भाषा
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
2
लेखी बोली चित्र मुकी
भाषा येवो कुठल्याही रूपे
कुणा कुणाला भावून जाई
त़र कुणाच्या मनी खुपे
भाषा अगदी पाण्या सारखी
जिला स्वत:चा रंग नाही
देणाऱ्याने दिलेला, घेणाऱ्याने घेतलेला
रंग सदा वाह़त राही
भाषा अगदी पाण्या सारखी
सात्विक अन् जीवनदायी
उगाच कुणी दुष्ट त्यात
म़नचे विष कालवत राही
भाषा अगदी पाण्या सारखी
बरेचजण वापरतात
उगाच आपली आहे म्हणून
इथे तिथे सांडत असतात
भाषा अगदी पाण्या सारखी
निर्मळ अन् प्रवाही
जिथे जिथे जीवन आहे
तिथे तिथे वाहत राही
कुणी म्हणेल भाषेला
पाण्या इतकं महत्व नाही
तरी शेवटी तिच्या शिवाय
पाणीही मागता येत नाही … .
सुधीर
प्रकार:
शेअर करा
छान आहे...
छान आहे...
सुमेधा
सुमेधा अभिप्रायाबद्दल धंन्यवाद
सुधीर