'रोमिओ ज्युलिएट' पासून 'ब्युटी अँड द बीस्ट' पर्यंत
'गॉडफादर' पासून 'सेक्रेड गेम्स' पर्यंत,
'सिंहासन' पासून 'गेम ऑफ थ्रोन्स' पर्यंत
'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' पासून 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' पर्यंत आणि
'शायनिंग थ्रू' पासून 'राझी' पर्यंत
ह्या सगळ्या चित्रपटांना जोडणारा समान धागा कुठला असे विचारले तर पटकन लक्षात येते की हे सगळे चित्रपट लिखित स्वरूपातील साहित्यकृतीवर आधारलेले आहेत.
आपण दरवर्षी शेकडो चित्रपट/नाटके/वेबसिरिज/डॉक्युंमेंट्री बघतो पण दरवेळी त्या कलाकृतीचा मूळ ऊगम तिचा जन्मदाता आपल्याला अनभिज्ञ असतो.थोडा प्रयत्न केल्यास आपण साहित्यकृतीवर आधारित चित्रपट/नाटके/वेबसिरिज/डॉक्युंमेंट्री ची जंत्री ईथे बनवू शकतो. सगळ्यांना ह्या माहितीचा निश्चितच ऊपयोगी होईल.
साहित्य आणि सिनेमाचे भाषेचे बंधन नाही. साहित्य आणि चित्रपटाची जुजबी माहिती (उदा. साल, लेखक वगैरे) आणि दोहोंची लिंक जोडणारा एकतरी दुवा (ऊदा. विकी लिंक) प्रतिसादात दिल्यास अधिक माहिती मिळवू ईच्छिणार्याला सुरूवात करण्यास सोपे जाईल.
डॉक्युमेंट्री आणि नाटकांसाठी यू-ट्यूब वा तत्सम विडिओज चालतील, पण घटना/भाषणे/गाणी/फॅनमेड विडिओज टाळल्यास बरे होईल.
पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुस्तक आणि चित्रपटाबद्दल तुमची मते, अभ्यास, संशोधन, माहिती प्रतिसादात नक्की लिहा.
लिखित कलाकृती आधी आणि त्यावर बेतलेले चित्रपट/नाटक/ वेबसिरिज हे महत्व अधोरेखीत करण्यासाठी धागा चित्रपट सदरात न ऊघडता 'वाचू आनंदे' ह्या सदरात ऊघडला आहे.
जुना (सध्या बंद पडलेला) धागा असल्यास त्या धाग्याची लिंक ईथे टाकून हा धागा पुढे चालवू शकतो.
टीप - प्रतिसाद देतांना पुस्तकाचे/सिनेमाचे नाव बोल्ड टाईपमध्ये लिहाल्यास चाळतांना सोपे जाईल एखादे नाव सापडायला.
'द गॉडफादर'
धाग्यात गॉडफादरचे नाव आले आहे तर सुरूवात गॉडफादरनेच करतो.
१९६९ साली आलेल्या मारिओ पुझोच्या 'द गॉडफादर' ह्या कादंबरीवरच बेतलेला पहिला सिनेमा 'द गॉडफादर' १९७२ साली आला आणि त्यानंतर ऊरलेले दोन भाग १९७४ आणि १९९० साली आले. 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' आणि नंतर 'हॅरी पॉटर पुस्तकांना' लोकाश्रय मिळण्याआधी बायबल खालोखाल सर्वात जास्तं वाचली/विकली गेलेली कादंबरी होती गॉडफादर (ऐकीव माहिती).
ईटलीतल्या सिसिली (जिथले योद्धे प्राचीन काळी शूरवीर म्हणून प्रसिद्धं होते) मधून सावकारापासून जीव वाचवून पळालेला एक लाजरा मुलगा अमेरिकेत येऊन सात घराण्यांनी व्यापलेल्या गुन्हेगारी जगताचा सगळ्यांना पुरून ऊरणारा अनभिशिक्त सम्राट कसा होतो त्याची आणि त्याच्या पुढच्या दोन पिढ्यांची कहानी म्हणजे 'गॉडफादर'
पुस्तक आणि चित्रपट दोन्हीही आपापल्या क्षेत्रात यश आणि गुणवत्तेचे मापदंड आहेत. चित्रपटाने, पुझो बरोबरच कपोला (डिरेक्टर), ब्रँडो, डी नीरो आणि अल पचिनोला अनंत काळासाठी यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.
मराठीतल्या सिंहासन आणि सामनासारखेच कधीही बघितले तरी आजिबात आऊटडेटेड न वाटणारे सिनेमे आहेत गॉडफादर. ह्या नंतर गुन्हेगारांना ग्लोरिफाय करणार्या सिनेमांची लाटच आली. रामूची 'सरकार' मालिकाही ह्यावरच बेतलेली आहे.
अर्धसत्य चित्रपट बनत असताना
अर्धसत्य चित्रपट बनत असताना पानवलकरांनी केलेल्या निरिक्षणांवर आधारित त्यांचे स्वतःचे 'शुटिंग' नावाचे एक पुस्तक देखिल आहे.
ऑलमोस्ट लाईक मेकिंग ऑफ अर्धसत्य.
हो हर्पेन मी ही हेच सांगणार
हो हर्पेन मी ही हेच सांगणार होते. ते पुस्तक होतं माझ्याकडे. ढापलं कुणीतरी.
पटकथेवर तेंडुलकरांनी बरेच काम केले होते. कथा वाढवलीही होती असे उल्लेख आहेत त्या पुस्तकात.
ते पुस्तक होतं माझ्याकडे.
ते पुस्तक होतं माझ्याकडे. ढापलं कुणीतरी.
आता नवीन मिळणं ही अवघड आहे
>>> अरेरे
पटकथेवर तेंडुलकरांनी बरेच काम केले होते. कथा वाढवलीही होती असे उल्लेख आहेत त्या पुस्तकात. +१
मस्त धागा.
मस्त धागा.
हॅरी पॉटर कसे राहिले इतका वेळ! वाचतोय आणि लिस्ट मध्ये टाकतोय.
>>>पुस्तक सुंदर आहेच व
>>>पुस्तक सुंदर आहेच व सिनेमाही तितकाच अप्रतिम. उत्पल दत्तनी भुवन शोमची भुमिका केली आहे तर सुहासिनी मुळेंनी गावाकडच्या मुलीची. मृणाल सेन दिग्दर्शक.
हा सिनेमा खरंच सुंदर आहे. मला फार आवडतो. आता पुस्तक पण वाचेन.
हॅ पॉ, लॉर्ड ऑफ द रिंग्ज,
हॅ पॉ, लॉर्ड ऑफ द रिंग्ज, शेक्सपीअर, शेरलॉक होम्स, गॉडफादर वगैरे वेगळ्याने लिहायची गरज आहे का अमितव?
वरती कुणीतरी फोर्सिथच्या जॅकल बद्दल लिहिले आहे, पण सिनेमा कितीही चांगला असला तरी कादंबरी शतपटीने जास्त उत्कंठावर्धक आहे.
फोर्सिथच्याच 'द फोर्थ प्रोटोकॉल' नामक अफाट थ्रिलरवर (माझ्यामते त्याची सर्वोत्कृष्ट थ्रिलर) त्याच नावाचा सिनेमा आहे. मायकेल केन आणि पीअर्स ब्रॉस्नन चा. पण सिनेमा अगदीच बंडल झालाय. मूळ कादंबरीचा आत्मा हा अॅक्शन नाहीये तर किम फिल्बी, तत्कालीन ब्रिटीश आणि सोविएत राजकारण इत्यादिच्या ताण्याबाण्यांवर आहे. सिनेमात मात्र फक्त अॅक्शनवर फोकस आलाय.
तसेच त्याच्याच ओडेसा फाईल आणि डॉग्ज ऑफ वॉर वर पण त्याच नावाचे चित्रपट आहेत
(रच्याकने, जॅकल मधला एडवर्ड फॉक्स उर्फ जॅकल म्हणजे गांधी चित्रपटातला जनरल डायर)
इतरही - लुडलम च्या बोर्न सीरीज वर सिनेमा आहे,
अॅलिस्टर मॅकलीनच्या थ्रिलर्सवर खूप गाजलेले चित्रपट आलेत
आईस स्टेशन झेब्रा वर सिनेमा आहे (रॉक हडसन आहे त्यात)
गन्स ऑफ नॅव्हेरॉन
व्हेअर ईगल्स डेअर
फोर्स टेन फ्रॉम नॅव्हेरॉन
यामधे 'गॉन विथ द विंड' पण
यामधे 'गॉन विथ द विंड' पण येतो.
गेन विद द विंड हा 1 9 3 9 अमेरिकन ऐतिहासिक रोमान्स चित्रपट आहे, जो मार्गारेट मिचेल च्या 1 9 36 च्या एकाच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट व्हिक्टर फ्लेमिंग यांनी दिग्दर्शित केला केला होता., हा चित्रपट जॉर्जटातील वृक्षारोपण मालकाच्या मजबूत-इच्छाशक्तीच्या कन्या स्कारलेट ओ'हाराची कथा सांगते. विवियन लेह (स्कार्लेट), क्लार्क गॅबल (रीटेट), लेस्ली हावर्ड (अॅश्ली) आणि ओलिविया डी हॅव्हीलँड (मेलानी) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रथम प्रकाशीत झाल्यावर हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला. बॉक्स ऑफिसच्या इतिहासातील हा अतिशय यशस्वी चित्रपट आहे. चित्रपट सर्व कालीन महान चित्रपट म्हणून ओळखला जातो.1 99 8 मध्येपहिल्यांदा अमेरिकन फिल्म इन्स्टिटय़ूंच्या यादीत पहिल्या 100 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
महानंदा ह्या दळवींच्या
महानंदा ह्या दळवींच्या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट आलेला. खूप पुर्वी पाहिलेला पण आता लिहिण्याजोगे चांगले वाईट काहीच आठवत नाही. 'माझे राणी माझे मोगा' हे गाणे मात्र आठवते. कादंबरी वाचलेली नाहीये.
पवनाकाठचा धोंडी ही गोनिदांची कादंबरी वाचल्ये. ह्याच नावाचा एक चित्रपट आहे. 'काय बाई सांगू, कसं गं सांगू' ह्या गाण्यामुळे माहित झालेला, बघितला मात्र नाही, चित्रपट गोनिदांच्या कादंबरीवरच आधारित आहे की नाही ते माहित नाही.
चक्र दळवींची मराठी कादंबरी ;
'चक्र' दळवींची मराठी कादंबरी ; त्याच नावाचा चित्रपट हिंदी स्मिता होती त्यात कादंबरी वाचली आहे चित्रपट पाहिला नाही.
'एक चादर मैली सी' हा सिनेमा
'एक चादर मैली सी' हा सिनेमा राजिंदरसिंग बेदी यांच्या याच नावाच्या उर्दू कादंबरीवर आधारित होता.
शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर
शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर वर 'बीबी और मकान' आणि 'अंगूर'.
त्याच्या मिडसमर नाईट्स ड्रीम वर मधे चित्रपट येणार होता असं ऐकलं होतं, पुढे काय झालं माहीत नाही.
टागोरांच्या नौकाडूबी कादंबरीवर त्याच नावाचा बंगाली चित्रपट आणि हिंदी चित्रपट घूंघट.
ऑस्कर वाईल्डच्या लॉर्ड आर्थर सव्हिलेज क्राईम वर मराठी चित्रपट विधिलिखित
The Shawshank Redemption हा
The Shawshank Redemption हा चित्रपट.>>>
लै भारी, मी तीनदा पाहिलाय. पुस्तकावरून असल्याचे आज कळले.
हा चित्रपट जॉर्जटातील
हा चित्रपट जॉर्जटातील वृक्षारोपण मालकाच्या मजबूत-इच्छाशक्तीच्या कन्या स्कारलेट ओ'हाराची कथा सांगते. >>> ही माहिती कोठे लिहीलेली आहे? पुलंच्या "खुर्च्या - एक न नाट्य" मधली अनेक वाक्ये आठवली.
हा चित्रपट जॉर्जटातील
हा चित्रपट जॉर्जटातील वृक्षारोपण मालकाच्या मजबूत-इच्छाशक्तीच्या कन्या स्कारलेट ओ'हाराची कथा सांगते.
हे गूगल भाषांतर असणार. स्कार्लेटचा बाप बडा रॅन्चर असतो, भरपूर गुलामांचा मालक.
>>>
ते गुगल ट्रान्स्लेशन असणार.
ते गुगल ट्रान्स्लेशन असणार.
प्लांटेशन = वृक्षारोपण वगैरे!
१९३० साली अमेरिकाभर पसरलेल्या
१९३० साली अमेरिकाभर पसरलेल्या द ग्रेट डिप्रेशन काळात टेक्सास, ओक्लाहामा सारख्या सदर्न आणि ओसाड्/दुष्काळी स्टेट्स मधून हिरव्या कॅलिफोर्नियाकडे निघालेल्या ३-४ लाख लोकांच्या 'द ग्रेट मायग्रेशन' वर आधारित नोबेल विनर जॉन स्टाईनबेकच्या 'ग्रेप्स ऑफ रॅथ' व आधारित त्याच नावाच सिनेमा आहे.
एका फॅमिलीच्या प्रवासाची, जीवनसंघर्षाची कहानी सांगत निघालेले हे पुस्तक फिलॉसॉफी, भांडवलशाही, सोशलिझम वरही अनेक प्रसंगातून भाष्य करत राहते.
केदारने ह्या पुस्तकाच्या केलेल्या विश्लेषणा चा लेख वाचनीय आहे.
ज्या रस्त्यावरून हे मायग्रेशन झाले त्या 'रूट ६६' ह्या रस्त्याने जर ह्या अनेक कुटुंबाच्या जीवनकहाण्या, त्यांची गाणी, जन्म, मृत्यू खाणे, संगीत सांगायला घेतले तर हजारो कांदबर्या आणि हजारो सिनेमे निघू शकतील.
'गॉन विथ द विंड' वर वेगळा
'गॉन विथ द विंड' वर वेगळा लेखच लिहावा लागेल.
पुस्तक, ज्याची सुरूवात आजारपणातला कंटाळा घालवण्यासाठी केलेल्या खरडीपासून झाली ते त्याच्या अनेक वर्षानंतरच्या प्रकाशनापर्यंत पर्यंतची कथाही मोठी सुरसच आहे.
स्कार्लेट चे नाव स्कार्लेट असे बदलण्यापूर्वी पॅन्सी की नॅन्सी होते असेही वाचले कुठे तरी.
गाइड -
गाइड -
आर के नारायणांच्या गाइड नावाच्या कादंबरीचा याच नावाचा सिनेमा विजय आनंदने दिग्दर्शित केला.
रोझी या नर्तिकेच्या व तिच्याबरोबरीने राजू या गाइडच्या आयुष्याची ही कहाणी. एका पुरातत्वशास्त्रज्ञाशी लग्न केलेली, पुर्वाश्रमीची नर्तिका पण लग्नानंतर संधी न मिळालेली रोझी नवर्याबरोबर त्याच्या कामाच्या साइटच्या ठिकाणी काही दिवसांकरीता येते. तिच्या नवर्याने स्थानिक गाइड राजूला वाटाड्या म्हणून कामावर घेतले असते. तिथे रोझीला राजूमध्ये आपला 'लिबरेटर' दिसतो. ती राजू बरोबर निघून जाते आणि राजूच्या मदतीने प्रसिद्ध कलाकार होते. राजूचे सामान्य असणे व रोझीचे प्रसिद्ध कलाकार होणे यातला संघर्ष सुरू होतो. रोझीला कला/साहित्य/कविता यांच्या गराड्यात राहायचे असते तर राजू तिच्यावर थोडासाच हक्क ठेवायचा प्रयत्न करतो. त्याला पैसा/यश सुख देत असते. यातून राजू एक गफला करतो आणि जेल मध्ये जातो. जेलमधून सुटलेला राजू घरी न परतता वेगळ्यात वाटेवर जातो.
पुस्तकातली रोझी उत्छृंखल आहे, फ्लर्ट आहे. सिनेमात ती तितकी फ्लर्ट दाखवलेली नाही. पुस्तकात विस्तारामुळे अनेक पदर उलगडतात. सिनेमात त्याला मर्यादा आहे. मात्र विजय आनंदने या सिनेमात कमाल केली आहे. देव आनंदनेही सुरेख काम केले आहे, वहिदा रेहमान तर अप्रतिमच. एस डी बर्मनांचे संगीत, लताचा आणि रफिचा आवाज हे या सिनेमात देव आणि वहिदा इतकेच महत्वाचे कलाकार आहे. कांटो से खीच के यें आचल या गाण्यात मुक्त झालेली, आनंदलेली, आयुष्यात वर जायच्या मार्गावर असलेली रोझी दाखवताना गाणे टिपेला सुरू करणे दादा बर्मनांचा मास्टरस्ट्रोक तर लताचा आवाज तिथे लागणे हे तिचे दैवी सामर्थ्य. मो से छल की ये जा आणि त्यातून पुढे येणारे क्या से क्या हुआ हे गाणे ऐकण्याची गोष्ट आहे, ते शब्दात मांडणे मला तरी अशक्य.
मला स्वतःला पुस्तकापेक्षा चित्रपट अधिक आवडतो. एक कारण म्हणजे संगीत. दुसरे म्हणजे आर के नारायणांचे इन्लिश मला ज्या ठिकाणी घडते तिथे कृत्रिम वाटते. आता तामिळनाडुत इन्ग्लिश कृत्रिमच असणार पण भाषेचा थोडा वेगळा लहेजा वापरून इंग्रजी नसलेल्या ठिकाणी घडणार्या कथा लिहिल्या गेल्या आहेत. विशेष करून संवादांमध्ये असा लहेजा आणला जातो.
रस्किन च्या पुस्तकांवर
रस्किन च्या पुस्तकांवर बेतलेले The Blue Umbrella आणि 'एक था रस्टी' च्या एपिसोड्स बद्दल लिहावे म्हणून काल माझी रस्किनची पुस्तकं सापडायला घेतली तर एकही सापडेना.. कोणाला दिली, कधी दिली काहीच आठवेना म्हणून जाम घोर लागलाये जीवाला.
९५ चे दूरदर्शनवरचे 'एक था रस्टी' चे एपिसोड्स पुसटसे आठवत आहेत.. नंतर दोन सीझन आल्याचे मात्रं माहितंच नव्हते.
The Blue Umbrella बद्दल लिहितो लवकरच.
कांटो से खीच के यें आचल या
कांटो से खीच के यें आचल या गाण्यात मुक्त झालेली, आनंदलेली, आयुष्यात वर जायच्या मार्गावर असलेली रोझी दाखवताना गाणे टिपेला सुरू करणे दादा बर्मनांचा मास्टरस्ट्रोक तर लताचा आवाज तिथे लागणे हे तिचे दैवी सामर्थ्य. मो से छल की ये जा आणि त्यातून पुढे येणारे क्या से क्या हुआ हे गाणे ऐकण्याची गोष्ट आहे, ते शब्दात मांडणे मला तरी अशक्य. >>> मस्त रे.
खालीद होसेनचं काइट रनर.
खालीद होसेनचं काइट रनर. पुस्तक आणि चित्रपट दोन्हि आत कुठेतरी पिळ पाडुन जातात...
विकास स्वरुप - स्लम्डॉग मिल्यनेर. पुस्तक वाचलेलं नाहि पण डॅनी बॉयलने कमाल केलेली आहे.
चेतन भगतचा उल्लेख इथे करु शकतो ना?..
कांटो से खीच के यें आचल या
कांटो से खीच के यें आचल या गाण्यात मुक्त झालेली, आनंदलेली, आयुष्यात वर जायच्या मार्गावर असलेली रोझी दाखवताना गाणे टिपेला सुरू करणे दादा बर्मनांचा मास्टरस्ट्रोक तर लताचा आवाज तिथे लागणे हे तिचे दैवी सामर्थ्य. >>> सही! ते टिपेला गाणे सुरू करणे वगैरे बद्दल मला जे वाटायचे ते परफेक्ट शब्दांत पकडले आहे! त्या गाण्यांची मजा काही वेगळीच आहे. गीतकार शैलेन्द्र ची खासियत म्हणजे ५-६ शब्दांच्या वाक्यांमधे किमान शब्दांत अर्थ चपखलपणे व्यक्त करणे - जी इथे "अपने कभी थे, अब है पराये" सारख्या ओळींमधे दिसणे, रफीचा आवाज, पण तितकेच किशोर-लता ने, आणि देव-वहीदा च्या अत्यंत ग्रेसफुल सादरीकरणाने "फ्रेश" करून टाकलेले 'गाता रहे मेरा दिल' - सगळेच जबरी.
चेतन भगतचा उल्लेख इथे करु
चेतन भगतचा उल्लेख इथे करु शकतो ना?.. Happy >> हो हो ...नक्कीच..
मी गाइड वाचलेली नाही. पण
मी गाइड वाचलेली नाही. पण सिनेमाची पारायणे केलीयेत आणि मला आजही सिनेमा प्रचंड आवडतो.
काही लोक कादंबरीची सर नाही सिनेमाला वगैरे म्हणतात. लेखकानेही माझ्या कादंबरीत भलतंच होतं आणि हे काय भलतंच असं म्हणलेलं आहे म्हणे (की ते 'मेरा नाम जोकर' बद्दल? ). ते असोच.
<आयन रॅन्डच्या फाउंटनहेड
<आयन रॅन्डच्या फाउंटनहेड कादंबरीवर सिनेमा निघालेला माहीत आहे, पण बघायची हिंमत झालेली नाही, होणार नाही. Happy>
मस्त आहे हा चित्रपट. पुस्तकाला न्याय देतो.
ओ हेन्री च्या द गिफ्ट ऑफ मॅगी
ओ हेन्री च्या द गिफ्ट ऑफ मॅगी वरून बनवलेला "रेनकोट" देखील चांगला आहे. अजय देवगण आणि ऐश्वर्या राय.
<आय होप कुणाला मिडसमर वर
<आय होप कुणाला मिडसमर वर हिंदी सिनेमा करण्याची अवदसा न सुचो. Proud>
मिडसमर नाईट्स ड्रीमवर मराठीत नाटक आहे, मतकरींचं, जादू तेरी नजर. भलतंच सोवळं आहे.
मस्त धागा
मस्त धागा
मतकरींनी केलंय म्हणजे एक
मतकरींनी केलंय म्हणजे एक अबव्ह अॅव्हरेज तरी नक्कीच असणार.
सोवळं असण्याला पर्याय नाही. मुळात मिडसमर हेच अत्यंत सोवळ्या अर्थाने घेणारी जनता आपली.
मिडसमर चे फार उत्तम भाषांतरही अस्तित्वात आहे. 'ऐन वसंतात अर्ध्या रात्री' या नावाचे. राजीव नाइकांनी केले आहे.
नंतर चेतनने रूपांतर केले होते. 'जंगल मे मंगल' या नावाने. अप्रतिम होत याचे प्रयोग. त्याने क्रॉस ड्रेसिंगचाही प्रयोग केला होता यामधे.
ते अजिबातच सोवळे बिवळे नव्हते. तरीही समांतर नाटकांमधली गोष्ट वेगळी आणि सिनेमातली वेगळी.
पण मराठी किंवा हिंदी सिनेमा झाला तर तो कमाल बावळट तरी होईल किंवा मग एकदम भोजपुरी सिनेमाला टशन टाइप. अशी आपली भिती.
मराठीत मुंबईचा जावई आणि
मराठीत मुंबईचा जावई आणि हिंदीत पिया का घर हे चित्रपट व.पुं.च्या कोणत्यातरी पुस्तकावरून काढलेले आहेत असे वाटते.
आणि दुनियादारीला विसरू नका
Pages