निसर्गाच्या गप्पा (भाग ३३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 July, 2018 - 03:13
landscape

अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..

आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.

त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .

हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.

सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.

पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.

खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...

बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..

सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा

वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही कमळे आहेत की कमलिनी? कोणी तरी प्रकाश टाका.-- याला कुमुदिनी म्हणतात बहुतेक . कमळं मोठी असतात आकाराने . माझ्याकडे पण सेम पिवळ्या रंगाचे आहे.

https://www.maayboli.com/node/35684

कमळ माहिती...
Botanical name: Nelumbo nucifera Family: Nelumbonaceae (Lotus family)
Synonyms: Nelumbium speciosum
.............................
water lilly..
Botanical name: Nymphaea nouchali Family: Nymphaeaceae (waterlily family)

आहाहा नीरु, so lucky u. सुरेख रंग. आमच्याकडे कोकणात पांढरा आहे. इथे डोंबिवलीत लावलेत काही ठिकाणी ते पण पांढरेच आहेत.

ननी मस्त फोटो. तुझ्या बागेतले अजून फोटो टाक ना.

शशांकजी खूप दिवसांनी दिसलात.

ननि, तुम्ही चुकून थंबनेल डकवलाय का?.....दिसत नाहीये का? बराच वेळ अपलोड होत नव्हतं म्हणून कुठे कुठे क्लिक करत होते
अंजू उद्या टाकते .तुझा आवडता सोनटक्का कालच फुललाय प्रथम या सीझनमध्ये

शशांकजी/जागू,
माझ्या इको पाँड मधल्या फुलांना २१ पेक्षा जास्त पाकळ्या आहेत असं दिसतंय..
तर ती फुलं कमळाची की लिलीची..

कमळांचा विषय निघालाय तर माॅरिशसचा बोटॅनिकल गार्डन मधला हा कमल तलाव.. (हा माझा खूप लाडका फोटो)

IMG-20180811-WA0084.jpg

आणि हा त्याच्या पानाचा, कमलपत्राचा प्रचि..
(ह्याचंही प्रतिबिंब आवडीचं )

IMG-20180811-WA0083.jpg

वाईट एकाच गोष्टीचं की विजोड आवडीची सोबत बरोबर असल्यामुळे जिथे कमीतकमी एक आख्खा दिवस तरी वेळ द्यायला पाहिजे तिथे आमच्या मित्रांनी उदारपणे फक्त एक तास काढू दिला.... आणि मागे चल रे, चल रे चा धोशा.. Angry

शशांकजी/जागू,
माझ्या इको पाँड मधल्या फुलांना २१ पेक्षा जास्त पाकळ्या आहेत असं दिसतंय..
तर ती फुलं कमळाची की लिलीची >>>>>
हा फरक पाकळ्यांवर अवलंबून नाहीये. कमळाला नंतर पाकळ्या गळून गेल्यावर मखाणे/कमळबिया येतात.
वॉटरलिलिमधे अशा बिया नसतात.
वर मी जी लिंक दिली आहे त्यातील फोटोवरून फरक लक्षात यावा किंवा गूगलबाबा आहेच मदतीला.... Happy

मढ (माळशेज) मामाचा गाव. रविवार सार्थकी लागला! Happy (मोबाईल कॅमेरा असल्याने फोटो व्यवस्थित नाही आले. कॅमेरा काढायच्या व्यापात पडलो नाही.)

FFF1FE9A-CBB7-4BEB-ABEF-CD82C170E7DE.jpeg

971A7D4B-23A9-4119-8E84-7AE086A6B9F3.jpeg

2060ACB3-C77C-466E-8EAD-3CEF993635DE.jpeg

33CC81E0-994C-4A2F-931E-B9EE097FDE07.jpeg

इथे कुणी मधेघाट/मढेघाट गेलय का?
मी आणि माझी मैत्रीण जायचा विचार करतोय.. दोघीच दोघींनी जाण्यासारखा आहे का?
तिला नाही पण मला पिसाळलेल्या लोकांची भिती वाटते.. आणि पिऊन झुंडीने फिरणार्‍यांची जरा जास्तच या सिझन मधे.. प्लिज सांगा..

टीना, पुण्यातुन पाबे घाटातुन वेल्हा मग सरळ केळद. अप्रतिम प्रवास! मी दर वर्षी जातो पण मला तरी हुल्लडबाजांचा त्रास झाला नाही. जेवणाची सोय होते पण आम्ही घरूनच खादाडीची सगळी व्यवस्था करून जातो. (सोबत शक्यतो थोडे खाद्यपदार्थात ठेवा.) तुम्ही पुण्यात असाल तर मढे घाट काय, मावळात कुठेही फिरा, निसर्गाची ईतकी मोहक रुपे दिसतील की हरखून जाल. दोघीच जाणार असाल तर जरा काळजी घ्या ईतकेच. (ती सह्याद्रीत कुठेही गेलात तरी घ्यावीच लागते. म्हणजे घ्यावी.)

माहितीबद्दल धन्यवाद शाली... आम्ही दोघीच अ‍ॅक्टिव्हाने जाण्याचा विचार करत आहो.. कार येत नाही चालवता खरतर Sad ..
मी तिला म्हटल कि निदान आणखी एक दोघे सोबत घेऊया कारण तेच.. पोरी दिसल्या कि हुल्लडबाजीला उधान येते लोकांच्या म्हणुन बाकी काही नाही.. एखादी रेंटल कार मिळाली तर माझ्या एखाद्या कझिनला घेऊन जावे असा विचार आहे माझा..
प्रश्न एकच असतो कि आम्ही दोघीही आहो निसर्गात रमणार्‍या पण सोबतची व्यक्ती तशी असतेच असं नाही ना म्हणुन वाटत उगा तिसर्‍याला एंटरटेन करायचं काम पडायला नको आणि निसर्गासोबत एक मी टाईम मिळावा.

शक्यतो ॲक्टीव्हा नको. पुण्यातून एका कॉलवर कार मिळेल. सोयीचे पडते. मुलींना पाहून कोणी त्रास देईल असे नाही पण फक्त दोघींनीच जावे हे नको. त्यात मजा नाही आणि सुरक्षितताही नाही. स्वतंत्र धागा काढा. योग्य सल्ले मिळतील. पण मढेघाटला जावून या नक्की. छानच आहे.

शुभ सायंकाळ....

IMG-20180816-WA0000.jpg

ही हेमकुट टेकडीवरच्या (हंपी) देवळांच्या परिसरातील सुरम्य, गूढ सायंकाळ...

शाली, निरु अप्रतिम फोटो.

माळशेज घाट मनाच्या खूप जवळचा. चार वर्षे श्रीरामपूरला होतो पूर्वी, तेव्हा डोंबिवलीला माहेरी बरेचदा येणं व्हायचं तेव्हा श्रीरामपूर कल्याण बसने माळशेज घाटातून प्रवास करायचे. अप्रतिम निसर्गसौंदर्य. ढग उतरायचे असे समोर तेव्हा अगदी आहाहा व्हायचं.

पावट्याच्या फुलांचे आणि शेंगाचे फोटो टाकतेय. गोड मानून घ्या. मोबाईलवरुन काढलेत. फोटोग्राफीची नजर माझ्याकडे नाही, तंत्रज्ञान समजत नाही एवढं.

merged final.jpg (48.73 KB)
merged final.jpgghevda4_425_0.jpg (40.42 KB)ghevda4_425_0.jpg

धागा थंड का पडलाय?
माझा जुनाच फोटो टाकतोय. कॅमेरा अर्थात मोबाईलचा.

padmanabh.jpg

कसले एकसे एक अप्रतिम फोटो आहेत. डोळ्यांचं पारणं फिटलं अगदी. निरू, शाली, जागुताई आणि इतर सर्वांना पण धन्यवाद या सुंदर फोटोज साठी.
@ शाली>> तो गुहागरवाला निळसर फुलांचा फोटो आहे त्या फुलांचा वास घेऊन पाहिलेला का??

Pages