क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याच आर्टिकल मधून...
"Don't forget under Shastri and current support staff, we have lost major Test series in Australia (0-2 in 2014-15), South Africa (1-2 in 2017-18). Now we are in dire straits in England.

मला वाटतं, शास्त्रीला गेलं पाहिजे... कोहलीला जे हवं ते मिळालं होतं, शास्त्री सहित... पण टूरवरचे यश हुलकावणी देतच राहिले. आता त्याला हट्टं धरण्यासाठी त्याचा स्वतःचा पर्फॉर्मन्स सोडून फार काही ऊरले नाही.
रहाणेच्या भरवश्याच्या म्हशीला बसलेला टोणगा काही हटत नाही.. शास्त्रीनंतर मी त्याला बदलेन पुढच्या टेस्ट साठी.... लेखात म्हंटले तसे अश्विन ला व्हा. कॅप द्या.

जे चालत नाहीये ते बदलण्यासाठी कुठल्याही मॉडेलचा आधार घेण्याची गरज नाही... If you don't change anything nothing will change

ऑसी मॉडेल चाललं नाही, ती खेळाडूंची पिढी वेगळी होती. त्यांची मानसिकता वेगळी होती. ही पिढी तशी वाटत नाही. ह्यांना 'अरे' ला 'का रे' करायला शिकवावं लागत नाही. ह्यांना समोरच्या खेळाडूच्या रेप्युटेशन चं दडपण न घेता, आक्रमक खेळायला शिकवावं लागत नाही. हक्कानं वाढीव काँपेनसेशन मागून घेणारी, खेळण्याचे दिवस कमी करायला लावणार्या ह्या पिढीला perform or perish तत्वाचा बाऊ करायची गरज नाही.

perform or perish हेच फक्त ऑसी मॉडेल नाहिये रे. selection committee member having last word in playing eleven हे आहे. त्यावरून तिथे बरेच वाद झालेले आहेत. कोहली सारखा hot headed मनुष्य नि selection committee हे फारसे चालणारे नाही.

कोहली सारखा hot headed मनुष्य नि selection committee हे फारसे चालणारे नाही. >> त्याची स्टीम घरीच संपत असेल रे आता Lol
ऊगीच नाही तो सांगत फिरत की लग्नं झाल्यापासून तो हॉट हेडेड चा लेवल हेडेड झाला आहे... भलेभले अडेलतट्टू सरळ होतात............................आर्मीतला सासरा मिळाला की.
चोप्रांचा जावई बघशीलच तू आता Proud

इंग्लंडच्या दौरयासाठी निवडलेल्या संघाबाहेर असा एक तरी खेळाडू आहे का ( गावसकर, द्रविड, लक्ष्मण, सौरव सचिन इ.इ. वगळून ) ज्याच्या संघात असण्यानेच आपल्या कामगिरीत फरक पडला असता ? ह्याच संघाला शास्त्री शिवाय इतर कुणीही कोच असता, तर संघांच्या कामगिरीत फार फरक पडला असता ? आपल्या दारूण कामगिरीचं कारण मुखयत: इंग्लंडमधील वातावरणात व कसोटी सामने
खेळणयासाठी लागणार्या तंत्राचा , मानसिकतेचा, तपश्चर्येचा अभाव हेंच आहे. त्यावर खूप चर्चा होवूं शकते व व्हावीच. पण आत्तां तरी खेळाडू स्वत:ला सांवरून घेवून , वातावरणाशी जुळवून घेत आपला खेळ किती सुधारूं शकतात, हीच खरी कसोटी आहे . (After all, let us admit, this is the best talent presently available to us.) त्यासाठी खेळडूना कोच व सपोरटींग स्टाफ किती सहाय्यभूत ठरतो, एवढंच सध्यंतरी महत्वाचं!

.

भाऊ - बरोबर आहे तुमचे. पण याचे कारण हे ही असू शकते की आयपीएल, २०-२० मुळे आजकाल रणजी, दुलीप वगैरे मधे चमकणारे लोक आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. स्विंग चांगला खेळणारे व इंग्लंड मधे चमकलेले वेंगसरकर, द्रविड, अझर, गांगुली सारखे सध्याचे खेळाडू असतीलही पण ते जर २०-२० वाले नसतील तर त्यांना प्रोत्साहन फारसे मिळत नसेल. सध्याच्या संघात पुजारा सारखे एक दोन सोडले तर बरेचसे वन डे, २०-२० मधे दिसणारे लोकच आहेत.

फारएनड, एकदम मान्य व तशी चर्चा होणंच महत्वाचं, हेंच माझंही मत . पण आत्तां लढाई जुंपली असतांना, आहे त्या सैन्यदलावरच विसंबून रहाणयाला पर्याय नाही , इतकंच !
(शिवाय, असामान्य प्रतिभा सहसा लपून रहात नाही; गावसकर अझर , सचिन इ. ठळक उदाहरणं आहेतच. त्यामुळे, रणजीसारखया स्पर्धेतून चांगला कसोटी खेळाडू मिळण्याची शक्यता असली तरी निश्चिती नाहीच. )

शास्त्रीबद्दल सर्वांना राग आहे, पण जर मला कोच करणार असाल तरंच मी अर्ज भरतो असं म्हणून आलेल्या इसमाला इतक्या सहजी बाहेर केलं जाईल का? ईंग्लंड आणि ऑसीजनी २०११ ला व्हाईटवॉश देऊनही ना कर्णधार बदलला होता ना कोच. त्यामुळे शास्त्रीबुवा निश्चिंत असतील.

कोहली (टेस्ट्स मधे) चांगला कॅप्टन नाही हे आपण कधी अ‍ॅक्सेप्ट करणार? का कॅप्टनचा अ‍ॅज अ प्लेअर परफॉर्मन्स चांगला असला म्हणजे झालं? बरं, कोहली पलिकडे सध्या आपल्याकडे कॅप्टन व्हायच्या लायकीचा कोण खेळाडू आहे? त्यामुळे तो ही निश्चिंत.

शास्त्री ने एक नियम तर मोडला. सहसा, जो चांगला खेळाडू नसतो, तो चांगला कोच होतो. हा नियम शास्त्री आणी द्रविड, दोघांनी मोडला. Happy

फारएण्ड शी सहमत आहे. ४ दिवसाच्या, लाल चेंडूच्या सामन्याचं महत्व / प्रमाण कमी होत, टी-२० चं प्रमाण वाढल्याचं खेळाडूंच्या तंत्रात सुद्धा दिसून येतय. फूटवर्क चा, पेशन्स चा अभाव मॅच बघताना सुद्धा जाणवतो.

प्रश्न आहे ती टीम बदलण्याचा नाहीये, पण सपोर्ट स्टाफ बदलणं ही इतकी मोठी समस्या नसावी. २०११ च्या डिबॅकल नंतर टीम मधे बदल झाला नव्हता असं नाहीये. धोनी (श्रीनिवासन कृपेनं) वाचला होता, पण डंकन फ्लेचर गेला होता. द्रविड ने स्वेच्छेनं आणी लक्ष्मण ने धोनीच्छेनं निवृत्ती पत्करली होती.

कोहली वन-डे मधे जितका चांगला कॅप्टन आहे, तितका तो टेस्ट मधे प्रभावी ठरत नाहीये. माझ्या मते स्टार प्लेयर्स कॅप्टन म्हणून फार यशस्वी होत नसावेत. ते स्वतःच्या दर्जाच्या परफॉर्मन्सची इतरांकडूनही अपेक्षा ठेवतात. म्हणूनच, वाडेकर, अझहरुद्दीन, गांगुली हे जास्त यशस्वी टेस्ट कॅप्टन्स झाले. त्यांची मॅन-मॅनेजमेंट चांगली होती आणी ते स्वतः चांगले खेळाडू असले, तरी त्यांच्या काळातले स्टार्स नव्हते. पण मला नाही वाटत कोहली ला कधी कुणी कॅप्टन्सी वरून काढेल (इतक्यात तरी). त्यामुळे तो पर्याय नाहीये.

T20, ODI हे आजचे bread and butter आहेत. कुठलाही उदयोन्मुख खेळाडू ह्यामधे आपली कामगिरी सरस व्हावी ह्यासाठी प्रयत्न करत राहणार. त्यासाठी हवे ते बदल करणे ही त्याची priority राहणार. (उदा : पुजारा, हनुमा विहारी इ.) हा मानवी स्वभाव आहे. ह्याचा परीणाम टेस्ट बॅटिंग वर होत असेल तरी तो compromise करायला त्यांची तयारी असणे साहजिक आहे. (उदा. : विजय, राहाणे इ.) प्रत्येक जण कोहली सारखे ह्या format मधून त्या format मधे नि मागे पुढे सहज पणे transition करू शकत नाही. IPl मधे मिळत असलेला पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर मूळे आपल्याकडे हा problem जास्त प्रकर्षाने जाणवतो. पण ह्याचा अर्थ इतर देशांना हे भेडसावत नाहिये असे नाही. वेस्ट इंडीयन क्रिकेट हे जिवंत उदाहरण आहे. अगदी इग्लंड चे उदाहरण घ्या - त्यांनी प्रयत्नपूर्वक डॅशिंग ODI/T20 बनव्ण्याकडे लक्ष दिलेय. अगदी रूट सारखा बॅट्समन तळ्यात मळ्यात खेळतोय. limited overs performance वर बटलर, बेअर स्ट्रो टेस्ट टीम मधे घुसलेत. transition handle करू शकणारे २-३ खेळाडू मिळाले तर त्या देशाची टेस्ट टींम नशिबवान म्हणायची. नाही तर ह्या चर्चा झडतच राहणार.

प्रश्न आहे ती टीम बदलण्याचा नाहीये, पण सपोर्ट स्टाफ बदलणं ही इतकी मोठी समस्या नसावी. >> माझा गोंधळ होतोय बहुधा समजण्यामधे. आधी बर्गने हाच मुद्दा मांडला. आता तू. सपोर्ट स्टाफ मधे कोच धरतोयस का ? उत्तर होकारार्थी असेल तर नक्की कधी बदलावा असे तुला वाटतो ? World Cup च्या आधी कि नंतर ? अगदी टेस्ट सिरीज ५-० हरलो असे धरून World Cup आधी हा बदल व्हावा असे तुला वाटते का ? थोडक्यात बर्ग ला विचारलेलाच प्रश्न, ODI/T20 मधे problems येत नसताना टेस्ट टीम च्या performance basis वर ODI/T20 च्या pivotal moment च्या आधी असा बदल करावा असे तुला का सयुक्तिक वाटते ? वेगळ्या format साठी वेगळा कोच असावा असे सुचवत आहेस का ? ह्यात कुठेही accountability नको असे मी म्हणत नाहिये.

दारूण पराभवाबददल आपण इतर कुणावरही कितीही तोंड्सुख घेतलं, तरीही मुख्यतः दोष खेळाडूंकडेच जातो हें नाकारतां येणार नाही. चांगली कामगिरी खेळाडूंकडून झाली असती तर आपण कर्णधार, कोच , निवडसमिती याना लक्ष्य केलं असतं ? राष्ट्रीय संघात स्थान मिळवणारया खेळाडूकडून ज्या किमान अपेक्षा असतात, त्यात जर ते कमी पडले तर त्याना कोणतीही सबब सांगण्याचा अधिकारच रहात नाही. आत्तांची प्राथमिकता खेळाडूंनी हें मान्य करणं व खेळात .सुधारणा करणं याला व फक्त यालाच आहे ! पोस्ट माॅरटेम करायला नंतर भरपूर वेळ आहेच.

मान्य भाऊ (आत्तांची प्राथमिकता खेळाडूंनी हें मान्य करणं ) हे मात्र अजूनही होत नाहिये. Mental aspect म्हणे.

सपोर्ट स्टाफ मधे कोच नक्कीच येतो. त्याचं कॉन्ट्रॅक्ट वर्ल्ड-कप पर्यंत आहे, त्यामुळे काही होणार नाहीये, पण चर्चेसाठी म्हणायचं तर, काही हरकत नाही. अजून एक वर्ष आहे वर्ल्ड कप ला.

वन-डे/टी-२० मधे प्रॉब्लेम नाही असं मला नाही वाटत. तिथेही कोहली आणी धूमकेतू शर्मा सोडले, तर बॅटींग गॅप्स मोठ्या आहेत. एजिंग धोनी ला रिप्लेसमेंट न शोधणं ही मोठी चूक होती आणी ती वर्ल्डकप ला भोवायची शक्यता आहे. मधल्या फळीत किमान ३ तरी जागा शिल्लक आहेत.

बॅटींग गॅप्स मोठ्या आहेत. >> results do not agree रे. टीपीकल conditions घेतल्या तर पहिले तिघे बहुतेक मॅचेस काढून देत आहेत. मधल्या फळीचा problem आहे हे नक्की, ते expose होतात तेंव्हाच मॅचेस हरतोय. पण सपशेल शरणागती नाही होत आहे.

धोनी बद्दल लिहू नकोस रे, बागुलबुवा येतो Wink

"धोनी बद्दल लिहू नकोस रे, बागुलबुवा येतो" - Happy बरेच दिवसात बागुलबुवा फिरकलेला नाहीये इथे. Wink

"टीपीकल conditions घेतल्या तर पहिले तिघे बहुतेक मॅचेस काढून देत आहेत. मधल्या फळीचा problem आहे हे नक्की, ते expose होतात तेंव्हाच मॅचेस हरतोय" - अशी टीम कशी सिलेक्ट कशी करणार? नाहीतर पहिले तिघं आणी बॉलर्स इतकीच टीम पाठवता येईल ना. आपण नेहमीच पहिले तिघं मॅच जिंकून देतील असं गृहीतक नाही मांडू शकत.

वन-डे/टी-२० मधे प्रॉब्लेम नाही असं मला नाही वाटत. तिथेही कोहली आणी धूमकेतू शर्मा सोडले, तर बॅटींग गॅप्स मोठ्या आहेत. एजिंग धोनी ला रिप्लेसमेंट न शोधणं ही मोठी चूक होती आणी ती वर्ल्डकप ला भोवायची शक्यता आहे. मधल्या फळीत किमान ३ तरी जागा शिल्लक आहेत. >> +१००

टीपीकल conditions घेतल्या तर पहिले तिघे बहुतेक मॅचेस काढून देत आहेत. मधल्या फळीचा problem आहे हे नक्की, ते expose होतात तेंव्हाच मॅचेस हरतोय. (कुठे?) >> ईंडियामध्ये असे गृहीत धरले. ही बाब झाकून नेण्यासारखी आहे की मिरवण्यासारखी?
पण सपशेल शरणागती नाही होत आहे. >> असामीजी, तुम्ही हे वन-डे मॅचेस बद्दल बोलत आहात ना?
चँपिअन्स ट्रॉफीचे ताजेताजे ऊदाहरण आहे बघा शरणागतीचे जून जुलैच्या ईंग्लिश कंडिशन्स + अबव अ‍ॅवरेज स्विंग बोलिंग.

फे फे, "आपण नेहमीच पहिले तिघं मॅच जिंकून देतील असं गृहीतक नाही मांडू शकत." हे बरोबर आहे नि मधली फळी stable असायला हवी होती वगैरे वगैरे ही मान्य आहे, फक्त शास्त्री नि सपोर्ट स्टाफ बदलून हे कसे होईल हे मला लक्षात येत नाहीये. तू वर टीम बदल "प्रश्न आहे ती टीम बदलण्याचा नाहीये," असे म्हणालायस

शरणागतीचे जून जुलैच्या ईंग्लिश कंडिशन्स + अबव अ‍ॅवरेज स्विंग बोलिंग. >> हुकलायस का बाबा ? That was an exception. त्या नंतर किती वेळा हे झालय ? अगदी ह्या दौर्‍यामधेही नाही. World Cup ला अशा विकेट्स नसतील हे उघड आहे. काल तुला कारणही दिले होते. साधे commercial गणित आहे. इंग्लंडला सुद्धा झेपणारे नाही. ह्या World Cup चे सोड. १९९९ मधला बघ तेंव्हाही बॅटसमन ला धार्जीण्या विकेट्स होत्या. अगदी आफ्रिके मधल्या २००४ किंवा down under २०११ च्या वेळच्या आठव. एखादी चुकार मॅच वगळता बॅटींगला धार्जीण्या खेळपट्ट्या असतात. एखाद दिवशी पाउस वगैरे पडला तर ठीक आहे पण सरसकट तसे कधीच New Zealand मधून आणलेल्या खेळपट्ट्या नसतात. BTW चँपिअन्स उदाहरण् घेतोयस म्हणून त्या मॅचच्या आधीच्या मॅच आपण कशा जिंकल्या होत्या हे आठवतेय नाहिये का ?

मला अजूनही आश्चर्य वाटते, कि तुम्ही दोघे पहिल्या टेस्ट आधी टीम मधे बदल नको World Cup साठी म्हणून म्हणत होता नि आता सरळ सरळ १८० टर्न मारलाय Happy मी तर म्हणतो वर्षभर आहे त्या टीम मधले नि फार तर England ला खेळलेल्या India A ला वगळता अजून options ही नाहियेत नि कोणीही बाहेरचा तुम्ही म्हणता ते batting problem solve करू शकणार नाही. एक नाव वानगीदाखल द्या जो मधळ्या फळीत येऊन स्विंग कंडीशन्स सांभाळून दाखवेल. असा असता तर आधीच संघात नसता का ?

असामीजी,
चँपिअन्स ट्रॉफी सुद्धा ईंग्लिश वातावरणात, ईंग्लिश मातीत, ज्या महिन्यात वर्ल्ड कप असणार आहे त्याच महिन्यांत त्याच खेळाडूंना घेऊन अगदी मागच्याच वर्षी खेळलेला वर्ल्डकपसारखाच आय सी सी ईवेंट होता ह्याची कृपया नोंद घ्यावी.
रहाणेच्या २०१४ मध्ये लॉर्डसवर काढलेल्या शतकाचा हवाला आपण देत असू तर चँपिअन्स ट्रॉफी फायनल मधल्या घसरगुंडी चा देऊ नये म्हणता... अजबच न्याय आहे.

अगदी ह्या दौर्‍यामधेही नाही. >>८६ रनांनी एक आणि ८ विकेट्सने दुसरी ह्याला शरणांगती नाही म्हणत Uhoh

BTW चँपिअन्स उदाहरण् घेतोयस म्हणून त्या मॅचच्या आधीच्या मॅच आपण कशा जिंकल्या होत्या हे आठवतेय नाहिये का ? >> अ‍ॅनालिसिस हरलेल्या मॅचसचे, वीकनेसचे करायचे की जिंकलेल्या मॅचेसचे? स्ट्रेन्ग्थचे.

मला अजूनही आश्चर्य वाटते, कि तुम्ही दोघे पहिल्या टेस्ट आधी टीम मधे बदल नको World Cup साठी म्हणून म्हणत होता नि आता सरळ सरळ १८० टर्न मारलाय >> टीमनेही मारलाय ना त्याला आम्ही काय करणार... आणि आम्ही अजूनही म्हणतोय घोडे नाही जॉकी बदला... टीम नाही कोच बदला. Lol

रहाणेच्या २०१४ मध्ये लॉर्डसवर काढलेल्या शतकाचा हवाला आपण देत असू >> कोणी नि कधी दिला ?

८६ रनांनी एक आणि ८ विकेट्सने दुसरी ह्याला शरणांगती नाही म्हणत > >आणि त्या सिमिंग विकेट्स होत्या रे ? तुझी गाडी त्या एका सामन्यावर अडकली आहे त्याच्या मागे पुढे काय झाले (अगदी त्याच सामन्यात पाकिस्तानच्या इनिंगमधे काय झाले वगैरे) बघायचे नाही असे ठरवलयस का ?

आणि आम्ही अजूनही म्हणतोय घोडे नाही जॉकी बदला... टीम नाही कोच बदला >> कोच बदलून काय होणार ते सांग कि. से तुला कोच केलय नि अमर्याद अधिकार दिले आहेत. "कोणाला घेतोस " कि दिसतोय तो वीकनेस प्लग करशील ? आणि परत तू टेस्ट मॅचेस च्या जोरावर World Cup साठी ठरवूया वर आला आहेस हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. (कोच बदला ही मागणी लॉर्ड्स नंतर सुरू झालेली आहे) Wink

BTW please drop that जी रे. एक कचकचित शिवी देऊन बोल हव तर पण जी नको Happy

कोणी नि कधी दिला ? >> मागच्या पोष्टीत वाचला ... अगदी भज्जी आणि नासीर हुसेनने ही दिला.

आणि त्या सिमिंग विकेट्स होत्या रे ? तुझी गाडी त्या एका सामन्यावर अडकली आहे त्याच्या मागे पुढे काय झाले (अगदी त्याच सामन्यात पाकिस्तानच्या इनिंगमधे काय झाले वगैरे) बघायचे नाही असे ठरवलयस का ? >> मागच्या चार मॅचेसमध्ये तीनदा झाले की मग चौथ्यांदा, पाचव्यांदा आणि पुन्हा पुन्हा कितीदा ही होऊ शकते, हे तुम्हीपण समजून घ्या की If it walks like duck , quacks like a duck then....
आणि टेस्ट मध्ये तर बघतोच आहे. मध्ये भारतात येऊन ढीगानी शतकं हाणून गेले त्याने काय होते?
तू म्हणतोस...कपडे आणि चेंडूचा रंग बदलल्याने... आणि पीचवर (सपोझेड्ली) आयसीसी चा कमर्शिअल ठप्पा लागल्याने आपले घोडे जे आता नीट ऊभे राहू शकत नाहीयेत ते अचानक ईंग्लिश डर्बीत धावायला लागतील.... मी नाही बाबा ईतका स्वप्नाळू.

कोच बदलून काय होणार ते सांग कि. से तुला कोच केलय नि अमर्याद अधिकार दिले आहेत. "कोणाला घेतोस " कि दिसतोय तो वीकनेस प्लग करशील ? >> ते बघणं सिलेक्शन कमिटीचं काम आहे ना... मला दमडी मिळणार नाही तर मी का करू. आणि अश्या क्रिटिकल कंडिशनम मध्ये वेकपम करायचेच काम करण्यासाठीच बसले आहेत ना ते.
कुंबळेला आणा, द्रविडला आणा मग तू बघशीलच काय होतं ते. शास्त्रीपेक्षा अंडर १९ जिंकून दिलेला द्रविड जास्त फिट आहे त्या रोलसाठी.

BTW please drop that जी रे. एक कचकचित शिवी देऊन बोल हव तर पण जी नको >> गंमतीनं म्हणत होतो रे.

१८० चा टर्न नाहीये रे. मी कोच बदलण्याबद्दल लिहील्यावर, तू विचारलंस की वन-डे ला प्रॉब्लेम नसताना, फक्त टेस्ट मॅचेस च्या रिझल्ट साठी कोच का बदलायचा. त्याचं उत्तर देताना मी असं म्हट्लं की वन-डेज मधे प्रॉब्लेम्स नाहीत असं नाहीये, फक्त ते टेस्ट्स पेक्षा जास्त वेळा झाकले जाताहेत.
पुढे जाऊन मी असंही म्हणीन की, टेस्ट्स मधेही झाकले जातील, जर आपण इंडियातच टेस्ट्स खेळलो तर.

कुंबळेला आणा, द्रविडला आणा मग तू बघशीलच काय होतं ते. शास्त्रीपेक्षा अंडर १९ जिंकून दिलेला द्रविड जास्त फिट आहे त्या रोलसाठी. >> मला नाही वाटत ह्याबद्दल वाद सुरू होता. तेच काय अजून बरेच जण जसे कि लाल्चंद राजपूत वगैरेही शास्त्रीपेक्षा फिट आहेत. मुद्दा World Cup च्या आधी कोच बदलण्याचा होता. वर्षभराचा वेळ नवा कोच आणून त्याला हवी तशी घडी बसवून देण्यासाठी पुरेसा आहे का ? प्लेयर कुठले आणशील हे मुद्दम विचारले होते. आडात असते तर त्यांना options तरी मिळतील कोणाला आणायला नाही तर नुसतेच बळीचे बकरे का बनवतोयस

मागच्या पोष्टीत वाचला ... अगदी भज्जी आणि नासीर हुसेनने ही दिला. >> मी नाहि दिला रे बाबा. तू बहुधा इतरत्र काहितरी वाचून इथे जोडतोयस.

फे फे आलं लक्षात.

वर्षभराचा वेळ नवा कोच आणून त्याला हवी तशी घडी बसवून देण्यासाठी पुरेसा आहे का ? >> किती वेळ पुरेसा असतो घडी बसवायला?
ते अनुभवी प्लेअर्स आहेत रे... आय पी एल वगैरे खेळतात तेव्हा वेगळे कोच असतात ना त्यांचे मग करतात ना अ‍ॅडजस्ट. ईंग्लंडचे तर टेस्ट आणि वनडेचे कॅप्टन्स ही वेगळे आहेत.. मग तेव्हा नाही करत का ते खेळाडू अ‍ॅडजस्ट? समजा कॅप्टनच ईंज्युअर झाला ऐन टुर्नामेंटला नवीन कॅप्टन आला मग तेव्हाही करणार ना अ‍ॅडजस्ट. ऊलट वर्षभर भरपूर मोठा वेळ आहे नवीन कोच येऊन अ‍ॅडजस्ट व्हायला.
कॅचेस पकडणे तरी सेमच असते ना वन डे आणि टेस्ट मध्ये का ते ही तुझ्यामते वेगळे असते. मग एवढे कॅचेस सुटत आहेत तर फिलिडिंग कोच आणि हेड कोच ला जाब नाही विचारणार का? बॅटिंग बॉलिंगचे ही सेमच आहे.

मी नाहि दिला रे बाबा. तू बहुधा इतरत्र काहितरी वाचून इथे जोडतोयस. >>आता मागच्या पोष्टी पुन्हा बघतो.

मग एवढे कॅचेस सुटत आहेत तर फिलिडिंग कोच आणि हेड कोच ला जाब नाही विचारणार का? बॅटिंग बॉलिंगचे ही सेमच आहे. >> वर माझे एक पोस्ट आहे त्यातले हे वाक्य "हयात कुठेही accountability नको असे मी म्हणत नाहिये." I rest my case My Lord. Happy

<<<कसोटी सामनयांसाठीचं तंत्र, मानसिक ठेवण व दौरयासाठीचा वैशिठयपूर्ण सराव >>>
या गोष्टी खरेच खूप जास्त महत्वाच्या आहेत, त्यांच्याकडे लक्ष दिल्या जात नाही असे दिसते, नाहीतर टेस्ट मधे ज्यांना घेतले त्यांची बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग उच्च दर्जाचीच असणार! पण कसोटी सामनयांसाठीचं तंत्र, मानसिक ठेवण व दौरयासाठीचा वैशिठयपूर्ण सराव इकडे जास्त लक्ष पाहिजे.

मुळात जिंकण्या हरण्यापेक्षा धंदा या दृष्टीने हा खेळ खेळला जातो. कितीहि नि कसेहि वाईट हरले तरी खेळाडूंना भरपूर पैसे मिळतातच. मग हरेनात का? गंमत म्हणून खेळायचे. इतर नोकर्‍यांमधे असे चालेल का?

काही असो, आता मला एव्हढेच वाटते, दाढी मिशा काढणे, देवला बोकड बळी देणे असलेच उपाय उरले आहेत! बाकीचे सगळे अनेक वर्षे बोंबलून झाले, दिवसेंदिवस बिघडतच चालले आहे. पण बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग उच्च दर्जाची असल्याने मधून मधून जिंकतात.

वा रे, मी तुला असामी जी नाही म्हणावयाचे आणि तू मला लॉर्ड म्हणणार? हा कुठला न्याय Lol

Anyways, बघूयात पुढच्या तीन सामन्यात काय दिवे लागतात मग बोलू पुन्हा आपण असामी जी. Wink

राष्ट्रीय संघाचा कोच म्हणजे शाळेच्या मैदानावरचा कोच नव्हे ; तो कांहीं टिप्स देवूं शकतो, ' फाईन टयूनींग ' करूं शकतो , विश्लेषण व डांवपेंच यामधे मदत करूं शकतो . पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलेल्या खेळाडूनी मानसिक, तंत्रविषयक तयारीसाठी कोचवरच अवलंबून रहाणं लज्जास्पदच. इंग्लंडमधलं वातावरण, तिथे खेळण्यासाठी अत्यावश्यक वेगळं तंत्र ्याची माहिती/जाणीव तर गल्लीबोळातून खेळणारया मुलानाही असतेच. प्रत्यक्ष तें तंत्र आत्मसात करणं निश्चितच सोपं नसलं तरीही अचानक कांही तरी भयानक समोर आलं, अशी अवस्था होणं त्या स्तरावर खेळणारयाना शोभत नाही. कोचला इतर कोणतेही दोष लावतां येतील पण इंग्लीश वातावरणात खेळण्यासाठी लागणार्या मानसिक व तांत्रिक तयारीच्या अभावाबददल (त्यात अडचणी असूनही) खेळाडूंनीच दोष स्वीकारला पाहिजे.

"इंग्लीश वातावरणात खेळण्यासाठी लागणार्या मानसिक व तांत्रिक तयारीच्या अभावाबददल (त्यात अडचणी असूनही) खेळाडूंनीच दोष स्वीकारला पाहिजे.' - हे बहुतांशी खरं आहे भाऊ. पण इथे जर स्वतः कोच च प्रॅक्टीस मॅचेस चे दिवस कमी करणं / मॅचेस कॅन्सल करून नेट-प्रॅक्टीस चा पर्याय स्वीकारत असेल, पहिली मॅच हारल्यावर सगळ्या टीम ला मधले पाचही दिवस युरोप ट्रीपला घेऊन जात असेल, तर त्याच्याविषयी प्रश्नचिन्ह उमटतं. माझा त्या व्हेकेशन ला विरोध नाहीये. असा ब्रेक उपयोगी ठरतो, पण तो लिमिटेड असावा. तुम्ही जेव्हा मोठीमोठी विधानं करता, तेव्हा अ‍ॅक्शन्स पण त्यांना पूरक असाव्या.

Pages