Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जर खेळाप्रति खरी कमिटमेंट
जर खेळाप्रति खरी कमिटमेंट असेल, तर खेळाडू स्पष्टपणे आपला अग्रक्रम सरावालाच असल्याचं ठामपणे सांगेल . तसं झालंय?
एक मिनिट, मी कालच इंग्लंडच्या
एक मिनिट, मी कालच इंग्लंडच्या कोचची मुलाखत वाचली त्यात त्याने त्याला भारताची तयारी करणे चुकीची वाटली नाही असे मत नोंदवले आहे. त्याचे म्हणणे की भारत (ऑस्ट्रेलिया, आफ्रिका नि इंग्लंड) ह्या देशांचे वेळापत्रक इतके भरगच्च असते कि एक मेंटल फटीग येत असतो. तुम्ही कितीही सराव सामने खेळू म्हटलत तरी एका मोडे मधून खेळाडूंचा फोकस दुसर्या मोडमधे नेण्यासाठी मोठा ब्रेक, व्हेकेशन हेही तितकेच उपयुक्त ठरतात. For all we know that may be thinking behind Shastri's method too.
हा कुठला न्याय > > अरे ते वाक्य किती तरी दिवस वापरायचे होते.
तू उगाच ढ्गात जाउ नकोस.
"जर खेळाप्रति खरी कमिटमेंट
"जर खेळाप्रति खरी कमिटमेंट असेल, तर खेळाडू स्पष्टपणे आपला अग्रक्रम सरावालाच असल्याचं ठामपणे सांगेल . तसं झालंय?" - कुणास ठाऊक? सगळ्या गोष्टी बाहेर कळत नाहीत. पण मला नाही वाटत की अगदी खेळाप्रती निष्ठावान असलेल्या एखाद्या ज्युनियर खेळाडू ला रवी शास्त्री / कोहली ने ठरवलेल्या 'प्रॅक्टीस मॅच न खेळण्याच्या' निर्णयाबद्दल फारसं बोलण्याची मुभा असेल, किंवा बोललं गेलं तरी त्याला फारसं वजन असेल. महत्वाचा मुद्दा म्हणजे ही जवाबदारी खेळाडूंवर नाही, तर कोच / थिंक टँक वर आहे.
महत्वाचा मुद्दा म्हणजे ही
महत्वाचा मुद्दा म्हणजे ही जवाबदारी खेळाडूंवर नाही, तर कोच / थिंक टँक वर आहे. >> फेफ, मोदकं संपले माझ्याकडचे तुला देऊन देऊन.
ऊसेन बोल्टवरची नेफि डॉक्यू बघा. त्याचा कोच म्हणतो, 'तो कितीही मोठा चँपिअन असेल त्याच्या घरचा' माझ्या समोर दर सकाळी त्याने मी सांगितले तसेच वागले पाहिजे. एकदा बोल्ट पाय दुखावल्याने अडीच महिने जर्मनीला जाऊन ऊपचार घेऊन येतो. परत आल्यावर त्याला बघून कोच म्हणतो.. तू एक जाड्या बैल होऊन आला आहेस. माझे ऐकले नाहीस तर फायनल सोड क्वालिफायिंग राऊंडच्या पुढेही जात नाहीस तू.
तुझे काम फक्तं मी सांगतो तशी प्रॅक्टिस करणे आणि रेसमध्ये पळणे आहे. बाकी तू चँपिअन आहेस नाहीस मला देणे घेणे नाही पण १०० मी साठी तू माझी जबाबदारी आहेस.
आणि सगळ्यात भारी म्हणजे... तो सेम कोच बोल्टला २००, आणि ४ बाय १०० रिले ला कोच करत नाही. ते माझे काम नाही म्हणतो. त्या रेसेससाठी बोल्टला कोच नाहीये. असा असावा कोच.
Happy तू उगाच ढ्गात जाउ नकोस. >> असामीजी, मी ढगात जाऊन पाऊस पाडला म्हणून तर दोन दिवस जास्तीचे लागले लॉर्डस (ग्राऊंडचं नावंच आहे हो) वर.
मी ढगात जाऊन पाऊस पाडला
मी ढगात जाऊन पाऊस पाडला म्हणून तर दोन दिवस जास्तीचे लागले >> म्हणजे खर तर तुला बदलायची गरज आहे असे नाही होत का ?
"असामीजी, मी ढगात जाऊन पाऊस
"असामीजी, मी ढगात जाऊन पाऊस पाडला म्हणून तर दोन दिवस जास्तीचे लागले लॉर्डस (ग्राऊंडचं नावंच आहे हो) वर." -
कितीजण आप-आपल्या परीनं प्रयत्न करताहेत इंडियन टीम ला मदत करण्याचे.
कितीजण आप-आपल्या परीनं
कितीजण आप-आपल्या परीनं प्रयत्न करताहेत इंडियन टीम ला मदत करण्याचे. >> नाही तर काय करणार.
मला तर हॅरी पॉटरमधल्या लॉर्ड (पुन्हा आला रे हा) वॉल्डरमॉर्ट सारखा ढगात कवटीचा चेहरा काढून खालची आकाशवाणी म्हणून दाखवायची होती
You have fought stupidly, and in vain. I do not wish this. Every fall of Indian batsman is a terrible waste. I therefore command my showers to retreat. In their absence, dispose of your coach with dignity. Ravi Shastri, I now speak directly to you. On this series, you have allowed your players to contract stupidity from you, rather than disassociate yourself. There is no greater dishonor. Join me in the Press Box, and confront your fate. If you do not do this, I shall fail every last batsman, bowler and fielder who tries to conceal you from me.
भाऊ - अजित वाडेकर च्या काही
भाऊ - अजित वाडेकर च्या काही खास आठवणी? आम्ही क्रिकेट बघू लागायच्या बराच आधी तो निवृत्त झाला होता.
एबीपी च्या व्हॉअॅ वर फिरणार्
एबीपी च्या व्हॉअॅ वर फिरणार्या बातमीत "भारताला परदेशात सिरीज जिंकून देणारे पहिले कप्तान" म्हणून चुकीची माहिती आहे. तो मान पतौडीचा - १९६७ न्यू झीलण्ड.
RIP अजित वाडेकर!
RIP अजित वाडेकर!
अजित वाडेकर च्या मुलाखतीतला
अजित वाडेकर च्या मुलाखतीतला एक भाग -आपल्या कोच विषयी च्या चर्चेच्या निमित्तानं: "So, as a coach, if the players don't have any thinking power, the coach has to think [for them] and plan accordingly, and get things done. Whatever he has in mind, he has to communicate that and let it percolate down to the players: what he thinks of the position, the kind of planning needed to get the opposition out as early as possible, the kind of batting he expects from the players, etc."
वाडेकरना मन:पूर्वक
वाडेकरना मन:पूर्वक श्रद्धांजली.
वाडेकर अतिशय शैलीदार, आक्रमक डावरा फलंदाज , धूर्त कर्णधार व उत्तम 'कलोज - इन' क्षेत्ररक्षक ! चांगल्या फिरकी गोलंदाजीला आक्रमक क्षेत्ररक्षणाची जोड देवून तेज गोलंदाजीच्या अभावावर मात करतां येते , हें वे.इंडीज व इंग्लंडच्या दौरयांवर यशस्वीपणे सिद्ध करून दाखविणारा क्रिकेटमधील पहिला कर्णधार ! भारताला जिंकणयाची चटक व संवय लावणाराही पहिला कर्णधार !!
अॅथलीटचा कोच व क्रिकेटचा कोच यांत खूप फरक असावा; शिवाय, व्यक्तिगत कोच व सांघिक कोच यातही फरक आहेच.
(रिले रेसचा कोच न होण्यामागे बोलटचया कोचचं हेंच कारण असावं )
अजित वाडेकर यांना भावपूर्ण
अजित वाडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ह्याबद्दल काय म्हणता मंडळी ?
ह्याबद्दल काय म्हणता मंडळी ?
http://www.espncricinfo.com/story/_/id/24389028/india-batting-struggles-...
वाडेकरांना ज्या तर्हेने ७४ च्या दौर्या नंतर वागवले गेले ते आठवले कि आपण भारतीय क्रिकेट प्रेमी म्हणून काय मनोवुत्तीचे आहोत ह्याची कल्पना येते. अजून ६-७ वर्षे सलग मिळाली असती तर त्या संघाचे काय होउ शकले असते ह्याची कल्पना सुद्धा कसली सुंदर वाटते.
असामीजी, खेळ फक्त जिंकण्याची
असामीजी, खेळ फक्त जिंकण्याची झिंग अनुभवण्यासाठीच पाहिला जातो , तेंव्हा अशी मनोवृत्तीच तयार होते !
झाले गेले विसरून, आपले खेळाडू
झाले गेले विसरून, आपले खेळाडू एका नव्या जोमाने व जिद्दीने आपली राष्ट्रीय संघातील निवड योग्य आहे हे आजपासून सिध्द करताना पहायला मिळावं, ही आशा, अपेक्षा व प्रार्थना!
मन:पूर्वक शुभेच्छा!!
बेट लावा, पुढच्या तीन मॅसेच
बेट लावा, पुढच्या तीन मॅसेच जिंकून आपण सिरीज मारणार का?
पंत, बुमरा आत कार्तिक, यादव
पंत, बुमरा, धवन आत विजय, कार्तिक, यादव बाहेर..
बेट लावा, पुढच्या तीन मॅसेच
बेट लावा, पुढच्या तीन मॅसेच जिंकून आपण सिरीज मारणार का?
नवीन Submitted by हिम्सकूल on 18 August, 2018 - 16:35
>>>
हे आजवर इतिहासात एकदाच झालं आहे, आणि करणारे ३६ सालचे ऑसीज होते. त्यामुळे मी ही पैज विरुद्ध बाजूने घ्यायला तयार आहे.
धवनला लवकर भूक लागली म्हणून
धवनला लवकर भूक लागली म्हणून तो ३५ मिनिटे आधीच लंच ला गेला! त्यामुळे पुजाराला यावे लागले फलंदाजीला.
राहुलला पण भूक लागली. तो पण
राहुलला पण भूक लागली. तो पण गेला आणि रिव्ह्यू पण घेऊन गेला
तो पण गेला आणि रिव्ह्यू पण
तो पण गेला आणि रिव्ह्यू पण घेऊन गेला>>>तोंडी लावायला जेवताना!
तिसरा पण गेला.. जेवायला, आणि
तिसरा पण गेला.. जेवायला, आणि त्याच्या बरोबर लंच पण झाला.. कसले पनवती आहेत लेकाचे..
राहुल हमखास बरोबर बाद झाला
राहुल हमखास बरोबर बाद झाला असनार याची खात्री आपण इथे बसून देउ शकतो अन हा लेकाचा रिव्यू कशाला वाया घालवतोय? कोहलीसारखा मोठा खेळाडू वाचवायला रिव्ह्यू शिल्लक नोको का? उद्या इशांत शर्मा देखील रिव्ह्यू मागेल...
आजही अश्विन टॉप स्कोअरर राहणार तर....
हे शिंचे २०-२० च्या हिशेबाने धावा काढताहेत . १५-२० झाले की बस आता पुरेसे . २०-२० मध्य नाही का ३० धावानाही अर्धशतकाचा दर्जा आहे
टी-20 हिशेबाने दोघांनी तरी
टी-20 हिशेबाने दोघांनी तरी हाफ शतक मारले.
जादूची कांडी फिरलो नसली तरी
जादूची कांडी फिरली नसली तरी खेळात सुधारणा आहेच आहे . आपणही सकारात्मक अपेक्षा ठेवण्याइतपत !
50 ओव्हर 177/3 अगदीच वाईट
50 ओव्हर 177/3 अगदीच वाईट स्कोर नाहीये
रहाणे चांगला खेळत असताना बाद.
रहाणे चांगला खेळत असताना बाद...
४-२४१
नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा
नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा स्कोअर! Keep up !!
कोहली शतक हुकले... ५-२७९
कोहली शतक हुकले...
५-२७९
पंत ने टेस्ट मधल्या दुसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकून सुरुवात केली धावांची..
Pages