प्रवासात रस असल्याने त्याच्या आयुष्यातला बराचसा कालखंड हा प्रवासातच व्यतीत झाला होता. अनेक भुभाग, अनेक देश, त्यांचे रितीरिवाज, संस्कृती, भाषा, कला पहात तो बराच फिरला होता. आज मात्र दिवसभर चालूनही त्याला थकवा आला नव्हता. कारण आजुबाजूचा सधन शेती, निसर्ग असलेला भाग, त्या भागातून जाणारा रस्ता, रस्त्यातील विश्रांती स्थळे, पाणपोया या सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतलेली दिसत होती. तो शहराच्या प्रवेशद्वारावर पोहचला तेंव्हा पहारेदारांनी अत्यंत नम्रपणे पण कसोशीने त्याची चौकशी करुन त्याला शहरात प्रवेश दिला होता. “राजधानीचे शहर असल्याने काटेकोर चौकशी करावी लागते” असे सांगत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती. सोबतच शुभेच्छा द्यायलाही ते सैनिक विसरले नव्हते. हे सौजन्य तो प्रथमच अनुभवत होता.
राजा अत्यंत कर्तव्यदक्ष होता. त्यामुळे “जसा राजा, तशी प्रजा” या न्यायाप्रमाणे सगळीच प्रजा आनंदी, सुखी होती. शेतीत अनेक प्रयोग सुरु होते. ऊत्पादनात वाढ होत होती. दर्जा सुधारत होता. ऊत्तम दळण-वळणामुळे व्यापार चढता होता. शस्त्रशाळेत वेगवेगळी शस्त्रे तयार होत होती. अश्वांच्या वेगवेगळ्या जातींचे संकर घडवून अधिक दमदार अश्वांचे बिज तयार केले जात होते. त्याबरोबरच साहित्यीक, गायक, चित्रकार, मुर्तीकार आणि ईतरही कलांना राजाश्रय असल्याने सगळ्याच कला आणि कलाकार बहरत होते. कधी काळी निर्माण होणारा एखादा वाद सामान्य सरकारी अधिकाऱ्याच्या मध्यस्थीतीने मिटत होते. आणि या सर्वांवर राजाचे वैयक्तिक, बारकाईने लक्ष होते. त्याला शहराच्या रस्त्यावरुन फिरताना हे सगळे जाणवत होते, दिसत होते.
असेच फिरताना त्याला दोन व्यक्तिंचे संभाषण ऐकायला मिळाले. लाल वस्त्रे परिधान केलेली एक व्यक्ती पांढरे शुभ्र वस्त्रे परिधान केलेल्या व्यक्तीच्या कमरेला बांधलेल्या तलवारीचे कौतुक करत होता.
“अप्रतिम शस्त्र आहे आपले”
“हो. मी हे खास लक्ष घालून, माझ्या गरजेप्रमाणे शस्त्रशाळेत बनवून घेतले आहे. तुमचीही तलवार पल्लेदार दिसते आहे” पांढरे वस्त्र घातलेला ऊत्तरला.
“होय. ही मी एका परकी व्यापाऱ्याकडून १००० सुवर्ण मुद्रा देऊन खरेदी केली आहे” असे म्हणत त्याने तलवार म्यानातुन बाहेर काढली आणि दोन बोटांवर तोलली. मुठ आणि पाते यांचे अचुक संतुलन असलेल्या स्वतःच्या तलवारीकडे त्याने मोठ्या कौतूकाने पाहीले.
लाल वस्त्रे असलेल्याने दुसऱ्याला विचारले “दोघांचीही शस्त्रे विलक्षण आहेत. दोन दोन हात करुयात का?”
पांढरे वस्त्रे असलेल्या व्यक्तीने आनंदाने मान हलवत सांगीतले “का नाही! दोघांच्याही शस्त्रांची आणि युद्धकौशल्याची परिक्षा होईल.”
पहाता पहाता दोघांनीही पवित्रा घेतला. आजुबाजूच्या लोकांच्याही काय होतेय हे लक्षात आले. त्यांनी आपसूक दोघांनाही जागा करुन दिली. रस्त्याच्या मधोमध ऊभे असलेल्या त्या दोघांभोवती नकळत पहाणाऱ्यांचे एक वर्तूळ तयार झाले. प्रवासीही ऊत्सुकतेने पुढे काय होते ते पाहू लागला. दोघेही तलवारबाज कधी एकमेकांच्या डोळ्यात तर कधी पायांच्या हालचालीवर लक्ष ठेवून अंदाज घेत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर मंद स्मित आणि डोळ्यात प्रचंड सावधपणा दिसत होता. क्षणभर दोघांनीही एकमेकांचा अंदाज घेतला आणि काही कळायच्या आतच लाल वस्त्र घातलेल्या व्यक्तीने डोळ्याचे पाते लवायच्या आत पहिला वार केला. समोरच्याने तो तितक्याच सफाईने चुकवला आणि परत पवित्रा घेतला. आता खरे तर दुसरा वार पांढरे वस्त्र परिधान केलेल्या व्यक्तीने करायला हवा होता. पण त्याच्या बचावात्मक हालचाली पाहून तसे काही वाटत नव्हते. पुन्हा पहिल्याने वार केला. या वेळी त्याने पहिला वार करुन स्वतःभोवती एक गिरकी घेतली आणि लगोलग दुसराही वार केला. शुभ्र वस्त्राने अतिशय चपळ हालचाली करत वार चुकवले आणि पुन्हा पवित्रा घेतला. लाल वस्त्राने यावेळी अगदी ठेवणीतला वार केला जो वर्मी बसायलाच हवा होता. पण शुभ्र वस्त्राने अत्यंत सहजतेने तो वार आपल्या तलवारीवर झेलला. दोघांच्या तलवारीच्या आघाताने काही तेजस्वी ठिणग्या ऊडाल्या. शुभ्र वस्त्राने हसत दोन पावले मागे घेत पुन्हा पवित्रा घेतला. दोघांचे ते डावपेच पहात असलेल्या प्रेक्षकांना काही वेळातच त्या दोघांचे युध्दकौशल्य लक्षात आले आणि सुवर्णमुद्रांची पैज लावायला सुरवात केली. कोणी लाल वस्त्रावर मुद्रा लावल्या तर कोणी शुभ्र वस्त्रावर. प्रवासीही आता ऊत्कंठतेने पाहू लागला. लाल वस्त्राचे चार वार झाल्यावर शुभ्र वस्त्राचा एखादाच वार व्हायचा पण तो फार विचारपुर्वक केलेला असायचा. लाल वस्त्राला त्यातून वाचणे कठीण व्हायचे. पहाता पहाता दोघांच्याही अंगातुन घामाच्या धारा वहायला लागल्या होत्या. शुभ्र वस्त्राने एक वार असा शिताफीने केला की लाल वस्त्राला मोठ्या मुश्कीलीने तो अडवता आला. पण तो वार अडवून लाल वस्त्राने प्रत्युत्यर म्हणून अतिशय त्वेषाने वार केला. विज कोसळावी तशी त्याची तलवार काडकन समोरच्याचे वर्म पाहून कोसळली. पण व्यर्थ. शुभ्र वस्त्राने लिलया तो वार परतवला. लढत आता रंगत होती. प्रवासीही ऊत्सुकतेने पहात होता. दोघांचेही लढण्याचे कौशल्य पाहून तो चकीत झाला होता. पुढे काय होते याची त्याला ऊत्कंठा लागली होती. पण त्याचे आजुबाजूला लक्ष गेले तर प्रेक्षकांचे वर्तुळ मोडत चालले होते. काही पहाणारे आपापल्या मार्गाला लागले होते. ज्यांनी पैजा लावल्या होत्या ते सुवर्णमुद्रांचे देणेघेणे करत होते. सगळ्यांचे वागणे “लढत निकाली” लागल्यासारखे होते. पहाता पहाता रस्ता मोकळा झाला.
प्रवाशाला काही कळेना. नुकतीच कुठे लढाई रंगात आली होती आणि हे सगळे असे काय वागत होते. त्याने न रहावून परत जाणाऱ्या शेवटच्या वृध्द व्यक्तीला विचारले “अहो, आता कुठे तलवारबाजीला रंग चढतोय आणि तुम्ही सगळे निघाला कुठे? काय झाले?”
तो वृद्ध म्हणाला “लढाईचा निकाल लागला मघाशीच. आता थांबून काय करायचे येथे”
प्रवाशाला काही कळेना. त्याने विचारले “निकाल लागला? कधी? कोण जिंकले?”
वृध्द ऊत्तरला “ईतका वेळ संयमीत लढाई खेळताना जेंव्हा त्या लाल वस्त्र परिधान केलेल्या व्यक्तीने त्वेषाने वार केला तेंव्हाच तो हरला आणि लढाई संपली.”
मार्मिक लघु कथा
(कथासुत्र-बहुधा झेनकथा, शब्दांकन-माझे)
नाही समजली. समजावे ल का कोणी
नाही समजली. समजावे ल का कोणी प्लिज.
“पण तो वार अडवून लाल वस्राने
“पण तो वार अडवून लाल वस्राने प्रत्युत्यर म्हणून अतिशय त्वेषाने वार केला. “
The spirit of the dual was lost at this point of time. It was supposed to be a friendly game played with sportsmanship spirit
मस्त् ही कथाही
मस्त् ही कथाही
वा शाली ! मजा आली.
वा शाली ! मजा आली.
मस्त कथा आणि संकल्पना!
मस्त कथा आणि संकल्पना! पुभाप्र!
छानच
छानच
तुम्ही खूप जबरदस्त लिहीता.ही
तुम्ही खूप जबरदस्त लिहीता.ही कथा वाचताना जी एं च्या प्रवासी आणि एस्किलार दोन्ही कथांच्या लेखनशैलीची आठवण आली.
या कथा नीट कॉपीराईट सहीत जपून ठेवून अमॅझॉन इ बुक बनवा.यु हॅव इट इन यु.
वाह !
वाह !
तुम्हा सगळ्यांना या कथा
तुम्हा सगळ्यांना या कथा आवडताहेत हे पाहून छान वाटले. सगळ्यांचे धन्यवाद!
या कथा नीट कॉपीराईट सहीत जपून ठेवून अमॅझॉन इ बुक बनवा.>>> mi_anu, फक्त शब्दांकन माझे आहे, कथा नाहीत. प्रतिसादासाठी खुप धन्यवाद!
सुंदर!!
सुंदर!!
MAST
MAST
छानच! आवडली ही देखिल कथा!
छानच! आवडली ही देखिल कथा!
आवडली ही देखिल कथा! >> +१
आवडली ही देखिल कथा! >> +१
आवडली ही देखिल कथा!>>
आवडली ही देखिल कथा!>>+११११११११
या कथेचं तात्पर्य आधीच्या
या कथेचं तात्पर्य आधीच्या कथेपेक्षा जास्त आवडलं.
शस्र / वस्र या शब्दांऐवजी शस्त्र / वस्त्र हे शब्द वापराल का?
वाह! सुरेख. हि पण आवडली.
वाह! सुरेख. हि पण आवडली.
प्रतिसादासाठी सगळ्यांचे
प्रतिसादासाठी सगळ्यांचे मनापासून आभार!
व्यत्यय, सुचवल्याप्रमाणे बदल केला आहे. खुप धन्यवाद!
मस्त
मस्त
छानच! आवडली ही देखिल कथा
छानच! आवडली ही देखिल कथा
मालक - लवकर टाका की पुढचा भाग
मालक - लवकर टाका की पुढचा भाग.
मस्त...
मस्त...
“जशी राजा, तशी प्रजा”
“जसा राजा, तशी प्रजा" कराल का..
मस्त.
मस्त.
सगळ्यांचे धन्यवाद!
सगळ्यांचे धन्यवाद!
बदल केला आहे Namokar. खुप आभार.
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
वाह!
वाह!
भारीच लिहिले शाली
भारीच लिहिले शाली
वा वा! मस्त!
वा वा! मस्त!
मस्त!
मस्त!
ही कथा माहीत असुनही, तुमच्या
ही कथा माहीत असुनही, तुमच्या शब्दांनी उत्सुकता वाढवली
मस्तच
मस्त
मस्त