निसर्गाच्या गप्पा (भाग ३३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 July, 2018 - 03:13
landscape

अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..

आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.

त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .

हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.

सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.

पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.

खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...

बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..

सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा

वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<मला ती लेपर्डीण काहीतरी सुनावतेय वचावचा आणि तो बिचारा ऐकतोय असं दिसलं Lol .>>>
हे मस्त.... Bw

जागू, झब्बू घे..
हा सिगिरीया राॅक च्या पायथ्याशी काढलेला..

IMG-20180516-WA0060.jpg

ही माॅरिशसच्या क्राॅकोडाईल पार्क मधली Hypomelanistic Iguana....
हिचे अंगावर घेऊन काढलेले फोटोही आहेत, दुसर्याने काढलेले.
पण एकदम हललेले आणि खराब..

IMG-20180811-WA0078.jpg

मस्त आहेत निरु फोटो.
माकडाने काजळ घातलय की काय?
आणि इगुआना चक्क ‘चावट’ दिसतोय Lol लोक पाळतातहीना याला?

जागूताई, मला मेल आला नाही. जंकमधेही चेक केले. माझा मेल आय डी देतो मी तुम्हाला.

स्मिता, अहो घ्या की फोटो. विचारायचे काय त्यात! Happy

भारी मस्त फोटो नीरु.

Hypomelanistic Iguana.. >>> हिची भीती नाही वाटत तुम्हाला नीरु, अंगावर घेऊन फोटो, बापरे.

शाली, रांजणकुंड मस्तच. बाकी सर्वांचे फोटोही सुंदर!
रांजणखळगे निघोजचे आहेत का? कुकडी नदीतले? एकदा जायचंय तिकडे नक्की. आम्हाला शाळेत इंग्लिशच्या पुस्तकात धडा होता या निघोजच्या कुंभगर्तांबद्दल. तेव्हापासून डोक्यात आहे हे. पण अजून जमलं नाही.

वावे, हो हे निघोजचे फोटो आहेत. कितीही प्रयत्न केला तरी फोटोत पकडता येत नाही त्यांचे सौंदर्य. प्रत्यक्षात खुपच सुरेख आहेत. आश्चर्य वाटते निसर्गाची कमाल पाहून. पावसाळ्यात जास्त छान दिसतात. नक्की पहा.

हा सिगिरीया राॅक च्या पायथ्याशी काढलेला.. .... याचे डोळे कसले भारी आहेत अगदि काजळ लावल्यासारखे

@ शाली <<<आणि इगुआना चक्क ‘चावट’ दिसतोय Lol लोक पाळतातहीना याला?>>>

हो पाळतात.. Green Iguana ला या बाबतीत जास्त मागणी असते..

@शाली - पुढच्या फोटोत नक्की टाकेन कॅमरा सेटीन्ग्स ... पण वरील सर्व फोटो कॅनन ७००ड ने काढलेले आहेत कधी १८-५५ ची लेन्स वापरून तर कधी ५५-२०० ची

हा फोटो आहे ... पैंटिंग नाही ... अटलांटा, २०१८ स्प्रिंगची सुरुवात झाली होती .. गिब्स गार्डन येथील ... माझा एक आवडता फोटो ... निसर्गाने काय उधळण केली आहे रंगांची ... अपेक्षा आहे आपल्याला हि आवडेल

IMG_5045.JPG

Canon EOS 700D
f/6.3
Exposure 1/125
ISO -100
Focal length - 28 mm

माकड आणि इग्वाना मस्तच.. इग्वानाचे स्केल्स काय मस्त आहे.. अंगावर षटकोनी आणि इकडे डायमंड (त्याला डायमंड का म्हणतात कळेना..शंकरपाळ शब्द रुळायला हवा Wink ) , त्रिकोणी आकाराचे..
तो फोटो ब्लर असो का काही तरी पाहायला आवडेल निरु.. तुम्ही अंगावर घेतली म्हणुन मित्रच घाबरला कि काय Lol

मस्त फोटो भुत्याभाऊ

भुत्याभाऊ खरच चित्र काढल्यासारख वाटत आहे. खुप सुंदर फोटो.

महाबळेश्वरला दिसलेली काही फुले.
१)

२)

३) ट्रंपेट फ्लॉवर

सगळेच फोटो सुंदर!
पुण्यात तुती कुणाला लावायची असेल तर माझ्याकडे कुंडीत आहे ... पण नुकतीच छाटणी केली आहे. पुढच्या वेळी फांद्या लावायला ठेवू शकेन.

सगळेच फोटो अफलातून...

माकडाने काजळ घातलय की काय?>>> हेयरकट पण करून घेतलेला दिसतोय Lol

पैंटिंग नाही>>> खासंच आलाय पेंटिंग नाही म्हणून सांगूनही पेंटिंगंच वाटते इतका छान फोटो, अगदी पेंटिगहून एक पाऊल पुढचा.

जागूताई, फोटो कसले झकास आलेत. मस्तच.

भुत्याभाउ फोटो सेव्ह केला आहे. सेटींग दिल्याबद्दल खुप आभारी आहे. मस्त काम केले ते. माझा EOS 60D आहे.

हेयरकट पण करून घेतलेला दिसतोय>>> अरे हो की. Happy

निगकर्स एक प्रश्ण होता माझा.
माझ्या घरी जे गुलाबाचं रोप आहे त्याला भुंगा/माशी लागलाय..
रोज येउन पानं कुरतडुन घेउन जातो..
यावर काय उपाय करता येइल ? त्याला पानं कुरतडुन घेउन जाताना बघणं खेळ झालाय आमच्यासाठी खरतर..पण अशानं माझा गुलाब गायब होउन जाइल अशी भिती वाटतेय..खाली फोटो देतेय बघा
rose leaves.jpg

स्मिता श्रीपाद गुलाबाची पाने उलटसुलट करून पहाल का?माझ्यामते एखादी अळी असावी.तिचे काम असावे हे. गुलाबाचे थोडे कटिंग करा.थोड्या पाण्यात चिमूटभर बे.पा. किंवा खायचा सोडा मिसळून ते पाणी झाडावर फवारा .

Pages