर्म्युडामधला जॉर्ज क्लुनी आहे
• क्लुनी, शैलेन वूडले आणि इतरांनी छान अभिनय केला आहे.
• पण परत एकदा भावभावना, मनातले विचार वगैरे वगैरे पुस्तक वाचल्यास नीट कळतात.
• कोमा, लाईफ सपोर्ट काढून घेणे, विवाहबाह्य संबंध, १० आणि १७ वर्षांच्या मुलींना बापाने सांभाळणे आणि वारसाहक्कात मिळालेली जमीन खरंच 'आपली' असते का? असे जडजड विषय असूनही पुस्तक, चित्रपट दोन्ही हल्केफुलके, संथ वगैरे आहेत. सर्वांना आवडेलच असे नाही.
लाईफ ऑफ पाय - यान मार्टेल -
लाईफ ऑफ पाय - यान मार्टेल - चित्रपट !
चित्रपट पहाताना शेवटच्या ५ मिनिटांमध्ये अतिशय सुंदर रितीने देवाचे अस्तित्त्व मानायचे की नाही मानायचे यावर संवाद आहेत. चित्रपटाची खरी हायलाईट ही आहे. मला वाट्टे बरेच जण हे मिस करतात.
सुलू पुस्तक यान मर्टेलचे
सुलू पुस्तक यान मर्टेलचे (लेखक) आणि सिनेमा आंग लीचा आहे (ना?)
लाईफ ऑफ पाय अनेक लोकांच्या 'मरण्यापूर्वी वाचायची १०० पुस्तके' ह्या यादीत आहे म्हणे. ह्यावर चित्रपट बनवणे अशक्य आहे समजून अनेकांनी हा प्रोजेक्ट सोडून दिला होता. पण आंग ली ने ती किमया करून दाखवली. मूळ कादंबरीला किती न्याय दिला आहे माहित नाही.
गुलशन नंदा यांच्या अनेक
गुलशन नंदा यांच्या अनेक कादंबरयांवर चित्रपट आले आहेत. उदा. . काजल (1 9 65), कटी पतंग (1 9 70), खिलोना (1 9 70), शर्मिली (1 9 71), दाग (1 9 73), नया जमाना (1 9 71) आणि मेहबूबा यातील सहा चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन करण्यात आले होते. >>> धन्यवाद! हे माहीत नव्हते.
शक्ति - द पावर हा करिष्मा, शाहरूख आणि नाना चा हिंदी सिनेमा ही ह्याच कादंबरीवर आधारित आहे. >>> भयाण पिक्चर होता तो. शाखा फक्त एका गाण्यापुरताच होता. पिक्चर मधल्या स्टोरी मधे नव्हता. नाना चा रोल भावखाउ करण्याच्या नादात त्या करिश्मा च्या पळून जाण्याच्या सीन्स ची वाट लावली आहे.
अरे जॉन ग्रिशम ला विसरले लोक
अरे जॉन ग्रिशम ला विसरले लोक >>>
काही वर्षांपूर्वी 'द फर्म' पुस्तकाच्या मराठी अनुवादावर हे लिहिलं होतं.
https://www.maayboli.com/node/25104
The Descendants >>> अॅमीला अनुमोदन. सिनेमा मला आवडला होता. पुस्तक अजून वाचलेलं नाही.
मध्यंतरी कुठल्यातरी चॅनलवर We Bought A Zoo सिनेमा पाहिला. तो त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे असं नंतर नेटवर वाचलं. एक जोडपं, बायको मेलेली, दोन मुलं, मुलगा अर्धवट वयाचा, मुलगी लहान, मुलांना वाढवताना बापाची खूप तारांबळ होत असते; एक पडीक प्राणीसंग्रहालय तो विकत घेतो आणि त्याचं पुनरुज्जीवन करतो; प्राणीसंग्रहालयातले कर्मचारी वगैरे त्याला मदत करतात; अशी स्टोरी आहे.
मॅट डेमन, स्कार्लेट योहान्सन.
त्यातल्या लहान मुलीचं काम खूप छान झालंय.
स्का.यो.ला इतकं का डोक्यावर घेतात समजलं नाही.
सिनेमा ठीकठाक वाटला. पण ते पुस्तक त्याहून सरस असणार असंही वाटलं. प्रत्यक्षातला तो झू विकत घेणारा मनुष्य आणि त्याची मुलं इंग्लंडमधली आहेत आणि अजूनही त्या झूच्या परिसरातच राहतात असंही समजलं. झू चं पुनरुज्जीवन करतानाचा त्याचा झगडा सिनेमात नीटसा दिसत नाही; सगळं सहजसाध्य झाल्यागत वाटतं; पण प्रत्यक्षात तसं नसणार आणि ते पुस्तकात आलेलं असणार, असा माझा अंदाज.
सिनेमा टिपिकल हॉलिवूड
सिनेमा टिपिकल हॉलिवूड चिक्फ्लिक झालेला आहे त्या वि बॉट अ झू वरचा.
द गुड अर्थ
द गुड अर्थ
द गुड अर्थ ही पर्ल बकची कादंबरी एका चिनी शेतकर्याच्या कुटुंबाचे चित्रण करते. ही कथा मुख्यत: विसाव्या शतकाच्या सुरुवातीला घडते. वांग लुंग हा शेतकरी, त्याचे वडील, पत्नी ओ-लान, त्यांची मुलं आणि मुख्य म्हणजे त्यांची जमीन, ही या कादंबरीतली प्रमुख पात्रं. वांग लुंग हा एका खेड्यात राहणारा, साधा, भोळा, थोडा अडाणीच असा, पण हाडाचा शेतकरी. कादंबरीला सुरुवात होते ती वांग लुंगच्या लग्नाच्या दिवशी. लग्न म्हणजे काही समारंभ नाही, तर जवळच्या शहरातल्या हवेलीतली एक दासी पैसे देऊन बायको म्हणून विकत आणणं. ही बायको (ओ-लान) कुरूप असली, तरी शांत स्वभावाची, कष्टाळू आणि साधी असते. कादंबरी पुढे जाते तसा त्यांचा संसार पुढे जातो. मुलगे आणि मुली जन्माला येतात. मुलगा जन्मला की आनंदीआनंद आणि मुलगी जन्मली की निराशा.
तो श्रीमंत होतो खरा, पण दिवसभर शेतात काम करून दमून भागून जे सुख त्याला मिळत होतं त्या सुखाला तो आता पारखा होतो. त्याला कशाचीच चव लागत नाही. मुलं शहरात शिकायला जातात आणि शेतात काम करणं त्यांना कमीपणाचं वाटू लागतं. वांग लुंगला त्यांचा राग तर येतो, पण तो काही करू शकत नाही. दरम्यान काही असाध्य आजार होऊन दु:खी असलेली ओ-लान मरून जाते.
पुढे दुष्काळ पडतो. अन्नान्नदशा होते आणि पोटार्थी माणसांच्या लोंढ्याबरोबर वांग लुंगचं कुटुंबही ( ट्रेनमधे बसून) लांबवरच्या शहरात येऊन पोचतं.तिथे भीक मागून, मोलमजुरी करून पोट भरतं. पण त्या दुरवस्थेतही त्याच्या मनात दुर्दम्य आशा असते की एक ना एक दिवस आपण आपल्या घरी परत जाऊ आणि तिथे आपली प्रिय जमीन आपली वाट बघत असेल.
चीनमधले ते दिवस अस्थैर्याचे होते. सावकारांविरुद्ध, श्रीमंतांविरुद्ध जनतेच्या मनात रोष होता. अशाच एका श्रीमंताच्या हवेलीवर जमाव हल्ला करतो. वांग लुंग आणि ओ-लानसुद्धा त्या जमावात सामील होतात. त्यांनाही थोडीफार लूट मिळते आणि त्या जिवावर ते आपल्या गावाला परततात. मग मात्र त्यांची भरभराट होते. पुष्कळ पीक येत राहतं. वांग लुंग नव्या नव्या जमिनी खरेदी करतो, आणखी आणखी श्रीमंत होतो. परंतु मिळालेलं सुख त्याला पचत नाही. ओ-लान त्याला आता नीरस, गावंढळ, कुरूप वाटू लागते आणि तो दुसर्या एका स्त्रीशी (जी वेश्या असते) लग्न करतो. आता वांग लुंगची नैतिक अधोगती सुरु होते. आपल्याला त्याचा राग येऊ लागतो.
ज्या हवेलीतून वांग लुंगने ओ-लानला विकत आणलेलं असतं, ती हवेलीच विकत घेण्यापर्यंत वांग लुंगची प्रगती होते. एक वर्तुळ पूर्ण होतं. वांग लुंग म्हातारा होतो. मुलं जमिनी विकून टाकण्याच्या गोष्टी करू लागतात. वांग लुंग त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न करतो. मुलं बापाच्या मरण्याची वाट पहात आहेत, या जागेवर ही कादंबरी संपते.
आपल्या लक्षात राहतं ते वांग लुंगचं जमिनीवरचं प्रेम, त्याचे कष्ट,भोळेपणा, ओ-लानचं शांतपणे मुलांना जन्माला घालणं, काम करत राहणं.
ही कादंबरी १९३१ साली प्रकाशित झाली आणि तिचं जोरदार स्वागत झालं. १९३२ साली या कादंबरीसाठी पर्ल बकला पुलित्झर पारितोषिक मिळालं. अमेरिकेत तोपर्यंत चिनी जीवनाबद्दल गैरसमजच जास्त होते. ते दूर करण्यात आणि चीनभोवती असलेलं गूढतेचं वलय कमी करण्यात या कादंबरीने महत्त्वाची भूमिका बजावली.
मराठीत या कादंबरीचा अनुवाद भारती पांडे यांनी ’ काळी’ या नावाने केला आहे. अतिशय छान अनुवाद आहे. मी लहानपणी अनुवाद वाचला होता. आत्ता १०-१२ वर्षांपूर्वी मूळ इंग्रजी पुस्तक वाचलं. द गुड अर्थ हा चित्रपट १९३७ साली आला. ओ-लानचे काम करणार्या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे आणि चित्रपटाला सिनेमॅटोग्राफीचे ऑस्कर मिळाले. .
मी आधी चानी आणि कालाय तस्मै
मी आधी चानी आणि कालाय तस्मै नमः (अनकही) यांची केवळ नोंद केलेली.
दोन्ही चिं.त्र्यं. खानोलकरांच्या कादंबर्या. चानी (गणुराया आणि चानी असं दोन कादंबर्यांच एक पुस्तक आहे) कॉलेजात असताना वाचलेली.
गोर्या (परदेशी/ब्रिटिश?) माणसापासुन कोकणातल्या एका बाईला झालेली मुलगी म्हणजे चानी. गोरी, निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची. गावकर्यांसाठी ती एकाच वेळी पापाचं प्रतीक, त्याचवेळी तिच्याबद्दल वासना. गावातला एक किशोर मित्र आणि तिला ज्याने वाढवले असा एक नावाडी हेच तिचे जिवाभावाचे दोघे जण.
चानीबद्दलचे लोकांचे आचारविचार पाहून त्या किशोरवयीन मुलाला अनेक प्रश्न पडतात.
कादंबरीचा शेवट जी ए किंवा खानोलकरांच्या कथानकांचा असतो, तसा सुन्न करणारा.
या कादंबरीवर व्ही शांताराम यांनी चित्रपट काढला . चानीच्या भूमिकेत रंजना. किशोरवयीन मुलाच्या भूमिकेत सुशान्त रे (पुढे नाव बदलून सिद्धार्थ झाला. बाजीगर मधला इन्स्पेक्टर) चित्रपट पाहिलेला नाही, पण गाणी पाहिलीत. रंजनाच्या अभिनयावर संध्याबाईंची छाप दिसतेय (शांताराम इफेक्ट). संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचे. मला नक्की आठवत नाही, पण गाण्यांच्या साथीला वाद्ये न वापरता भांडी किंवा तत्सम वस्तू वापरून निर्माण केलेले नाद आहेत. गाणी संवादांच्या रूपात आहेत. एका गाण्यात नावाडी 'ए चानी, तुझ्या आवशीचो घो" असे म्हणतो, ती काहीतरी भयंकर शिवी आहे असे वाटायचे.
कालाय तस्मै नमः हे नाटक. नायकाच्या पत्रिकेत लिहिलंय की त्याची पहिली बायको मरणार. प्रेयसीच्या जिवावर बेतू नये म्हणून तो एका गरीब मुलीशी लग्न करतो. तरीही नियतीचा फेरा त्याला चुकत नाही.
अमोल पालेकर यांनी चित्रपट काढलाय. संगीत जयदेव यांचं. आशाचं "कौन ठगवा नगरिया लूटल हो" हे गाणं यातलंच. पं.भीमसेन जोशींचीही दोन गाणी यात आहेत.
चानी चित्रपट थोडासा पाहिलाय.
चानी चित्रपट थोडासा पाहिलाय. चानी म्हणजे खारूताई.
गारंबीचा बापू
श्री ना पेंडसे यांची अतिशय लोकप्रिय कादंबरी. या कादंबरीने ते उत्कृष्ट कादंबरीकार म्हणून प्रस्थापित झाले. व्यक्तिशः मला त्यांची रथचक्र आणि तुंबाडचे खोत जास्त आवडतात.
चित्रपटात बापूचं काम one and only काशिनाथ घाणेकरांनी केलं होतं. नायिका फैय्याज. बाकी कलाकार लक्षात नाहीत. या चित्रपटातलं रवींद्र साठेंनी गायलेलं ' अजब सोहळा.. माती भिडवी आभाळा' हे गाणं सुंदर आहे.
रथचक्रवर हिंदीत मालिका आली
रथचक्रवर हिंदीत मालिका आली होती हे आठवत़ंय.
वावा! मस्त लिहिलत भरत आणि
वावा! मस्त लिहिलत भरत आणि वावे.
वावे, वांग लुंग चे ओलान आणि जमिनीशी असलेले नाते समांतर चाललेले दिसते.. दोघी एकमेकींना रुपक असल्यासारखे
भांडवलशाही वि. साम्य्वाद असा काहीसा रंग असावा का असाही संशय आला.
मलाही श्रीनांची रथचक्र तुंबाडपेक्षा ऊजवी वाटते आणि जास्त आवडते. चानी लहान असतांना बघितला होता पण तेव्हा डोके कमी असल्याने रंजना प्रकरण काही झेपले नव्हते. आता पुन्हा प्रयत्न करायला पाहिजे.
Pages