Submitted by कटप्पा on 27 July, 2018 - 15:26
आहे का तुमच्याकडे एखादी सुपेरपॉवर जी फक्त तुम्हाला माहीत आहे? अशी फालतू पॉवर की जी तुम्हाला सुपरहिरो चा दर्जा देऊ शकत नाही पण वेगळी आहे ?
आता माझे बघा - मी कधी हवे तेंव्हा झोपू शकतो. अगदी ढोल ताशे वाजत असतील तरी मी ठरवले झोपायचे समजा तर मी पाच मिनिटात झोपू शकतो. दुपारी जेवून, संध्याकाळी 7 पर्यंत झोपून परत 1 तास डिनर करून परत झोपू शकतो. आहे ना फालतू पॉवर?
माझा रूममेट - त्याच्याकडे एक युनिक पॉवर आहे. त्याला झुरळांचा वास येतो. रूम मध्ये झुरळ असेल त्याला वास येतो आणि तो सांगतो पण कोणत्या बाजूने येतोय.
आणखी एक गोष्ट तो करतो- एकाच दिवसात तो 2 पाउंड वजन कमी किंवा जास्त करून दाखवतो ( टॉयलेट ला न जाता)
तुमच्याकडे कोणती फालतू सुपरपॉवर आहे?????
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी खुप भरभर वाचतो. एका तासात
मी खुप भरभर वाचतो. एका तासात मी जेवढं वाचून काढतो तेवढं वेगाने वाचू शकणारं मला अद्याप कुणी भेटलेलं नाही.
दरवर्षी एक पुस्तक पब्लिश होतं
दरवर्षी एक पुस्तक पब्लिश होतं. ते वाचणार का एका तासात ?
माबोवर हवे तितके पुनर्जन्म
माबोवर हवे तितके पुनर्जन्म घेणे ही सुप्पर पावर आहे.
(ता.क. वजा धमकी : मी लवकरच माझ्याच डू आय बद्दल धागा काढणार आहे
)
- अड्डेवाला डॉक्
अंधारात सुद्धा माझा निशाणा
अंधारात सुद्धा माझा निशाणा बरोब्बर लागतो आणि विव्हळण्याचा, फडफडण्याचा आवाज येतोच येतो. आत्ता पण आला !

मी किमान ४ ते ५ पुस्तकांचं
मी किमान ४ ते ५ पुस्तकांचं समांतर वाचन सुरू ठेऊ शकते.
एक पुस्तक थोडं वाचून झालं, ते बाजूला ठेवून दुसरं, तिसरं... मग मधेच पहिलं... असं माझं अनेकदा होतं...
एकाही पुस्तकाची लिंक तुटत नाही, मध्ये १-२ महिने गेले तरी परत कुठलंही पुस्तक पुढे वाचायला सुरू करू शकते.
१९९२-९३ साली कधीतरी पुण्यात
१९९२-९३ साली कधीतरी पुण्यात माझ्या एका मित्राने टीवीचं दुकान टाकलं. तेव्हा केबलवर वेगवेगळे चॅनेल्स नुकतेच सुरु झाले होते आणि आताच्या डीश टीवीसारखं नव्हतं तेव्हा म्हणजे तुमच्याकडे १० टीवी असतील तर एकाच एक कनेक्षन वर तुम्ही १० वेगवेगळ्या टीवींवर १० वेगवेगळे चॅनेल्स पाहू शकायचा (आता त्याकरिता १० सेट टॉपबॉक्स घ्यावे लागतील आणि प्रत्येकाचं वेगळं सब्स्क्रिप्शन भरावं लागेल नाहीतर एकच डबा सगळ्या टीवींवर जोडला तर सगळ्याच टीवींवर एकच चॅनेल दिसेल. असो.) तर मित्राच्या दुकानात एका शोकेसवर १२ टीवी लावलेले असायचे आणि प्रत्येकावर वेगवेगळे चॅनेल्स असायचे. मी संध्याकाळी २ ते ३ तास रोज तिथे जायचो. म्हणजे मला तसा नादच लागला. त्या २-३ तासांत मी त्या १२ टीवींसमोर बसून एकाच वेळी सगळे चॅनेल्स पाह्यचो. आवाज बारीक किंवा म्यूट केलेला असायचा पण तरी चित्र बघून बरीच स्टोरी समजायची. तर त्या २-३ तासांत मी एकाच वेळी किमान सहा चॅनेल्सवरचे कार्यक्रम ग्रास्प करायचो आणि इतक्या वेळांत मी त्या सहाही चॅनेल्सवर काय पाह्यलं ते बर्यापैकी नंतर सांगू शकायचो.
ही सुपरपॉवर आधी फालतू वाटायची पण आता बंगल्याच्या वेगवेगळ्या बाजूंना लावलेल्या आठ सीसीटीवी कॅमेर्याचं लाइव्ह शुटिंग एकाच वेळी दोन टीवींवर (१ टीवीवर चार या प्रमाणे) पाहताना ही सुपरपॉवर फारच उपयोगी पडते.
पण आता बंगल्याच्या वेगवेगळ्या
पण आता बंगल्याच्या वेगवेगळ्या बाजूंना लावलेल्या आठ सीसीटीवी कॅमेर्याचं लाइव्ह शुटिंग एकाच वेळी दोन टीवींवर >>>> बंगला कुणाचा आहे ?
माझाच की. इतरांच्या
माझाच की. इतरांच्या बंगल्यावर मी कशाला पाळत ठेवतोय?
ओह. तुम्ही नेपाळी आहात का ?
ओह. तुम्ही नेपाळी आहात का ?
(No subject)
१९९२-९३ साली कधीतरी पुण्यात
१९९२-९३ साली कधीतरी पुण्यात माझ्या एका मित्राने टीवीचं दुकान टाकलं. तेव्हा केबलवर वेगवेगळे चॅनेल्स नुकतेच सुरु झाले होते आणि आताच्या डीश टीवीसारखं नव्हतं तेव्हा म्हणजे तुमच्याकडे १० टीवी असतील तर एकाच एक कनेक्षन वर तुम्ही १० वेगवेगळ्या टीवींवर १० वेगवेगळे चॅनेल्स पाहू शकायचा.......
Submitted by बिपीन चन्द्र हर... on 29 July, 2018 - 21:39
अशीच काहीशी सवय मलाही आहे! काही विशेष घटना, मोठा अपघात घडला की मी desktop वर एकाच वेळी किमान ४ न्यूज चॅॅनेल्स सुरु करून बसतो! (जणू काही ती परिस्थिती नियंत्रणात आणणे ही माझी जबाबदारी आहे!!!
)
एकाच वेळी अनेक टीव्ही.. अफाट
एकाच वेळी अनेक टीव्ही.. अफाट आहात राव.. मला एकच बघायल वैताग येतो. टीव्ही बघताना हाताला डोक्याला काहीतरी वेगळा चाळा लागतोच.
असो,
@ टॉपिक मागेही नमूद केलेले. मला चालताना पावले आणि लिहिताना शब्द मोजायची सवय आहे. चालताना पावले मोजणे साधारण गोष्ट आहे. पण लिहिताबा शब्द मोजणे अवघड. ट्राय करून बघा ..
एकदा काही मित्रांसोबत
एकदा काही मित्रांसोबत पार्टीला बसलेलो. ते पिणारे होते. मला दारूतले काही कळत नाही पण बहुतेक बीअरच्या बाटल्या मागवल्या होत्या. घाईगडबडीत ओपनर आणायला विसरलेलो. एक जण आणायला गेला. पण ईतरांना धीर कसला. गरमागरम सीग कबाब सोबत थंडगार बीअर. सारेच उतावीळ. मग आमच्यातील एकाने पटापट दातानेच एकेका बाटलीचे बूच उघडत एकेकाच्या हातात बाटली द्यायला सुरुवात केली. ओपनरपेक्षाही फास्ट. सेहवागपेक्षाही फास्टर. भारी फोडाफोडी. मी म्हटलं बघू तरी आपल्याला कितपत जनतेय. तर दात तुटून हातात यायचा शिल्लल राहिलेला. म्हटलं ही बाबा खरी सुपरपॉवर !
वेगवेगळ्या विंडोमध्ये
वेगवेगळ्या विंडोमध्ये वेगवेगळ्या मैत्रीणींशी एकाच वेळी चॅटींग करायचा कोणाचा काय रेकॉर्ड आहे. एकाच वेळी दहाबारा मुलींशी चॅट करणे माझ्यासाठी खूप कॉमन होते. आणि त्यातही काही जणी तर फक्त माझ्याशीच बोलत असायच्या. म्हणजे त्यांचे रिप्लाय फास्ट यायचे. अगदी लढाईच्या थाटात हल्ला परतवून लावावा अशी मजा यायची चॅट करायला. आणि त्यातही हाय हेल्लो जेवलीस का आजचा दिवस कसा गेला वगैरे बोअरींग टिपिकल चॅट नसायची. ईण्टरेस्टींग नाही बोललो तर त्या खिडकीचे शटर डाऊन याची कल्पना ठेऊनच बोलायचो. चॅटींग हा खरेच आपला टायपिंग गुरू असतो.
ओह. तुम्ही नेपाळी आहात का ?
ओह. तुम्ही नेपाळी आहात का ?
नवीन Submitted by डबा बाटली on 29 July, 2018 - 22:32
स्वतःच्या (च) बंगल्यावर सिक्युरिटी कॅमेर्यांमधून नजर ठेवणारे लोक (फक्त) नेपाळीच (च) असतात?
इतर देशांच्या नागरिकांविषयीही माहिती घ्यावी.
नाही पण तुम्ही मुर्ख आहात असे
नाही पण तुम्ही मुर्ख आहात असे दिसते. >>>>
अहो नेपाळी (गुरखे) स्वतःच्या घराच्या सिक्युरिटी साठी दुसरा गुरखा नेमत नाहीत. हा प्रसिद्ध विनोद आहे. मला वाटले तुम्हाला विबु असावी...
जाने भी दो यारो मधला
जाने भी दो यारो मधला धृतराष्ट्र मोड:

ये क्या हो रहा है????
वेगवेगळ्या विंडोमध्ये
वेगवेगळ्या विंडोमध्ये वेगवेगळ्या मैत्रीणींशी एकाच वेळी चॅटींग करायचा >>> हे कसं करतात? आणि कोणत्या ऍप्लिकेशनमध्ये? एकावेळी दहा विंडो उघडता येतात का?
मी desktop वर एकाच वेळी किमान ४ न्यूज चॅॅनेल्स सुरु करून बसतो! >>> स्क्रीनच्या चार कोपऱ्यात चार चॅनेल दिसतात का? की एक विंडो खाली आणून ठेवायची आणि दुसरी उघडायची. असं आलटून पालटून चारही उघडबंद करतात?
वरील दोन्ही प्रश्न मी सहज उत्सुकता म्हणून विचारलेत. गैरसमज नसावा.
Submitted by सचिन काळे on 30
Submitted by सचिन काळे on 30 July, 2018 - 11:46
---
desktop वर एकाच वेळी ४ न्यूज चॅॅनेल्स पाहायला, चार वेगवेगळे ब्राऊझर इंस्टॉल करुन घ्यावे लागतील तुम्हाला तुमच्या पीसीवर.
चार वेगवेगळे ब्राऊझर इंस्टॉल
चार वेगवेगळे ब्राऊझर इंस्टॉल करुन घ्यावे लागतील तुम्हाला तुमच्या पीसीवर. >>> मला वाटते एकाच ब्राऊसरमध्ये चार पेज ओपन करून आलटून पालटून चॅनेल पहाता येतील.
ब्राउझर विंडोची साइझ लहानमोठी
ब्राउझर विंडोची साइझ लहानमोठी करता येते की मंडळी.
अरे वा लले!
अरे वा लले!
मी याबाबतीत जरा स्लो... ४-५ तर नाही पण २-३ पुस्तकं वाचतो अशी... बहुतेक वेळेला पान नं सुद्धा लक्षात असतात. पानं दुमडणं, बुकमार्क वगैरे वापरत नाही मी...
यावरून एक आठवलं. सुपरपॉवर
यावरून एक आठवलं. सुपरपॉवर वगैरे नाही, पण पुस्तक वाचताना मधेच उठून जावं लागलं, तर बर्याच वेळाने परत येऊनही आपोआप जिथपर्यंत वाचलं होतं तिथूनच वाचायला सुरुवात होते. फार तर एखादी ओळ वरखाली. लिंक लागायला मागच्या दोन तीन ओळी वाचाव्या लागतात, पण नॅचरली नजर तिथेच जाते जिथे आधी वाचायचं सोडलं होतं.
लिंक लागायला मागच्या दोन तीन
लिंक लागायला मागच्या दोन तीन ओळी वाचाव्या लागतात, पण नॅचरली नजर तिथेच जाते जिथे आधी वाचायचं सोडलं होतं
>>>
हे बहुतेक सर्वांच्या बाबतीत होते. याचे काय मेकानिजम आहे शोधायला पाहिजे
(No subject)
हे घाईघाईत केलं आहे.
आता मी उजव्या हाताने जेवतोय,
आता मी उजव्या हाताने जेवतोय, आणि डाव्या हाताने समोरच्या लॅपटॉपवर टाईप करतोय - सुपरपॉवर?
याबरोबरच पायाने मोबाईल वर
याबरोबरच पायाने मोबाईल वर दुसऱ्या आयडी ने टाईप केले तर सुपेरपॉवर.
केलं असते, पण आज पायांना
केलं असते, पण आज पायांना मेहंदी लावलीय
येनीवेज, शुभरात्री
शब्बा अनुपम खेर ☺️
शब्बा अनुपम खेर ☺️
याचे काय मेकानिजम आहे शोधायला
याचे काय मेकानिजम आहे शोधायला पाहिजे>> लास्ट लोकेशन मेंदूतल्या स्टॅकवर जात असेल.
Pages