सॉरी बॉस! हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही!
जालावर एक मननीय ब्लॉगपोस्ट वाचण्यात आली :
हिंदी ही राष्ट्रभाषा? – एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम.
खेरीज 'हिंदू'मधील एक झकास माहितीपूर्ण लेखही वाचण्यात आला :
(इंग्लिश लेख) Hindi chauvinism
आज हे दोन लेख टाकण्यामागचं सूत्र म्हणजे - मो.क. गांधी! भारतीय प्रजासत्ताकाच्या शासनमान्य राष्ट्रपित्याचे हिंदुस्तानी (हिंदी+उर्दू मिसळ) स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा असावी असे एके काळी मत होते. काळाच्या ओघात (सुदैवाने) प्रजासत्ताकाची ती राष्ट्रभाषा झाली नाही (*१). पण हे वास्तव दडपून हिंदी प्रजासत्ताकाची राष्ट्रभाषा असल्याचा खोटारडा प्रचार चालवला जातो. या बुद्धिभेदाचे, फसव्या प्रचारतंत्राचे दुष्परिणाम महाराष्ट्रात - विशेषकरून मुंबईत - आपण बघतच आहोत (खुद्द हिंदी भाषेचं आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय (*२) हिंदीभाषिक प्रदेशांत नसून, महाराष्ट्रात - वर्ध्यात - आहे. आता बोला!).
मो.क. गांधी यांची जयंती आज भारतीय प्रजासत्ताकात साजरी केली जात आहे. त्याचं औचित्य साधून 'हिंदी ही भारतीय प्रजासत्ताकाची राष्ट्रभाषा नाही' (असा वस्तुनिष्ठ प्रचार) ठसवणारी ही रंगीबेरंगी पोस्ट!
तळटीप :
*१. भारतीय राज्यघटनेतील कलम ३४३ अनुसार (अधिकृत इंग्लिश दुवा) हिंदी भारताच्या संघराज्याची अधिकृत भाषा आहे. ३४३ व्या कलमातील अधिकृत नोंद असे म्हणते :
(इंग्लिश : ) The official language of the Union shall be Hindi in Devanagari script.
(मराठी भाषांतर : ) देवनागरी लिपीतील हिंदी ही संघराज्याची अधिकृत भाषा असेल.
घटनेत कुठेही 'राष्ट्रभाषा' किंवा 'राष्ट्रीय भाषा' असा उल्लेख नाही. किंबहुना नेमकेपणा अनुसरत हिंदीला 'official language of the Union' म्हटले असून, 'official language of the India' अशी संदिग्ध वाक्ययोजना नाही हे लक्षात घ्यायला हवे. भारतीय घटनेनुसार मराठीसह २२ भाषा भारताच्या मान्यताप्राप्त भाषा आहेत. त्यांची यादी आठव्या अनुसूचीत नोंदवली आहे.
'अधिकृत भाषा (Official language)' व 'राष्ट्रीय भाषा/राष्ट्रभाषा (National language)' यांमध्ये भेद असल्यास निस्संदिग्धपणे तसे-तसे उल्लेख त्या-त्या देशांच्या घटनांमध्ये नोंदवलेले असतात. याचं एक उदाहरण म्हणून सिंगापूरच्या प्रजासत्ताकाच्या घटनेतील कलम '१५३ अ' पाहता येईल. हे कलम म्हणते (इंग्लिश मजकूर):
Official languages and national language
153A. —(1) Malay, Mandarin, Tamil and English shall be the 4 official languages in Singapore.
(2) The national language shall be the Malay language and shall be in the Roman script:
Provided that —
(a) no person shall be prohibited or prevented from using or from teaching or learning any other language; and
(b) nothing in this Article shall prejudice the right of the Government to preserve and sustain the use and study of the language of any other community in Singapore.
यात सिंगापूरच्या प्रजासत्ताकाची 'मलय' ही 'राष्ट्रीय भाषा' आहे असा उल्लेख असून 'मलय, मँडरिन चिनी, तमिळ व इंग्लिश या चार अधिकृत भाषा आहेत' (यातील 'अधिकृत भाषा' / 'official language' असा उल्लेख भारतीय राज्यघटनेतील याच उल्लेखाच्या संदर्भात विशेष चिंतनीय आहे.) असा स्पष्ट उल्लेख आहे.
दुसरं उदाहरण पाकिस्तानाचं. पाकिस्तानी राज्यघटनेच्या २५१ व्या कलमानुसार 'उर्दू' ही पाकिस्तानाची 'राष्ट्रीय भाषा' आहे असे निस्संदिग्ध रित्या नोंदवले गेले आहे. इंग्लिश मजकूर :
(1) The National language of Pakistan is Urdu, and arrangements shall be made for its being used for official and other purposes within fifteen years from the commencing day.
(2) Subject to clause (1), the English language may be used for official purposes until arrangements are made for its replacement by Urdu.
(3) Without prejudice to the status of the National language, a Provincial Assembly may by law prescribe measures for the leaching, promotion and use of a Provincial language in addition to the National language.
यावरून एखाद्या देशाच्या राज्यघटनेत 'राष्ट्रीय भाषा (national language)' म्हणून उल्लेख असला, तर एखादी भाषा त्या देशाची राष्ट्रभाषा ठरते हे ध्यानी येईल. या निकषानुसार हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही, हे लक्षात येते.
*२. 'महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा' संस्थेचे अधिकृत संस्थळ (इंग्लिश व हिंदी भाषेतच उपलब्ध.)
उल्टा चोर कोतवाल को डाटे? मी
उल्टा चोर कोतवाल को डाटे?
मी थयथयाट काय केला आहे? सर्व भाषांमध्ये सामंजस्य असावे असा माझा नेहमीच प्रयत्न असतो व ते इथे माहीत आहे.
तुमचा तोल ढ्ळला आहे हे दिसते आहे.
अॅडमिन जरा नोन्द घ्या.
चला, भांडण पुरे करा
चला, भांडण पुरे करा बघू.
बहुतेक वाचकांना कॅटल क्लास म्हणजे काय, त्याची कल्पना एव्हाना आली असेलच.
अश्विनी पौर्णिमेनंतरचा काळ हा श्री म्हणजे लक्ष्मीच्या आगमनाचा काळ असल्याने आपण सुख शांतीचा संकल्प करू या.
१)मामी! तू तुझ्या फटाक्यांच्या दुकानात कॅश काऊंटरकडे धाव घे जरा. तुझे नोकर दिसेल त्याला उधारीवर फटाके देत सुटलेत.
२) फ! आमच्या पुढील महिन्यात प्रसिद्ध होणार्या 'पिशाच्चवाणी' विशेषांकासाठी तुम्ही 'थरारक थरूरचा थयथयाट' ही भयकथा लिहायला घ्या पाहू.
३) राम! तू उसगावातील 'यंग विमेन्स असोसिएशन'च्या सदस्यांना 'दिपावली : एक आनंदाचा सण' या विषयावर माहिती द्यायला जा बघू.
सण आहे दिव्यांचा. दिवे घ्या दिवे
>>सण आहे दिव्यांचा. दिवे घ्या
>>सण आहे दिव्यांचा. दिवे घ्या दिवे
हे बाकी सगळ्यात बेश्ट!!
एक निरीक्षणः
शीर्षकात इंग्रजी शब्द कशासाठी?
"माफ करा! हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही!" हे सुद्धा चाललं असतं.
माझ्यामते "हिन्दीला" तगवली अन
माझ्यामते "हिन्दीला" तगवली अन वाढवली ती मराठ्यान्च्या महाराष्ट्रात असलेल्या मुम्बै मधे बनत असलेल्या हिन्दी शिनेमान्नी! त्यालाच हल्ली बॉलीवुड की कायसेसे म्हणतात!
काय म्हणते जनता?
अगदी अगदी... मी पण याच मताचा
अगदी अगदी...
मी पण याच मताचा आहे....
limbutimbu, <<माझ्यामते
limbutimbu,
<<माझ्यामते "हिन्दीला" तगवली अन वाढवली ती मराठ्यान्च्या महाराष्ट्रात असलेल्या मुम्बै मधे बनत असलेल्या हिन्दी शिनेमान्नी! त्यालाच हल्ली बॉलीवुड की कायसेसे म्हणतात!
काय म्हणते जनता?>> खर आहे.
मग मराठी सिनेमे काय करत होते, हा प्रश्न आलाच की राव.
<<मग मराठी सिनेमे काय करत
<<मग मराठी सिनेमे काय करत होते, हा प्रश्न आलाच की राव.>>
मराठी सिनेमे, तेच का जे सरकारी अनुदानावर चालतात ?
अहो जी कला स्वतःच अस्तित्व टिकविण्यासाठी अनुदानाचं कुबड धरुन चालते, ते मराठीचं अस्तित्व वैगरे ............ छे.... न बोललेलं बरं.
थोडं विषयांतरः
त्या मराठी सिनेमांपेक्षा शाळेतली नाटकं तरी बरं असतात.
आणि मराठी हिरोबद्दल तर सांगु नका, तो लक्ष्या, अशोक सराफ, जाधव ते मकरंद आनसपुरे. हे म्हणे हिरो........ या सगळयामुळे मराठी सिनेम्याना टॉकिज मिळेनासे झाले, माझ्याकडे याचा मोठा अनुभव आहे. अहो मी आधी एका मराठी सेनेमा निर्मात्याकडे कामाला होतो, ( नाव विचारु नका) ज्यांच्या कडे मराठी सिनेमा तयार आहे, पण टॉकिज मिळत नाही म्हणून ४-६ महीन्यापासुन सिनेमा प्रदर्शीत न करता तसाच पडुन आहे अशी बरिच लोकं यायची आमच्याकडे. जरा मदत करा म्हणुन पाय झिजविणारे कितीतरी निर्माते मी स्वतः बघितले आहेत. आम्ही महिना २५,०००/- फिज घेउन काही सिनेम्याना टॉकीज मिळवुन दयायचो, (म्हणजे आजही तिथे हे काम चालुच आहे). अशी ही मराठी सिनेम्याची (Post Production)अवस्था आहे. आणि सिनेमा निर्माण करण्या आधी तो अनुदानात कसा बसेल यासाठी दिवसरात्र केलेले बजेट व मेहनतीची आठवण झाली.
विनोदी पॅटर्नच्या (काही अपवाद वगळता) चक्रातुन सुटका होईल या मराठी सिनेम्यांची ?
विषयांतर समाप्त.
>>> मग मराठी सिनेमे काय करत
>>> मग मराठी सिनेमे काय करत होते, हा प्रश्न आलाच की राव.
रुग्वेद, अतिशय कर्तव्य कठोर पद्धतीने विश्लेषण केले, तर मराठी सिनेमे अगदी चान्गल्या कथेसह बनतच होते, पण प्रेक्षकांस हिन्दी सिनेमातल्या कपडेपटापासून सगळ्ञाची भुरळ पडून तो तिकडे जाऊ लागला!
तर शहरातील प्रेक्षक, जिथे उपलब्ध आहे, तिथे नन्तर तो इन्ग्रजी पटान्कडे वळतो! (भले इन्ग्रजी समजत नसूदे, चित्रे तर समजतात? )
यात दादा कोन्डकेन्नी "प्रेक्षकान्च्या अभिरुचीला" साजेसा वेगळा प्रयोग केला व सतत दहा वर्षे यशस्वीपणे चालविला, पण ते तितकेच राहिले!
मला एक सान्गा, राजकपुरने आर्टच्या नावाखाली एक्स्पोझ करुन दाखविलेल्या (नावे घेत नाही) निरनिराळ्या नट्या बघायला मिळत अस्ताना, मराठीमधील नौवारी वा पाचवारीतील नट्या बघायला कोण जाणार हो? वास्तव हे कटू वाटल तरी असच आहे!
गम्मत अशी आहे की सुपरमॅनने ड्रेसबाहेरून सोनेरी "अन्डरवेअर" घातली तर नाके मुरडणार्यान्ना, जेव्हा आपल्याइथले सेन्सॉर कडक होते तेव्हान्च्या (पन्चवीस तीस वर्षान्पूर्वीच्या) हिन्दी नट्यान्चे कमरेवरचे, अन्ग तर झाकणारे पण विशिष्ट आकार दृगोच्चर करणारे स्पेशल दुरन्गी कपडे मात्र भावत होते... अजुनही भावतात, हा विरोधाभास की ढोन्गीपणा?
तर, मूळ सुत्र अस की हिन्दी सिनेमान्नी इये मराठीचिये नगरी हिन्दी रुजवली
लोक हिन्दी सिनेमे का बघत होते आवर्जुन? मराठि का बघत नव्हते? त्याचे कारण वर दिल हे!
याहून अधिक स्पष्ट शब्दात समजावुन सान्गायला हवे का?
मधुकरराव, तुम्ही का हो नाही काढला एखादा शिनुमा? मिळाल अस्त की तुम्हालाही अनुदान!
संपूर्ण चर्च वाचली. कुठल्याही
संपूर्ण चर्च वाचली. कुठल्याही निष्कर्षाला येणे कठीण आहे. मराठीचा अभिमान असना-यांना शुभेच्छा आणि हिंदी ही राष्ट्रभाषा / राजभाषा आहे / असावी अशी भूमिका असणा-यांनाही शुभेच्छा. भारताची एकच एक राजभाषा / राष्ट्रभाषा आहे / असावी असे वाटते का ?
असल्यास ती भाषा कोणती असावी असे वाटते ?
निकष काय असले पाहिजेत ?
भारतामध्ये सर्वाधिक राज्यांमधे बोलली जाणारी भारतीय भाषा कोणती ?
भारतामधे सर्वाधिक नागरिकांकडून प्रयोगात आणली जाणारी भाषा कोणती ?
मराठी ही राष्ट्रभाषा बनू शकते का ?
असल्यास त्यासाठी काय करावे लागेल ? मराठीचा अभिमान बाळगणा-यांनी या दूष्टीने पुढाकार घेतला आहे काय ? त्यादॄष्टीने काय प्रयत्न केले गेले आहेत ?
देशभर पसरलेल्या पण महाराष्ट्रातून सुरू झालेल्या चळवळींमधे कोणत्या भाषेचा प्रयोग केला जातो ?
अशा मुद्द्यांवर चर्चा होऊ शकेल का ?
limbutimbu, <<मधुकरराव,
limbutimbu,
<<मधुकरराव, तुम्ही का हो नाही काढला एखादा शिनुमा? मिळाल अस्त की तुम्हालाही अनुदान! >>
मी कलेवर प्रेम करणारा माणूस आहे बॉस, मग ती कला कुठल्याही भाषेत असो. मराठीच्या नावाखाली कच-याला कला म्हणुन स्विकारने मला नाही जमत, आणी उभ्या महाराष्ट्राने मराठी सिनेम्याना जागा दाखवुन दिली, ही क्रुतिने दिलेली प्रतिक्रिया सगळयानाच ज्ञात आहे.
मात्रुभाषेच्या नावावर काहिही विकायला निघालात कि नाही खपणार बॉस.
म्हणुन तर आता मराठीसिनेमा कात टाकतोय!
>>>>> म्हणुन तर आता
>>>>> म्हणुन तर आता मराठीसिनेमा कात टाकतोय!
कात??? कुणाची????
खर तर उभ्या महाराष्ट्राने मराठी सिनेमाबाबत आपली "उच्च की हुच्च अभिरुची" दाखवून दिली आहे, कशा बद्दल ते आधीच्या पोस्ट मधे मी लिहीलेच आहे!
अन त्यातुन आता मराठी सिनेमा "कात टाकतोय" अस म्हणता...; तर मला वेगळीच शन्का येऊ लागलीये!
नट्यान्च्या अन्गावरची एकेक वस्त्रे कमी कमी करत प्रेक्षकान्च्या हुच्च अभिरुचीला साजेसे खपाऊ मराठी शिनेमे बनवणे म्हणजेच "कात टाकणे" असेल तर मग काय हो! मज्जाच मज्जा!
याने फक्त एक होईल, तमासगिरी आधीच बोम्बललीये, अजुन बोम्बलेल!
मग लोककलेच्या नावाखाली तमाशान्ना अनुदान मिळणे चालू होईल (कदाचित आत्ताही मिळत असेल)
मग चुकुन माकुन आरार पाटील पुन्हा मन्त्री बनलेच, तर बिचार्यान्ना "बारबालान्सारखेच", "तमाशावरही कडी नजर ठेवावी" लागेल
बघा! एक करता कस कस एकेक निघत त्यातुन......!
<<नट्यान्च्या अन्गावरची एकेक
<<नट्यान्च्या अन्गावरची एकेक वस्त्रे कमी कमी करत प्रेक्षकान्च्या हुच्च अभिरुचीला साजेसे खपाऊ मराठी शिनेमे बनवणे म्हणजेच "कात टाकणे" असेल तर मग काय हो! मज्जाच मज्जा! >>
कपडे काढुन अंग दाखविल्याने सिनेमे चालले असते तर, ममता कुलकर्णी (नाव आठवतं का बघा) शिबा, मंदाकिनी, वैगरे वैगरे ना आज उत्क्रुष्ट अभीनेत्री म्हणुन जिवन गौरव पुरस्कार स्विकारतान बघाव लागलं असतं. ह्यातलं काही होत नाही याचा अर्थ हे असलं प्रकार करणारे बाहेर फेकल्या जातात व ज्याना हे लवर कळलं त्यानी (बिपासा (कर्पोरेट), करीना(जब वी मेट)) थोडीफार का होईना अभिनयाची सुरुवात केली.
<<अन त्यातुन आता मराठी सिनेमा "कात टाकतोय" अस म्हणता...; तर मला वेगळीच शन्का येऊ लागलीय>>
हो, या दोन चार वर्षात अधुन मधुन येताहेत चांगले सिनेमे.
राशीभविष्यावर विश्वास नाही. नाहितर विचारलं असतं तुम्ही मीन राशीचे का, सारखी शंका करता ?
सप्रेम नमस्कार. निरनिराळ्या
सप्रेम नमस्कार.
निरनिराळ्या मित्रमैत्रिणींनी ह्याविषयात रस घेऊन पुढे केलेले मुद्दे पाहता ह्या विषयाचं महत्त्व समजून चुकतं. म्हणूनच तर लोकांसमोर सर्व वस्तुस्थिती ठेवण्याच्या उद्देशाने हा लेख प्रस्तुत केला होता. अर्थात विषय जरा किचकट आहे. त्याला कायदेशीर, राजकीय व भावनिक असे विविध प्रकारचे पैलू आहेत. त्याविषयाबद्दल नीट माहिती करून घ्यायची इच्छा असल्यास आमच्या (अमृतयात्री गटाच्या) अमृतमंथन अनुदिनीवरील मूळ लेख, त्याखालील सर्व चर्चा, इथे वरील श्री० फ (ह्यांना व्यक्तिशः आम्ही ओळखत नाही) व अमृतयात्री यांच्या उत्तरांतील मुद्दे नीट, अभ्यासपूर्वक वाचून त्यावर साकल्याने विचार करून मग त्यावर काही शंका असल्यास त्यांबद्दल लिहावे. आपण आपापल्या क्षेत्रांत तज्ज्ञ असणारच. पण तरीही वरवर वाचून झटपट मते बनवून शेरे ठोकण्याइतका प्रस्तुत विषय सोपाही नाही. यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली आहे व आपल्या विचारपूर्ण व रास्त शंकांसाठी अधिक अभ्यास करून उत्तर देण्याचीही आमची तयारी आहे.
वरीलप्रमाणे मूळ लेख व आनुषंगिक वाचन झाल्यावर खालील मुद्देही वाचावेत.
भारत सरकारच्या त्रिभाषा सूत्राबद्दल किंबहुना कुठल्याही कायदेशीर बाबीबद्दल आम्हाला आक्षेप नाही. उलट सर्व कायद्यातील बाबींचे पालन करताना इतर राज्यांत संबंदित राज्यभाषांना जेवढे महत्त्व, प्राथमिकता, अग्रक्रम, मान, दिला जातो, ते सर्व आमच्या राज्यात आम्हाला मिळाला पाहिजे; त्याहून अधिक नको पण त्यांच्याहून यत्किंचितही कमी नको; हाच आमचा आग्रह आहे.
हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही ही वस्तुस्थिती आहे. ती केवळ केंद्र सरकारची (अंतर्गत) व्यवहाराची भाषा आहे; किंबहुना याबाबतीत इंग्रजीचे स्थान तिने घ्यावे; अशी घटनाकारांना अपेक्षा होती. (ती देखिल सत्यात येण्याची लक्षणे अजून दिसत नाही आहेत.) अर्थात काहीही झाले तरीही सामान्य माणसाचा केंद्र सरकारच्या अंतर्गत व्यवहाराशी फारसा संबंध सहसा येत नाही. मात्र त्रिभाषा-सूत्रानुसार केंद्र सरकारनेदेखिल आमच्या राज्यात आमच्याशी प्राधान्याने आमच्या भाषेतूनच संवाद साधायला पाहिजे. आमच्या भाषेमागून हिंदी-इंग्रजी भाषासुद्धा उपस्थित असण्याला आमची हरकत नाही; पण आमची राज्यभाषा सर्वप्रथम असायलाच पाहिजे. आमच्या राज्यातील एखाद्या अतिसामान्य नागरिकाला देखिल त्याला केवळ स्थानिक राज्यभाषा मराठीच येते हिंदी-इंग्रजी समजत नाही म्हणून कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये. बहुजनसमाजाला सरकारने बहुजनसमाजाच्या भाषेतच सर्व प्रकारे सेवा, माहिती दिली पाहिजे. नाहीतर इंग्लंडमध्ये सोयीसाठी कायदे फ्रेंचमध्ये करून ते न कळणार्या सामान्य जनतेवर मनमानी करून कडक कारवाई केली जाई तसाच प्रकार होईल. (संदर्भ: रंगीबेरंगी सदरातील "इंग्रजी भाषेचा विजय" हा लेख वाचा.)
पण ही सर्व तत्त्वे जर केवळ महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांतच राबवली जाणार असतील व आमच्यावर मात्र बेकायदेशीर रीतीने द्विभाषा-सूत्र (हिंदी-इंग्रजीचा समावेश असलेले व आमच्या राज्यभाषेचा जिथे-तिथे पाणउतारा करणारे) तर मात्र आम्ही त्याला कडाडून विरोधच करू.
साधे उदाहरण घेऊ. उत्तरेकडून येणारा प्रत्येक राजकारणी महाराष्ट्रात आल्यावर “हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, म्हणून आपण हिंदी शिकायलाच पाहिजे, तिचा आदर करायलाच पाहिजे” इत्यादी (असत्य) पुन्हापुन्हा घोकून दाखवतो. सर्व राष्ट्रीयीकृत बॅंका, केंद्र सरकारी विभाग, टपाल खाते, रेल-वे, सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) कंपन्या इथे तोच धोशा लावलेला असतो, कार्यालयांत येणार्या सर्वजनांनी वाचण्यासाठी सर्वत्र पाट्या लावल्या असतात. सर्व फॉर्म व सूचना-फलक मराठीला डच्चू देऊन हिंदीत असतात. पण हेच राजकारणी इतर कुठल्याही अहिंदी स्वाभिमानी राज्यात गेले की ही सर्व तत्त्वे अचानक पालटतात. ही मंडळी तिथे जाऊन त्या राज्याच्या भाषेच्या व संस्कृतीच्या आरत्या म्हणतात; तसेच केंद्र सरकार, किंवा त्यांचा पक्ष (जो असेल तो) त्या राज्याच्या भाषिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी कशी आटोकाट मदत करतो आहे याचे रसभरीत वर्णन करतात. विविध सरकारी संस्थासुद्धा राज्यभाषेला सर्वाधिक महत्त्व देतात. बर्याच वेळा हिंदीलाच डच्चू दिला जातो. बंगळूरूमध्ये अनेक दशके कानडी माणसांच्यापेक्षा तमिळ भाषक कितीतरी अधिक संख्येने रहात असूनही तिथे सर्व सरकारी कार्यालयात तमिळ किंवा हिंदी नव्हे तर कानडीच सर्वत्र दिमाखाने मिरवताना दिसते. पण महाराष्ट्रातील खेड्यात, अगदी आदिवासी भागातही, जिथे त्यांना हिंदी-इंग्रजीचा वासही लागलेला नसतो, तिथे सरकारी पाट्या, फॉर्म यांच्यावर सर्वत्र बेकायदेशीरपणे हिंदी-इंग्रजीच मराठीच्या नाकावर टिच्चून मिरवत असतात. हा दुटप्पीपणा का म्हणून? कायद्याने नेमून दिलेले आणि इतर राज्यभाषांना दिले जाणारे सर्व अधिकार, मान, महत्त्व आमच्या मराठी भाषेला द्यायलाच पाहिजेत – त्याहून जास्त नको; पण कणभरही कमी नको; एवढंच आमचं म्हणणं आहे. हे अयोग्य, बेकायदेशीर, अनैतिक म्हणता येईल का?
आपण अमृतमंथनवरील पन्हाळ्याच्या अनुभवाबद्दलचा लेख वाचला का? ही गोष्ट महाराष्ट्राच्या गावांतही सर्वसामान्य-नेहमीची-बिनमहत्त्वाची (normal-unimportant) अशी गणली जाते. परंतु तशीच गोष्ट इतर कुठल्याही राज्यातील गावात तर राहू दे, अगदी कोलकाता-बंगळूरसारख्या बहुभाषिक शहरांतही घडू शकेल काय? आणि चुकून माकून घडलीच तर त्या बॅंकेच्या शाखेचे काय होईल याची कल्पना आम्ही आपल्याला द्यायला नकोच.
देशात हिंदी भाषा सुमारे ३०-४०% जनतेला येते. ती देखिल ठराविक राज्यांतच. तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र, ओरिसा, आसाम, अरुणाचल, नागालॅंड इत्यादी राज्यांत हिंदी जाणणार्यांचे प्रमाण नगण्य आहे. इतर अहिंदी राज्यांत (महाराष्ट्रासकट) अत्यंत ग्रामीण, अप्रगत, आदिवासी भागात हिंदी-इंग्रजी फारसे ऐकलेले नसते ही वस्तुस्थिती आपल्यापैकी नागरी भागांत राहणार्या मंडळींना माहित नसेल. म्हणजे केवळ हिंदी भाषेच्या जोरावर आपण देशभर मोकळेपणाने फिरू शकतच नाही. तरीही आम्ही हिंदी माहित करून घ्यावी असेच म्हणू. कारण ती त्यातल्यात्यात सेतु भाषा ठरण्यास इतर भाषांपेक्षा अधिक योग्य आहे. भारतीय प्रजासत्ताक पद्धतीत १०% मते मिळवणारा माणूस १००% जनतेचा प्रतिनिधी ठरतो तसे म्हणा फार तर. असो. शेजार्याशी संबंध ठेवण्यासाठी त्याची भाषा जाणून घेणे चांगले. पण तेवढीच तिची मर्यादा. तिने आमच्या मायबोलीची जागा घेऊ नये.
देशाच्या भाषावार प्रांतरचना व इतर भाषाविषयक कायद्यांमध्ये हेच अभिप्रेत आहे; की प्रत्येकाने आपापल्या भाषेचा उत्कर्ष साधावा व एकत्रितपणे राष्ट्राचा उद्धार साधावा. मी माझ्या शेजार्याच्या मुलाशी चांगले वागीन, मधून कधीतरी त्याला लाडू वगैरे देईन पण; सातत्याने, प्रेमाने व निष्ठेने मी माझ्या मुलाचाच सांभाळ व संगोपन करतो, त्याला चांगले शिक्षण-संस्कार मिळून त्याची उन्नती करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाने आपला मुलगा चांगला नागरिक केला तरी संपूर्ण समाज चांगला होईल; त्यासाठी प्रत्येकाने आपली मुले सोडून दुसर्याच्या मुलाचे (जरी तो बड्या बापाचा बेटा असला तरीही) सतत कौतुक करून आपल्या मुलाची हेळसांड करणे योग्य नाही आणि कुठल्याही कायद्यास तसे अपेक्षितही नाही.
कर्नाटक शासन विरुद्ध इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पालक संघाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय म्हणाले:
“कोणाला आवडो अथवा न आवडो, परंतु या देशात भाषावार राज्यरचना व्यवस्थित प्रस्थापित झाली आहे. अशा भाषावार राज्यरचनेचा हेतु आणि उद्देश असे आहेत की त्या-त्या राज्यातील लोकांची त्या-त्या राज्यातील भाषेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधण्यासाठी अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे.”
महाराष्ट्र शासन विरुद्ध अल्पसंख्य भाषक शाळांचे प्रतिनिधी यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय म्हणाले:
“वस्तुतः पहायला (ipso facto) गेल्यास एखाद्या राज्यात वास्तव्य करणार्या लोकांना तेथील स्थानिक भाषा शिकण्यास सांगता कामा नये असे प्रतिपादन मुळीच मान्य करता येणार नाही. परक्या प्रदेशात राहताना भाषिक अल्पसंख्यांकांनी स्थानिक भाषा शिकून घ्यायला पाहिजे हे उचितच आहे. आमच्या मते स्थानिक भाषा शिकण्यास विरोधाच्या भावनेचे पर्यवसान समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहापासून अलग होण्यात होते आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यात भाषेवर आधारित विखंडन (तुकडे-तुकडे पडणे) होते व तसे घडणे ही राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने निंद्य गोष्ट आहे.”
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती देशात सर्वत्र समजली जात नाही. तरीही आम्ही हिंदी माहित करून घ्यावी असेच म्हणू. शेजार्याशी संबंध ठेवण्यासाठी सेतु भाषा जाणून घेणे चांगले. पण तेवढीच तिची मर्यादा. तिने आमच्या मायबोलीची जागा घेऊ नये. आपण आपल्या भाषेचा अभिमान धरायलाच पाहिजे; आपल्या राज्यात स्वभाषेचा आग्रह धरायलाच पाहिजे; संवादभाषा, शिक्षणभाषा, ज्ञानभाषा, माहितीभाषा अशा विविध दृष्टीकोनातून तिचा सतत विकास साधायलाच पाहिजे.
अर्थात याबाबतीत आपल्याला अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही पातळ्यांवर जागृती घडवायला हवी. स्थानिक मराठी माणसांना औदासिन्याच्या-न्यूनगंडाच्या गर्तेतून बाहेर काढायला हवं आणि त्याच बरोबर मराठीची गळचेपी करणार्यांना बाणेदारपणे त्यांची कायदेशीर जागा दाखवून द्यायला हवी.
स्वातंत्र्योत्तर भारताने देशी भाषांची पुरेशी काळजी न घेतल्याने आपण इंग्रजीवरही अत्यधिक अवलंबून आहोत. तेव्हा ती भाषा तर नीट शिकायलाच पाहिजे आणि मग त्याभाषेतील ज्ञान स्वभाषेत आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे सर्व जपान, इस्रायल आदी देशांनी फार पूर्वीच केले. (ब्राझिल, कोरिया, चीनसारखे देशही आता करू लागले आहेत.) त्यामुळे त्या देशात अधिक मूलभूत संशोधन झाले. आपण मूलतः भारतीय वंशाच्या व्यक्तीस परदेशात केलेल्या कार्याबद्दल नोबेल पारितोषक मिळाल्यावर आपली पाठ थोपटून घेतो. त्यात फार काही अर्थ नाही. तसं म्हटलं तर आपण सर्वच एका वंशाचे, कारण एकाच अमिबापासून निर्माण झालो; म्हणजे सर्वच नोबेल पारितोषक विजेते आमच्याच वंशाचे. ते खरंही आहे. पण तरीही प्रत्येकाने आपापल्या कुटुंबाचा, गावाचा, राज्याचा, देशाचा, योग्य उत्कर्ष घडवावा. तोही विश्वकल्याणाचाच भाग ठरेल.
क०लो०अ०
- अमृतयात्री
बाप रे! वाचेन नंतर सावकाश...
बाप रे! वाचेन नंतर सावकाश...
>>>>> कपडे काढुन अंग
>>>>> कपडे काढुन अंग दाखविल्याने सिनेमे चालले असते तर, ममता कुलकर्णी (नाव आठवतं का बघा) शिबा, मंदाकिनी, वैगरे वैगरे ना आज उत्क्रुष्ट अभीनेत्री म्हणुन जिवन गौरव पुरस्कार स्विकारतान बघाव लागलं असतं. ह्यातलं काही होत नाही याचा अर्थ हे असलं प्रकार करणारे बाहेर फेकल्या जातात व ज्याना हे लवर कळलं त्यानी (बिपासा (कर्पोरेट), करीना(जब वी मेट)) थोडीफार का होईना अभिनयाची सुरुवात केली.
याच्यात प्रेक्षकान्च्या अभिरुचीचा विषय कुठ हे??? त्यावर बोला की राव! त्या नट्या आल्या गेल्या, पण त्यान्चे शिनुमे तर पब्लिकनीच डोक्यावर घेतले ना? निर्मात्यान्चा धन्दा झाला, नट्यान्ना प्रसिद्धी मिळाली, पब्लिकला नेत्रसुख मिलाल, हे सर्व हिन्दी शिनुमातून....... ते का नाकारता? नाकारत नसाल तर विषयान्तर का करता जिवनगौरवपुरस्कार वगैरेचे? मूळ विषय काय? हे पुरस्कार फिरस्कार कशाला मधे?
गावाकडे कधी जात नाही वाटत तुम्ही तमाशे बघायला! आता तर तिथेही शिनुमासारख्याच खोडी चालतात! बघा एकदा डोळे भरून!
अमृतयात्री, चिंतनीय पोस्ट!
अमृतयात्री, चिंतनीय पोस्ट! धन्यवाद!
बरं लिंबुजी, कपडे काढल्यानेच
बरं लिंबुजी,
कपडे काढल्यानेच सिनेमे चालतात हे जर मान्य कराचंच म्हटल,
तर श्वास, मी शिवाजीराजे भोसले बोलतो वैगरे सिनेमे कसे काय चालले कपडे न काढता?
म्हणजेच कपडे काढल्याने सिनेमे चालतात हे समिकरणच चुकिच आहे.
आपण मूलतः भारतीय वंशाच्या
आपण मूलतः भारतीय वंशाच्या व्यक्तीस परदेशात केलेल्या कार्याबद्दल नोबेल पारितोषक मिळाल्यावर आपली पाठ थोपटून घेतो. त्यात फार काही अर्थ नाही. तसं म्हटलं तर आपण सर्वच एका वंशाचे, कारण एकाच अमिबापासून निर्माण झालो; म्हणजे सर्वच नोबेल पारितोषक विजेते आमच्याच वंशाचे. ते खरंही आहे. पण तरीही प्रत्येकाने आपापल्या कुटुंबाचा, गावाचा, राज्याचा, देशाचा, योग्य उत्कर्ष घडवावा. तोही विश्वकल्याणाचाच भाग ठरेल.>> अम्रुतजी अनुमोदन. चान्गले पोस्ट.
१.अर्थात याबाबतीत आपल्याला
१.अर्थात याबाबतीत आपल्याला अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही पातळ्यांवर जागृती घडवायला हवी. २.स्थानिक मराठी माणसांना औदासिन्याच्या-न्यूनगंडाच्या गर्तेतून बाहेर काढायला हवं आणि
३.त्याच बरोबर मराठीची गळचेपी करणार्यांना बाणेदारपणे त्यांची कायदेशीर जागा दाखवून द्यायला हवी.
--------------------------------------------------------------------------------
मुद्दे १ आणि २ बद्दल काय करायचे याबद्दल काही प्लॅन असतील तर कृपया शेअर करा.
वाचायला आवडेल.
श्री०/श्रीमती mansmi18, आम्ही
श्री०/श्रीमती mansmi18,
आम्ही (अमृतयात्री गट) कोणी पुढारी नाही आहोत. पण तरीही स्वभाषेबद्दल प्रेम आणि अभिमान असणारी सामान्य माणसे म्हणूनही आमचे काही विचार आहेत. पण त्याबद्दल सविस्तर चर्चा करण्याआधी आपण खालील लेख वाचावेत असे आम्हाला वाटते. शक्य असल्यास लेखांखालील चर्चासुद्धा वाचा. हे सर्व वाचून आपल्याला "आपले कायद्याने काय अधिकार आहेत व आपण काय करू शकतो" याची कल्पना येईल. त्यानंतर आपण त्या मुद्द्यांवर चर्चा करू.
http://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/
http://amrutmanthan.wordpress.com/2009/09/18/पन्हाळा-एक-अनुभव-मराठी-मा/
Pages